पुरणपोळी चांगली होण्यासाठी त्याची कणीक चांगली नव्हे योग्य प्रकारे भिजवणे आवश्यक आहे. पण वर जोडणी दिलेली जी " पुरणपोळी"ची कृती आहे तीत ही कृती एका ओळीत गुंडाळली आहे.
"हे सारण कणिके च्या पारी त भरुन पोळी लाटावी" एव्हढेच लिहून ही कृती समजणार नाही आणि जमणार नाही.
ही माझी पुरणपोळीची पाककृती :
साहित्य :
पाव किलो चणाडाळ
पाव किलो गुळ
वेलची पुड
जायफळ पुड
पिठ :
मैदा पाव किलो
तेल
मिठ
पहिला मैदया मध्ये मिठ टाकुन थोडे थोडे पाणी, तेल टाकुन पिठ सैलसर भिजवुन घ्यावे. सैलसर म्हणजे पिठ हाताने ओढता आल पाहीजे. चपातीच्या पिठासारखच साधारण. ह्या पिठ मळताना परातीत ७-८ वेळा तरी जोरात आपटायचे वरुन खाली. हे करताना आपला दुष्मन नजरेसमोर आणायचा आणि तोच हातात आहे अस समजुन त्याला आपटायचा. पिठ चांगले मळून आपटुन झाले की ते खोलगट भांड्यात वरुन तेल टाकुन तेलात मुरवत ठेवायच. हे पिठ साधारण १ तास तरी मुरवायच.
आता पुरण करण्यासाठी कुकरला डाळ भिजेल एवढ पाणी घालून तिन ते चार शिट्ट्या घ्यायच्या. हे झाल्यावर जर डाळीचे पाणी एका भांड्यात काढून ठेवायचे कारण कुकरमध्ये डाळ पुर्ण शिजते आणि डाळीत गुळ, वेलची जायफळ पावडर घालुन डाळ घट्ट होईपर्यंत शिजवायची. शिजली की गरम असतानाच ही डाळ पुरणयंत्रातुन काढायची. कुकरमध्ये शिजवल्यावर पुरणयंत्रातुन काढायला जास्त कष्ट पडत नाहीत.
आता मैद्याच्या पिठाची छोटी गोळी म्हणजे साधारण लिंबाएवढी . त्याची वाटी करुन त्यात एक मुठीत बसेल एवढ पुरण त्या वाटीत दाबुन दाबुन भरा आणि वाटीच तोंड बंद करुन गोळा मैद्यात किंवा तांदळाच्या पिठात बुडवुन पोळीपाटावर हलक्य हाताने पोळी लाटावी आणि गरम तव्यावर मिडीयम गॅसवर भाजावी. पोळी उलटली की पोळीच्या कडीने तुप टाकायचे म्हणजे पोळी टमकन फुलते. मग हलक्या हाताने पलटून त्याची घडी घालुन बाहेर काढायची.
>>पिठ : मैदा पाव किलो
जागूजी, पुरणपोळीसाठी मैद्याऐवजी गव्हाची कणिक का नाही वापरत?
आमच्याकडे गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करतात. आईच्या हातच्या पोळ्या छान खुसखुशीत होतात आणि फुटलेल्या ही नसतात.
मैदा जिथे जिथे टाळता येईल तेवढे चांगलेच.
हे करताना आपला दुष्मन नजरेसमोर आणायचा आणि तोच हातात आहे अस समजुन त्याला आपटायचा. >>
मी पुरणपोळीच नाही, तर रोजच्या पोळ्या बनवताना पण असेच करते. छान मउ पोळ्या होतात. :)
पुरण शिजल्यावर ते वाटून अथवा पुरण यंत्रातुन बारीक करुन घ्यावे.
पोळी कशी तव्यावर टाकायची याचीसुध्दा पध्दत आहे. (लाटण्याला गुंडाळुन तव्यावर सोडायची) आणि कशी भाजायची याची सुध्दा. त्याची कृती आणि "फटू" टाकलेत तर जास्त सोपे होईल समजायला.
असो.
हे झाल्यावर जर डाळीचे पाणी एका भांड्यात काढून ठेवायचे कारण .......
चिंतामणी कटाच्या आमटीच मी सांगायचेच राहीले. कटाच्या आमटीत सुक खोबर भाजुन त्यात थोडी दालचीनी किंवा गरम मसाला घालुन आमटी करतात. ह्या आमटीला लाल मिरचीचा तडका चांगला लागतो.
मी पोळी लाटणीला गुंडाळून नाही टाकत. डायरेक्ट टाकते.
चिंतामणी जर पिठ चांगल मळल गेल आणि मुरल गेल तर पोळी फुटत नाही. माझी पोळी पुर्ण पोळीपाटाएवढी असते. करेन तेंव्हा फोटो टाकेन. पाव किलो मध्ये ११ ते १२ मोठ्या पोळ्या होतात.
पक्या तुमच म्हणण १००% बरोबर आहे. मैदा शक्यतो टाळावा. पण पुरण पोळी आपण नेहमी तर करत नाही. वर्षातुन एकदा किंवा दोनदा. एखाद दिवस खायला काही हरकत नाही मैदा. मैद्याने अगदी पातळ होते, म्हणून मी मैद्याची करते.
जागुताईने आधीच पाकृ दिलेली आहे मग आम्ही काय बोलावे. पण मला माहित असलेली पाकृ थोडी निराळी असल्याने देत आहे.
साहित्य :
पाव किलो चणाडाळ
पाव किलो गुळ
वेलची पुड
जायफळ पुड ( पुरणपोळ्या भावी जावयासाठी करत असल्यास आपले चातुर्य वापरुन ही घालावी. ;))
आवरण :
मध्यम आकाराचा पाऊण ग्लास कणिक
मध्यम आकाराचा पाव ग्लास मैदा
साजूक तूप
मिठ
कृती:
डाळ एका भांड्यात धुवून भिजत घालावी. ती नीट भिजली की एका पातेल्यात डाळीच्या दुप्पट पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आली की मग भिजलेली डाळ त्यात घालावी. थोड्या वेळाने पाण्यावर फेस येऊ लागेल, हा फेस वेगळ्या एका भांड्यात काढावा . डाळ नीट शिजली की पाणी वेळून फेस काढलेल्या भांड्यात घ्यावे, हे नंतर आमटीसाठी वापरावे. पातेले पुन्हा गॅसवर ठेवून त्यात गूळ चिरुन घालावा. वेलची जायफळाची पूड घालावी. हळूहळू मिश्रणाला घट्टपणा येऊ लागेल. पुरण शिजवायला घेतलेला कालथा/चमचा त्यात रोवून पहावा. तो रोवल्यानंतर तसाच उभा राहिला तर पुरण वाटण्यासाठी तयार आहे असे समजावे. हे पुरण मिक्सर अथवा पुरणयंत्रातून वाटून घ्यावे.
आता आवरणासाठी कणिक व मैदा एकत्र चाळून घ्यावे. त्यात मीठ घालून तूपाचा हात घेऊन सैलसर मळावे. कसे मळावे हे जागुतैने उत्तम समजवले आहे त्यामुळे फार लिहीत नाही. थोडा वेळ झाकून ठेवावे.
तेवढ्या वेळात पुरण वाटून घ्यावे. लाटायला घेताना पीठाची पारी करून त्यात पुरण ठासून भरावे, जास्त ठासू नका नाहीतर फुटेल :) . असो, तर आवरणाला घेतलेल्या पिठाच्या अंदाजे पावपट जास्त पुरण घ्यावे.
नंतर ही गोळी नीट बंद करून तांदळाच्या पीठीवर लाटावी. नवशिके असल्यास पोळपाटाला एक पातळ सुती फडकं गुंडाळून मैद्यावर लाटावे. पण लाटताना सतत उलटत राहावे.
आता ही पोळी तव्यावर अलगद टाकून तुपावर खरपूस भाजून सर्व्ह करावी.
माझ्या सासुबाई खालिलप्रमाणे पुरणपोळी करतात
साहित्य : पाव किलो चणाडाळ, पाव किलो गुळ, वेलची पुड, मैदा पाव किलो , कणीक,तेल, तुप,मिठ
अगोदर एका टोपामधे पाणी आणी चणा डाळ शिजत घालावि त्यात किन्चित तेल घालाव. डाळ शिजलि कि त्यातल पाणि काढून घ्यावे ते आमटी करिता वापरावे. पाणी काढून झाल्यावर डाळीत गुळ आणी वेलचि पूड घालुन डाळ घट्ट होईपर्यंत शिजवायची मग डाळ पुरणयंत्रातुन वाटून घ्यायचि हे झाल पुरण आता पाव किलो मैदया मध्ये थोडे गव्हाचे पिठ व मिठ आणी पाणी टाकुन पिठ मळून घ्यावे. थोड सैलसर पाहीजे.पिठ चांगले मळून झाल्यावर तेल लावुन झाकुन ठेवायच.
शक्यतो कुकरला डाळ लावु नये कारण डाळीचे पाणी मिळत नाहि. आता पिठाची छोटी गोळी घेउन त्याची वाटी करुन त्यात पुरण भरा आणि मैद्याच्या पिठात बुडवुन पोळीपाटावर हळू पोळी लाटावी आणि गरम तव्यावर भाजावी. पोळी उलटली की पोळीच्या कडीने तुप टाका म्हणजे पोळी फुगेल. मग पलटून तव्यावरुन बाहेर काढावि . मि पोळ्या लाटत नाहि पण बाकि तयारि करुन देते.
शक्यतो कुकरला डाळ लावु नये कारण डाळीचे पाणी मिळत नाहि.
माझा अनुभव वेगळा आहे. कुकर लावतानाच पाणी जास्त घातल की आपोआपच पाणी जास्त होत.
पण शक्यतो सुधांशू आणि शुभांगिने सांगितल्याप्रमाने पातेल्यातच केलेले चांगले. त्याचा स्वादही चांगला येतो. मी झटपट व्हाव म्हणून कुकरला लावते.
प्रतिक्रिया
18 Oct 2010 - 3:06 am | शुचि
http://www.misalpav.com/node/3823
18 Oct 2010 - 9:16 am | चिंतामणी
पुरणपोळी चांगली होण्यासाठी त्याची कणीक चांगली नव्हे योग्य प्रकारे भिजवणे आवश्यक आहे. पण वर जोडणी दिलेली जी " पुरणपोळी"ची कृती आहे तीत ही कृती एका ओळीत गुंडाळली आहे.
"हे सारण कणिके च्या पारी त भरुन पोळी लाटावी" एव्हढेच लिहून ही कृती समजणार नाही आणि जमणार नाही.
18 Oct 2010 - 7:41 am | स्पंदना
झटपट नको असेल तर मला सांगा . मी पुरी रेसिपी टाकु शकते.
18 Oct 2010 - 9:07 am | चिंतामणी
नुसती पाकृ वाचुन पुरणपोळी बनवणे हे जरा अवघड आहे. त्यासाठी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन आवश्यकच आहे असे माझे मत आहे.
18 Oct 2010 - 3:55 pm | जागु
ही माझी पुरणपोळीची पाककृती :
साहित्य :
पाव किलो चणाडाळ
पाव किलो गुळ
वेलची पुड
जायफळ पुड
पिठ :
मैदा पाव किलो
तेल
मिठ
पहिला मैदया मध्ये मिठ टाकुन थोडे थोडे पाणी, तेल टाकुन पिठ सैलसर भिजवुन घ्यावे. सैलसर म्हणजे पिठ हाताने ओढता आल पाहीजे. चपातीच्या पिठासारखच साधारण. ह्या पिठ मळताना परातीत ७-८ वेळा तरी जोरात आपटायचे वरुन खाली. हे करताना आपला दुष्मन नजरेसमोर आणायचा आणि तोच हातात आहे अस समजुन त्याला आपटायचा. पिठ चांगले मळून आपटुन झाले की ते खोलगट भांड्यात वरुन तेल टाकुन तेलात मुरवत ठेवायच. हे पिठ साधारण १ तास तरी मुरवायच.
आता पुरण करण्यासाठी कुकरला डाळ भिजेल एवढ पाणी घालून तिन ते चार शिट्ट्या घ्यायच्या. हे झाल्यावर जर डाळीचे पाणी एका भांड्यात काढून ठेवायचे कारण कुकरमध्ये डाळ पुर्ण शिजते आणि डाळीत गुळ, वेलची जायफळ पावडर घालुन डाळ घट्ट होईपर्यंत शिजवायची. शिजली की गरम असतानाच ही डाळ पुरणयंत्रातुन काढायची. कुकरमध्ये शिजवल्यावर पुरणयंत्रातुन काढायला जास्त कष्ट पडत नाहीत.
आता मैद्याच्या पिठाची छोटी गोळी म्हणजे साधारण लिंबाएवढी . त्याची वाटी करुन त्यात एक मुठीत बसेल एवढ पुरण त्या वाटीत दाबुन दाबुन भरा आणि वाटीच तोंड बंद करुन गोळा मैद्यात किंवा तांदळाच्या पिठात बुडवुन पोळीपाटावर हलक्य हाताने पोळी लाटावी आणि गरम तव्यावर मिडीयम गॅसवर भाजावी. पोळी उलटली की पोळीच्या कडीने तुप टाकायचे म्हणजे पोळी टमकन फुलते. मग हलक्या हाताने पलटून त्याची घडी घालुन बाहेर काढायची.
पुरणात केसरही घालतात.
18 Oct 2010 - 10:10 pm | पक्या
>>पिठ : मैदा पाव किलो
जागूजी, पुरणपोळीसाठी मैद्याऐवजी गव्हाची कणिक का नाही वापरत?
आमच्याकडे गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करतात. आईच्या हातच्या पोळ्या छान खुसखुशीत होतात आणि फुटलेल्या ही नसतात.
मैदा जिथे जिथे टाळता येईल तेवढे चांगलेच.
19 Oct 2010 - 10:05 pm | रुपी
हे करताना आपला दुष्मन नजरेसमोर आणायचा आणि तोच हातात आहे अस समजुन त्याला आपटायचा. >>
मी पुरणपोळीच नाही, तर रोजच्या पोळ्या बनवताना पण असेच करते. छान मउ पोळ्या होतात. :)
18 Oct 2010 - 3:30 pm | चिंतामणी
पुरण शिजल्यावर ते वाटून अथवा पुरण यंत्रातुन बारीक करुन घ्यावे.
पोळी कशी तव्यावर टाकायची याचीसुध्दा पध्दत आहे. (लाटण्याला गुंडाळुन तव्यावर सोडायची) आणि कशी भाजायची याची सुध्दा. त्याची कृती आणि "फटू" टाकलेत तर जास्त सोपे होईल समजायला.
असो.
हे झाल्यावर जर डाळीचे पाणी एका भांड्यात काढून ठेवायचे कारण .......
त्याची म्हणजे कटाची आमटी करायची.
"कटाच्या आमटी"ची कृती सुध्दा येउ द्यात.
18 Oct 2010 - 3:49 pm | जागु
चिंतामणी कटाच्या आमटीच मी सांगायचेच राहीले. कटाच्या आमटीत सुक खोबर भाजुन त्यात थोडी दालचीनी किंवा गरम मसाला घालुन आमटी करतात. ह्या आमटीला लाल मिरचीचा तडका चांगला लागतो.
मी पोळी लाटणीला गुंडाळून नाही टाकत. डायरेक्ट टाकते.
18 Oct 2010 - 3:54 pm | चिंतामणी
मी पोळी लाटणीला गुंडाळून नाही टाकत. डायरेक्ट टाकते.
मग कसबी कलाकार आहेस तु . पण मोठी आणि पातळ पोळी असेल तर ती पोळी लाटणीला गुंडाळून टाकतात.
कटाच्या आंमटीच्या कृती बद्दल आभार.
18 Oct 2010 - 3:58 pm | जागु
चिंतामणी जर पिठ चांगल मळल गेल आणि मुरल गेल तर पोळी फुटत नाही. माझी पोळी पुर्ण पोळीपाटाएवढी असते. करेन तेंव्हा फोटो टाकेन. पाव किलो मध्ये ११ ते १२ मोठ्या पोळ्या होतात.
18 Oct 2010 - 3:59 pm | sneharani
तेलावर लाटलेली पोळी डायरेक्ट कशी काय टाकता येते?
18 Oct 2010 - 4:18 pm | परिकथेतील राजकुमार
मी तर डायरेक्ट तव्यावरच पोळी लाटतो.
18 Oct 2010 - 7:10 pm | प्राजु
तुझं डोकं कुठे आणि कसं चालेल सांगता नाही येत. :)
18 Oct 2010 - 7:18 pm | गणपा
=)) =)) =)) =))
18 Oct 2010 - 10:23 pm | चतुरंग
'मी तर डायरेक्ट तव्यावरचीच पोळी लाटतो' असं म्हणायचं आहे! ;)
तवाकथेतील पोळीकुमार
18 Oct 2010 - 10:34 pm | पैसा
19 Oct 2010 - 6:57 am | शुचि
ए कुठुन इतक्या मस्त स्मायली मिळतात? मला पण असच हसू येतं. पण =)) असं हसावं लागतं
19 Oct 2010 - 3:25 am | दिपाली पाटिल
नशिब तव्यावरच लाटतोस, तुझ्या कॅफे मधल्या कॉम्प्युटर्स वर लाटत नाहीस... :D
19 Oct 2010 - 5:42 am | टिउ
आमच्याकडे काँप्युटरवर पत्रिका, कुंडली आणी पुरणपोळी तयार करुन मिळेल.
19 Oct 2010 - 11:58 am | जागु
पक्या तुमच म्हणण १००% बरोबर आहे. मैदा शक्यतो टाळावा. पण पुरण पोळी आपण नेहमी तर करत नाही. वर्षातुन एकदा किंवा दोनदा. एखाद दिवस खायला काही हरकत नाही मैदा. मैद्याने अगदी पातळ होते, म्हणून मी मैद्याची करते.
राजकुमार लाटण वापरता की डारेक्ट हाताने थापता ?
19 Oct 2010 - 12:44 pm | परिकथेतील राजकुमार
19 Oct 2010 - 5:11 pm | सूड
जागुताईने आधीच पाकृ दिलेली आहे मग आम्ही काय बोलावे. पण मला माहित असलेली पाकृ थोडी निराळी असल्याने देत आहे.
साहित्य :
पाव किलो चणाडाळ
पाव किलो गुळ
वेलची पुड
जायफळ पुड ( पुरणपोळ्या भावी जावयासाठी करत असल्यास आपले चातुर्य वापरुन ही घालावी. ;))
आवरण :
मध्यम आकाराचा पाऊण ग्लास कणिक
मध्यम आकाराचा पाव ग्लास मैदा
साजूक तूप
मिठ
कृती:
डाळ एका भांड्यात धुवून भिजत घालावी. ती नीट भिजली की एका पातेल्यात डाळीच्या दुप्पट पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आली की मग भिजलेली डाळ त्यात घालावी. थोड्या वेळाने पाण्यावर फेस येऊ लागेल, हा फेस वेगळ्या एका भांड्यात काढावा . डाळ नीट शिजली की पाणी वेळून फेस काढलेल्या भांड्यात घ्यावे, हे नंतर आमटीसाठी वापरावे. पातेले पुन्हा गॅसवर ठेवून त्यात गूळ चिरुन घालावा. वेलची जायफळाची पूड घालावी. हळूहळू मिश्रणाला घट्टपणा येऊ लागेल. पुरण शिजवायला घेतलेला कालथा/चमचा त्यात रोवून पहावा. तो रोवल्यानंतर तसाच उभा राहिला तर पुरण वाटण्यासाठी तयार आहे असे समजावे. हे पुरण मिक्सर अथवा पुरणयंत्रातून वाटून घ्यावे.
आता आवरणासाठी कणिक व मैदा एकत्र चाळून घ्यावे. त्यात मीठ घालून तूपाचा हात घेऊन सैलसर मळावे. कसे मळावे हे जागुतैने उत्तम समजवले आहे त्यामुळे फार लिहीत नाही. थोडा वेळ झाकून ठेवावे.

तेवढ्या वेळात पुरण वाटून घ्यावे. लाटायला घेताना पीठाची पारी करून त्यात पुरण ठासून भरावे, जास्त ठासू नका नाहीतर फुटेल :) . असो, तर आवरणाला घेतलेल्या पिठाच्या अंदाजे पावपट जास्त पुरण घ्यावे.
नंतर ही गोळी नीट बंद करून तांदळाच्या पीठीवर लाटावी. नवशिके असल्यास पोळपाटाला एक पातळ सुती फडकं गुंडाळून मैद्यावर लाटावे. पण लाटताना सतत उलटत राहावे.

आता ही पोळी तव्यावर अलगद टाकून तुपावर खरपूस भाजून सर्व्ह करावी.

19 Oct 2010 - 10:11 pm | पक्या
वा, सुधांशु, छान सांगितली आहे रेसिपी. फोटो पण छान . आणि गव्हाची कणीक वापरून केलेल्या पोळ्या पाहून छान वाटले.
रेसिपी साठी धन्यवाद.
22 Oct 2010 - 10:42 am | नितिन थत्ते
पहिला फोटो अंमळ उकडलेल्या अंड्यासारखा वाटला.
19 Oct 2010 - 5:19 pm | Shubhangi Pingale
माझ्या सासुबाई खालिलप्रमाणे पुरणपोळी करतात
साहित्य : पाव किलो चणाडाळ, पाव किलो गुळ, वेलची पुड, मैदा पाव किलो , कणीक,तेल, तुप,मिठ
अगोदर एका टोपामधे पाणी आणी चणा डाळ शिजत घालावि त्यात किन्चित तेल घालाव. डाळ शिजलि कि त्यातल पाणि काढून घ्यावे ते आमटी करिता वापरावे. पाणी काढून झाल्यावर डाळीत गुळ आणी वेलचि पूड घालुन डाळ घट्ट होईपर्यंत शिजवायची मग डाळ पुरणयंत्रातुन वाटून घ्यायचि हे झाल पुरण आता पाव किलो मैदया मध्ये थोडे गव्हाचे पिठ व मिठ आणी पाणी टाकुन पिठ मळून घ्यावे. थोड सैलसर पाहीजे.पिठ चांगले मळून झाल्यावर तेल लावुन झाकुन ठेवायच.
शक्यतो कुकरला डाळ लावु नये कारण डाळीचे पाणी मिळत नाहि. आता पिठाची छोटी गोळी घेउन त्याची वाटी करुन त्यात पुरण भरा आणि मैद्याच्या पिठात बुडवुन पोळीपाटावर हळू पोळी लाटावी आणि गरम तव्यावर भाजावी. पोळी उलटली की पोळीच्या कडीने तुप टाका म्हणजे पोळी फुगेल. मग पलटून तव्यावरुन बाहेर काढावि . मि पोळ्या लाटत नाहि पण बाकि तयारि करुन देते.
21 Oct 2010 - 12:28 pm | भाग्यश्री पातिल
मला खापरच्या पुरनपोळ्या आवडतात्.थोड्याच दिवसात मी गावी जानार आहे तेव्हा फोटो व पाकक्रूती घेउन येइन
21 Oct 2010 - 12:37 pm | जागु
शक्यतो कुकरला डाळ लावु नये कारण डाळीचे पाणी मिळत नाहि.
माझा अनुभव वेगळा आहे. कुकर लावतानाच पाणी जास्त घातल की आपोआपच पाणी जास्त होत.
पण शक्यतो सुधांशू आणि शुभांगिने सांगितल्याप्रमाने पातेल्यातच केलेले चांगले. त्याचा स्वादही चांगला येतो. मी झटपट व्हाव म्हणून कुकरला लावते.
सुधांशू पुढच्यावेळी तुमच्या पध्दतीने पुरणपोळ्या करुन बघणार.
21 Oct 2010 - 6:16 pm | स्वाती राजेश
http://misalpav.com/node/1371