खास- नवरात्र - उपवासासाठी..............शाबूवडा....

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
11 Oct 2010 - 2:04 pm

From
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
From

साहित्य:- एक वाटी भिजवलेला शाबूदाणा, दोन बटाटे (उकडून), दोन मिरच्या,एक टे.स्पून साखर,
चवीनुसार मिठ, तळण्यासाठी रिफाईंड. ज्यांना उपवासाला जिरे चालत अशांनी थोडे जिरे घालावेत.

कॄती:- बटाटे सोलुन कुस्करुन घ्यावेत, त्यात भिजवलेला शाबूदाणा, मिरची तुकडे, मीठ, साखर चवीनुसार,जिरे इ. सर्व एकत्र करुन चांगले मळुन घ्यावे,पाणी थोडे सुद्धा घालू नये. त्याचे लहान लहान चपटे वडे थापून मध्यम आचेवर तळून घ्यावेत. हे वडे गोड दही किंवा नारळाच्या चटणीबरोबर खावेत.
टीप-- यात शेंगदाणे कुट अज्जिबात घातले नाही, त्यामुळे हे कुरकुरीत होतात.

प्रतिक्रिया

छानच लागतात हे वडे......
मला खूप आवडतात.. माझी आई कुट घालून करते...
ह्यावेळी तिला असे करायला सांगेन...:-)
माझी शंका कम प्रश्न:- ह्यात आपण रताळी पण घालू शकतो का बटाट्या ऐवजी..???

निवेदिता-ताई's picture

11 Oct 2010 - 9:27 pm | निवेदिता-ताई

नाही रताळी यात चांगली लागत नाहित, बटाटाच घालावा.

प्राजु's picture

11 Oct 2010 - 9:34 pm | प्राजु

यामध्ये थोडी उपास भाजणी सुद्धा छान लागते. किंवा, वरई थोडीशी शिजवून घातली तर एक कुरकुरीतपणा येतो.