साहित्यः-- एक वाटी हरबरा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, पाव वाटी धने, दोन टे. स्पून जिरे.
दही एक वाटी, फोडणीचे साहित्य. थोडा कढीपत्ता, कोथिंबीर, एक कांदा.लाल तिखट, मिठ.
कॄती:- एक वाटी हरबरा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, पाव वाटी धने, दोन टे. स्पून जिरे.हे सर्व खमंग भाजुन घ्यावे.ते गार झाल्यावर मि़क्सर् मधून जरासे जाडसर दळावे.हे एकदम करुन ठेवले तरी चालते, यातील सर्व पदार्थ भाजले
आता त्यातील थोडे तयार पिठ घेउन ते थोडेसे दही घालून भिजवावे, कांदा बारीक चिरुन त्यात कच्चाच
घालावा, कोथिंबीर बारीक चिरुन, चवीनुसार मिरची पावडर , मिठ घालावे.व अजून थोडे दही घालुन
सरसरीत करावे, वरुन मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून खम्ंग फोडणी घालावी.
झक्कास तोंडीलावणे तय्यार.
प्रतिक्रिया
13 Oct 2010 - 8:50 pm | स्मिता चावरे
माझा आवडता पदार्थ !
17 Oct 2010 - 5:41 pm | निवेदिता-ताई
हा घ्या फोटो.........त्यासाठी खास डांगर बनवले व फ़ोटु काढला.
13 Oct 2010 - 8:54 pm | पैसा
आणखी येऊ दे.
13 Oct 2010 - 8:56 pm | स्पंदना
नाही नाही ,डांगर हा पदार्थ विसरण्या सारखा नाहीच मुळी .
आता परत माझ्या घरच थोड वेगळ असत, म्हणजे आम्ही फक्त उडीद डाळीच करतो अन दही असलच पाहीजे अस ही नाही, नुसत पाण्यात सुद्धा कालवल तरी छान लागत. तो कच्चा कांदा, मिरची अन कोथींबीर आहाहा !!
13 Oct 2010 - 11:42 pm | विकास
नाही नाही ,डांगर हा पदार्थ विसरण्या सारखा नाहीच मुळी .
असेच म्हणतो! माझा देखील आवडता पदार्थ. बाकी त्यात काय असते ते माहीत नाही, त्या पिठाचे डांगर पदार्थ मात्र मला देखील करता येतो आणि अर्थातच खाता येतो. :-)
15 Oct 2010 - 6:37 pm | प्राजु
कोण म्हणतं.. विस्मरणात गेलंय डांगर?? आमच्याकडे खूप आवडतं. आम्ही सुद्धा फक्त उदड डाळीचे करतो. (करतो म्हणजे सहस्त्रबुद्धेंच्या ६५ प्रकारच्या पिठांमधून उचलून आणतो) ;)
अतिशय लाडका पदार्थ. कशाबरोबरही छानच लागतो, पोळी, भाकरी, भात.. :)
13 Oct 2010 - 10:03 pm | गणेशा
येवुद्या आनखिन
वाचत आहे
13 Oct 2010 - 10:14 pm | विसोबा खेचर
आम्हाला पोह्याचं डांगर आवडतं..
(कोकणातला) तात्या.
--
शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!
13 Oct 2010 - 10:24 pm | निवेदिता-ताई
आम्हाला पोह्याचं डांगर आवडतं..
ते कस बनवायच......सांगा...पहाते करुन.
13 Oct 2010 - 11:38 pm | तर्री
पोह्याच्या पापडाचे पिठ असते ते.
पापड न लटता , तसेच गोळा करून खावे . बरोबर कच्चे गोडे तेल असेल तर काय ? आणि हो त्यामध्ये "टाकणखार" घालतात असे वाट्ते.
14 Oct 2010 - 12:30 am | चिंतामणी
हा विस्मरणात नक्कीच गेला नाही. कदाचीत नव्या पिढीला माहीत नसेल.
कच्चा कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरचिचे तुकडे (लाल तिखटा ऐवजी) यासाह दह्यात भिजविलेले डांगर आणि त्यात हिंग घालुन चरचरित फोडणी म्हणजे एक भन्नाट चव असते.
14 Oct 2010 - 12:36 am | रेवती
भयानक सहमत!:)
माझा आवडता पदार्थ!
14 Oct 2010 - 4:18 am | शुचि
हा हा "भयानक सहमत" :) हा हा हा
पाककृती हा विभागच अतिरेकी घोषीत करा बुवा :)
14 Oct 2010 - 1:26 pm | इंटरनेटस्नेही
+१ असेच म्हणतो..
(अंमळ जुन्या पिढीतला) इंट्या.
14 Oct 2010 - 7:25 am | चित्रा
मला लग्न होईपर्यंत डांगर दह्यात घालून खातात हे माहिती नव्हते.
नंतर कळले. आमच्याकडे पोह्याचे डांगर लाट्या करून तेलात बुडवून खात.
ते झकास लागते.
14 Oct 2010 - 10:07 am | राधा१
य्म्म्मीच असत.
त्याची रेसिपी
१ वाटी पोह्याचे पीठ
१ चमचा लाल भडक तिखट (लाल मिरची ची पुड)
१/२ चमचा मिठ
पाव चमचा पापडखार
२वाट्या पाणी
इराणी हिंग नसल्यास वनदेवी हिंग तोही नसल्यास साधा हिंग वासा नुसार साधारण २/३ चिमट्या.
प्रथम पोह्याचे पिठ..पोहे मंद आचेवर भाजुन घ्यावेत व ते घरघंटीवर दळुन आणावेत.
पोह्याच्या पिठात हिंग, पापड खार, तिखट चांगले मिसळुन घ्यावे.
नंतर चवीप्रमाणे मिठ पाण्यात घालावे व त्याला चांगली उकळी येवु द्यावी.
याला मिठवणी म्हणतात.
हि मिठवणी तिखट मिसळ्लेल्या पिठात आवश्यकतेनुसार घालावी.
ह्याची कन्सिसटन्सी पोळीच्या पिठासारखि पाहिजे..नंतर यात थोड तेल घालुन चांगल मळून घ्याव.
मग मिक्सरला तेला चा हात लावुन त्यात हे पिठ मउसर फिरवुन घ्याव. आणि मग हाणाव...पण जरा जपुन.. कारणा आजच्या नंतर नेहमी उद्या उगवत असतो... ;)..सो तिखट झेपेल एवढं घाला.. :) ;)
14 Oct 2010 - 10:36 am | स्पंदना
राधा १ कध्धी ऐकल सुद्धा नाही हो अस पण डांगर !!
हे परत आणि तेला बरोबर खायच? कस? वरुन तेल घेउन?
14 Oct 2010 - 11:17 am | राधा१
अग मस्त लागत नक्की करुन बघ.
लहानपणी आम्ही पोह्याचे पापड करायचो..अर्धे वाळत घालायचॉ आणि अर्धे गट्टम करायचो..कच्चे/ओले..!!
अपर्णा ताई..कच्चया तेलात बुडवुन, माखुन..!!!
पण मला नाही आवडत तस..त्या पेक्षा मी नंतर ताक पिते..
14 Oct 2010 - 11:21 am | मराठमोळा
पाकृ छान आहे. :)
पण डांगर म्हणजे खान्देशात लाल भोपळ्याला म्हणतात. त्यामुळे गल्लत झाली.
14 Oct 2010 - 1:07 pm | भाऊ पाटील
>>पण डांगर म्हणजे खान्देशात लाल भोपळ्याला म्हणतात
नाही हो.... खान्देशातले डांगर म्हणजे मस्क मेलन (इंग्लिश)
खान्देशात लाल भोपळ्याला लाल भोपळाच म्हणतात
14 Oct 2010 - 1:53 pm | सुहास..
पण डांगर म्हणजे खान्देशात लाल भोपळ्याला म्हणतात. त्यामुळे गल्लत झाली >>.
होय आणी त्याची आम्ही भाजी सुध्दा करतो ...अर्थातत्यात अजुन एक अनुस्वार
हवा " डांगरं"
धन्यवाद
14 Oct 2010 - 11:29 am | जागु
निवेदिता ताई मस्तच. मी केला होता हा प्रकार एकदा पण चणाडाळ ऐवजी मी चण्याचे डाळे म्हणजे चिवड्यात घालतो ती घेतली होती. छान लागतो.
14 Oct 2010 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त मस्त ! लेखातल्या आणि प्रतिसादातल्या पाकृ देखील.
फोटु कुठ हाय ? दरवेळी असे चालणार नाही बॉ !
14 Oct 2010 - 3:11 pm | आशिष सुर्वे
छानच!!
लहानपणी गावी गेल्यावर गरम गरम नाचण्याच्या भाकरीत ताजे ताजे डांगर पसरवून मग भाकरी दुमडून खायचो..
आजीची आठवण आली..
झक्कासच!!
14 Oct 2010 - 6:28 pm | सुनील
विस्मृतीत गेलेल्या डांगराची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
14 Oct 2010 - 11:22 pm | लतिका धुमाळे
मेतकूट दह्यात कलवून त्याला जिरे हिन्ग आणि लाल मिरचिची फोडणी. हे पण छान लागते.
15 Oct 2010 - 3:45 pm | सविता
मस्त......... आम्ही कच्च्या कांद्याच्या ऐवजी तो फोडणी मध्येच परतून टाकतो.... एक नंबर होते...
खिचडी..पापड्...डांगर..... मस्त मेनू!!!!