उडीद-मुगाचे लाडू

मितान's picture
मितान in पाककृती
13 Oct 2010 - 2:39 am

हिवाळा सुरू झाला की वेगवेगळे लाडू आठवायला लागतात. त्यातले माझे आवडते लाडू उडीद आणि मुगाच्या डाळीचा लाडू. त्याची ही पाकृ.
सामग्री -
१ वाटी मुगाची डाळ
१ वाटी उडीद डाळ
१ वाटी तूप
१ वाटी पिठी साखर
आवडेल तेवढी वेलची पूड, जायफळ वगैरे
आवडत असल्यास आणि तब्येतीला परवडत असल्यास मूठभर बदाम, काजू वगैरे

कृती -
मुगाची डाळ आणि उडीद डाळ लाल गुलाबी रंगाची होईपर्यंत खमंग भाजून घ्या. थोडी गार झाली की मिक्सरवर रवाळ दळून घ्या.
एका नॉनस्टिक कढईत तूप गरम करा. त्यात डाळींचे पीठ घाला. अजुन थोडा गडद रंग येईपर्यंत भाजून घ्या. खमंग भाजले की गॅस बंद करून पिठीसाखर आणि वेलची जायफळ मिसळा. सुकामेवा घाला.
मिश्रण थोडे गार झाले की लाडू वळा.
टिप्स :
हे लाडू जास्त केले तर बरेच दिवस टिकतात ;)
मुगाची आणि उडदाची डाळ सालींसकट वापरू शकता. पण मग डाळ भाजली गेली की नाही ते लवकर कळत नाही म्हणून मी तो धोका पत्करत नाही.
हे घ्या लाडू.....

ladoo

अजून पाहिजे?

ladoo

प्रतिक्रिया

तर्री's picture

13 Oct 2010 - 2:45 am | तर्री

जळवा अजून.खालच्या कढईतले मोजले ! २३ आहेत अगदी एक वेळी नही पण दिवसभराचाच ऐवज !!!

कौशी's picture

13 Oct 2010 - 2:49 am | कौशी

खुप छान ....करून बघते.

साखरेचा पाक करून पण जमेल का हेच लाडू????

मेघवेडा's picture

13 Oct 2010 - 2:51 am | मेघवेडा

वाट बघतो आहे! :D

असुर's picture

13 Oct 2010 - 4:21 am | असुर

+१. अगदी सहमत!

तू घेऊन ये नक्की, पण लाडवाचा डबा (लाडूंसहीत) माझ्याकडे दे. मेव्या, तू वाटच बघ! :-)
काय आहे, तू मेव्याला जर डबा दिलास तर बाकी कुणालाही काहीही देणार नाही! त्याचा मूड असेल तर रिकामा डबा परत देईल, नायतर तो पण गेलाच! त्यापेक्षा, हा सगळा ऐवज माझ्याकडे दे, मी डबा परत करेन असं वाटतंय आत्ता मला.

डब्याची काळजी करु नकोस आजिबात, पण लाडू आण नक्की! अगदी डबा गेलाच तरी पुष्का देईल तुला एखादा!

--असुर

हे लाडू मी लंडन कट्ट्यासाठी केले आहेत असे मी कुठेही आणि कधीही म्हणाले नाही. कृपया गैरसमज नसावा. :))

सेरेपी आणि चुचु
मला गोल लाडू करता येत नाहीत. म्हणून मी नेहमी असे चपटेच करते.
बाकी लाडू गोलच करावे असा नियम नाही. मी तर पोळी पण गोल करत नाही ! ;)

हे लाडू आपल्या कट्ट्यासाठी नैच्चेत हे आमालापन म्हैती है! त्यामुळे कुणाचाही गैरसमज होणार नाही याची जबाबदारी मी घेतो, तू लाडू आणायची जबाबदारी घे. नव्याने लाडू करणं म्हणजे तुझ्या हातचा मळ! हाकानाका! फटू लावलाय तसे होतील असे पहा. ते फटूतले लाडू लैच कातील आहेत.
तुला इतकं सोप्पं काम सांगितलं म्हणून बाकीचे चिडतील माझ्यावर, पण ठीक आहे. तेव्हढं म्यानेज करीन मी! :-)

--असुर

सही दिसतायत. दिवाळीला करून बघेन.

(जरा चपटे झालेयत का पेढ्यांसारखे? कि तसेच करायचेत?)

~सेरेपी

रेवती's picture

13 Oct 2010 - 4:33 am | रेवती

छान दिसतायत.

प्रभो's picture

13 Oct 2010 - 5:35 am | प्रभो

फटू मस्तच....मुगाचे लाडू नाहीत आवडत एवढे....पण २ दिवसात धा रव्याचे लाडू संपवले...

मितान's picture

13 Oct 2010 - 12:37 pm | मितान

कोल्ह्याला द्राक्षे !

स्वाती२'s picture

13 Oct 2010 - 5:55 am | स्वाती२

मस्त!

नगरीनिरंजन's picture

13 Oct 2010 - 8:27 am | नगरीनिरंजन

लय भारी! :-P

पर्नल नेने मराठे's picture

13 Oct 2010 - 10:54 am | पर्नल नेने मराठे

लाडु बसलेत कि त्यांना पेढ्याचा आकार दिला आहे.
पॉश्टीक लाडु वावा !!! पोश्तिक पोउश्तिक मरोस !!!

लाडु बसलेत कि

अंहह कदाचीत चुकुन कुणी तरी लाडवांवरच बसल असाव ;)

पॉश्टीक लाडु वावा !!! पोश्तिक पोउश्तिक मरोस !!!

हा धागा उघडायच्या आधी शरदिनी तैंची कविता वाचलीस की काय :?

आवांतरः मितान लाडु बेष्ट. आपल्याला आकाराशी कसलही देण घेण नाय. बेसन म्हटल की जीव खुळा होतो. :)

गणपा भौ ! तुझ्या डोक्यावर कोणीतरी बसलंय ! मी लाडू केलेत उडीद मुगाचे नि तू म्हणे बेसन म्हटल की जीव खुळा होतो. ! =))

गणपा's picture

13 Oct 2010 - 1:06 pm | गणपा

=)) हा हा हा
अग ते पिवळे धम्म्म्म्मक लाडु पाहुन एकदम मागे मी केलेल्या (फसलेल्या) बेसन लाडवांची (पेढ्यांची) आठवण मनातुन काही जाईना. त्यामुळे टंकताना चुक झाली. एक डाव माफीद्या पामराला :(

अंतरात्मा की आवाझः वाच वाच अजुन ती भरमाध्यान्हीच्या सान्ताक्लॉजचे प्रियाराधन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 11:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे लाडू जास्त केले तर बरेच दिवस टिकतात

=)) =))
बाकी कंपूबाजांनी धागा आधीच हायजॅक केल्यामुळे 'चान चान' म्हणते आहे.

पुष्करिणी's picture

13 Oct 2010 - 12:21 pm | पुष्करिणी

मस्त!

जागु's picture

13 Oct 2010 - 12:43 pm | जागु

वा वा मस्तच लाडू आहेत. साखरेऐवजी गुळ नाही का वापरता येणार ?

जागू, गूळ वापरता येईल.

कौशी, पाकातले लाडू मी कधी केले नाहीत. पण जमतिल बहुतेक.

चिंतामणी's picture

13 Oct 2010 - 12:58 pm | चिंतामणी

आवडत असल्यास आणि तब्येतीला परवडत असल्यास मूठभर बदाम, काजू वगैरे :D

हे वाक्य सगळ्यात जास्त आवडले.

(बाकी कोणाला उद्देशुन आहे याचा खुलासा केल्यास जास्त आवडेल.) ;)

[ विक्षिप्त अदितीशी सहमत असलो तरी एक वाक्य जास्तच टाकले आहे.]

मितान एक सुचवावस वाटत. पिठी साखरे ऐवजी जी (एकदम ) बारीक साखर मिळते ना ती वापरुन पहा.
लाडू खाताना दाताखाली जे बारीक बारीक साखरेचे कण येतात ना त्याने लज्जत वाढते असा स्वानुभव आहे. :)

हे घ्या, हे घ्या म्हणून फक्त फोटो !! तुम्ही कधीपासून सदाशिवपेठी झालात. :)

भारतात येणार आहेस तेह्वा हे लाडू करुन आणशीलच.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या पाकृ नुसत्या दिसणारच आहेत का खायचा योग पण नशिबात आहे ?