गणपतीची आरती

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
12 Sep 2010 - 10:42 pm

गणपतीची आरती

जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्विकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥

वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥

पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥

तुच बाप,माय तुची, आम्ही तुझी लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥

गंगाधर मुटे
................................................

कविता

प्रतिक्रिया

गेयता आणि मधुरता आहे. छान आहे.

>> एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा >>

मस्त!!

नगरीनिरंजन's picture

13 Sep 2010 - 10:35 am | नगरीनिरंजन

असेच म्हणतो.
चांगली जमली आहे.

पाषाणभेद's picture

13 Sep 2010 - 11:50 am | पाषाणभेद

गणपती बाप्पा मोरया!

निवेदिता-ताई's picture

13 Sep 2010 - 5:19 pm | निवेदिता-ताई

गणपती बाप्पा मोरया!

गंगाधर मुटे's picture

14 Sep 2010 - 7:50 am | गंगाधर मुटे

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.

गंगाधर मुटे's picture

9 Sep 2013 - 7:03 pm | गंगाधर मुटे

गणपती बाप्पा मोरया!

टक्कू's picture

9 Sep 2013 - 11:27 pm | टक्कू

चांगली जमलीय की!

मुक्त विहारि's picture

10 Sep 2013 - 10:01 am | मुक्त विहारि

चांगली जमलीय

मीनल's picture

10 Sep 2013 - 11:48 pm | मीनल

आरतीचे शब्द खूप छान आहेत. ते मी माझ्या परीने चालीत म्ह्टली आहे.
जरूर ऐका.

गंगाधर मुटे's picture

11 Sep 2013 - 10:27 am | गंगाधर मुटे

सुंदर चाल दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. :)

पैसा's picture

11 Sep 2013 - 10:57 am | पैसा

आरती लिहिली चांगली आहे आणि तुमही म्हटलीही छान!

एस's picture

4 Sep 2014 - 11:42 pm | एस

मस्त...

दत्ता काळे's picture

11 Sep 2013 - 12:24 pm | दत्ता काळे

आरती आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Sep 2013 - 12:56 pm | अत्रुप्त आत्मा

आरती अवडली... :) (आणी मिळाली देखिल! ;) मराठी-कम-हिंदी यजमानांकडे म्हणण्यासाठी :D )

दादा कोंडके's picture

11 Sep 2013 - 7:00 pm | दादा कोंडके

एलिफंट गॉडची प्रेज करणारी पोएम आवडली नाही.

गंगाधर मुटे's picture

4 Sep 2014 - 9:49 pm | गंगाधर मुटे

गणपती बप्पा मोरया !!! :)