एका जेलियाने

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in काथ्याकूट
14 Oct 2010 - 3:49 pm
गाभा: 

डान्राव हे आमचे फार जुने मित्र आणि थोडे जुने राको (राकोचा अर्थ विचारण्यासाठी कृपया व्यनी आणि खरडी वापरू नयेत. तुम्हाला राकोचा अर्थ माहित असेल तर तुम्ही नशीबवान आणि माहित नसेल तर तुम्ही आनंदी (आठवा: अज्ञानात आनंद असतो)). डान्रावांच्या प्रदीर्घ कारकीर्दीवर 'एका जेलियाने' नामक पुस्तक लिहीण्याचा मानस आम्ही अनेकदा जाहिर केला आहे. आता प्रश्न असा पडेल की जेल या इंग्लिश शब्दाचा (खरंतर शब्दांचा gel आणि jail) इथे काय संबंध? तर संबंध आहे. डान्राव डोक्यास जेल (gel) लावतात आणि अनेकोत्तम सामाजिक कार्यांचा ध्यास घेऊन डान्राव जेलमधे जातात. (अर्थात लोकं या अनेकोत्तम कामांना तुंबडी भरणे म्हणतात आणि डोक्याच्या जेलला चार वडे तळून होतील इतकं तेल म्हणतात हा 'इनो'मय भाग निराळा! त्याची चर्चा आपण इथे करणार नाहीत.)

डान्रावांची राको म्हणून 'एका जेलियाने' हे पुस्तक लिहीण्याची जबाबदारी अर्थातच आमच्यावर येऊन पडली. तसंही 'हा जेल नावाचा इतिहास आहे' हे डान्रावांचं हे सव्वातीन ओळींचं खंडकाव्य अलिकडेच फार प्रसिद्ध झालं आहे. आणि आतल्या गोटातली बातमी अशी आहे की या खंडकाव्याला आयटी वाईफ स्वयंपाक समितीचा बहुमानाचा 'कुकर' पारितोषिकही मिळणार आहे. (अर्थात पारितोषिकप्राप्त पुस्तकाची निवड करणार्‍या समितीत श्री.श्री. पूजावाले गुर्जी, स्विडीश चिंग्या, खानेसुमार गुर्जी, मस्त सिकंदर आणि खुद्द आम्ही होतो ही बाब निराळी!) तर 'एका जेलियाने' लिहीण्याची जबाबदारी आमच्यावर पडली. पण अलिकडेच बेरकेवाडी म्हैला मंडळाला फ्लेक्स बनवण्याचे नवीन कंत्राट मिळाल्यामुळे आम्ही फार बिस्सी झालोत. तेव्हा आम्ही या पुस्तकाला फक्त प्रस्तावना लिहायची आणि आमचे अतिपरममित्र श्री. चंंद्रराज गवार यांनी पुस्तक लिहायचं अशी तडजोड मान्य करण्यात आलेली आहे. या प्रस्तावनेसाठी काही संदर्भांची जमवाजमव करत असतानाच जनतेचे डान्रावांबद्दल काय विचार आहेत हे 'बहुतांची मंतरे'मधे वाचावयास मिळाले. तर आमचे डान्रावांबद्दलचे विचार जगजाहीर आहेतच, आता जनतेच्या विचारांची दखल घ्यावी म्हणून याच विचारांचे संकलन करून आम्ही 'एका जेलियाने'ची प्रस्तावना लिहीली. तीच प्रस्तावना इथे आम्ही लेखस्वरूपात मिपावर मांडत आहोत.

डान्राव त्यांच्या अनेकविध कारनाम्यांमुळे प्रसिद्ध आहेत. डान्रवांच्या कर्तृत्वासमोर आपण किती खुजे आहोत याची वारंवार कल्पना येते. उदा: त्यांचे केस. अनेकदा खासगीत आणि जाहिररित्या अनेक मुलींनीही डान्रावांना केशसंवर्धानासाठी टिप्स मागितल्या आहेत, अनेक राजकारण्यांनी, उदा आपले धमालचंद्रपंत, डान्रावांना त्यांच्या सुप्रसिद्ध धवलस्मितासाठी टिप्स मागितल्या आहेत. डान्राव किती महान आहेत आणि कोणीकोणी त्यांच्याबद्दल काय गौरवोद्गार काढले हे लिहायचं असेल तर चार डान्राव लागतील. तर एवढं सर्व डीट्टेलवारी लिहीण्याऐवजी डान्रावांच्या विविधरंगी कर्तबगारीचा एक सांख्यिकी लेखाजोखा आपण घेऊ या.

डान्रावांची एकूण जालिय आणि आंतर-जालीय प्रतिमा ही वेगवेगळ्या सदरांमधे विभागता येईल:
१. डान्रावांची कल्पकता: गरजूं*नी पुणेरी पाट्या, पिझ्झा हटमधली संध्याकाळ, इ.इ. लेख पहावेत.
२. डान्रावांची लेखनलांबी: यात डान्रावांनी लिहीलेली विविध खरडखेचरं (ही धमाल मुलगा, आनंदयात्री (जिवंत आहेत का?), मस्त कलंदर, बिपिन कार्यकर्ते, ३_१४ विक्षिप्त अदिती यांच्या खवमधे मिळतील) आणि डान्रावांचे प्रतिसाद (राजकीय विषयांवरचे विविध प्रकार आणि लांबीचे धागे उसवावेत) येतात.
३. डान्रावांचे केसः याबद्दल बहुत काय बोलणे
४. डान्रावांची डॉन ही प्रतिमा: यात डान्रावांनी व्यसनांशी दिलेला लढा येतो
५. डान्रावांचे वायदे: डान्रावांना अतिपूर्वीच 'वायदा-इ-आझम' असा किताब (ते स्वतः खिताब म्हणतात!) मिळालेला आहे.
६. डान्रावांची एकूणच जालिय आणि जालबाह्य प्रतिमा: यासाठी मात्र सखोल आणि स्वयंपूर्ण अभ्यासाचीच गरज आहे.
७. डान्रावांना देवत्त्व बहाल होणे: रजनीकांत इत्यादींना इत्यादी या कॅटेगरीत टाकणारी इतर विधानं डान्रावांना देवत्त्व बहाल करतात.
*गणप्याने बदनाम करण्याआधी हा शब्द चांगल्या अर्थाने वापरत.

तर वाचकांच्या पत्रव्यवहारात डान्रावांबद्दल एकूण १०६ विधानं करण्यात आलेली आहेत. पैकी कल्पकतेबद्दल २०, लेखनलांबी आणि वेग याबद्दल १०, डॉन प्रतिमेबद्दल ३, वायद्यांबद्दल २, डान्रावांच्या एकूण प्रतिमेबद्दल २२ आणि डान्रावांना देवत्त्व बहाल करणारी एकूण १७ विधानं आहेत. पण विजयी वीर आहेत डान्रावांचे केस, या केसांबद्दल एकूण ३२ विधानं आहेत. एकूण विधानांच्या एक तृतीयांश, ३३% विधानं डान्रावांच्या केसांबद्दल आहेत यावरून डान्रावांच्या केसांच्या महतीची कल्पना यावी. आजपर्यंत युवतींच्या केसांवर काव्य रचलेली आहेत, पण डान्रावांसारख्या निधड्या छातीच्या राजकारणी अभियंत्याच्या केसाबद्दल केसभरही वाङ्मय नव्हतं. आज ते सर्व जगासमोर उपलब्ध आहे याचा मला फार अभिमान वाटतो.
डान्रावांचे वायदे आणि त्यांची डॉन ही प्रतिमा (पक्षी: व्यसनांविरोधात लढा) हे डान्रावांचे स्वभावाचे पैलू मात्र अतिदुर्लक्षित आहेत किंवा जनसामान्यांना त्याबद्दल फार चौकशी नाही असं दिसतं. त्यावरूनच राजकारण्यांनी वायदे करावेत आणि ते विसरावेत याला जनता नेहेमीचंच मानते असं दिसतं. एवढंच नव्हे तर, राजकारण्यांचं व्यक्तीगत आयुष्य चव्हाट्यावर आणू नये ही सुद्धा तमाम जनतेची इच्छा दिसते आहे.

डान्रावांच्या लेखनलांबीबद्दलही घसघशीत (<१०% ;-) ) विधानं आली आहेत. आणि डान्रावांच्या एकूण, सम्यक प्रतिमेबद्दल २०% आहेत. यावरून डान्रावांच्या लिखाणाची योग्यता आणि प्रसिद्धी मोजता येणार नाही. डान्रावांची प्रतिमा, म्हणजे डान्राव आंघोळ करतात का, फेस आणतात का वगैरे बद्दल लोकांच्या मनात फार खळबळ आहे असं दिसतंय. वरवर पहाता हा सर्व जनतेचा कौल दिसत आहे तरीही याला एक वेगळीच किनार आहे. डान्रावांच्या प्रतिमेविषयी एका सलज्जविरहीत जनसामान्याने बरेच लिखाण केले आहेत आणि त्यानेच डान्रावांच्या एकूण प्रतिमेविषयी बहु लिखाण केलेले आहे. सदर इसम डान्रावांचा मोठा चाहता असावा आणि डान्रावांबद्दल घाऊक प्रसिद्धी करण्यात सदर इसमांस रस असावा असे दिसते. याच्या विपरीत दोन सज्जन आहेत ज्यांनी डान्रावांबद्दल बर्‍याच वेगळ्या प्रकारची बरीच विधानं केली आहेत. पैकी एकांचा डान्रावांच्या कार्याशी दाट परिचय असावा अशी शंका येते. आणि दुसरे सद्गृहस्थ आहेत त्यांचा डान्रावांशी परिचय नसावा. डान्रावांशी परिचय नसणारा माणूस विरळाच, पण सुदैवाने अशा बर्‍याच लोकांनी डान्रावांबद्दल लिहीताना लेखणी मोकळी सोडून डान्रावांना देवत्त्व बहाल केलेले दिसत आहे.

डान्रावांसारख्या डोंगराएवढ्या डूडी, डॅशिंग, ढासू व्यक्तीमत्त्वाबद्दल लिहीण्याची खरंतर माझी प्राज्ञा नव्हतीच. डान्रावांच्या महान कार्याच्या आठवणीनेच छाती दडपून जाते. पण मस्त कलंदर, नंदन यांच्यासारखे आग्रही आणि प्रेमळ मित्रमंडळ, पूजावाल्या गुर्जींसारखे महान पथदर्शक, बिपिन, धमाल मुलगा यांच्यासारखे कार्यकर्ते यांच्यामुळे आज मी 'एका जेलियाने'ला प्रस्तावना लिहीण्याची हिंमत केली. आता पुस्तक डॉनार्पण!! अधिक काय लिहीणे?

-- अदितीताई अवखळकर पाटील, मु. बेरकेवाडी, पो. अवखळवाडी

प्रतिक्रिया

सहज's picture

14 Oct 2010 - 4:18 pm | सहज

इतक्या प्रसिद्धीनंतर डोन्राव आता लवकरात लवकर जालसन्यास घेउन एक हेअर केअर सलून काढणार आहेत अशी वदंता आजच संध्यानंदमधे छापली गेली आहे.

यू डोन्ट मेस विथ द झोहान हा चित्रपट खरे तर यू डोन्ट मेस विथ द डॉन वर प्रेरीत आहे!

लौकिकाला साजेसा लेख नाही असेच म्हणावे लागेल.
डोंगर पोखरून उंदीर असे लिखाण वाटले.
प्रस्तूत लेखीकेने स्वतःच्या प्रतिभेशी अशी प्रतारणे करणे हे वाचकांचा अपेक्षाभंग होण्यास कारणीभूत ठरत आहे

सुहास..'s picture

14 Oct 2010 - 3:59 pm | सुहास..

मि. छोटा डॉन ..व्हाट नाऊ

अवांतर : पुण्यातल्या चांगल्या व्हाव्यांचे पत्ते देऊ का ??

अतिअवांतर : प्रेरणेचा पत्ता द्या की .नवीन आयडीजला कस समजायच ?

राजेश घासकडवी's picture

14 Oct 2010 - 4:22 pm | राजेश घासकडवी

एकदम भन्नाट लेख आहे. भाषा मस्त जमली आहे. तो बाज कायम ठेवणं कठीण असतं.
सलज्जविरहीत शब्द खूप आवडला.

डान्राव किती महान आहेत आणि कोणीकोणी त्यांच्याबद्दल काय गौरवोद्गार काढले हे लिहायचं असेल तर चार डान्राव लागतील.

आयटी वाईफ स्वयंपाक समितीचा बहुमानाचा 'कुकर' पारितोषिकही मिळणार आहे

हे जबरी.

श्रावण मोडक's picture

14 Oct 2010 - 4:29 pm | श्रावण मोडक

कोलॅबोरेटर हा शब्द गुन्हे शास्त्रातही वापरतात. ;)

धमाल मुलगा's picture

14 Oct 2010 - 6:00 pm | धमाल मुलगा

आपल्या वाक्यातून गुन्हेशास्त्रासंबंधित वापर दुय्यम वाटतो आहे. ;)

सुहास..'s picture

14 Oct 2010 - 6:46 pm | सुहास..

आपल्या वाक्यातून गुन्हेशास्त्रासंबंधित वापर दुय्यम वाटतो आहे >>>

धम्याशी ४३८१ वेळा सहमत ..

खर तर तो प्रतिसाद वाचल्यावर दोन मिनीटे विचार केला काही समजले नाही,
मग दहा मिनीटे विचार केला काही समजले नाही,
नंतर पन्नास मिनीटे विचार केला काही समजले नाही.
नंतर ....सारखा सारखा विचार करायला मी काय रिकामा आहे असे स्वतालाच समजुन सांगीतले ..

गांधीवादी's picture

14 Oct 2010 - 7:04 pm | गांधीवादी

धमाल साहेबांचा प्रतिसाद वेळ = 18:00.
तुमची प्रतिसाद वेळ = 18:46.
आणि ह्यात तुम्ही कसा काय पन्नास मिनीटे विचार केला, काही समजले नाही.

धमाल साहेबांचा प्रतिसाद वेळ = 18:00.
तुमची प्रतिसाद वेळ = 18:46.
आणि ह्यात तुम्ही कसा काय पन्नास मिनीटे विचार केला, काही समजले नाही. >>>

माननीय श्री रा रा गांधीवादीसाहेब,
आपल्यासारख्या थोर विचारवंताच्या आमच्या क्षुल्लक प्रतिसादाबद्दल गैरसमज व्हावा,प्रश्न पडावा आणी त्याबद्दल आपल्याला दोन शब्द लिहावे लागावेत याबद्दल आम्ही अतिशय खेद व्यक्त करतो.माझे परममित्र धमालजी मुलगा आणी मी स्वता म्हणजेच सुहास ,आम्ही दोघे सहसा नेहमीच एकमेंकाशी सहमत असतो म्हणुन आपणास असा प्रश्न पडला असावा असे मला वाटते.तस बघायला गेल तर मला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही,पण मी आपल्या प्रतिसांदाचा (पंचवीस वर्षात स्वच्छ न केल्या गेलेल्या, सरकारी दफ्तरातला)पंखा असल्याने माझ्या बुध्दीच्या अतिक्षुल्लक कुवतीप्रमाणे,प्रामाणीकपणे ऊत्तर देण्याचा प्रयत्न करतो.जसे धमालजी मुलगा आणी मी मित्र आहोत, तसेच मी आणी आमचे परमगुरू माननीय श्री रा रा श्रावणचंद्ररावजी मोडकसाहेबही आमचे मित्रच आहेत,माझ पन्नास मिनीटे विचार करण्याबद्दलच वक्तव्य हे त्यांनी दिलेल्या एकवाक्यी प्रतिसादाबद्दल होत.
धन्यवाद.

अवांतर : आता तरी वाटतो का मी विचारवंत

मस्त कलंदर's picture

14 Oct 2010 - 4:31 pm | मस्त कलंदर

’एका जेलियाने’ पुस्तकाची व त्यावरच्या डाण्रावांच्या मनोगताची वाट पाहात आहे. (नंतर ती व्यवस्थित लावलीही जाईल याबद्दल काही शंका कुणी मनात ठेऊ नये. पण आमच्या या निरागस इच्छेस श्री. वायदेआझम डॉन हे आम्हास अपेक्षित असलेले मनोगत न लिहून सुरूंग लावण्याची शक्यताच जास्त.)
असो. प्रस्तावना अगदी मस्त आणि कलंदर आहे. पुस्तक लिहायला घेच आता तू!!!!

जाताजाता:

डोक्याच्या जेलला चार वडे तळून होतील इतकं तेल म्हणतात हा 'इनो'मय भाग निराळा!

लोकांच्या या समजामुळेच आजकाल ते "मी डोक्याला तेल लावत नाही, जेल लावतो " असे सांगत फिरताना नुकतेच पाहण्यात आले आहेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2010 - 4:40 pm | llपुण्याचे पेशवेll

बरं बरं. (खरंतर बरं हा प्रतिसाद २दा देणार होतो. २ उपप्रतिसाद म्हणून. पण तूर्तास इतक्या महत्वाच्या विषयात अवांतर नको म्हणून एकाच प्रतिसादात २दा बरं म्हणून घेतो आहे)

-पेशवे (चेरमन)
डॉन्धर्म महाविद्यालय, पुणे,
(संचालक)वायदेआझम डॉन अध्यासन, उणे विद्यापीठ, पुणे.

छोटा डॉन's picture

14 Oct 2010 - 4:42 pm | छोटा डॉन

" आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा !"

मॅटर खतम !!!

अवांतर : सध्या भयंकर बिइझी आहोत, हा मुहुर्त साधुन आमच्या काही हितचिंतकांच्या नतद्रष्ट कारवाया वाढल्याचे नजरेस येत आहे, त्यात वाहत्या गंगेत इतर काही सोमेगोमे उगाच 'उचलली जीभ आणि ... ' असे वागत आहेत.
जरा फुरसत मिळुदेत, एकेकाचा हिशेब व्याजासकट सेटल केला जाईल.

इथे लिहला जाणारा प्रत्येक शब्द आपल्याविरुद्ध उपलब्ध असणारे मटेरियल म्हणुन वापरण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

जाता जाता अजुन एक माहिती देतो, काही महिन्यांपुर्वीची आमची सही आठवा.
" आम्ही आंतरजालीय दुष्मनांना माफ करणे सोडा पण त्यांचे आयपी ड्रेसही विसरत नसतो".

बाकी असो.

निखिल देशपांडे's picture

14 Oct 2010 - 4:45 pm | निखिल देशपांडे

" आम्ही आंतरजालीय दुष्मनांना माफ करणे सोडा पण त्यांचे आयपी ड्रेसही विसरत नसतो".

ऑ??? आय पी ड्रेस???
हे काय असतं???

बाकी अदिती लेख जमला नाही हे आमचे स्पष्ट मत आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2010 - 4:45 pm | llपुण्याचे पेशवेll

आम्ही डानरावांच्या धमकीला घाबरून इथेच शेपूट घातले असे जाहीर करतो. या आणि या प्रकारच्या धाग्यावर आमचा शेवटचा प्रतिसाद.
(नतद्रष्ट, सोम्यागोम्या) पेशवे

धमाल मुलगा's picture

14 Oct 2010 - 5:50 pm | धमाल मुलगा

वायदा-ए-आझम !

पाषाणभेद's picture

14 Oct 2010 - 8:20 pm | पाषाणभेद

आय पी ड्रेस म्हणजे इंडीयन पोलीस ड्रेस हो. म्हणजे डगला घातलेल्या पोलीसाला ते विसरत नसतील.

धमाल मुलगा's picture

14 Oct 2010 - 8:25 pm | धमाल मुलगा

का?
ते काय गुणेगार है का?

ते शिर्षकातच नाहिये का? एका 'जेली'याने.

स्वाती दिनेश's picture

14 Oct 2010 - 4:42 pm | स्वाती दिनेश

धमाल आली वाचायला,:)
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

14 Oct 2010 - 4:47 pm | परिकथेतील राजकुमार

कंपुने कंपुच्या मनोरंजनासाठी काढलेला अजुन एक धागा.

गरिब मिपावाचकांनी हे असे 'पेड-लेखन' अजुन किती सहन करायचे ? संपादक ह्याची दखल घेतील काय ? का संपादकांवरच हा धागा असल्याने आमची मागणी फाट्यावार मारली जाईल ??

आता एकामागोमाग एक ह्या धाग्यावर प्रतिसादाचा पाऊस पाडुन इतर दीन-दुर्लक्षित मिपा लेखकांचे लेखन रसातळाला नेले जाईल. स्वातंत्राच्या आधीपासून हेच चालु आहे !!

दुर्लक्षितकथेतील टेक्सासकुमार
(संस्थापक अध्यक्ष)दुर्लक्षित पँथर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2010 - 5:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता स्वसंपादन करता येणे शक्य नसल्यामुळे काही खुलासे आणि आभारप्रदर्शन प्रतिसादात करत आहे.

  • या प्रस्तावनालेखनासाठी माझे आंजा-परमशत्रू श्री. प. रा. यांची बहुमोल मदत झाली. त्यांचे आभार.
  • श्री. चंद्रराज गवार या सिद्धहस्त लेखकाशी गाठ घालून देणारे धडाडीचे शेटलमेंटवाले श्री. श्रामो यांचे अनेकाभार.
  • माझे अनेक आंजा मित्र, उदा: पुणे-करारवाले पेशवे, विडंबनटीकाकार मेघवेडे, शब्दटीकाकार आणि सर्वद्वेष्टे Nile, नवमैत्रिणी पुष्करिणी आणि मितान या सर्वांनी मला जो विनाअट पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानणे धार्ष्ट्याचे ठरेल तरीही हा आगाऊपणा करून घेते.
  • सर्वात जास्त आभार मला नैष्ठीक पाठिंबा देणार्‍या सहजमामांचे ... अजून सांग!
श्रावण मोडक's picture

14 Oct 2010 - 5:28 pm | श्रावण मोडक

यमेsssssssssssssssssssssssssss!!!

परिकथेतील राजकुमार's picture

14 Oct 2010 - 5:38 pm | परिकथेतील राजकुमार

या प्रस्तावनालेखनासाठी माझे आंजा-परमशत्रू श्री. प. रा. यांची बहुमोल मदत झाली. त्यांचे आभार.

अतिशय निंदनिय आरोप. आज मी खरच व्यथीत झालोय !

हा परा हलकट कम्युनिस्ट आहे का? उल्लेक केला नाहीतर दुर्लक्षित होतो, अन केला की लगेच व्यथित होतो लेकाचा.

अवखळकरबैंचे एका महत्त्वाच्या विषयावर उत्तम विवेचनाबद्दल अभिनंदन.

अवांतरः मला तर हा तेल नावाचा इतिहास आहे की काय हे पुस्तकच डान्रावांच्या केसांना पाहुन लिहले गेले असे इतके दिवस वाटत असे.

मस्त कलंदर's picture

14 Oct 2010 - 5:43 pm | मस्त कलंदर

द्विरूक्तीबद्दल सद्वे नाईल्याचा णिशेढ!!!

परिकथेतील राजकुमार's picture

14 Oct 2010 - 5:46 pm | परिकथेतील राजकुमार

हा परा हलकट कम्युनिस्ट आहे का? उल्लेक केला नाहीतर दुर्लक्षित होतो, अन केला की लगेच व्यथित होतो लेकाचा.

आपल्या कंपुत नसणार्‍या अथवा कंपुला विरोध करणार्‍या सदस्यांची निंदा नालस्ती करण्यासाठी काढलेला हा धागा असल्याने त्यावर अशी खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तीक टिका करणारी प्रतिक्रीया श्री. निळे ह्यांच्या कडून अपेक्षीतच होती.

असो..

बहुदा ते व आम्ही लवकरच दोन कार्ट्या असलेल्या एका धनाढ्याचे जावई होणार असल्याने जाहिर वाद टाळत आहे.

Nile's picture

14 Oct 2010 - 5:48 pm | Nile

सहमत. ते वाद आपण सासर्‍याचाच घरात घालुन त्याची टीव्ही शिरीयल बनवु. साला हिट्ट होउन जाईल.

हाउस हसबंड्स ओफ पुणे!

पर्नल नेने मराठे's picture

14 Oct 2010 - 5:46 pm | पर्नल नेने मराठे

मी हिची आत्या न सहज हिचा मामा .. म्हणजे माझ न सहजचे नाते काय :-/

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2010 - 6:10 pm | llपुण्याचे पेशवेll

आम्ही शेपूट घातलेले असल्याचे जाहीर केल्याने आता या विषयावर अधिक काही लिहीत नाही. आपल्या आभारप्रदर्शनाबद्दल आभार मानण्यासाठी हा प्रतिसाद. :)

हे हे हे!
कालपासून धाकटे डॉन यांना बरेच पिडले आहे असे दिसते.
आपला लेख आवडला.

sagarparadkar's picture

14 Oct 2010 - 6:51 pm | sagarparadkar

सरकारी कर्मचार्‍यांना फारसं काम नसतं असं आत्तापर्यंत फक्त ऐकत होतो ... आता खात्री पटली (ह. घ्या. हे सांगणे न लगे)

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 7:04 pm | नगरीनिरंजन

समकालीनांचा मिपाजगात चंचुप्रवेश होईहोईतो श्री. चंद्रराज गवार यांचा कंपुप्रवेशही झालेला पाहून त्यांच्याबद्दलचा आदर शतगुणित झाला. :-)

रेवती's picture

14 Oct 2010 - 7:06 pm | रेवती

अगदी अगदी!
हेच मनात आले.

इन्द्र्राज पवार's picture

14 Oct 2010 - 7:34 pm | इन्द्र्राज पवार

"....श्री. चंद्रराज गवार या सिद्धहस्त लेखकाशी गाठ घालून देणारे धडाडीचे शेटलमेंटवाले श्री. श्रामो यांचे अनेकाभार.....!"

~~ पाटलीणबाईंच्या या मित्राचा माझा तसा जुजुबी (फार दिवसांनी वापरायला मिळालेला शब्द...) परिचय आहे आणि बाईंची ही प्रथम वर्ग प्रस्तावना वाचून झाल्यावर श्री.गवार यांना पुस्तक केव्हापर्यंत तयार होईल असे विचारले असता त्यांनी थेट श्री.पु.भागवत स्टाईलमध्ये समाधी लावली आणि म्हणाले, "फॉण्ट साईझ अजून फिक्स केलेली नाही, मॅटर समोर ढीगाने आहे, पण खुद्द कथानायकाने नुकतेच सर्वांवर डोळे वटारले, झिंज्या फिस्कारल्या आहेत, आणि कालिकामूर्तीचा अवतार करून पाटलीणबाईंच्या नावाने कडकडा बोटे मोडत आहेत...असा सांडणीस्वाराने पुण्याहून निरोप धाडला असल्याने तूर्तास प्रस्ताव रुमालबंद केला आहे."

मी जास्त विचारणार होतो, पण सकाळी सकाळी श्री.गवार यांनी पाटलीणबाईंनी केलेल्या पोळ्या खावून दात आणि आतडी दोन्ही कुरतडून घेतली (असे ते म्हणाले....) असल्याने ते बेड रेस्ट घेत होते, ते पाहून मी शांत राहिलो.

.....असे जर असेल तर सदस्यांनी अदितीताईंच्या प्रस्तावनेवरूनच हिमालयाची उंची 'गेस' करावी आणि श्री.गवार यांना सुखाने जगू द्यावे अशी मी त्यांच्यातर्फे सादर विनंती करत आहे.

चंद्रराजच्या वतीने लिहिणारा इन्द्रराज

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2010 - 10:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली, तुझी थिअरी एकाच दिवसात फेल गेली आहे.

ब्रिटिश टिंग्या's picture

14 Oct 2010 - 7:35 pm | ब्रिटिश टिंग्या

मायला ह्या गुर्जींनी अन् यमीनी डानरावांचा पार बाजार उठवला आहे! :)

चालू द्या..पुस्तक मात्र लिहून काढा बाई...वायदेआझमावरच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहून फक्त वायदे करून सोडू नका.

हॅ हॅ हॅ...
डॉन्याला चाकं (प्रतावना) भेट दिली आहे तेव्हा आता त्याने गाडीचा (पुस्तकाचा) खर्च स्वतः करावा अशी चाकंभेट करणारीची अपेक्षा आहे काय?

@ डॉण्या गिफ्ट केवढ्याला पडली रे (काढ ती झुल्फातली बोटं, कर हिशेब....)?

पिवळा डांबिस's picture

14 Oct 2010 - 10:09 pm | पिवळा डांबिस

गवारांच्या पुस्तकाला विक्षिप्तबाईची प्रस्तावना?
हे म्हणजे गोनीदांच्या पुस्तकाला बाळासाहेब ठाकर्‍यांनी प्रस्तावना लिहिण्यासारखं झालं!!! :)
लेखकाचा (आणि लेखनातल्या व्यक्तीचा!!!) सुपडा साफ!!!
:)

इथे काय झालंय की विक्षिप्तबाईंनी एक सोलाणं घेतलंय....
आपण बटाटे वगैरे सोलतो ते हो! (ही माहिती खास आयट्या सुगरणींसाठी!!:)
छान पात्यावरून बोट फिरवून त्याची धार वगैरे पारखून घेतलीय...
आणि मग मस्तपैकी डानरावांची एक-एक सालटी सोलून काढलीये...
(खरंतर साफ हजामत केलीये असं म्हणणार होतो पण तो डानरावांच्या स्वर्गतुल्य जटांचा अपमान होईल म्हणून तसं लिहित नाही!!!)
:)
काय चोता दोन, आंतरजालावरचं तुम्ही पूर्वी केलेलं हे कुठलं पाप असं भोवतंय तुम्हाला आज? :)

(अवांतरः डानरावांचं या आठवड्याचं राशीभविष्यः सुळी चढवले जाण्याची शक्यता!!)
:)

बेसनलाडू's picture

14 Oct 2010 - 10:36 pm | बेसनलाडू

लेख तर आवडलाच; त्यावरच आहा प्रतिसादही तितकाच आवडला.
(वाचक)बेसनलाडू
चोता दोन कडून अद्याप काहीच उत्तर न येणे ही मी वादळापूर्वीची शांतता समजत आहे. नंतर वादळ आले की पॉपकॉर्न नि कोक घेऊन चढून बसण्यासाठी झाडेही वाचायची नाहीत (लव्हाळ्यांवर टिकून राहील, इतके क्षुद्र आकारमान दुर्दैवाने आम्हांला लाभलेले नाही :( )
(जाणकार)बेसनलाडू

सुहास..'s picture

14 Oct 2010 - 10:45 pm | सुहास..


पिडाकाका ,,

दंडवत ...

डॉन्या, आता बोल , काय म्हणत होता आय पी ड्रेस वगैरे

पिवळा डांबिस's picture

15 Oct 2010 - 3:43 am | पिवळा डांबिस

खरं तर आम्ही प्रतिक्रिया देणारच नव्हतो...
कारण चोता दोन काही झालं तरी आमच्याच टवाळकुळापैकी एक!!!!
पण त्यांना आमचा नव्वा-कोरा आयपी ड्रेस दाखवायचा मोह आवरला नाही!!!!
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2010 - 11:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =))
काका लैच फारमात आहे. तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे आता आणखी एक पुस्तक-प्रस्तावना लिहीण्याचा विचार करत आहे! ;-)

इंटरनेटस्नेही's picture

14 Oct 2010 - 10:09 pm | इंटरनेटस्नेही

मस्त! राजकुमार साहेबांचा प्रतिसाद मात्र पटला!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2010 - 10:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> राजकुमार साहेबांचा प्रतिसाद मात्र पटला! <<
राजकुमार साहेबांनातरी त्यांचा प्रतिसाद पटलाय का ते पहा! नाहीतर राणीपेक्षा जास्त स्वामीनिष्ठ आणि देवापेक्षा जास्त आस्तिक असं प्रकरण व्हायचं!

इंटरनेटस्नेही's picture

15 Oct 2010 - 12:46 am | इंटरनेटस्नेही

>>> नाहीतर राणीपेक्षा जास्त स्वामीनिष्ठ आणि देवापेक्षा जास्त आस्तिक असं प्रकरण व्हायचं!<<<

ही ही ही... मस्तच! याला म्हणतात क्रिएटीव्ह प्रतिसाद!

चतुरंग's picture

14 Oct 2010 - 10:49 pm | चतुरंग

उघड मत -
चोता दोन,कुठून पुण्यात आलास असं वाट्टंय ना? उगीच आलास असं वाटतंय ना?
ही अदिती आणि तिचा कंपू असेच आहेत रे! एक दिवस सुखाने जगू देणार नाहीत.
मराठी माणूस मराठी माणसाचे पाय ओढतो हेच आजवर ऐकून होतो पण आता केसही ओढतो म्हणजे हद्द झाली!
छे छे तुम्ही घाबरु नका डॉन्राव आम्ही तुमच्या मागे आहोत, तुम्ही लढा!
(विशेष सूचना - मनमिळावू कार्यकर्त्यांचा सारवासारवी/दिलजमाई करणारा फोन आला तर सावध रहा! ;) )

खर्र खर्र* मत -
हॅ हॅ हॅ! बरी रेवडी उडवलीये ह्या डान्याची अदितीने, कितीतरी दिवस ह्या चोता दोनचा उत्कर्ष पाहवत नव्हताच नाहीतरी.
डोक्याबाहेरच गेलेली केस होती ही. बरं झालं परस्पर 'अदितीच्या कात्रीने केस कापले' ;)
आता कुठला फिरतोय तो 'काजळमाथ्याने' पुण्यात? आता एकदम तिरुपती कटच! ;)
*शब्दनिर्मिती श्रेय - द्मु

(गॉन केस्#)चतुरंग
#शब्दनिर्मिती श्रेय लिंकन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2010 - 10:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

अरे काय चाल्लंय हे? मी किती प्रयत्नांनी डान्रावांसाठी एवढं लिहीलं तर तुम्ही त्याला कात्रीने केस कापणं म्हणता!!

अवांतरः "खर्र खर्र"चं श्रेय द्मुचं नाहीये, मकीला विचारा तुम्ही!
(अतिअवांतरः आता तुम्हाला रंगराव म्हणण्याचीही चोरी की!!)

मस्त कलंदर's picture

14 Oct 2010 - 11:13 pm | मस्त कलंदर

हे सौजन्य आमचेच हो... (आम्ही म्हणजे मी आणि अदिती हे वेगळे सांगायलाच नको)

मस्त कलंदर's picture

15 Oct 2010 - 11:38 am | मस्त कलंदर

आणि हो, या खर्रं खर्रं चा अर्थही वेगळा आहे हो. तो आधी माहित करून घ्या नाहीतर भलतेच घोळ होतील!!! ;)
द्मु, खर्रं खर्रं ना???

परिकथेतील राजकुमार's picture

15 Oct 2010 - 12:42 pm | परिकथेतील राजकुमार

सॉलीड गोष्ट आहे. उपद्रवमूल्य किती असतं काही लोकांचं ना खरच :\

साला पब्लिक कधी डोस्क्यावर उचलुन धरेल अन कधी धरुन आपटेल काय सांगता येत नाही. कालचच पहा ना राव, काल डान्या हीरो, अहो हिरो कुठला अगदी चक नॉरीसचा बा होता. आज लगेच डान्याचा पार हिंदी शिनेमातला हरलेला व्हीलन करुन टाकला लोकांनी!!! छ्यॅ!! आपल्या देशात साला कदरच नाय लोकांना. डॉनराव जर पश्चिमेत डान्राव असते तर आज कुठे असते? आँ?

राजेश घासकडवी's picture

15 Oct 2010 - 3:50 am | राजेश घासकडवी

एका जेलियाने या आकर्षक शीर्षकानंतर आम्हीही काही शीर्षकांचा विचार केला.

क्वाएट ब्लोज द डॉन - ब्लो ड्रायरने केसांची निगा [मूळ पुस्तक - क्वाएट फ्लोज द डॉन]
फॉरेव्हर डॉन : हायलाइट धागा, पुस्तक २ [मूळ पुस्तक - फॉरेव्हर डॉन : ट्वायलाइट सागा, पुस्तक २]
ब्रेकिंग डॉन : हायलाइट धागा, पुस्तक ४ [मूळ पुस्तक - ब्रेकिंग डॉन : ट्वायलाइट सागा, पुस्तक ४]
द ब्लड ऑफ छोटा डॉन [मूळ पुस्तक द ब्लड ऑफ रेड डॉन]

कोणाला अजून सुचतात का?

मिसळभोक्ता's picture

15 Oct 2010 - 4:09 am | मिसळभोक्ता

सध्या डॉनरावांची हवा असल्याने, "डॉन विथ द विंड" आठवले.

नंदन's picture

15 Oct 2010 - 5:31 am | नंदन

फ्रॉम हिअर टू इटर्निटी
हार्ट ऑफ डार्कनेस
द फाऊंटन-हेड
द लॉर्ड ऑफ द रिंग्ज (किंवा रिंगलेट्स)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2010 - 10:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता यांची "डानंबन" करायची म्हणजे:

फ्रॉम डान टू इटर्निटी
डॉन ऑफ डार्कनेस
द फाऊंटन-डेन
द डॉन ऑफ द रिंग्ज (किंवा रिंगलेट्स)

द डॉन ओफ ऑल थिंग्स
द व्हास्ट डॉन (द लास्ट डॉन वरुन)

नगरीनिरंजन's picture

15 Oct 2010 - 11:49 am | नगरीनिरंजन

डानंबनाची गरज नसलेली:
अ सुटेबल बॉय.
द अल्केमिस्ट
द गॉडफादर
द व्हेरी हंग्री कॅटरपिलर

डानंबन केलेली
अ‍ॅन्ड देन देअर वॉज डॉन (मूळ पुस्तक अ‍ॅन्ड देन देअर वेअर नन - अ‍ॅगाथा ख्रिस्ती)

मराठमोळा's picture

15 Oct 2010 - 10:16 am | मराठमोळा

लैच जोरदार..
लेख वाचुन मला भडकमकर मास्तरांचा जालिंदर बाबांचा लेख आठवला..
आणि प्रतिक्रिया वाचुन मोकलाया दाही दिशा ची आठवण झाली. =))
=))

अनिल २७'s picture

15 Oct 2010 - 11:26 am | अनिल २७

आय. टी. तल्या कंपूबाजीला ऐटीतल्या कंपूबाजीने थेट ऊत्तर देण्याचा प्रयत्न आहे का ? किंवा नकळत तसे झाले आहे का ?

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Oct 2010 - 12:42 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रिय डान्या,

लवकर परत ये. आता यापुढे तुला कोणीही काही बोलणार नाही. अगदी तू काहीही उतमात घातलास तरी. तुझ्या केसांवर डोळा ठेवणार नाहीत. तू आख्खी तेलाची विहिर जरी ओतलीस डोक्यावर तरी आमची हरकत नाही. तू तुझे सगळे वायदे पुरे केलेस तरी आम्ही कानाडोळा करू. तू जरी ५० पेक्षा कमी ओळींचा प्रतिसाद दिलास तरी त्याच्यावर +१ टाकू.

तू गेल्या पासून नाक्यावरची राणी सारख्या चकरा मारते आहे. टाम्याने अन्नपाणी सोडले आहे. फक्त ऑन द रॉक्स वर दिवस काढतोय. मनीने उंदरांकडे बघणे सुद्ध बंद केले आहे. सगळे तुझी आठवण काढू काढू मोठ्या मुश्किलीने दिवस काढत आहेत.

प्लिज प्लिज प्लिज लवकर परत ये.

तुझेच,

नन्या, मन्या, सोन्या, नान्या

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2010 - 1:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रा.रा. राको, तुम्ही लवकरात लवकर परत येणे. समस्त बेरकेवाडीच्या म्हैला रक्षाबंधनापासून आपली वाट पहात आहे. आता भाऊबीजेची वेळ आली.

अदितीताई अवखळकर पाटील.

छोटा डॉन's picture

15 Oct 2010 - 1:41 pm | छोटा डॉन

कोण तुम्ही ?

धन्यवाद !

- छोटा डॉन

ह्याला म्हणतात घरचा अहेर ;)

तरी त्या बिकाला सांगत होतो. गप गुमान मजा पाह्य. शेपटावर पाय नको दिउ ;)

नन्या, मन्या, सोन्या, नान्या

बिपन्या ला पण अ‍ॅड करा ना काका

ज्ञानेश...'s picture

15 Oct 2010 - 2:50 pm | ज्ञानेश...

छान छान.
छोटा डॉन यांचे असंख्य गुण (पुन्हा नव्याने) कळले.
पुढच्या अशाच २७ लेख/कौलांच्या प्रतिक्षेत.

वि.सू.- अशा धाग्यांच्या शीर्षकात "डॉन प्रशस्ति भाग: **" असे काही लिहिता आले तर बघावे. म्हणजे एका टिचकीचे कष्ट वाचतील.

शहराजाद's picture

15 Oct 2010 - 9:45 pm | शहराजाद

मस्त धागा.
मजा येत आहे.
स्वतःशीच : च्यामारी, गेल्या काही दिवसांत डान्रावांवर दोन धागे! त्यांचेच जुने छान धागे वर काढलेले! 'परा- नाना प्रोत्साहन मंडळा' चे पब्लिशिटी प्याकेज निघाले की काय? :)

शहराजाद's picture

15 Oct 2010 - 9:57 pm | शहराजाद

आणखी स्वतःशीच : 'प. ना. प्रो. मं' ला कांपिटिशन द्यायला घासूगुर्जी आणि अवखळकर्तैंनी अजून एक प्रोत्साहन मंडळ काढले असावे का?

Pain's picture

16 Oct 2010 - 3:56 am | Pain

लेख आवडला!