From Pictures" width="300" height="300" alt="" />
या आधी जागुतैने या भाजीची रेसिप दिलेली वाचली अन लक्षात आल अरे आपण तर खूपच वेगळ्या पद्धतीने करतो ही भाजी.
म्हणून मग परत भाजी आणून हा सारा उपद्व्याप !!
खरच एकदा करून पहा, वेगळ्या चवीची अन जागू ताईन इतकीच फक्कड!!.
तर सामग्री:-
एक जुडी अम्बाड्याची भाजी.
एक ते दीड मूठ ज्वारीची कणी( माझ्या कडे ज्वारी मिळते, तुम्हाला नसेल मिळत तर थोडे तांदूळ भिजवले तरी चालतील)
एक मुठभर तूर डाळ.
एक ते दीड मूठ शेंगदाणे
१ टी स्पून जिरे.
१/४ टी स्पून मेथीदाणे .
आवडी नुसार हिरव्या मिरच्या,( मी फक्त एक वापरते)
तिन चार लसूण पाकळ्या (आमचे लसूण मोठे असतात, आपल्याकडचे १० कुड्या म्हणा हवेतर)
हळद, हिंग , मीठ.
फोडणी साठी.
चार पाच लसूण पाकळ्या , हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, हिंग अन हळद.
From Pictures" width="300" height="300" alt="" />
कृती.
प्रथम ज्वारीची कणी, तूर डाळ अन अर्धवट फोडलेले शेंगदाणे भिजत घाला.
भाजी निवडून धुवून घ्या. पातेल भर पाणी उकळत ठेवा, पाणी उकळल की त्यात भाजी घालून वेळून घ्या.
या मूळे भाजीचा आंबट पणा थोडा कमी होतो.
आता हा वेळलेला भाजीचा गोळा एका भांड्यात थोडे पाणी खाली घालून ठेवा, अन त्या गोळ्यावर भिजलेली कणी, डाळ अन शेंगदाणे उपसून घाला.
झाकण ठेवून चांगली वाफ येऊ दया.
एकदा कणी शिजली की त्या मध्ये हिंग हळद अन मीठ मिसळा.
लसूण अन मिरची ठेचून घ्या अन या भाजीत मिसळा. जवळ जवळ शिजत आलेल्या या भाजीवर मग मेथी अन जीऱ्याची एकत्र कुटून पावडर घाला.
From Pictures" width="300" height="300" alt="" />
फोडणी साठी एक पळीभर तेल गरम करा.
त्यात लसूण पाकळ्या मग कढीपत्ता अन मिरच्या घाला. शेवटी हिंग अन हळद घालून ही फोडणी वरून भाजीवर ओता अन चांगले ढवळून घ्या. थोडी दुबदुबीत च राहु द्या ही भाजी.
खाताना भाकरी असेल तर क्या कहने. आपण जसे वर्जिन ऑलिव ओईल कच्चे खातोना तसे आम्ही या भाजी बरोबर कच्चे शेंगदाण्याचे तेल खातो, बरोबर थोडी मिसळलेल तिखट.
From Pictures" width="300" height="300" alt="" />
प्रतिक्रिया
7 Oct 2010 - 1:50 pm | स्पंदना
आंबाड्याच्या भाजी खाली बसुन झालेला अमुल्य बोध- फोटो ची एम्बेड वापरणे लिंक नव्हे.
शेवटी एकदा प्रकाश पडला डोक्यात, हे ही नसे थोडके.
7 Oct 2010 - 2:07 pm | विसोबा खेचर
मस्त.. :)
तात्या.
--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
7 Oct 2010 - 2:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अंबाडीची भाजी का अंबाड्याची? ;-)
7 Oct 2010 - 6:33 pm | पैसा
कोकणात "अंबाडा" नावाची हिरवी आंबट चवीची फळे मिळतात त्यांचं रायतं (गोव्यात त्याला सासव म्हणतात), आमटी इ करतात. अतिशय रुचकर लागते.
7 Oct 2010 - 7:59 pm | प्राजु
हो..खूप मस्त होते त्याची आमटी. सावंतवाडीला खाल्ली होती.
या भाजीला आम्ही आंबाडी म्हणतो. मी ही अशीच करते. मात्र यात मी ओले (फ्रोजन)हरभरे सुद्धा घालते आणि ज्वारीच्या ऐवजी भाताची कणी घालते.
7 Oct 2010 - 10:55 pm | शाहरुख
आम्ही पण !
फक्त कोल्हापूर परिसरात अंबाडी, शेपू (इंग्रजी-डील) सारख्या पालेभाज्यात भाताच्या कण्या घालतात असा एक फुटकळ अंदाज व्यक्त करुन आणि अपर्णा ताईंचे आभार मानून तसेच निषेध व्यक्त करुन प्रतिसाद संपवतो.
7 Oct 2010 - 2:49 pm | सूड
रेशिपी छानच !!
7 Oct 2010 - 3:06 pm | सहज
स्वीट पोटॅटो लिव्ह्ज (रताळ्याची का 'यॅम'ची?? पाने) अशीच करता येईल. गोळा भाजी. अंबाडी इतकी आंबट नसली तरी गोळा भाजी अश्या पद्धतीने छान होते.
8 Oct 2010 - 2:56 am | दिपाली पाटिल
रताळ्याची पाने पहील्यांदा पाहीली. रंग सुंदर आहे.
7 Oct 2010 - 3:07 pm | विजुभाऊ
अरे बापरे अम्बाडी की अम्बाडा?
मी शिकलेल्या मराठी अम्बाडा हा केशरचनेचा एक प्रकार आहे असे सांगितलय.
एनी वे पा कॄ झकास. करुन पहायला हवी
7 Oct 2010 - 4:25 pm | स्पंदना
अॅक्चुअली अम्बाडी हा शब्द आहे पण बोलताना आम्ही आम्बाड्याची म्हणतो, म्हणुन गलती से मिस्टेक हो गया . माफ करा अदिती तै अन विजुभौ .( तसे स्वयंपाकात केस असतात पण पुरा अम्बाडा म्हणजे जरा जास्तच झाला)
तात्या , सहज काका अन सुशांधु धन्यवाद.
7 Oct 2010 - 5:25 pm | सूड
अपर्णातै अंबाडीला अंबाडा काय वेणी म्हणालात तरी चालेल, पोटात गेल्याशी मतलब. पण आ सुं छे ??
>>सुशांधु धन्यवाद.
7 Oct 2010 - 5:10 pm | प्राजक्ता पवार
छान झाली आहे भाजी. ही अंबाडीची भाजी शिजवुन , मीठ व वाटण यासोबत ज्वारीच्या पिठात मिसळुन भाकरीदेखील बनवता येते. चवीला खुप छान लागते :)
7 Oct 2010 - 7:49 pm | प्रभो
मस्तच...आवडती भाजी..!!
7 Oct 2010 - 10:08 pm | पक्या
ह्या भाजीचे इंग्लीश नाव काय आहे?
इंग्लिश नाव समजल्यास इथे शोधता येईल मिळते का ते. मागे एकदा कॅलीफोर्नियातील मित्राने आज अंबाडीची भाजी खाल्ली असा उल्लेख केला होता सहज बोलता बोलता. पण त्यावेळी मी विचारायचे विसरलो कुठे आणि काय नावाने मिळते. आणि आता तो मित्र संपर्कात नाहिये.
कोलार्ड (collard) ही भाजी नेमकी कोणती? ईथे एक केल (kale) नावाची पण हिरवट लालसर रंगाची पालेभाजी मिळते.
7 Oct 2010 - 10:28 pm | बेसनलाडू
कॅलिफोर्नियातील भारतीय दुकानात ही भाजी घोंगुरा नावाने मिळते. हे या भाजीचे दक्षिण भारतीय (तेलगू?) नाव आहे.
(माहीतगार)बेसनलाडू
7 Oct 2010 - 10:40 pm | पक्या
धन्यवाद. इथल्या देशी दुकानात बघतो घोंगुरा मिळते का ते.
8 Oct 2010 - 3:46 am | रेवती
पूर्व किनार्यावर कधीकधी मिळतो पण घोंगुर्याचे वृक्ष असतात.;)
ज्या दिवशी आणतो त्याच दिवशी केली नाही तर वाया जाते.
माझी भयानक आवडती पाकृ आहे.
या भाजीची आठवण करून दिल्याबद्दल अपर्णाचा निषेध!
8 Oct 2010 - 5:16 pm | स्वाती२
अंबाडीला सॉरेल लिव्हज म्हणतात.
केल मी चिकन नुडल किंवा बार्ली सुप मधे टाकते.
7 Oct 2010 - 10:20 pm | निवेदिता-ताई
मला खूप खूप आवडते ही भाजी.....पण दुसर्याने केलेली.
8 Oct 2010 - 5:19 pm | स्वाती२
छान रेसिपी. इथे ते बाटलीतले घोंगुराचे लोणचे मिळते. भाजी नाही दिसली कधी.