हे अप्पे करायला अगदी सोप्पे नी मस्त आहेत...
साहीत्य:
२ वाट्या जाड रवा
आल - मिरची पेस्ट
चवीनुसार मीठ
१ बारिक चिरलेला कांदा
१ बारिक चिरलेली हीरवी मिरची
पाणी
चटणीसाठी:
ओलं खोबरं
२ हीरवी मिरच्या भाजून
मीठ
मुठभर कोथंबीर
दही
फोडणीचे साहीत्य : मोहरी, कढीपत्ता, हींग
कृती:
१) आधी चटणीचे सगळे साहीत्य थोड्या पाण्यात बारिक करून घेणे आणि त्यावर कढीपत्त, मोहरी आणि हिंगाची फोडणी द्या.
२) एका पातेल्यात रवा, पाणी, मिरची, आलं-मिरची, मीठ एकत्र करून घ्यावे नी ५-१० मिनीटे बाजूला ठेवा.
३) तोपर्यंत अप्पे पात्र तापत ठेवा.
४) आता एक छोटा वाडगा घेऊन त्यात ३ पळ्या रव्याचे मिश्रण, थोडा कांदा आणि इनो घाला. आणि तापलेल्या अप्पे पात्रात टाका.
५) ५-७ मिनीटे एकेका बाजूने खरपूस करावे नी लग्गेच खाय्ला घ्यावे.
टीपः इनो टाकल्यावर टाइमपास करू नये नाहीतर ते अप्पे न होता दगडं होऊ शकतात.
प्रतिक्रिया
22 Sep 2010 - 4:02 am | रेवती
वाह!
फोटू पाकृ दोन्ही मस्त!
मलाच इनो घ्यावासा वाट्टोय!;)
चटण्यांचा फोटू तर झकास आलाय.
माझी मावशी असेच आप्पे करते.
फरक एवढाच कि पाण्याऐवजी आंबट ताकात रवा भिजवून ठेवायचा.
मग इनोची गरज पडत नाही.
आता मावशीचं वय झालं म्हणून 'नो स्वयंपाक' पण तिच्या हातचे रव्याचे आप्पे आणि फोडणीचा ब्रेड विसरणे अशक्य!
22 Sep 2010 - 10:40 pm | दिपाली पाटिल
रेवतीताई, आंबट ताकात किती वे़ळ भिजवायचं... तेही करून बघेन, त्यची चव अजून छान लागेल.
23 Sep 2010 - 7:20 am | रेवती
साधारण चार तास भिजवायचा रवा!
मी कालच ताकातले आप्पे केले होते जरा जास्त वेळ सात तास भिजले तर तितकेसे चांगले झाले नाहीत.
आता नीट जमेपर्यंत प्रयोग सुरु !:)
24 Sep 2010 - 12:22 am | दिपाली पाटिल
मीही बनवून बघते... मी कधी कधी दही पण घाल्ते या अप्प्यांमध्ये
22 Sep 2010 - 6:37 am | शिल्पा ब
फोटोत तर छान दिसताहेत...चटण्या पण भारीच...तोंडाला पाणी सुटले..
पण हे आप्पे करायला काही वेगळी भांडे लागते का? कुठे शोधायचे?
22 Sep 2010 - 6:58 am | बेसनलाडू
अलीकडेच घेतले. आता ही पाककृती आली आहे तसे वापरता येईल.
(ग्राहक)बेसनलाडू
22 Sep 2010 - 10:25 pm | शिल्पा ब
अहो मग आम्हा सगळ्यांना बोलवा कि गिळायला..
22 Sep 2010 - 10:38 pm | दिपाली पाटिल
कधीही ये शिल्पा... तु तर जवळच राहतेस की... नाहीतर पुढच्या कट्ट्याला हेच घेऊन येइन...
23 Sep 2010 - 8:38 am | शिल्पा ब
यालाच पुणेरी आमंत्रण म्हणतात का? ;)
23 Sep 2010 - 11:37 pm | दिपाली पाटिल
कै च्या कै...एकतर मी म्हणतेय की आणेन अन तू म्हणतेयस की पुणेरी आमंत्रण... आता मी नाही आणणार ज्जा... :D
23 Sep 2010 - 6:31 pm | परिकथेतील राजकुमार
दिपालीतै, तु आणी मी पुढचा कट्टा माझ्या कॅफेत करुयात का ? ;)
24 Sep 2010 - 1:33 am | दिपाली पाटिल
तु तुझं कॅफे उसगावात उघड म्हणजे मलाही चालेल...
22 Sep 2010 - 7:55 am | नितिन थत्ते
पापी लोकांना फटु दिसत नाहीत का?
22 Sep 2010 - 10:16 am | पर्नल नेने मराठे
+१
22 Sep 2010 - 10:20 am | मदनबाण
+२
ए दिप्स ताय...फोटोचा काय झोल झाला हयं ?
22 Sep 2010 - 10:25 am | सविता
+१००
मी पापी या सदरात मोडते ही मला शंका होती...आता खात्री झाली :P
22 Sep 2010 - 11:47 am | अवलिया
नितिनशेट बरोबर राहुन माझ्या पापात भर पडतच आहे...
22 Sep 2010 - 12:23 pm | नितिन थत्ते
:O
अवलियाशेट कधीपासून माझ्याबरोबर राहू लागले?
22 Sep 2010 - 12:26 pm | यशोधरा
दिपाली, कृती सोपी आहे, धन्यवाद. फोटो दिसत नाहीत गं.
22 Sep 2010 - 12:53 pm | गणपा
वेल्कम बॅक :)
आप्पे पात्र घेण्यापासुन सुरवात आहे.
-पापी नं. ७०७
22 Sep 2010 - 11:07 pm | दिपाली पाटिल
शिर्षकात "वेल्कम बॅक आप्पे पात्र " बघून जरा दचकलेच... :D
22 Sep 2010 - 10:16 pm | दिपाली पाटिल
आता पहा फोटो, संपादकलोकहो , जरा माझ्या पाकृ च्या हेडलाइन मध्येही टाका नं "आता फोटोसहीत" नाहीतर बिचार्या लोकांना ते उगाचच पापी असल्याचं दु:ख होत रहील ...
22 Sep 2010 - 10:22 pm | चतुरंग
खरोखर सोप्पी कृती आहे.
आणि मस्तच दिसताहेत फटू!
रंगा
22 Sep 2010 - 10:25 pm | पैसा
एकदम सोप्पे! पण त्या फोटोने तुमचं काम कठीण झालं म्हणा! :P
बाकी इनोचं लक्षात ठेवायला हवं. खायचा सोडा चालेल का?
22 Sep 2010 - 11:14 pm | दिपाली पाटिल
खायचा सोडा टाक्ता येइल.. पण इन्स्टंट मध्ये मी अजून पर्यंत इनोच टाकलंय.
22 Sep 2010 - 10:28 pm | नितिन थत्ते
मस्त. अगदी लास्ट मोमेंटला एनो टाकण्याची आय्ड्या आवडली.
ते (लाळ पुसायचं) फडकं कुठे गेलं बरं?
23 Sep 2010 - 3:41 am | चित्रा
फार आवडतात मला आप्पे.
23 Sep 2010 - 9:39 am | सविता
खतरा फोटो..... मला आत्ताच्या आत्ता पायजे............ :(
23 Sep 2010 - 12:26 pm | अब् क
तो चटनी चा बोउल मस्त आहे!!!
24 Sep 2010 - 2:26 am | शिल्पा ब
अन चटणी कशी वाटतेय?
23 Sep 2010 - 5:57 pm | स्वाती२
व्वा! मस्त, सोपी पाकृ.
24 Sep 2010 - 11:48 am | काजुकतली
चटणी आणि चटणी पात्र दोन्ही बेस्ट....
इनो किती घालायचा ते लिहिले नाही. मी एका-एका घाण्यासाठी एक एक चमचा असे गृहीत धरु का????
गेल्याच आठवड्यात मी आप्पे पात्र घेतले विकत (इथलीच एक रेसिपी पाहुन धाडस केले शेवटी :) ) आता त्याचा सदुपयोग करायची वेळ जवळ आलीय बहुतेक.....
26 Sep 2010 - 6:18 am | दिपाली पाटिल
काजूकतली, ३ पळ्यांसाठी (अंदाजे १ १/२ कप) अर्धा - पाउण चमचा (टेबल्स्पून) इनो पुरेसे होइल..इनो घातलेले मिश्रण अगदी एकदा वापरता येइल असे वेगळे आणि थोडे-थोडे बनवावे.
26 Sep 2010 - 9:28 am | चिंतामणी
३ पळ्यांसाठी (अंदाजे १ १/२ कप) अर्धा - पाउण चमचा (टेबल्स्पून) इनो
दिपाली, तुला "टी" स्पुन म्हणायचे आहे ना.
27 Sep 2010 - 2:51 am | दिपाली पाटिल
नाही चिंतामणी, १/२ टेस्पून तरी लागतोच इनो...
27 Sep 2010 - 1:52 pm | चिंतामणी
माझ्या माहिती प्रमाणे टेबल स्पुन म्हणजे मोठा चमचा अथवा डाव.
१ ते दिड कपाला अर्धा - पाउण टेबलसुन नाही लागणार. अर्धा - पाउण चमचा (म्हणजे टी स्पुन) लागेल.
27 Sep 2010 - 10:10 pm | दिपाली पाटिल
अहो चिंतामणी टेबलस्पून म्हणजे डाव नव्हे. फूड मेजरिंग स्पून्स येतात त्यातला टेबलस्पून. अगदी टेबलावर वापराय्चा चमचा अर्थात डाव म्हणाजे टेबलस्पून नव्हे हो. तरीच म्हटलं १/२ - ३/४ टेस्पून इनो कही फार नहीये तरी तुम्ही असं कां म्हणताय... जनरली चहाचा चम्चा टी-स्पून अस्तो आणि पोहे खाय्चा टेबल स्पून असतो... :D :D :D
26 Sep 2010 - 6:36 am | प्राजु
खतरा फोटो!!!
चटणी अशी..दूरदर्शच्या लोगोसारखी कशी काय केली??
की ती वाटीच तशी आहे..??
26 Sep 2010 - 9:11 am | दिपाली पाटिल
ती वाटीच तशी आहे...इकडे सॅन फ्रान्सिस्कोच्या चायना टाऊन मध्ये खुप मस्त आणि स्वस्त मिळतात अश्या प्लेट्स, वाट्या...
28 Sep 2010 - 9:43 am | विलासराव
पण मला नाही आवडले.
अवांतरः जे खायला मिळणार नाही ते सगळ मला आवडत नाही मिळेपर्यंत तरी.