बुक्का - कशाचा, कशासाठी?

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
14 Oct 2010 - 2:02 pm
गाभा: 

'गुलाल-बुक्का' वगैरेंमध्ये ज्याचा उल्लेख होतो त्या बुक्क्याविषयी काही मूलभूत प्रश्न आहेत. तत्पर उत्तरे मिळाल्यास मदत होईल.

  1. 'बुक्का' कशापासून बनवतात?
  2. धर्मकार्यांमध्ये त्याचे काही विशिष्ट स्थान असते काय? असल्यास ते कोणते?
  3. बुक्का काही प्रसंगी अशुभ मानला जातो का? असल्यास कोणत्या प्रसंगी? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
  4. अंत्ययात्रेमध्ये प्रेताला बुक्का लावतात का? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
  5. चितेवर बुक्का टाकतात का? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.

मदतीबद्दल अग्रिम धन्यवाद.

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

14 Oct 2010 - 2:05 pm | स्पंदना

अरे हा विचारच नाही केला मी कधी.

चला या निमित्तान आम्हाला ही थोडेफार समजेल.

सुनील's picture

14 Oct 2010 - 6:16 pm | सुनील

जालावर फार माहिती मिळाली नाही. जी मिळाली ती ही -

In the plate meant for puja, on the right hand side of worshipper turmeric powder (haldi) and vermillion (kumkum) are kept and on to the left Bukka (a black coloured powder prepared from tale (a metal), gulal and sindoor. In the front portion of the plate a bottle of attar (a fragrant essence of flowers), a small plate of sandalwood paste, flowers and durva (a type of fragrant grass) and other leaves. We are aware that attar, sandalwood and flowers have fragrance. The subtle particles of the fragrance are known as gandhkan. Similarly there are subtle particles of colour in leaves and durvas. The frequencies of deity principle are activated through the medium of these subtle particles of fragrance from attar, sandalwood paste and flowers and subtle particles of colour present in leaves and durvas. In the lower portion of the plate keep pan-supari (betel leaf and betel nut) and some coins as dakshina (offerings of money). We can keep a coconut in place of betel nut. Two leaves of betelleaf, betel nut or coconut and dakshina are kept together. Betel leaf, betel nut and coconut have the highest capacity to emit subtle frequencies of deities. The two leaves of betel leaf are representative of God and its activated energy that is Shiv and Shakti. They are invoked to work on a manifest (sagun) level. In the center of the puja plate unbroken rice grains are arranged in small heap.

धमाल मुलगा's picture

14 Oct 2010 - 6:38 pm | धमाल मुलगा

पूजेचं ताट कळालं.
पण बुक्का का? कशासाठी? ते नाही हो कळालं.

स्वछंदी-पाखरु's picture

14 Oct 2010 - 6:24 pm | स्वछंदी-पाखरु

जंतू साहेब........

तुमचे चिंतेचे कीडे कसले वळवळतात हो????

लय भारी........

स्वपा
सुलेमानी जंतू......

बुक्क्याला काही लोक अबिर पण म्हणतात.

बुक्क्याला काही लोक अबिर पण म्हणतात.

नाय वो "अबीर " पांढरे असते. बुक्का काळा असतो.

नितिन थत्ते's picture

15 Oct 2010 - 1:41 pm | नितिन थत्ते

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%...

इकडे बुक्का शोधल्यावर अबीरवर घून जातात. आणि अबीरचा रंग काळा असल्याचे सांगतात. तेव्हा अबीर आणि बुक्का एकच असावेत.

पिवळा डांबिस's picture

16 Oct 2010 - 1:16 am | पिवळा डांबिस

विजुभाऊंचं बरोबर आहे...
अबीर पांढरा असतो, आणि बुक्का काळा!!
आम्ही पूर्वी एक भारतातल्या देवस्थानांवरची फिल्म पाहिली होती त्याच्यात त्यांनी पांढरा अबीर, काळा बुक्का, लाल गुलाल वगैरे दाखवले होते...

अप्पा जोगळेकर's picture

15 Oct 2010 - 9:54 am | अप्पा जोगळेकर

मला ऑप्स आणि बॅट्स वाला बुक्का आठवला.

वारकरी संप्रदायात बुक्का आणि बुक्केवाली या दोन्हींना अनन्यसाधारण महत्व आहे. सोमवार, गुरुवार, एकादशी या दिवशी नित्यनेमाने भजनाला जाणार्‍या तसेच दिंड्या-वार्‍या केलेल्या व्यक्तीला विचारा. अचुक माहीती बिनबोभाट मिळेल.

चिंतातुर जंतू's picture

15 Oct 2010 - 2:51 pm | चिंतातुर जंतू

बुक्का पांढरा आणि काळा अशा दोन्ही रंगांत सापडतो. पांढरा बुक्का जैन आणि बंगाली लोकांत वापरतात. महाराष्ट्रात काळा बुक्का वापरतात. चंदन, नागरमोथा, बकुळीची फुलं, वाळा, दवणा, मरवा अशा सुगंधी पदार्थांची वाळवून वस्त्रगाळ पूड करून ती कोळशाच्या पुडीत एकत्र करून काळा बुक्का बनवतात. पांढर्‍या बुक्क्यासाठी कापराची वस्त्रगाळ पूड (कोळशाऐवजी) वापरतात आणि चंदन, वाळा, दवणा आदिंबरोबर गव्हला काचरा, देवदार, लवंग, वेलची अशा पदार्थांचा वापर करतात.

अनेक नैमित्तिक पूजांत बुक्का वापरला जातो. बहुधा फक्त वैष्णवांत बुक्का वापरतात. त्यामुळे विठ्ठलाचे भक्त बुक्का वापरतात. यात्रेवरून प्रसाद म्हणूनही वारकरी बुक्का घेऊन येतात. कीर्तन करणार्‍या हरदासाला 'आता गप्प बस' असं सांगायचं असतं तेव्हा त्याला बुक्का लावतात म्हणे! प्रेतयात्रेत तिरडीवर गुलाल-बुक्का टाकतात.

आणखी माहिती मिळाल्यास कृपया सांगावी.

धमाल मुलगा's picture

15 Oct 2010 - 4:34 pm | धमाल मुलगा

>>कीर्तन करणार्‍या हरदासाला 'आता गप्प बस' असं सांगायचं असतं तेव्हा त्याला बुक्का लावतात म्हणे!
आठवलं..आठवलं..!
बरेचदा लै पिळणार्‍यालासुध्दा 'आता घ्या बुक्का लावायला' म्हणतात ते आठवलं. :)

विजुभाऊ's picture

15 Oct 2010 - 3:17 pm | विजुभाऊ

अबीर गुलाल उधळीत आला
असे एक गाणे आहे.
असो. बुक्का हा काळा असतो
पांढरे असते त्याला अबीर म्हणतात.

मिसळभोक्ता's picture

15 Oct 2010 - 10:57 pm | मिसळभोक्ता

अबीर गुलालं उधळीत रंग
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग

अबीर = काळा असतो, वारकरी वापरतात. त्यालाच बुक्का म्हणतात.

हेच म्हणते.
अबीर आणि बुक्का एकच.

वारकरी लोक, अष्टगंधाच्या (पांढर्‍या)मोठ्या टीळ्याच्या वरती अबीराचा काळा छोटा टिळा लावतात..

विजुभाऊ's picture

15 Oct 2010 - 3:18 pm | विजुभाऊ

अबीर गुलाल उधळीत आला
असे एक गाणे आहे.
असो. बुक्का हा काळा असतो
पांढरे असते त्याला अबीर म्हणतात.

नितिन थत्ते's picture

16 Oct 2010 - 2:51 pm | नितिन थत्ते

म्हणजे अजून अबीर आणि बुक्क्याविषयी निर्णय झालाच नाही वाटते.

असो.

मिसळपाववरील एक सदस्य श्री रा रा अवलिया हे धर्म / अध्यात्म या विषयाचे गाढे अभ्यासक असल्याने ते वेगवेगळ्या वेदांत बुक्क्याविषयी काय लिहिले आहे ते सांगतील.

धनंजय's picture

16 Oct 2010 - 8:41 pm | धनंजय

अग्निहोत्र्यांच्या शब्दकोशात "अबीर" आहे (पण बुक्का नाही). त्यांच्या मते अबीर म्हणजे चंदन वगैरे सुगंधी द्रव्यांचे चूर्ण.

अबीर आणि बुका हे शब्द हिंदी शब्दकोशांत सापडले. "अबीर" म्हणजे अभ्रकाचे चकचकीत चूर्ण (त्यात काही मिसळले असले तरी "अबीर"च). लाल रंग मिसळून होळीत रंग म्हणून वापरतात. शब्दकोशात यासाठी बुका/बुक्का प्रतिशब्द म्हणून वापरलेला आहे. "बुका/बुक्का" शब्द थेट बघता शब्दाचा अर्थ "चूर्ण" असा आहे, विशेषतः अभ्रकाचे चूर्ण.

(शब्दकोश बघून फारसा फायदा झालेला नाही.)

चिंतातुर जंतू's picture

18 Oct 2010 - 11:12 am | चिंतातुर जंतू

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार! कामापुरती माहिती सध्या तरी मिळालेली आहे. अधिक माहिती मिळाल्यास जरूर सांगावी.

चित्रा's picture

19 Oct 2010 - 8:03 am | चित्रा

"Deccan Abir or Bukkd is of a black colour, and in addition to
all the above contains the following:—
Aquilaria Agallocha.

Costus Root (Saussurea Lappa, C.B.C., formerly Aucklandia
Costus, Falc ); Jatamansi; Liquid Storax. "

संदर्भ: हे पुस्तक

ह्यातील aquilaria agallocha म्हणजे http://en.wikipedia.org/wiki/Agarwood असे कळले. (अगरबत्ती यावरूनच नाव आले का काय? )

असो.

बुक्का का लावतात हे माहिती नाही, पण नाथ संप्रदायाशी याचा संबंध असेल का? वारकरी बुक्का वापरतात हे माहिती आहे.

चिंतातुर जंतू's picture

19 Oct 2010 - 11:15 am | चिंतातुर जंतू

चित्र दिसत नाही पण अगरबत्ती/उदबत्ती हे शब्द यावरूनच आले. धुपाप्रमाणे उदही जाळतात.