तळलेल्या मिरच्या

जागु's picture
जागु in पाककृती
12 Oct 2010 - 3:29 pm

मिरच्या म्हटल म्हणजे खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटत. ह्या मिरच्यांचे बरेच प्रकार आहेत. तळण्यासाठी जाड्या मिरच्या घ्यायच्या. जाड्या मिरच्या बारीक मिरच्यांच्या मानाने कमी तिखट असतात.

लागणारे साहित्य:
५-६ जाड्या मिरच्या
बेसन गरजे नुसार
हिंग
हळद
मिठ
अर्धा चमचा मिरचीपुड
तळण्यासाठी तेल

पाककृती:
प्रथम मिरच्या धुवुन त्याचे मधे चिर पाडून दोन तुकडे करावेत. मिरचीतील बी काढून टाका.

एका भांड्यात बेसन, हिंग, हळद, मिठ, मिरचीपुड हे थोडे पाणी घालुन भजीच्या पिठासारखे घट्ट भिजवावे.

नंतर भिजवलेल्या पिठात मिरच्या बुडवून तव्यात शॅलोफ्राय किंवा कढईत डिपफ्राय करत ठेवाव्यात. शॅलोफ्रायमुळे तेल कमी लागते.

गॅस मिडीयम किंवा मंदच ठेवावा म्हणजे कुरकुरीत होतात. थोडावेळाने पलटी करुन शिजवाव्यात म्हणजे झाल्या रुचकर तळलेल्या मिरच्या तय्यार.

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

12 Oct 2010 - 3:54 pm | पर्नल नेने मराठे

जागु , भज्यांचे पिठ उरले कि मी हा प्रकार करते.

रामदास's picture

12 Oct 2010 - 5:41 pm | रामदास

उरला की पाकातल्या मिर्च्या पण करते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Oct 2010 - 5:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

उरला की पाकातल्या मिर्च्या पण करते.

किती लोकं हा आयडी वापरतात हो रामदासकाका?

बाकी मिरचीची भजी मलाही आवडतात.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Oct 2010 - 6:01 pm | परिकथेतील राजकुमार

जोजोकाकु, अहो रामदासकाका चुचु विषयी टिपणी करत आहेत.

खरच वयोमानपरत्वे तुम्ही....

असो...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Oct 2010 - 6:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रामदासकाकांना वकीलाची गरज कधीपासून निर्माण झाली?
असो. रामदासकाका, तुमचा सर्वनाम वापरण्याला काही तात्विक विरोध नाहीये ना?

परिकथेतील राजकुमार's picture

12 Oct 2010 - 6:14 pm | परिकथेतील राजकुमार

आपल्या नाकाला मिरच्या झोंबल्याचे स्पष्ट दिसत आहे.

रामदास's picture

12 Oct 2010 - 8:54 pm | रामदास

लेखीकेचा आणि माझा थोडासा मतभेद आहे.
आमच्याकडे बारीक मिर्च्या आल्या ,त्या जाड्या झाल्या, आता त्या सिमल्याच्या मार्गावर आहेत पण पण तिखटपणा काही कमी होत नाहीय्ये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Oct 2010 - 8:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रामदासकाका, पाय कुठे आहेत हो तुमचे? _/\_

धमाल मुलगा's picture

12 Oct 2010 - 9:05 pm | धमाल मुलगा

एकही मारा पण काय सॉल्लीड मारा की नही? :D

_/\_ मुनीवर्यांच्या चरणी साष्टांग.

प्रभो's picture

12 Oct 2010 - 9:11 pm | प्रभो

_/\_ मुनीवर्यांच्या चरणी साष्टांग.

रामदास, मिरच्या खाण्याच्या दर्दी माणसाला मिरचीचा तिखटपणा तितकासा जाणवत नाही. पण मिरच्या कमी तिखट होण्यासाठी मिरचीच्या आतले बी काढून टाकायचे म्हणजे कमी तिखट होतात मिरच्या कारण मिरचीची बी मिरचीच्या सालापेक्षा जास्त तिखट असते.

जागु ताई तुमको कळ्या नाय. ते वेगळ्या तिखट मिरच्यांबद्दल बोलताहेत.

आत्ता कळल्या. ट्युब पेटली आत्ता.

श्रीयुत संतोष जोशी's picture

13 Oct 2010 - 7:17 pm | श्रीयुत संतोष जोशी

जबरा...................

मनि२७'s picture

12 Oct 2010 - 4:00 pm | मनि२७

ह्या प्रकाराला आम्ही मिरचीची भजी म्हणतो...
मस्तच लागतात...!!
आवडल्या... !

सुत्रधार's picture

12 Oct 2010 - 5:22 pm | सुत्रधार

जागु तै,

एवढ्या मिरच्या एकदम!!!
छ्या काहि खर नाही
जाळ अन धूर सन्गटच

मनी, मी नावच चुकीच दिलय अस मला वाटत. मिरचीची भजीच टाकायला पाहिजे. बदलते मी.
सुत्रधार अहो आमच्या घरात ९ माणस आहेत एक व्यक्ती नाही खात एवढ्या मिरच्या.

चिंतामणी's picture

14 Oct 2010 - 11:52 am | चिंतामणी

व्यनी करा सं.मं.ला. आणि दुरूस्त करायला सांगा.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Oct 2010 - 5:45 pm | परिकथेतील राजकुमार

च र च री त ! मिर्च्यात सारण भरताना पुन्हा मिर्चीपुड म्हणजे पळापळच ;)

अजुन एक मिर्चीचा आवडता प्रकार म्हणजे कुटाच्या मिरच्या.

प्राजु's picture

12 Oct 2010 - 7:20 pm | प्राजु

मला नावावरून कुटाच्या मिरच्याचीच पाकृ वाटली.
भन्नाट लागते कुटाची मिरची तळल्यावर. :)

राजकुमार, प्राजु कुटाच्या मिरच्या माझ्यापण आवडीच्या. उन्हाळ्यात केल्या की रेसिपी टाकणार.
राजकुमार तसे मिरचीपुड नाही टाकली तरी चालु शकेल पण पिठाला पण चव हवी म्हणून किंचीत टाकायची.

निवेदिता-ताई's picture

12 Oct 2010 - 5:53 pm | निवेदिता-ताई

मस्त्च.........मिरची भजी..........छान लागतात.

रतन's picture

12 Oct 2010 - 6:01 pm | रतन

छान. घरी गेलो कि बनवतोच.
आता कळाले कि आपण भारतिय पाणी का वापरतो ते. अहो, पेपर वापरला तर तो जळणार नाही का?
(अवांतरः मलापण चरचरीत आणि झणझणीत पदार्थ आवडतात)

धमाल मुलगा's picture

12 Oct 2010 - 6:07 pm | धमाल मुलगा

जेव्हा जेव्हा घरी भजी करतात तेव्हा जर माझ्यासाठी मिरचीभजी केल्या नसतील तर तांडव, रुद्रावतार, आकाश-पाताळ एक करणं... वगैरे वगैरे शब्दांचे अर्थ उदाहरणासह स्पष्ट होतात. ;)

आपल्याला हा प्रकार लै लै म्हणजे लैच्च आवडतो :)

छोटा डॉन's picture

12 Oct 2010 - 6:12 pm | छोटा डॉन

अहो धमालराव, आपण जे नेहमी करतो ते मिर्च्याचे भजे वेगळे आणि ह्या तळलेल्या मिर्च्या वेगळ्या.
निदान फोटो तरी पहायचा की राव ;)

असो, ह्या अशा प्रकारच्या मिर्च्या "गुजराथ"मध्ये ढाब्यावर सर्रास आढळतात असे वाटते.
दक्षिण भारतातही 'आध्रां स्टाईल' हॉटेल्समध्ये अशा तळलेल्या मिर्च्या कंपल्सरी असतातच टेबलावर. एकदम मस्त कुरकुरीत लागतात. मस्त दही-भात आणि त्याबरोबर ह्या तळलेल्या मिर्च्या म्हणजे स्वर्गसुख.

अवांतर : थोड्या वेळात धमालराव "नाकाला झोंबणार्‍या मिर्च्या" ही पाककृती टाकतीलच ;)

- छोटा डॉन

धमाल मुलगा's picture

12 Oct 2010 - 6:21 pm | धमाल मुलगा

हापिसात आम्हाला फोटो पहायचा पगार देत नाहीत. त्यामुळं फोटो बॅन असतात.

राहिला प्रश्न पाकृ वाचुन अंदाज बांधण्याचा, तर मुळात आमची मजल मॅगी+कॉफी ह्यापुढे नाही. मिरची, डाळीचं पीठ, तळणे एव्हढ्यावरुन अस्सल मराठी माणूस जेव्हढा अंदाज बांधू शकतो तेव्हढ्यावरुन आम्ही बोललो. आंध्रात किंवा गुजरातमधल्य ढाब्यावर जाण्याचे प्रसंग आले नाहीत हो आयुक्षात.

>>अवांतर : थोड्या वेळात धमालराव "नाकाला झोंबणार्‍या मिर्च्या" ही पाककृती टाकतीलच
मला वाटलं तुम्हीच 'मळलेल्या खुर्च्या' ही पाकृ टाकणार आहात.

>>हापिसात आम्हाला फोटो पहायचा पगार देत नाहीत. त्यामुळं फोटो बॅन असतात.
असेल, तसेही असेल, म्हणजे फोटो बॅन असु शकतात.
पण तरीही केवळ फोटो पाहण्यासाठी पगार देत असलेली कंपनी माझ्या पाहण्यात नाही, पण तुम्ही म्हणता तशी असु शकते.

राहिला प्रश्न पाकृ वाचुन अंदाज बांधण्याचा, तर मुळात आमची मजल मॅगी+कॉफी ह्यापुढे नाही. मिरची, डाळीचं पीठ, तळणे एव्हढ्यावरुन अस्सल मराठी माणूस जेव्हढा अंदाज बांधू शकतो तेव्हढ्यावरुन आम्ही बोललो. आंध्रात किंवा गुजरातमधल्य ढाब्यावर जाण्याचे प्रसंग आले नाहीत हो आयुक्षात.

बास बास बास !!!
वरच्या पॅरामध्ये २-३ ठिकाणी मिरच्या हा शब्द पेरला आणि इअजुन किंचित आदळाआपट भुरभुरली की झालीच की हो "नाकाला झोंबणार्‍या मिरच्या" ही पाककृती, नाय काय म्हणता.
तुम्ही तर एकदम छुपे रुस्तम निघालात की ;)

- छोटा डॉन

धमाल मुलगा's picture

12 Oct 2010 - 6:40 pm | धमाल मुलगा

अवांतर मिरच्यांसाठी खरडवही पेटवू.

म्हणुनच तुमचा आयडी धमाल मुलगा आहे का ?

सुहास..'s picture

12 Oct 2010 - 6:40 pm | सुहास..

मुळात आमची मजल मॅगी+कॉफी ह्यापुढे नाही >>.

आख्ख्या बंगळुरात प्रसिध्द असलेलं ट्रेन्ड सिक्रेट मिपावर ओपन केल्याबद्दल धम्याचा निषेध ...

जागु !! एक नंबर ग !!

नगरीनिरंजन's picture

12 Oct 2010 - 6:44 pm | नगरीनिरंजन

लै ब्येस लागतात. एका हैद्राबादी हाटेलात खाल्ल्या होत्या. मज्जा आलती.
तळून तयार झालेल्या मिर्च्यांचा फटू नाही टाकला का?

मदनबाण's picture

12 Oct 2010 - 7:11 pm | मदनबाण

हा प्रकार अजुन तरी खाल्ला नाहीये...पण मिरचीची भजी आणि तळलेली सांडगी मिरची लयं मस्त लागते. :)

(तिखट-गोड प्रेमी) ;)

या मिरच्या खायला छान लागतात, पण आम्ही जरा जपूनच खातो!!

अवलिया's picture

12 Oct 2010 - 7:14 pm | अवलिया

जबरा !!

प्रभो's picture

12 Oct 2010 - 7:28 pm | प्रभो

खल्लास!!!

स्वाती२'s picture

12 Oct 2010 - 7:32 pm | स्वाती२

मस्त!

चिंतामणी's picture

13 Oct 2010 - 12:45 am | चिंतामणी

पाकृ चान sorry छान आहे. (मिपावर जागुची पाकृ म्हणजे चांगलीच असणार असे समीकरण आहे)
(चानचा अर्थ येथे वेगळा आहे हे वेळेतच लक्षात आहे नाहितर...........)
;)

पण याला मिरचीची भजी म्हणणे जास्त योग्य आहे.

बाकी हैदराबादला ही भजी दोन तीन भेटीत खाल्ली होती. त्यात एक थोडा वेगळा प्रयोग चाखण्यात आला होता. मिरची बेसन आणि त्यात अनेक गोष्टी मिसळुन बनवलेल्या प्रकारात बुडवण्या पुर्वी आत उकडुन स्माश केलेला बटाट्यात थोडे मिठ, कोथिंबीर, तिखट घालुने हे सारण मिरचीत भरल्यावर मग बेसन आणि वरील पदार्थ मिसळलेल्या पिठात बुडवुन तळल्या होत्या.

एकदम भन्नाट प्रकार होता.
:)

विसोबा खेचर's picture

13 Oct 2010 - 12:31 pm | विसोबा खेचर

एक नंबर..!

तात्या.

--
शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!

मितान's picture

13 Oct 2010 - 7:20 pm | मितान

जागुतै ! जोरदार झाल्यात मिर्च्या ! आज केल्या :)

तळलेल्या मिरच्या इकडे वड्या सोबत खायला देतात त्या वेगळ्या असतात. त्यासाठी बारीक लंवगी मिरच्या मधुन चिरुन घेतात. त्या तेलात चांगल्या तळुन काढतात. व नंतर त्यावर मीठ टाकतात. तसल्या मिरच्या भाकरी सोबत खायला खुप मस्त लागतात.

स्मिता_१३'s picture

14 Oct 2010 - 10:33 am | स्मिता_१३

जागु ताई.

मिरच्या भन्नाट. पण मी जरा जपुनच खाते (तिखटामुळे). :-)

सुनील's picture

14 Oct 2010 - 6:24 pm | सुनील

मागे एकदा करून पाहिल्या होत्या. पण मिरचीच्या पृष्ठभागावर बेसन टिकून राहात नाही आणि तेलात मिरची आणि बेसन सुटे होते. पुन्हा एकदा प्रयत्न करून बघायला हवा.

मागे एकदा करून पाहिल्या होत्या. पण मिरचीच्या पृष्ठभागावर बेसन टिकून राहात नाही आणि तेलात मिरची आणि बेसन सुटे होते.

सुनिल पिठ पातळ झाल्यावर अस होत. पिठाचे मिश्रण थोडे घट्ट ठेवायचे म्हणजे पिठ चिकचुन राहत.

सुनील's picture

15 Oct 2010 - 6:41 pm | सुनील

धन्यवाद!

मी मिरचीचा पृष्ठभाग फोर्कने किंचित खडबडीत करून पिठात बुडवून पाहिले, हाही उपाय बरा वाटला!

गणपा's picture

15 Oct 2010 - 6:56 pm | गणपा

"गरज शोधाची जजनी" म्हणतात ते हेच :)