टीन एज वारे वाहू लागलंय !

अथांग's picture
अथांग in जे न देखे रवी...
14 Oct 2010 - 7:44 am

परत एकदा टीन एज वारे
अंगातून वाहू लागलंय,
हुरहुर-धडधड असे राग मन-
वेळी-अवेळी गाऊ लागलंय !

भेटण्याची वेळ ठरवून-बिरवून
स्वप्नरंजन होऊ लागलंय,
समोरा-समोर आल्यावर मात्र-
लाजून लांबच राहू लागलंय !

डोळ्यात चमक, ओठांवर शिट्टी..
पाऊल तिच्याच तालात पडू लागलंय,
चेहरा न दिसता हसरा तिचा,
मन हिरमुसून रडू लागलंय !

लपाछपीचा नवा खेळ खेळण्यात
कोण कोण बघा रमू लागलंय..
मधेच 'आउट' होण्याच्या भीतीने
माझं रक्त गोठून जमू लागलंय !

टीन एजचं जगच न्यारं..
आत्ता परत पटू लागलंय..
धपापलेल मन नकळत,
मागे-मागेच हटू लागलंय..:(

कविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

14 Oct 2010 - 8:49 am | पाषाणभेद

आम्हालाही मागे नेलंत तुम्ही.

काव्यवेडी's picture

14 Oct 2010 - 12:18 pm | काव्यवेडी

किशोर वयातील मुलान्चे भाव-विश्व उभे केले डोळ्यासमोर !!!!!
अप्रतिम काव्य !!! कविता वाचून वाचकान्चे पण मन अनेक
राग गाऊ लागेल.

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 12:53 pm | नगरीनिरंजन

>>हुरहुर-धडधड असे राग मन-
>>वेळी-अवेळी गाऊ लागलंय !
ह्म्म्म.. 'ते' दिवस आठवले. टीनेज मूड अगदी बरोबर पकडला आहे.