जिताडा म्हटला म्हणजे शेतकर्यांना पर्वणीच असायची आधी. शेतात पाणी साचल की जिताडे येत असत. शेतातले जिताडे म्हणजे चविष्ट मांसाहार. हल्ली शेतातले जिताडे खुप कमी मिळतात. आता तळ्यात, खाडीत आणि समुद्रात जास्त सापडतात. तळ्यातल्या जिताड्यांना जास्त वईस वास असतो पण शेतातले किंवा खाडीतले जिताडे चवदार असायचे. पुर्वी शेतात जिताडे आले की शेतकरी ते पकडून अगदी अलिपलीकडच्या गावांतील नातलगांनासुद्धा भेट द्यायचे.
जिताड्याची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मग जर जिताडी कापुन घ्यावी. डोके व शेपटाचा भाग कालवणासाठी वापरावे व मधल्या तुकड्या तळण्यासाठी वापराव्यात. सगळ कालवणासाठी किंवा तळण्यासाठी वापरल तरी चालतच.
जिताड्याच्या तळण्याचे साहित्य :
जिताड्याच्या तुकड्या
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
वरचे सगळ साहित्य तळण्यासाठी वापरणार्या तुकड्यांना चांगल चोळा. थोडा लिंबुरस लावला तरी छान होतात तुकड्या. आणि हे मुरवलत तर अजुनच चविष्ट.
चला आता तव्यावर टाका बघु तळायला.
मिडीयम गॅसवर चांगल्या शिजवा पलटी करुन चांगल्या खरपुस भाजुन घ्या. तळून अश्या तुकड्या तयार होऊन जेवणावर घ्यायच्या आधीच एखादी मटकावली जाते.
जिताड्याच्या कालवणाचे साहित्य :
जिताडी (कापुन, धुवुन)
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
चिंचेचा कोळ
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.
जिताड्याच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घालावे वर जिताड्यांचे तुकडे घालावेत. वर वाटण, चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवावे. ४-५ मिनीटांत गॅस बंद करावा.
असे मस्त लाल भडक कालवण तय्यार.
प्रतिक्रिया
20 Oct 2010 - 4:44 pm | गणपा
ब्रंम्हानंदी टाळी लावुन बसलो आहे.
20 Oct 2010 - 4:48 pm | अब् क
मस्त!!!!!!!!!
अवान्तरः तुम्हि कोकण साइड्च्या वाट्त!!!!!!!!!!! तुकड्या,टोपात ......
21 Oct 2010 - 1:22 am | नेत्रेश
पाककृती मध्ये कोकम वापरलेले नाही (चिंच) वापरलेली आहे. त्यावरुन कोकणातील नसाव्यात असे वाटते.
21 Oct 2010 - 12:15 pm | जागु
गणपा धन्यवाद.
अबक कोकणच समजा तुम्हाला खरडीत दिलय उत्तर.
20 Oct 2010 - 5:03 pm | सुनील
अनवट मत्स्याहारी पाकृंची परंपरा चालू ठेवल्याबद्दल आभार आणि अभिनंदन!
जिताडा मूळचा भातशेतीतील मासा. त्याची अंडी उन्हात करपत कशी नाहीत कुणास ठाऊक पण पाऊस सुरू झाला की त्यातून मासे बाहेर येतात. शेतकरी त्याला देवाचीच देणगी मानतात. अशी मिळालेली देवाची देणगी कोकणातील गरीबातील गरीब शेतकरीदेखिल बाजारात विकत नाही. स्वतः खातो, इतरांना देतो. बाजारात मिळणारे जिताडे हे मुद्दामहून तळ्यात संवर्धन केलेले! भातशेतीतील नव्हे!
असो. पेणहून अलिबागकडे जाताना वाटेत पोयनाडजवळ ब्रेकफास्ट म्हणून हॉटेल आहे. तिथे चांगले जिताडे मिळतात. ठाण्यात तीन हात नाक्यावर हॉटेल साईमास किंवा प्रताप टॉकीजसमोरील हॉटेल फिशलँडमध्ये उत्तम खरपूस तळलेले जिताडे मिळतात.
बाकी पाकृ आणि फोटो उत्तम आणि जीवघेणे हे वे सां न ल!
21 Oct 2010 - 12:18 pm | जागु
सुनिल खुप चांगली माहिती दिलीत.
20 Oct 2010 - 5:07 pm | सुहास..
गणपाशी सहमत !!
20 Oct 2010 - 6:24 pm | चिंतातुर जंतू
गावाकडच्या आठवणी यायला लागल्या! जिताडे म्हणजे पकडल्यावर पुष्कळ वेळ ताडताड उडत राहातात तेच ना? उडून वाश्यावर जाऊन बसल्याचा आठवतोय.
20 Oct 2010 - 7:29 pm | नंदन
वा, वा, झकास पाकृ!
जिताडा म्हणजे अतिशय चविष्ट मासा. [अलीकडेच तो सी-बास प्रजातीतला असल्याचं कुठेतरी वाचलं - एशियन सीबास हे त्याचं शास्त्रीय नाव.]
20 Oct 2010 - 8:30 pm | रेवती
मी शाकाहारी असूनही तुझ्या मत्स्यकृती पाहून खाण्याचा प्रयत्न करावा कि काय असं वाटायला लागलय.
20 Oct 2010 - 10:46 pm | बेसनलाडू
परमेश्वराचा प्रथमावतार तुमच्यावर प्रसन्न होवो. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा ;-)
(प्रयत्नवादी)बेसनलाडू
माहिती आणि पाककृती चवदारच! आता हा मासा शोधून मटकावायला हवा!
(मत्स्याहारी)बेसनलाडू
12 Nov 2010 - 11:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हिरव्या देशात मिळतो हा मासा? ऐकावे ते नवलच !!!
मिळाला तुम्हाला तिथे तर जरूर कळवा. चुकून कोल्ह्याची (पक्षी माझी) एखादी उडी ऊंच मारली गेली तर द्राक्षांबरोबर जीत्ताडा पण खाता येईल.
20 Oct 2010 - 10:43 pm | दीपा माने
जागुताई आमच्या पनवेलला सुध्दा शेतातली किन्वा खाडीची जिताडी मिळायची पण आता हाचरीज मधुनच जिताडी मिळायला लागली आहेत.
आपली मासे करण्याची पध्दत किन्चित थोड्या फार फरकाने माझ्या आई सारखीच आहे. तरीपण मी आपली क्रुती लिहुन घेतली आहे.
आपण वरचेवर अश्या पाकक्रुती देत जा अशी मनापासुन विनन्ती करते.
20 Oct 2010 - 11:07 pm | प्राजु
सगळ्याच अनवट (शाकहारी/मांसाहारी).. पाकृ देते आहे जागुताई..
ग्रेट!
20 Oct 2010 - 11:58 pm | स्वाती२
कालवणाचा रंग पाहून तोंडाला पाणी सुटले.
21 Oct 2010 - 1:25 am | प्रियाली
फोटो बघून तोंडाला पाणी सुटते.
21 Oct 2010 - 1:41 am | चित्रा
छानच.:)
21 Oct 2010 - 4:51 am | सहज
अन्नपूर्णादेवीला सा. न.
21 Oct 2010 - 6:00 am | समई
मला फक्त पापलेट,बांगडा,सुकट्,बोंबिल,झिंगे हेच प्रकार माहिति आहेत आणि खाल्ले आहेत्..तुमच्यामुळे बरेच प्रकार सम्जले...पण आता खाय्ला कधि मिलतिल माहिति नाहि :)
21 Oct 2010 - 8:56 am | नगरीनिरंजन
मस्त! नुसते फोटो पाहूनच वास घमघमायला लागला मनात!
21 Oct 2010 - 11:59 am | रत्नागिरीकर१
मस्तच .... रत्नागिरीला जावे असे मनात आले....
21 Oct 2010 - 12:05 pm | भाग्यश्री पातिल
वा!!!! मस्तच
21 Oct 2010 - 12:22 pm | मराठमोळा
जागुतै,
:)
दिपाली, स्वाती दिनेश, जागु, गणपा (नावे विसरलो असेल तर भर घाला) यांच्या समवेत एखादा खादाड मिपाकट्टा करण्याची फार ईच्छा आहे, असा दुग्धशर्करा योग कधी येईल काय माहित, बट आय एम ऑप्टीमिस्टीक. :)
21 Oct 2010 - 12:27 pm | जागु
सुहास, बेसनलाडू, स्वाती, प्रियाली, चित्रा, सहज, समई, नगरीनिरंजन, रत्नागिरिकर, भाग्यश्री धन्यवाद.
चिंतातुर, शेतातले सगळेच मासे ताड ताड उडतात पकडल्यावर. तुम्ही कोलंबी पाहीली आहे का ? अगदी उंच उडी मारते.
नंदन, नविन नाव सांगितल्याबद्दल धन्यवाद.
रेवती अग खाउनच बघ. हे आयुष्य परत मिळणार नाही. आणि हे मासेही पुढल्याजन्मी कदाचीत मिळणार नाहीत.
दिपा, तु वही आणि पेन तयार ठेव.
प्राजु, तू ही आणि सगळी कडे हजेरी नेमाने लावतेस. धन्स.
29 Oct 2010 - 2:06 pm | विसोबा खेचर
........!!!!!!!!
12 Nov 2010 - 3:18 pm | कुक
आम्च्या शेतात यदा फक्त ४ जिताडी मिळाली पण दुसर्या दिवशी मि मछि पकडायला शेतावर गेलो तेव्हा मला १ जिताड
भेटला होता
12 Nov 2010 - 8:40 pm | राघव
छ्या छळवाद आहे नुसता..!!
मी कशाला हे पाकृंचे धागे उघडतो हे मला न उलगडलेले कोडे आहे. आपोआप लक्ष जाते, धागा उघडतो, अधाशासारखे फोटू बघतो, पाकृ वाचतो अन् जळ जळ जळतो..
बाकी, पाकृ नेहमीसारखी.. अगदी भूक चाळवणारी!! :)
12 Nov 2010 - 9:41 pm | जागु
कुक कुठे आहे तुमच शेत ?
राघव धन्यवाद.
14 Nov 2010 - 9:02 am | गवि
absolutely great..