कोलंबस

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in पाककृती
23 Sep 2010 - 6:15 pm

मी इडली हॉटेलमधे खात नाही.
कारण -९९.९९% सांबार म्हणुन जे फोडणीचे लाल पाणी देतात त्याला सांबार म्हणणे हे खर्‍या सांबाराचा अपमान आहे.
ह्यातलीच एक वरायटी म्हणजे कॉळंबो.
हे इडली बरोबर पण चालते- चालते काय धावते.
हॉटेल मधे २ इडल्यांवर पोट भरते.
घरी १२ सहज जातात.
म्हणुनच हॉटेल मधे कधी नाईलाजाने इडली खावी लागली तर सांबार चटणी अलग अलग.
उगीचच स्वःत ला कमीट कशाला करायचे.
चाखुन बघायचे.
नाहीतर आपली चटणी परवडली.
चट्णी पण बहुतांशी सत्व काढलेल्या पांढर्‍या चोथ्याची असते.
___________________________________________________
ज्यांना भात खायला आवडतो त्यांना भाता बरोबर कोलंबस म्हणजे पर्वणी.
आवडी नुसार ह्यातले डाळीचे प्रमाण कमी जास्त करता येते.
ह्यात शेवग्याच्या शेंगा, बटाटा, वांगे, फरसबी आपल्या आवडी नुसार.
तिखट आपल्या कुवती नुसार.
पण भात अगदी गरम हवा.
---------------------------------------------------------------------------------------
फोडणी शुद्ध तुपातली दिल्याने कोलंबस च खुमारी अजुन वाढते.
पण ह्यातली खरी गोम आहे ती सांबार पावडर.
लग्न झाल्यावर ३ र्‍या दिवशी सौ. ने केलेला कोलंबस खाल्यावर माझ्या मोठ्या भावाने दिलेली प्रतिक्रिया खालील प्रमाणे.
Look here buddy. If you were to make this girl unhappy in future for any reason whatsoever, I will kick you where it hurts most.
----------------------------------------------------------------------------------------

बाजारात मिळाणारी सांबार पावडर ही शुद्ध नसते.
सासुने घरी बनवुन पाठवलेली होती.
आजपर्यंत हुंडा घेतला नाही ह्याची खंत नाही.
असो.
अगदी जवळ जवळ तशीच सांबार पावडर गावावरुन मागवलेली आहे.
कुणाला हवी असल्यास मागणी नोंदवावी.
मिपावर २ वर्षे आयडी न उडता जिवंत राहील्याबद्दलचे सेल्लिब्रेशन.
ही एक गिफ्ट आहे. पैसे घेणार नाही.
फक्त कुरियर करायचा आग्रह करु नये.
कुरियर शी डील करायचा पेशन्स माझ्याकडे नाही.
एरिया रेप्रेझेंटेटीव ने ही जबाबदारी घ्यावी.
-----------------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया

सुनील's picture

23 Sep 2010 - 6:19 pm | सुनील

मागवली असती (किंबहुना येऊन घेऊनच गेलो असतो) पण सध्या बाहेरगावी आहे!

पण पाकृ देलिच्च नाय तुमि ! :(

समंजस's picture

23 Sep 2010 - 7:56 pm | समंजस

प्रभू गुर्जींकडून पाकृ ? म्हणून मी खुप उत्सुकतेने धागा उघडला तर पाकृ कुठेच नाही :(

[अवांतरः मागणी नोंदवली असती परंतु गुर्जी म्हणतात पैसे नको म्हणून नोंदवण्या आधीच रद्द केली. गुर्जीं कडून भेट ? हे पाप करून फेडणार कुठे ? नको बुवा त्यापेक्षा ती बाजारातील शुद्ध नसलेली सांबार पावडरच बरी :) ]

सहज's picture

23 Sep 2010 - 6:21 pm | सहज

सर मी हात वर केला आहे. कृपया माझा वाटा तूर्तास तुमच्या पाशीच ठेवा.

नंदन's picture

24 Sep 2010 - 1:25 am | नंदन

असेच म्हणतो. तीन-चार महिन्यांत पिकअप केली तर चालेल काय? :)

धमाल मुलगा's picture

23 Sep 2010 - 6:22 pm | धमाल मुलगा

मास्तुरे,
आपल्या फोनाफोनीप्रमाणे माझा वाटा पक्का :)
साला कोणी नाय सापडला, तर ठाण्यात येऊन घेऊन जाईन!

विनायक प्रभू's picture

23 Sep 2010 - 6:23 pm | विनायक प्रभू

अहो तुम्हाला दिली नाही तर डायरेक्ट नरक लेवल ५.
असो सांबार ची पाककृती सावकाश्.(द्यायला पाहीजेच का?)

आधी लाळ टपकेल अशी वर्णने लिहून, पा.कृ. ने देण्या बद्दल निषेध!

(मास्तर, सगळेच व्यवहार फुकट करतात काय?)

अगदी जवळ जवळ तशीच सांबार पावडर गावावरुन मागवलेली आहे.
कुणाला हवी असल्यास मागणी नोंदवावी.

मास्तर आम्हास्नी काय जमायच न्हाय पगा, त्यापरीस सासुबाईंना आम्हा मिपाकरांतर्फे साकड घाला आणि सांबार पावडरची कृती येउद्यात.
बाकी तुमच्या ऑफरची एरिया रेप्रेझेंटेटीव नक्कीच लाभ उठवतील, आमची येवडी सोय करा ही इनंती.

गणपाभौ म्हणत्यात तस्संच म्हणते...

बाकी इडली हलकी, फुगलेली, चपटी, वातड, नरम, गरम, गार कशीही असो कोणत्याही सांबार, रस्सम, कढी, दही, चटणी, लोणचे, तूप, लोणी, चायनिज सॉस, ठेचा अशा कोणत्याही पदार्थासोबत चांगलीच लागते अशी आमची 'श्रद्धा' आहे !

इडलिप्रेमी
मितान

मेघवेडा's picture

23 Sep 2010 - 7:04 pm | मेघवेडा

आम्ही देखील याच पंथाचे अनुयायी असल्याने सहमत आहे! जै बोलो!

दिपाली पाटिल's picture

24 Sep 2010 - 11:37 pm | दिपाली पाटिल

मलापण तुम्च्यात अ‍ॅड करून घ्या...

ब्रिटिश टिंग्या's picture

23 Sep 2010 - 6:26 pm | ब्रिटिश टिंग्या

पुढच्या आठवड्यात आहे मुंबईत! :)

विनायक प्रभू's picture

23 Sep 2010 - 6:36 pm | विनायक प्रभू

पुणेकरांनो,
ब्रिटीश टींग्या ला फिजिकल कुरियर करुया का?
रिलायबेल पार्टी आहे ह्याची ग्वाही हवी.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Sep 2010 - 6:26 pm | परिकथेतील राजकुमार

अगदी जवळ जवळ तशीच सांबार पावडर गावावरुन मागवलेली आहे

गाववाली पावडर पण घरी बनवलेलीच आहे का मास्तुरे ? ऑ ?

बाकी लेखात मेदूवड्याचा उल्लेख राहिला का? ;)

निखिल देशपांडे's picture

23 Sep 2010 - 6:30 pm | निखिल देशपांडे

ठाण्यातला पहिला नंबर माझा.. उद्या फोनवतो तुम्हाला. बाकी, काकूंच्या पाककौशल्याबद्दल काय बोलायचे??? खाऊन मन आणि पोट अगदी तृप्त होते.

धमाल मुलगा's picture

23 Sep 2010 - 6:33 pm | धमाल मुलगा

>>उद्या फोनवतो तुम्हाला.
=)) =)) =))

ओ गुर्जी, पाहिलं का? आणखी एक फोनचं आश्वासन...आता भेटला की ह्याला अश्वासनच करायला लावा.

मितान's picture

23 Sep 2010 - 6:38 pm | मितान

आता भेटला की ह्याला अश्वासनच करायला लावा.

त्याला नुसतं उभं रहावं लागेल. अश्वासन करण्यासाठी :)))))
(पळा......)

विनायक प्रभू's picture

23 Sep 2010 - 6:46 pm | विनायक प्रभू

आताच एक सद्स्य मित्राचा फोन आला त्यानुसार खालील डीक्लरेशन.
मी कुठलीही सांबार विकायची एजन्सी घेतलेली नाही.

कृपया माझ्यासाठी थोडी पावडर राखून ठेवा.
ती पावडर आणि कोलंबस बनवण्याची रेशिपी द्या कि!
निखिलशी सहमत.
सौ. काकूंच्या पाककौशल्याबद्दल बोलायलाच नको.:)

शुचि's picture

23 Sep 2010 - 7:25 pm | शुचि

लेखन शैली आवडली :)

असो मास्तर फोन करतो.कोल्हापुरला पाठवु शकाल काय? सांबार मिक्स.नाहीतर दुसरे काय तरी पाठवाल.

संदीप चित्रे's picture

23 Sep 2010 - 8:45 pm | संदीप चित्रे

झन्टामॅटिक आहे !
>> बाजारात मिळाणारी सांबार पावडर ही शुद्ध नसते.
सासुने घरी बनवुन पाठवलेली होती.
आजपर्यंत हुंडा घेतला नाही ह्याची खंत नाही.
अगदी अगदी... हाच अनुभव मला माझ्या सासूबाई पाठवतात त्या सामिष भोजन मसाल्याचा आहे :)
(अवांतरः 'कोलंबस' नावामुळे आमाच्या जीव की प्राण 'कोलंबी'बद्दल काही पाकृ दिसतीय असं आधी वाटलं होतं !)

सहमत आहे.
मिपावर २ वर्षे आयडी न उडता जिवंत राहील्याबद्दलचे सेल्लिब्रेशन
हे वाक्य नसते तर घरच्या पावडरीच्या शुध्दतेबद्दल वाढीव खात्री झाली असती.
तरीपण मी येऊन मुकाट्याने पावडर घेऊन जाईन.

दिपाली पाटिल's picture

23 Sep 2010 - 9:24 pm | दिपाली पाटिल

मी तर नक्की मागवली असती पण तुम्ही ठाण्यात अम्ही उसगावात... हाच तोटा आहे इकडे असण्याचा, कोलंबसाच्या नुसत्या वर्णनाने अगदी अत्ता खावंसं वाटतंय. पण जरा पाकृ दिली असती तर बरे झाले अस्ते. माझ्या पध्दतीने बन्वून पाहीली असती.

दिपाली पाटिल's picture

24 Sep 2010 - 10:51 pm | दिपाली पाटिल

.

शाहरुख's picture

23 Sep 2010 - 9:40 pm | शाहरुख

नक्की म्हणणं काय आहे ??

पैसा's picture

23 Sep 2010 - 10:00 pm | पैसा

बोलाची कढी आणि बोलाचा भात! ;)

दिपाली पाटिल's picture

24 Sep 2010 - 10:52 pm | दिपाली पाटिल

मी तर नक्की मागवली असती पण तुम्ही ठाण्यात अम्ही उसगावात... हाच तोटा आहे इकडे असण्याचा, ---- आता माझं म्हणणं असं आहे की ठाण्यात अस्ते तर सांबारची पावडर येऊन घेऊन गेले अस्ते पण उसगावात आहे म्हणून तोटा आहे की ती पावडर मिळणार नाही.

कोलंबसाच्या नुसत्या वर्णनाने अगदी अत्ता खावंसं वाटतंय. ---- आता यात न समजण्यासारखं काय आहे?

पण जरा पाकृ दिली असती तर बरे झाले अस्ते. माझ्या पध्दतीने बन्वून पाहीली असती ---- याचा अर्थ म्हणजे पाकृ दिली असती तर जी सांबार पावडर माझ्याकडे आहे तीनेच हे कोलंबस बनवून पाहीन.

अजून काही राहीलंय कां समजावण्यासाठी...

दिपाली :)

स्वाती२'s picture

23 Sep 2010 - 10:23 pm | स्वाती२

काय हे? एवढं वर्णन करुन कृती नाहिच. ठाण्याला येणे काही शक्य नाही. तेव्हा सांबार पावडर आणि कोलंबो दोन्हीची कृती द्या ना प्लीज.

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2010 - 10:35 pm | पिवळा डांबिस

एव्हढा काय भाव नको खायला!!!!
मी तिथे येईन तेंव्हा व्हयनेकडून सांबार पावडर , ती करण्याची रेसेपी (आणि वर एक कर्लीच्या हुमणाचे जेवणसुद्धा!!!) घेऊन येईन!!!!:)
तुम्हाला कोण मस्का लावत बसतंय!!!

टू द पॉईंट,
पिडां

चतुरंग's picture

23 Sep 2010 - 10:44 pm | चतुरंग

आम्ही डायरेक्ट काकूंशी बोलून म्याटर सेटल करु! तुम्ही बायपास! ;)

(बायपास सर्जन)चतुरंग

येताना माझ्यासाठी पण आणा हो रंगांण्णा!!!

चतुरंग's picture

23 Sep 2010 - 10:49 pm | चतुरंग

विषय संपला!
धन्यवाद! ;)

(स्प्लिट पर्सन)रंगा

आम्ही डायरेक्ट तुमच्या होम मिनिस्टरांशी बोलून म्याटर सेटल करु! तुम्ही बायपास! ;)

चतुरंग's picture

23 Sep 2010 - 11:01 pm | चतुरंग

अरे ये ये ये, प्रभोऽऽऽ!! ये!! (हे बनवाबनवी मधल्या अशोक सराफ स्टाईलने म्हणावे)
(बाकी व्यनीतून बोलूयात ;))

रंगाकाका

चित्रा's picture

24 Sep 2010 - 1:21 am | चित्रा

रेसिपी द्या की.

स्वातीदेव's picture

24 Sep 2010 - 9:18 am | स्वातीदेव

गणपा यांना अनुमोदन. प्लीज त्या मसाल्याची रेसेपी द्या.
आणि एवढे वर्णन करुन "कोलंबस" बद्दल उत्सुकता वाढवुन रेसेपी नाहीच :-(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Sep 2010 - 12:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी (धम्या आणि माझ्या वतीने) आमच्या कुरीयर बॉयलाच तुमच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करते. आणि ठाण्यात आले की काकूंना भेटायला येतेच.

मला वाटल कोल्बमस म्हणजे कोल्बी चा काही प्रकार आहे काय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2010 - 5:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाजारात मिळाणारी सांबार पावडर ही शुद्ध नसते.
सासुने घरी बनवुन पाठवलेली होती.
आजपर्यंत हुंडा घेतला नाही ह्याची खंत नाही.

सांबार पावडर ज्याला लागेल तो मागवेल.
पण लेखनातील वरील ओळींनी माझे डोळे भरुन आले. :)

-दिलीप बिरुटे

चिंतामणी's picture

24 Sep 2010 - 11:39 pm | चिंतामणी

माझेसुध्दा डोळे भरुन आले.

कुरिअर कराल का सांबार पावडर आणि कृतीसुद्धा.

कुरिअर चार्जेस दिले जातील.

कवितानागेश's picture

24 Sep 2010 - 11:48 pm | कवितानागेश

मी फक्त 'कोळंबो' मसालाच वापरते......
नेहमीच.........
त्या साम्बारात मूळा घातला की जास्त छान लागते.
पण मी मात्र तो कुणालाही देणार नाहीये! :P

sagarparadkar's picture

30 Sep 2010 - 2:28 pm | sagarparadkar

>> कारण -९९.९९% सांबार म्हणुन जे फोडणीचे लाल पाणी देतात त्याला सांबार म्हणणे हे खर्‍या सांबाराचा अपमान आहे. <<

१००% सहमत.

पण आमच्या एफ. सी. वरील वैशाली, रुपाली मधील सांबार एकदा ट्राय करून पहा. तसे मस्त सांबार मला खुद्द चेन्नई वा हैदराबाद मधे पण मिळाले नव्हते.

माझ्या मते सर्व दक्षिणी उपहारगॄहांनी वैशाली, रुपाली च्या व्यवस्थापनाकडे सांबार बनवण्याचे 'क्लासेस' लावावेत. बहुतेक पुणेकर खवैय्ये माझ्याशी सहमत असतील.

(वैशालीचा चाहता) सागर