ज्योतिष हे शास्त्रच ! ...आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र. डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे .

dr sanjay honkalse's picture
dr sanjay honkalse in जनातलं, मनातलं
30 Aug 2010 - 5:41 pm

">ज्योतिष हे शास्त्रच ! ...
आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र.

डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे .
M.A.;M.Phil.;M.D.;M.Com.LL.B.D.B.M.;D.H.E.
drsanjayhonkalse@gmail.com
http://drsanjayhonkalse.tripod.com

ज्योतिष शास्त्र हे प्राचीन शास्त्र असून त्याची उत्पत्ती ही भारतात व ब्याबिलोन संस्कृतीत झाला आहे. ऋषी पराशर हे या शास्त्राचे जनक होत.ज्योतिष शास्त्र हे "ज्योती" म्हणजे "प्रकाश"अथवा "दिशा"(मार्ग) दाखवणारे शास्त्र होय
गम्मत म्हणजे.या शास्त्रास स्वातंत्रपूर्व काळात अमाप राजाश्रय लाभला होता. तरं पाश्चिमात्य जगात ते एक थोतांड व फसवे शास्त्र म्हणून नाकारले जात होते पण १९५० नन्तर चित्र अगदी उलट झाले .पाश्चिमात्य जगात या शास्त्राचे संशोधन सुरु झाले,तरं भारतात बुद्धी वाद्यांचा ,शास्त्रज्ञांचा यांचा या शास्त्राला विरोध सुरु झालायात अंधश्रधा निर्मूलन वाल्यांची गरळ चालू झाली , पहानाf, फ्युचरोलोजी (Futurology ) ज्याला भविष्य शास्त्र म्हणतात आणि ज्यात मागील घडलेल्या घटनाक्रमावर आधारित भविष्यात शकणाऱ्या घटनांचा वेधअथवा अंदाजच घेतला जातो त्याला शास्त्र म्हणून मान्यता आहे. खरेतर ते एक अंदाज शास्त्र आहे. पण खागोलशात्रीय घटना व बाबींवर आधारित भविष्य सांगणारे ज्योतिष हे शास्त्रच नाही,व ते एक फसवे शास्त्र आहे असे म्हणणे म्हणजे केवढा विरोधाभास .असे म्हणणारे सांगतात शास्त्रज्ञांच्या मते ज्योतिष शास्त्र हे नैसर्गिक शास्त्राच्या कसोट्यांवर खरे उतरत नाही म्हणून ते फसवे शास्त्र आहे. तसेच सूर्य ,राहू,केतू हे ग्रह नाहीतच म्हणून त्यांचा ग्रह म्हणून विचारच करणे चुकीचे आहे. ज्योतिष अथवा शास्त्र हे सामाजिक घटनांवर भाष्य करत नाही किंवा सार्वत्रिक घडामोडींवर व घटनांचे भविष्य वर्तवत नाही असा आक्षेप घेतला जातो.हर्शल नेपच्यून,प्ल्युटो,हे गेले ग्रह आधुनिक काळात शोधले गेले आहेत त्यामुळे त्यांचा विचार या शास्त्रात केला जात नाही. त्यात आता हल्लीच अस्त्रोनोमिकाल सोसायटीने तेरावी रास "भुजंग धारी " शोधून काढली आहे .या सर्व बाबींमुळे ज्योतिष शास्त्र निकालातच
काढले जाते.
शास्त्रज्ञांच्या मते ज्योतिष शास्त्र हे नैसर्गिक शास्त्राच्या कसोट्यांवर खरे उतरत नाही म्हणून ते फसवे शास्त्र आहे. पण हे म्हणणे चुकीचे आहे .कारण एका शास्त्राच्या कसोटीवर दुसऱ्या शास्त्राचे मोजमाप करणे किती योग्य ठरेल हा वादाचा मुद्दा होईल. नैसर्गिक शास्त्राच्या कसोटीवर मानस शास्त्र व इतर सामाजिक शास्त्रे पण फसवी ठरतील. खरेतर ती तशी ठरवली गेलीच होती. गेल्या शतकाच्या उत्तरार्द्धापर्यंत मानस शास्त्र हे शास्त्र म्हणून मान्यता पावले न्हवते.कारण मन ही सज्ञाच शास्र ,मुख्यत्वे पाश्चात्य शास्त्रज्ञ , मान्य करीत न्हवते . मन ही भौक्तिक वा दृश्य वस्तू म्हणून स्वीकारली जाऊ शकत नाही जसा मेंदू ,हृदय इ.अशी त्यांची धारणा होती ,व शास्त्र निरीक्षणात्मक व दृश्य वास्तुमानाचाच विचार करतंआणि आज फक्त विलाज नाही म्हणूनच ,कारण ते शास्त्र नाही म्हणून सिद्ध करता येत नाही आणि त्याच अतीत्वा नाकारता येत नाही अशीं सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी अवस्था झल्याने, आज त्याला शास्त्र म्हणून मान्यता मिळाली आहे. थोडक्यात शास्त्राचा आवाकाच थिटा आहे .त्याच्या थिटे पणात ज्योतिष शास्त्रच काय इतर अनेक गोष्टी अथवा विद्या जसे अष्ट सिद्धी /विद्या व योगिक शक्ती ज्याला भारतीय परंपरेत शास्राचाच दर्जा आहे बसत नाहीत.
तसेच सूर्य ,राहू,केतू, यांना ग्रह मानाने ही एक सोय आहे. त्यांचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव व त्याचा अभ्यास महत्वाचा .जसं अर्थाश्स्त्रात नफा हा व्याजाचाच घटक अथवा जमीन (land) ह्या संकल्पनेत .सर्व निसर्ग संपत्ती ग्राह्य धरली जाते, त्यामुळे कुणी अर्थशास्त्र निकालात काढत नाही,,तसेच ज्योतिशास्त्र एक सोय म्हणूनच ग्रह,तारे ,छायाग्रह यांना सोयीस्कर रित्या ग्रह म्हणून संबोधले जाते. त्याला या मुद्द्यावरून नाकारणे म्हणजे अर्थश्स्त्र पण खोटे आहे ,फसवे आहे असे म्हणावे लागेल.
हर्शल,नेपच्यून ,प्लुटो ग्रह आधुनिक युगात जरी शोधले गेले असले तरी ते त्याआधीही होते व त्यांचा अस्तित्वाचा उल्लेख आढळतो .महाभारतात त्यांचा उल्लेख श्यामल वरुण,आणि
,प्रजापती असा उल्लेख आढळतो .त्यांची आजही नाव ग्रहांबरोबर ,विशेषता वरुणाची ,पूजा होते व ते अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्फोटके ,अणु परमाणु(हर्शल),अंतर्मन(नेपच्यून) ,व सामाजिक घटना (प्रजापती) दर्शवतात. थोडक्यात ज्योतिष शास्त्राला फसवे ठरवण्याही. साठी घेतले जाणारे सारे आक्षेपच " फसवे " ठरतात.

या उलट ज्योतिष शास्त्रावरील विश्वासाची अतालता जगात कोठेही नाकारता येत नाही. . उदा. या एप्रिल महिन्यात आपल्या एका ( हाय मर जावां ) चित्रपटाच्या प्रमोशन करतेवेळी E .T .C .या चानलवर मान्य केले कि तिच्या विवाहाचे भविष्य बद्री उझ्मान या अमेरिकेत स्थायिक असलेल्या नटाने सांगितल्या प्रमाणे तंतोतंत खरे झाल्याचे सांगितले. येव्ध्येच न्हावे तरं बडे बडे लोक जे जाहीरपणे ज्योतिष व देवाला रिटायर करा असे सांगतात ते लपून छपून आपल्या समस्यांचं समाधान ज्योतिषाकडे करतात. हा इतर व्यवसायांप्रमाणे येथेही दांभिकता आहे,अर्धवट ज्ञान असलेले लोक आहेत पण त्यामुळे शास्त्र खोटे ठरत नाही .
राशी भविष्य हे सर्व साधारण भविष्य असते एखादा पोपट वाला ज्योतिषी किंवा सुशिक्षित सज्जन ज्योतिषी पण चूक करू शकतो पण त्यामुळे शास्त्रच निकालात काढणे म्हणजे एखाद्या डॉक्टरच निदान चुकलं म्हणून वैद्यक शास्त्रच अवैध ठरव्ण्या सारख आहे .जेवढ एखाद्याच्या ज्ञानाचं कुंपण तेवढी त्या व्यक्तीची झेप. त्यामुळेच ज्योतिष शास्त्राचा औपचारिक अभ्यास होणे महत्वाच व अती आवश्यकच आहे. औपचारिक अभ्यास सुरु केल्यानंतर सुशिक्षित व जबाबदार
ज्योतिषी तयार होतील.त्यांची बार कौन्सिल वा मेडिकल कौन्सिल सारखी regulatory authority स्थापन होऊ शकेल त्यामुळे शास्त्राची औपचारिक विश्वासाहर्ता वाढेल .थोडक्यात या शास्त्राचा अभ्यास होणे महत्वाचे होय. या संदर्भात न्यूटनने एडमंड ह्यले याला दिलेले उत्तर समर्पक आहे.न्यूटनचा ज्योतिष शास्त्रावर गाढ विश्वास होता. ह्यालेने त्यांना आपला ज्योतीशास्त्रावर एवढा विश्वास कसा काय? असा प्रश्न केला तेंव्हा "मी वस्तू विषयाचा अभ्यास केला आहे तू तो केलेला नाहीस म्हणून माझा विश्वास आहे तुझा नाही." असे उत्तर दिले
या मुळेच कदाचित विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants commission) ,जी भारतीय उच्य शिक्षणाची शिखर संस्था आहे,
ज्योतिष अभ्यासक्रम विद्यापीठात शिकवण्याची शिफारस केली. या मुले सुशिक्षित ज्योतिषी तयार होतील वा या शास्त्राचा औपचारिक अभ्यास होईलआणि ढोंगीपणावर ताबा ठेवता येईल. ही शिफारस २००१ साली वा ती स्वीकारली गेली असती तरं एव्हांना दोन तुकड्या तयार झाल्या असत्या .पण ते भाग्य या शास्त्राच्या वाट्यास यावयास अजून अवकाश होता.कारण त्या शिफारशीच्या विरुद्ध आव्हाहन दिले गेले हे आव्हाहन श्री भार्गव नावाच्या व्यक्तीने आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात दिले गेले परंतु ते आव्हाहन उच्च न्यायालयाने फेटाळून लावले .पण याने समाधान होईल ते बुद्धिवादी कसले?

यासाठी जनहित मंच नावाची संस्था कामाला लागली. व या मंचच्या वतीने श्री भगवान रैयानी यांनी याचिका दाखल केली .ड्रग व मेजिक कायदा (Drug and Magic Act )१९५४ या खाली त्यांनी ज्योतिष ,वास्तू शास्त्र (भारतीय वस्तू विज्ञान महती ऐकून अमेरिकन राष्ट्र अधक्ष्यांनी अहमदाबादच्या स्वामी नारायण मंदिरास याच सुमारास भेंट दिली होती हे लक्षात घेणे येथे महत्वाचे)
व इतर संबधित शास्त्रांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. या शास्त्रा वरबंदी घालण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली . पण ही ती याचीकापण एप्रिल २०१० च्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे याच वर्षी रद्द केली गेली .यासंदर्भात ड्रग कंट्रोलर डॉक्टर पी. रामकृष्ण यांनी ज्योतिष शास्त्राचा बाजूने जनहितार्थ प्रतिज्ञापत्र सदर केले. या प्रतिज्ञापत्रात ते लिहतात "ज्योतीश्शात्र हे चार हजारहून अधिक जुने 'शास्त्र' असून त्यावर बंदी घालणे गैर व अनुचित आहे"

या पार्श्व भूमीवर "ज्योतिषशास्त्र हे शास्त्रच आहे"यावर केंद्र सरकारद्वारे शिक्कामोर्तबच झाला आहे .त्याचा आत्तातरी औपचारिक अभ्यास व संशोधन सुरु
होणे आवश्यक आहे मंचाद्वारे मी हे अपील करीत आहेकि भारतीय ज्योतिषशास्त्र हे सूक्ष्म व योग्य , वैशिष्ट्यपूर्ण आहे . भारतात या बाबतीतपुढाकार घेतला जाने आपल्या दृष्टीने हितावह आहे .

या बरोबरच ज्योतीश्शात्राच्या भविष्य कथनाची
परीक्षा घेणे आवश्यक आहे असेसर्वश्री जयंत नारळीकर,,कुंटे,घाटपांडे यांनी करंट सायन्स च्या ( "Current Science ")९६ व्या व्हॉल्यूम पान ६४१-४६ मार्फत सुचवले आहे पण याच बरोबर भविष्य सांगण्याची पद्धत , नैतिकता , कायदा , मानसिकता ,सामाजिक परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर यावरही विचार विनिमय होणे आवश्यक आहे.त्यादृष्टीने अभ्यासक्रम आखणे आवश्यक आहे. या पद्धतीनेच होमियोपथी या चिकित्सा पद्धतीने ने अलोपथी या पाश्चात्य चिकित्सा वा औषध पद्धतीला मोठी स्पर्धा निर्माण केली आहे.ज्योतिष शास्त्रा चा चिकित्सा(dignosis )व औषधोपचार या साठी उपयोग केला जाउ शकतो .खरे तरं" औषध ज्योतिष "(Medical Astrology ) हा एक संपूर्ण विषयच आहे. म्हणजेच ज्योतिष शास्त्राचा साधारण (General ) व विशेष ( Special )(विवाह ज्योतिष,आरोग्य ज्योतिष, औषध ज्योतिष , रत्न ज्योतिष ,व्यवसाय ज्योतिष, गुन्हे ज्योतिष इ. ) आभ्यासक्रम तयार करता येउ शकतात .

सुरवातीला सांगितल्याप्रमाणे पास्च्यात्यांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास व संशोधन सुरु केलेले आहे.मिशेल गौकालीन या नावाच्या संशोधकाने १९५५ साली मंगळाच्या मानवी जीवनावरील प्रभावाचा अभ्यास केला .त्याने अनेक अये एठलीटचा (मैदानी खेळाडूंचा )अभ्यास केला व त्यांचा मंगल बलवान असतो असा सिद्धांत मांडला व त्याला "मंगल परिणाम"="मार्स इफेक्ट "असे नामकरण केले.त्याचा हा मार्स इफेक्ट जगप्रसिद्धह आहे . (खरेतर खेळाडू ,पोलीस, मिलिटरी ,सर्जन ,इ चा मंगल बलवान असतो हे आपल्याकडे पूर्वापार सामान्यपणे माहित आहे. पण भाव मिशेल(पाश्चिमात्य संशोधक ) खावून जातो(जातात) हेही नवीन नाही .मिशेलच्या संशोधनानंतर तेहे ज्योतिष संस्था स्थापण्याचा व नियतकालिके निघण्याचा धपाटा सुरु झाला. तशी लाटच सुरु झाली. या पैकी एकूण दहा देशातील चौपन्न संशोधकांचे संशोधन "रिसेंट अडवान्सेस इन अष्ट्रोलोजी "=Recent Advances In Astrology "या नावे उपलब्द्ध आहे .तेथे चारशेच्यावर निय
त्कालिक या विषयावर निघतात .पाश्चात्य विद्यापीठे ज्योतिषशास्त्राच्या संशोधनास प्रोत्साहन व मान्यता देतात. प्रतुत लेखाकांस संशोधनासाठी अशी परवानगी कोलंबस क्रेडीट गुनंकात भरपूर सूट देउन प्रोत्साहन दिले होते व श्री जमेस रीग्ग यांनी आनंदाने मार्गदर्शनाचे आव्हाहन स्वीकारत असल्याचे पत्र पाठविले होते. आज यामुळेच ज्योतिष शास्त्रास ४८ टक्के अमेरिकन्स ,व ४० टक्के जागतिक लोकसंखेचे पाठबळ आहे.

आज गरज आहे ती शास्त्रज्ञ ,व भारतीय बुद्धिवादी यांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्याची कारण
भारतीय ज्योतिषशास्त्र हे जास्त व्यापक ,सूक्ष्म तरं आहेच पण त्याची उभारणी व मांडणी भक्कम सामाजिक ,धार्मिक व आध्यात्मिक पायांवर रचली गेली आहे. आपल्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल केला गेला नाही तरं आज फक्त भारतातच ५०,०००कोतिन्चि उलाढाल हा व्यवसाय एखादी पाश्चात्य संस्था बौद्धिक अधिकार (Intellectual Property Rights ) मिळून क्रेडीट व रोयाल्टी मिळवेलच पण हा आपलाच शोध असल्याचे सांगून ज्योतिष शास्त्राचे जनकत्व लाटेल .एवढेच न्हावे तरं भारतात संस्था उघडून आपलाच माल आपल्यालाच विकेल व श्रेय पण लाटेल.

dr.sanjay honkalse.
drsanjayhonkalse@gmail .com

--
dr.sanjay honkalse.

--
dr.sanjay honkalse

ज्योतिषलेख

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2010 - 6:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सर्वप्रथम, ज्योतिष हे शास्त्र आहे, आकाशातल्या ज्योतींचे शास्त्र ते ज्योतिष. तुम्हाला बहुदा फलज्योतिषामधे रस आहे; ज्यावर बर्‍याच लोकांचा आक्षेप आहे, असेल, असावा, असतो.

त्यात आता हल्लीच अस्त्रोनोमिकाल सोसायटीने तेरावी रास "भुजंग धारी " शोधून काढली आहे

ही रास शोधून काढलेली नाही. तिला मान्यता देण्यात आली आहे. वर्षभरात सूर्य ज्या तारकासमूहांच्या पार्श्वभूमीवर दिसतो त्यांना राशी म्हणतात. राशी ही संकल्पना ग्रीक आहे असं कुठेतरी वाचनात आलं आहे. (चूभूदेघे.) वर्षाच्या काही काळात सूर्य ना तुळा राशीत असतो ना वृश्चिक राशीत; तेव्हा तो भुजंगधारी या तारकासमूहात असतो. तेव्हा शास्त्रज्ञांनी "डोळे" उघडे ठेवून भुजंगधारी या तारकासमूहाला राशीचा दर्जा दिला ही चूक आहे असं आपणांस म्हणायचे आहे काय?
(असाच आणखी एक दुसरा तारकासमूह आहे, पण आत्ता स्मरणशक्ती दगा देत आहे.)
असाच काहीसा प्रकार प्लुटो या प्लॅनेटॉईडच्या बाबतीत आहे. काही विशिष्ट व्याख्या बनवून नंतर प्लुटो (आणि
Ceres) यांना ग्रह म्हणणे नाकारले गेले.

तसेच ज्योतिशास्त्र एक सोय म्हणूनच ग्रह,तारे ,छायाग्रह यांना सोयीस्कर रित्या ग्रह म्हणून संबोधले जाते. त्याला या मुद्द्यावरून नाकारणे म्हणजे अर्थश्स्त्र पण खोटे आहे ,फसवे आहे असे म्हणावे लागेल.

अर्थशास्त्रात (आणि मानसशास्त्रातही) अशी काही सोयीस्कर गृहीतकं असतात का?

महाभारत काळात युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो(?) च्या कक्षांचे गणित दिले होते का? किंवा तेव्हा हे ग्रह आहेत हे माहित होते यासाठी काही पुरावा? आणि असला तरीही त्याच्या फलज्योतिष विज्ञान किंवा शास्त्र आहे का नाही या प्रश्नाशी काय संबंध?

येव्ध्येच न्हावे तरं बडे बडे लोक जे जाहीरपणे ज्योतिष व देवाला रिटायर करा असे सांगतात ते लपून छपून आपल्या समस्यांचं समाधान ज्योतिषाकडे करतात.

"देवाला रिटायर करा" हे वाक्य माझ्या माहितीतरी डॉ. श्रीराम लागू यांचं आहे. काही पुरावा आहे का त्यांनी आपल्या समस्यांचं समाधान करण्यासाठी फलज्योतिषाचा आसरा घेतल्याचं? का हवेत तीर?

या पार्श्व भूमीवर "ज्योतिषशास्त्र हे शास्त्रच आहे"यावर केंद्र सरकारद्वारे शिक्कामोर्तबच झाला आहे

कोणी एकाने प्रतिज्ञापत्र केलं म्हणून शिक्कामोर्तब कसं झालं?

बाकी फलज्योतिष हे शास्त्र आहे का नाही याबद्दल अळीमिळी गुपचिळी! नाहीतर पुन्हा मी माझी मतं इतरांवर लादते असे आरोप माझी खरडवही भरून टाकतील.

ग्रहगणित, ज्योतिष आणि फलज्योतिषाचा अभ्यास केलेल्या लोकमान्य टिळकांचं वाक्य आठवलं, "ग्रहांना त्यांचं काम करू द्या, मला माझं." संदर्भः लोकमान्य ते महात्मा, ले: सदानंद मोरे, खंड - १

पैसा's picture

30 Aug 2010 - 9:06 pm | पैसा

१. भुजंगधारीबद्दल अजून बर्‍याच लोकांना माहिती नाही. खरं म्हणजे मला ही माहिती संपूर्ण नवीन आहे.
२. अर्थशास्त्रात बदलणार्‍या परिस्थिती असतात, पण सोयिस्कर गृहितके नसतात.
३. पॉसिडॉनला ग्रहाचा दर्जा देण्यात आला आणि नंतर काढून घेण्यात आला. धूमकेतू, लघुग्रह हे पण सूर्यमालेचे भाग आहेत. त्यांच्याबद्दल काय?
४. डॉ. श्रीराम लागू: १००% सहमत.
५. ज्योतिष शास्त्र आहे का नाही? मोठ्या लोकांचा वादाचा मुद्द आहे. त्यात माझ्यासारख्या लहान माणसाने पडू नये हे बरं.
६. सगळ्यात बेस्ट!

"ग्रहगणित, ज्योतिष आणि फलज्योतिषाचा अभ्यास केलेल्या लोकमान्य टिळकांचं वाक्य आठवलं, "ग्रहांना त्यांचं काम करू द्या, मला माझं." संदर्भः लोकमान्य ते महात्मा, ले: सदानंद मोरे, खंड - १"

(आणि तू स्वतःला विक्षिप्त का म्हणून घेतेस?)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2010 - 11:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> १. भुजंगधारीबद्दल अजून बर्‍याच लोकांना माहिती नाही. खरं म्हणजे मला ही माहिती संपूर्ण नवीन आहे. <<
काही वर्षांपूर्वी ही भानगड वृत्तपत्रांमधे गाजत होती. अर्थात हा काही कट केलेला नाही, फलज्योतिष आणि फलज्योतिषांविरूद्ध!!
>> २. अर्थशास्त्रात बदलणार्‍या परिस्थिती असतात, पण सोयिस्कर गृहितके नसतात.<<
अशाच काही प्रकारचं माझं मत अभ्यासाशिवाय असल्यामुळे अभ्यासू लोकांच्या आणि/किंवा लेखकाच्या कोर्टात चेंडू ढकलला.
>> ३. पॉसिडॉनला ग्रहाचा दर्जा देण्यात आला आणि नंतर काढून घेण्यात आला. धूमकेतू, लघुग्रह हे पण सूर्यमालेचे भाग आहेत. त्यांच्याबद्दल काय? <<
माझ्या माहितीत पॉसिडॉन हा ग्रह कधीच नव्हता. कायपर पट्ट्यात, जो प्लुटोच्या पलिकडे आहे, त्यातला पॉसिडॉन हा एक दगड किंवा लघुग्रह आहे. सीरिझ (Ceres) हा लघुग्रह मंगळ आणि गुरूच्या मध्ये आहे.

विकास's picture

31 Aug 2010 - 9:09 am | विकास

माझ्या माहितीत पॉसिडॉन हा ग्रह कधीच नव्हता.

आमच्या माहीतीत होताना! नसता लक्षात ठेवला तर आम्हाला भूगोलात किमान एक-दोन मार्क कमी पडले असते. :( कारण आमच्या वेळच्या महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मला वाटते १०वीच्या पुस्तकात दहा ग्रहांची नावे होती, त्यातील शेवटचे पॉसिडॉन हे होते!

काय ही नवीन पिढी, कसे होणार!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2010 - 10:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

या जुन्या लोकांना नवीन पिढीत खोड्या काढायची सवयच असते! आता नव्हता एक ग्रह आमच्या पुस्तकात तर विश्वास ठेवतील तर शपथ! तेव्हा माहित असतं हे असं होणार तर जपून नसती ठेवली का ती पुस्तकं?
असो. तर मुद्दा असा आहे की त्या एक दोन मार्कांनी काय मोठ्ठासा फरक पडणार होता हो तुम्हाला? शेवटी तुमचं भविष्य नवग्रहांमुळे असो वा दशमग्रहामुळे, काय बदलणार आहे/होतं का?
(या प्रश्नाचा नक्की अर्थ काय कोणी मला समजावून देऊ शकेल काय?)

आता कळले विकासरावांच्या लांबलचक प्रतिसादांचे गमक, हा ग्रह त्यांच्या कुंडलीला लागला आहे तर! ;-)

श्रावण मोडक's picture

31 Aug 2010 - 5:08 pm | श्रावण मोडक

विकास यांच्याशी सहमत.
मी कर्नाटकातून दहावी झालो आहे. तिथेही पॉसिडॉन हा दहावा ग्रह असे शिकवले जात होते. मी नववीत असताना सूर्यमालेचे एक मॉडेल केले होते एका विज्ञान प्रदर्शनासाठी आमच्या एका गटाने. त्यात हा दहावा ग्रह होता हे आठवते.

राजेश घासकडवी's picture

31 Aug 2010 - 2:04 am | राजेश घासकडवी

कारण एका शास्त्राच्या कसोटीवर दुसऱ्या शास्त्राचे मोजमाप करणे किती योग्य ठरेल हा वादाचा मुद्दा होईल.

हे लेखात स्पष्टपणे लिहिलेलं असताना सामान्यज्ञान (कॉमन सेन्स) या शास्त्राच्या मानदंडांनी या लेखाचं मोजमाप करून वादाचे मुद्दे उकरून काढण्याबद्द अदिती यांचा निषेध.

थोडक्यात शास्त्राचा आवाकाच थिटा आहे. त्याच्या थिटे पणात ज्योतिष शास्त्रच काय इतर अनेक गोष्टी अथवा विद्या जसे अष्ट सिद्धी /विद्या व योगिक शक्ती ज्याला भारतीय परंपरेत शास्राचाच दर्जा आहे बसत नाहीत.

नामदेव ढसाळांच्या एका कवितेच्या काही ओळी अंधुकपणे आठवल्या. त्यात चांभार आपण बनवलेल्या चपलेविषयी बोलत असतो

घालून घालून सैल होईल, घालून घालून सैल.

ज्योतिषशास्त्राचा आवाका असे सामान्यज्ञानाचे मानदंड घालून इतका सैल, विशाल झाला आहे की ते दंड आता थिटे पडतात.

ऋषिकेश's picture

31 Aug 2010 - 10:25 am | ऋषिकेश

वर्षाच्या काही काळात सूर्य ना तुळा राशीत असतो ना वृश्चिक राशीत; तेव्हा तो भुजंगधारी या तारकासमूहात असतो. तेव्हा शास्त्रज्ञांनी "डोळे" उघडे ठेवून भुजंगधारी या तारकासमूहाला राशीचा दर्जा दिला ही चूक आहे असं आपणांस म्हणायचे आहे काय?

भुजंगधारीबद्द्ल थोडं. ही रास नसून तरकासमुह आहे. खरंतर सगळ्या राशी ह्या तारका समुह आहेत. आयन वृत्तावर (म्हणजे चंद्र सूर्य आकाशाच्या नकाशावरच्या ज्या भासमान मार्गावरून जातात) येणार्‍या तारकांचे १२ समान भाग केले त्याला राशी नाव दिलं. आता पृथ्वीची परिभ्रमव व परिवलन गती सगळ्यांना माहित आहेच. याच बरोबर अजून एक गती आहे ती म्हणजे "परांचन" गती. ही गती कशी असते ते लक्षात घ्यायचं असेल तर भोवरा डोळ्यासमोर आणा. फिरणं संपत आलेल्या भोवर्‍याचे वरील टोक जसे वॉबल होते त्या गतीला परांचन गती म्हणतात. पृथ्वीचा अक्षही असाच परांचन गतीने फीरत असतो (त्याची गती फार कमी आहे) त्यामुळे शेकडो वर्षांमधे चंद्र सूर्याचा भासमान मार्ग बदलतो व त्यत नवे तारका समुह्ह येतात. भुजंगधारी हा असाच नवा तारका समुह.. काही (शे) वर्षात वृश्चिक तारकासमुह या भासमान मार्गाबाहेर जाईल व त्याजागी भुजंगधारी पूर्णपणे त्यामार्गावर येईल.

बाकी फलज्योतिष हे शास्त्र नाही याबद्दल खात्री असल्याने काही लिहिण्यात हशील नाही

अर्धवट's picture

30 Aug 2010 - 10:13 pm | अर्धवट

>या पार्श्व भूमीवर "ज्योतिषशास्त्र हे शास्त्रच आहे"यावर केंद्र सरकारद्वारे शिक्कामोर्तबच झाला आहे.

आमच्या आंधळे बुद्रुक ग्रामपंचायतीमधे कालच एकमतानं ठराव झाला की गावातली सगळी गाढवे घोडे आहेत म्हणुन. सबब आम्ही आता त्यांची रेससाठी पाठवणी करणार आहोत.

बाकी चालुद्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2010 - 10:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =))
आमच्या बेरकेवाडीतल्या म्हैला मंडळाचा याला संपूर्ण सपोर्ट आहे.

अदितीताई अवखळकर पाटील.
-- मु. अवखळवाडी, पो. बेरकेवाडी.

राजेश घासकडवी's picture

31 Aug 2010 - 1:45 am | राजेश घासकडवी

हे इतक्या थोडक्यात इतक्या सुंदर रीतीने सांगितल्याबद्दल आमच्याकडून तुमची एक नाडी व्हिजिट स्पॉन्सर!

ठराव अंमळ उशीरा झाल्यामुळे सही करायची राहिली.

ही घ्या.

डॉ. प्रा. बंडल घालवळसे.
Y.Z.

(स्वगत - छ्या बुवा, आताशा दर्जेदार स्वाक्षरी विडंबन विरळाच नै.)

उपेन्द्र's picture

30 Aug 2010 - 11:39 pm | उपेन्द्र

फलज्योतिष शास्त्र आणि पर्यायाने राशीभविष्य खरे असेल तर ९/११ किंवा त्सुनामी सारख्या घटनांमध्ये मृत झालेल्या सर्वांची रास एकच होती का?

ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होत असेल तर इतर प्राण्यांवर ही व्हायला हवा. मग वेगवेगळ्या वेळी जन्मलेल्या पोल्ट्रीतल्या कोंबड्यांचे आणि खाटीकखान्यातल्या बोकडांचे मरण सारखेच कसे होते?

हे प्रातिनिधीक झालं... अशा खूप शंका विचारता येतील.

जर भविष्याचा खरा अंदाज वर्तवता येत असेल तर मानवी जीवन अनिश्चित का आहे? मी परीक्षेत पास होणार हे खात्रीशीर कळलं म्हणून मी अभ्यास करणं सोड्लं तर मी होईन पास?

कोणत्याही शास्त्रात कार्यकारणभाव मह्त्वाचा असतो. कावळा बसला म्हणून फांदी मोड्ली या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. ती त्याच्याच बसण्यामुळे मोडली हे सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. आणि सिद्ध करण्याची जबाबदारी ते विधान खरे मानणार्‍याची आहे.

चिंतामणी's picture

30 Aug 2010 - 11:53 pm | चिंतामणी

उद्या सवडीने वाचेन आणि लिहीन.

परन्तु उद्या त्यावर खूप प्रतिक्रियांचा पाउस पडणार हे नक्की.

धनंजय's picture

31 Aug 2010 - 12:12 am | धनंजय

मिसळपावावर स्वागत आहे.

पैकी काही डिग्र्या मला तितक्याशा ओळखीच्या नाहीत.

M.A.; मास्टर ऑफ आर्ट्स (बॅचलर डिग्री पण आहे, असे धरले तर ५ वर्षे)
M.Phil.; मास्टर ऑफ फिलॉसॉफी (+३ वर्षे)
M.D.; डॉक्टर ऑफ मेडिसिन (खाली एमबीबीएसची वर्षे धरली, तर +८.५ वर्षे)
M.Com. मास्टर ऑफ कॉमर्स (+२ वर्षे)
LL.B. बॅचलर ऑफ लॉज (+४ वर्षे)
D.B.M.; ?
D.H.E. ?

= कमीतकमी २२.५ वर्षे कॉलेजात शिक्षण, अबब! आणखी दोन डिग्र्यांचा हिशोब केला तर ~२६.५ वर्षे! डॉ. श्रीकांत जिचकार त्या तिथे फटक पडले आहेत...

सुनील's picture

31 Aug 2010 - 3:22 am | सुनील

कमीतकमी २२.५ वर्षे कॉलेजात शिक्षण
सगळ्या डिग्र्या पारंपरिक पद्धतीने, कॉलेजात जाऊन, एकानंतर दुसरी ह्या पद्धतीने घेतल्या नसाव्यात. M.D. वगळता इतर डिग्र्या एखाद्या मुक्त विद्यापीठातून, डिस्टन्ट लर्निंग पद्धतीने, एकावेळेस एकापेक्षा अधिक अशा मिळवल्या गेल्या असू शकतील. अर्थात, तेही कठिणच म्हणा!

मिसळभोक्ता's picture

31 Aug 2010 - 3:48 am | मिसळभोक्ता

अगदी खरे आहे.

मला देखील हार्बर्ड मेडिकल स्कूलने पत्रद्वारे "मास्टर ऑफ सर्जरी" ची पदवी दिली आहे. त्यामुळे सगळ्या शस्त्रक्रिया हल्ली मी लेटर-ओपनर ने करतो.

dr sanjay honkalse's picture

3 Sep 2010 - 12:01 am | dr sanjay honkalse

४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी.

५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल.

नितिन थत्ते's picture

3 Sep 2010 - 8:12 am | नितिन थत्ते

साधारणत: लोकांनी नांदण्याविषयी ज्या शंका उपस्थित केल्या आहेत त्याची कारणे पुढीलप्रमाणे असावीत.

१. नवे येणारे सदस्य सहसा सुरुवातीला एखाद्या धाग्यावर काही प्रतिसाद वगैरे सुरुवात करतात. मग स्वतःचे धागे वगैरे काढू लागतात.
२. तुम्ही इथे नव्यानेच आला आहात. आणि लगेच एक लांबलचक तांत्रिक लेख लिहिला आहात.
३. अशी मोठी एण्ट्री मारणारे सदस्य नंतर गायब होतात असा इतिहास आहे. तसेच अशा तांत्रिक धाग्यांवर प्रतिसाद येतात त्यांवर उत्तरे देत नाहीत. जणू त्यांनी लिहिलेला लेख हे त्या विषयातले अखेरचे ब्रह्मवाक्य असते.

आपल्या या धाग्यावर दोन प्रकारचे प्रतिसाद आहेत. एक तुमची + तुमच्या डिग्र्यांची खिल्ली उडवणारे आणि दुसरे विषयाबाबत शंका उपस्थित करणारे. आपण प्रतिसाद दिले आहेत पण ते खिल्ली उडवणार्‍या प्रतिसादांवर दिले आहेत.

विषयाबाबत शंका उपस्थित करणार्‍या प्रतिसादांना आपण काही उत्तरे दिलेली नाहीत. ती सुरुवातीसच दिली असती तर खिल्ली उडवणारे प्रतिसाद थांबले असते अशी माझी खात्री आहे.

तेव्हा रागावू नका आणि सदस्यांना नियम दाखवू नका अशी विनंती.

इन्द्र्राज पवार's picture

3 Sep 2010 - 9:53 am | इन्द्र्राज पवार

+ सहमत.
मिपा असो वा तत्सम संस्थळ, सदस्यत्व स्वीकारल्यानंतर (किमान) एकदोन आठवडे येथील चर्चेचा दर्जा, विषयांतील वैविध्य, धागे सादर करण्याची धाटणी, प्रतिसादांचा सूर, त्यातील भाषेचा दर्जा आदी बाबी तपासण्यासाठी संबंधिताने वेळ देणे गरजेचे असतेच. लेख लिहिण्यापूर्वी अन्य धाग्यांवर निदान दोनतीन ओळीचे प्रतिसाद दिल्यामुळे 'ओळख' प्रस्थापित होण्यास म्हटले तर साहाय्यच होत असते.

इथे डॉ.संजय यांनी आल्याआल्या सेहवाग धर्तीची सिक्सर ठोकली (टिपिकल च्योप्ये पेस्ते स्टाईल मॅटर) आणि तेही आपल्या डझनभर पद्व्यांच्या उल्लेखांसह (प्लस ई-मेल, बायॉग्रॉफी इ.सह). पदव्यांबद्दल आम्हाला नेहमीच आदर वाटतो हे सांगण्याची आवश्यकता नसावी, पण सर्वाना दिसेल अशी माळ ज्यावेळी कुणी लावतो, त्यावेळी साहजिकच शंका येते की, अंतस्थ हेतू दुसराच (व्यवसायाच्या जाहिरातीचा वगैरे) आहे काय?

मिपावर जे सदस्य 'प्रा.' 'डॉ'. आहेत, त्यांनी कधीही आपल्या नावापुढे पदव्या झळकविलेल्या नाहीत. 'डॉ'. हा टॅग 'पीएच.डी.' साठी असतो इतपत सामान्यज्ञान अन्यांना आहेच. शिवाय जे सदस्य केवळ 'नाव' घेऊन इथे वावरतात तेदेखील आपापल्या विषयातील पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेतच. त्यामुळे डॉ.होनकळसे यांच्या पदव्यांच्या जंत्रीची खिल्ली उडविण्याचा कुणाचा मानस नसला तरी त्या इथे प्रकटने हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. (त्यातही एकदा "एम.ए.", "एम.कॉम." या पदव्या घेतल्यानंतर 'याशिवाय मी "बी.ए.", "बी.कॉम." देखील झालो आहे' असे कुणी सांगते/लिहिते का?)

यांच्या ब्लॉगवर ते "स्पिरिच्युअल सीकर' असल्याचा उल्लेख आहे. असे असेल तर मग काही सदस्यांनी त्यांच्या लेखावर वा पदव्यावर काही (खेळकर) टिपण्या केल्यापाठोपाठ 'मिसळपाव' च्या धोरणातील कलमे इथे चिकटविण्याची जी तत्परता त्यांनी दाखविली ती कोणत्या स्पिरिच्युअल सीकिंग कॅटेगरीमध्ये येते?

'मोठी एन्ट्री मारून गायब होणारे' सदस्य नेमक्या कोणत्या कारणासाठी ती एन्ट्री घेतात ते केवळ आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठीच असे अनुमान जर कुणी काढले तर त्याला उत्तर हे धागाकर्तेच देवू शकतात. मात्र इतिहास तसे सांगत नाही.

इन्द्रा

B.A.; M.A.(FIRST IN UNI -GOLD MEDAL);M.Phil.;LL.B.D.H.E; ALL MUM UNIVERSITY
M.D. INDIAN BOARD OF ALT .MED (RECOGNIZED BY W.H.O AND G.O.I)

0

मिसळभोक्ता's picture

31 Aug 2010 - 12:31 am | मिसळभोक्ता

वरूल प्रतिसाद लिहून होई पर्यंत डॉक्टर साहेबांना आणखी काही डिग्र्या मिळालेल्या आहेत. पूर्ण यादी अशी:

DR SANJAY HONKALSE alias sanjaysir is referred to as self made one man institution by his friends n students.

M.D.;M.Phil.;M.A.;M.COM; LL.B.;
. B.A.; B.COM ;D .H. E.;D.B.M.;
D.T.T; D.G.T; D.M.T.;

संजय सर हे सेल्फ मेड असल्याने, मला अजीबात आश्चर्य वाटले नाही.

शिल्पा ब's picture

31 Aug 2010 - 1:50 am | शिल्पा ब

तुम्ही मनानीच डॉक्टर , खरे डॉक्टर का ज्योतिषशास्त्रातले डॉक्टर? सहज एक प्रश्न पडला..

धरलेले बघून गहिवरुन आले! ;)

(नवपंचम योगातला)चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

31 Aug 2010 - 9:44 am | प्रकाश घाटपांडे

वा!वा!छान!छान!
बाकी चालू द्यात

विजुभाऊ's picture

31 Aug 2010 - 10:11 am | विजुभाऊ

एखादी गोष्ट शास्त्र आहे असे म्हणताना त्या विषयाची बैठक मजबूत पायावर असते. त्यात असलेले मूलभूत नियम त्यात्या कक्षेत केंव्हाही सिद्ध करायचा प्रयत्न केला तरीही ते नेहमी ठरावीकच फळे देत असतात आणि ठरावीकच निष्कर्शा प्रत येतात.
काही काल आपण मानूया की फलज्योतिष हे शास्त्र आहे. पण मग तुम्ही एखादा नियम सांगा आणि तो प्रत्येकवेळेस सिद्ध होताना दिसत नाही. उदा एखाद्या बालकाचा जन्म ठरावीक ठीकाणी झाला असता आकाशस्थ ग्रह त्या बालकाची वर्तणूक आणि आयूष्यातील घटनाक्रम ठरवितात.
माझ्या एका मित्राचा सख्खा जुळा भाऊ आणि तो यांच्या आयूष्यात बरीच भिन्नता आहे. मित्राच्या भावाचा संसार सुखात चालला आहे. मित्राचे अजून कुठे एकदा जमून तुटले आहे.
आता एकाचा आईच्या पोटी एकाच वेळेस जन्माला आलेली दोन बालके त्यांच्या आयूष्यात इतका फरक कसा पडतो.
( उत्तर म्हणून "पूर्वजन्म आणि संचित हा फलज्योतिषाचा भाग आहे" असे न सिद्ध करता येण्यासारखे नियम सांगू नका )

राजेश घासकडवी's picture

31 Aug 2010 - 10:24 am | राजेश घासकडवी

आता एकाचा आईच्या पोटी एकाच वेळेस जन्माला आलेली दोन बालके त्यांच्या आयूष्यात इतका फरक कसा पडतो.

सामान्यज्ञानाचे मानदंड ज्योतिषाच्या आवाक्यात घुसवल्याबद्दल विजुभाऊंचादेखील निषेध.

भडकमकर मास्तर's picture

31 Aug 2010 - 3:45 pm | भडकमकर मास्तर

उदा. या एप्रिल महिन्यात आपल्या एका ( हाय मर जावां ) चित्रपटाच्या प्रमोशन करतेवेळी E .T .C .या चानलवर मान्य केले कि तिच्या विवाहाचे भविष्य बद्री उझ्मान या अमेरिकेत स्थायिक असलेल्या नटाने सांगितल्या प्रमाणे तंतोतंत खरे झाल्याचे सांगितले.

वाक्य अप्रतिम..फक्त कोणी सांगितले हे कळाले नाही....
मज्जा आली..
बाकी चालूद्या

dr sanjay honkalse's picture

1 Sep 2010 - 6:45 pm | dr sanjay honkalse

1 सप्टें 2010 - 18:44

त्यान्चे नाव गुर्विन छड्डा ज्यान्नि बेन्ड इट लाइक अ बेक्मन काडला। टाइपिन्ग चुकिमुळॅ (मराठी)ऊल्लेख मिस्स झाला.माफ करा.

त्यान्चे नाव गुरिन्दर छड्डा ज्यान्नि बेन्ड इट लाइक अ बेक्मन काडला। टाइपिन्ग चुकिमुळॅ (मराठी)ऊल्लेख मिस्स झाला.माफ करा.

संजय होन्कलसे

अमोल केळकर's picture

31 Aug 2010 - 4:49 pm | अमोल केळकर

लेख आवडला

अमोल केळकर

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Aug 2010 - 6:20 pm | llपुण्याचे पेशवेll

लेख आवडला. संपूर्ण पटला असे नाही. जर आपण लिहीलेल्या डिग्र्या खर्‍या असतील तर आपल्याविषयीचा आदर दुणावला. फलज्योतिषावर तितकासा विश्वास नाही पण म्हणून केवळ माझा विश्वास नाही त्या विषयावर लेख लिहील्याने तुम्ही अनादरास पात्र ठरत नाही.

अवलिया's picture

31 Aug 2010 - 6:34 pm | अवलिया

हेच आणि असेच.

सर्व डिग्रीज परम्परीक पध्धतीने घेतल्या आहेत.
B.A.; M.A.(FIRST IN UNI -GOLD MEDAL);M.Phil.;LL.B.:D.H.E; ALL MUM UNIVERSITY
M.D. INDIAN BOARD OF ALT .MED (RECOGNIZED BY W.H.O AND G.O.I)

संजय होन्कलसे

विसुनाना's picture

31 Aug 2010 - 6:59 pm | विसुनाना

होनकळसे सर,
आपण केलल्या एम्.डी. ला 'डब्लयूएचओ'ची मान्यता आहे हे वाचून कुतुहल वाढले.
कृपया Numerology, Divine Healing, Gem Therapy, Magnet Therapy, Radionics (Dowsing), Cosmic Ray therapy, Medical Astrology, Tele-Therapy, Reiki, Pyramid Therapy, Crystal Therapy, Graphology, Rudraksha Therapy and Naturopathy या आपल्या स्पेशलायझेशनच्या विषयांवरही लिहावे ही विनंती.
विशेषतः रेडिऑनिक्स आणि टेलेथेरपी बद्दल उत्सुकता आहे.कॉस्मिक रे थेरपीमध्ये दोन हातांमध्ये गोलगोल फिरणारा अँटेना असतो असे अंधुकसे स्मरते. तो काही कॉस्मिक फ्रिक्वेन्सींना रेझोनेट होतो इ.इ. (हे बरोबर आहे काय? चूक असले तर नीट समजावून सांगावे.)

या नवनवीन (खरे म्हणजे वैदिक पण सामान्य लोकांसाठी नव्या) तंत्रांबाबत आणि त्यातील विज्ञान-तंत्रज्ञान यांबाबत जाणून घ्यायला आवडेल.कृपया या विषयांवर एक लेखमाला लिहून वाचकांना उपकृत व ज्ञानी करावे ही विनंती.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2010 - 12:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कॉस्मिक फ्रीक्वेन्सी म्हणजे काय?
कॉस्मिक रेज हे तरंग नसून कण असतात अशी माझी समजूत होती!

मिसळभोक्ता's picture

1 Sep 2010 - 12:30 am | मिसळभोक्ता

कणांना वारंवारिता नसते असे कुणी सांगितले ?

(पहा: पेण्डुलम उर्फ दोलक.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2010 - 12:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कणांना वारंवारिता नसते असे कुणी सांगितले ?

मी कुठे म्हटलं कणांना वारंवारिता नसते?

फोटॉन्सची फ्रीक्वेन्सी लिहीता येतेच. पण शक्यतोवर कणांची ऊर्जा लिहीतात आणि तरंगांची तरंगलांबी/वारंवारीता; अपवाद गॅमा आणि एक्स-रे खगोलशास्त्रात तरंगांची ऊर्जा लिहीतात.
कॉस्मिक रे खगोलशास्त्रात कणांची ऊर्जा लिहीतात हे माझ्या माहितीचं आहे म्हणून मुद्दाम प्रश्न विचारला आहे. मला (सगळं!) माहिती आहे असा कुठेही दावा नाही.
(चला भांडू या मिभो काकांशी!)

मिसळभोक्ता's picture

1 Sep 2010 - 12:45 am | मिसळभोक्ता

कॉस्मिक रे खगोलशास्त्रात कणांची ऊर्जा लिहीतात

ते लहान मुलांना कळावं म्हणून !

मोठी माणसे पटकन गणीत करून वारंवारितेवरून आणि तरंगलांबीवरून ऊर्जा काढतात. कारण त्यांना प्लँकचा स्थिरांक माहिती असतो.

मला (सगळं!) माहिती आहे असा कुठेही दावा नाही.

असा दावा करणारा माझ्याही पाहण्यात नाही. मी अद्याप प्रा. डॉ. होनकळसेंना भेटलेलो नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2010 - 12:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मोठी माणसे पटकन गणीत करून वारंवारितेवरून आणि तरंगलांबीवरून ऊर्जा काढतात. कारण त्यांना प्लँकचा स्थिरांक माहिती असतो.

इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची ऊर्जा कशी काढणार नुस्त्याच प्लँकच्या स्थिरांकावरून?
कॉस्मिक रेजमधे हेच मोठ्या प्रमाणावर असतात. शिवाय न्यूट्रीनोजचं काय??

असा दावा करणारा माझ्याही पाहण्यात नाही. मी अद्याप प्रा. डॉ. होनकळसेंना भेटलेलो नाही.

कदाचित भेटलाही असाल, तेव्हा "हेच ते(ही)" असं माहीत नसेल! ;-)

मिसळभोक्ता's picture

1 Sep 2010 - 2:16 am | मिसळभोक्ता

ह्यासाठी आम्ही एक माणूस जर्मनीत पेटंट ऑफिसात ठेवला होता. त्याने सगळे आधीच करून ठेवले आहे.

नवीन काही कामे असतील तर सांगा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2010 - 9:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पेटंट ऑफिसातल्या माणसाने पेन्शन घेणं बंद केल्यालाही बरीच वर्ष झालीत! ;-)

नितिन थत्ते's picture

1 Sep 2010 - 10:42 am | नितिन थत्ते

एक माणूस स्विस पेटंट ऑफीसात असल्याचे ऐकले होते.

विसुनाना's picture

1 Sep 2010 - 11:18 am | विसुनाना

इतक्या महत्त्वाच्या विषयांबद्दल तरंग की कण? स्विस की जर्मन? असले वाद उकरून काढू नयेत.
चर्चा होणे महत्त्वाचे. वाद नव्हे.

खरे म्हणजे जर्मनीत आणि इंग्लंडात (!!) जेमॉलॉजी, ऑरा थेरपी आणि कॉस्मिक रे थेरपीला अतोनात पाठबळ आहे. (पहा, आपल्या नाडीशास्त्राला झेक रिपब्लिकमध्ये केवढी मान्यता मिळाली.) आपण भारतीय मात्र उगाच शंका-कुशंका काढून या महत्त्वाच्या आणि सर्वंकष उपचारपद्धतींना हीन लेखतो हे चुकीचे आहे. पाश्चात्यांना जेजे मान्य तेते (बाय डिफॉल्ट) आपणही मान्य केलेच पाहिजे या मताचा मी आहे. आजकाल कोणत्याच गोष्टींवर श्रद्धा न ठेवण्याचे फ्याड बळावत चालले आहे ही खेदाची गोष्ट आहे. केवळ बुद्धीच्या जोरावर मनुष्य विश्वाचे रहस्य उकलू शकतो हीच एक अंधश्रद्धा आहे आणि तिलाही तपासले पाहिजे. (कोणत्या कसोटीवर? या प्रश्नाचे उत्तर स्वतःच शोधावे.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Jul 2011 - 9:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला विसुनानांचे म्हणणे आज मान्य झाले आहे. गुरूदेव, काय हा चमत्कार!

अविनाशकुलकर्णी's picture

1 Sep 2010 - 9:29 am | अविनाशकुलकर्णी

मी आपली वेब साइट पाहिलि..मी आपल्या लेखनाचा चाहता आहे......वरील लेख सुंदर व विचार प्रवर्तक आहे ......शुभेछ्या....

सुहास..'s picture

3 Sep 2010 - 8:17 am | सुहास..

आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र >>>

व्हाट द हेल !!

नगरीनिरंजन's picture

3 Sep 2010 - 10:23 am | नगरीनिरंजन

एवढ्या डिग्र्यांचा अभ्यास करुन, परीक्षा देऊन, वेबसाईटवर लिहून आणि झालंच तर स्वतःचा व्यवसाय करुन पुन्हा मिपावर वेळ घालवायला वेळ कसा मिळतो हा मला पामराला पडलेला एक किंचित प्रश्न.
बाकीचं सध्या राहू द्या, तुम्ही वेळेच्या व्यवस्थापनावरच एक लेख लिहा आधी डॉक्टर.

रामजोशी's picture

19 Jul 2011 - 10:02 pm | रामजोशी

जासत बोलायला नको ! Govt. registered अशा पद्तीने लिहीले आहे की ते Govt approved वाटवे. मिंबईत अशा लाखो संस्था reg. आहेत.

What is the status of Indian Board of Alternative Medicines and its courses?

Indian Board of Alternative Medicines is legally constituted, internationally recognized and the largest institution of Alternative Medicine in India. It is duly incorporated under Act XXVI of 1961 of Government of West Bengal, based on the Central Government Act XXI of 1860, Literary & Scientific Institutions Act, 1854. The Diploma, Bachelor, Masters and Doctorate programs are duly chartered under the memorandum of the IBAM which has been accepted by the concerned department for registration. Moreover the rights of the practitioners of Alternative Medicine are duly protected under Article 19 of the Constitution of India.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Jul 2011 - 10:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... Government of West Bengal, ...

बाबा बंगाल्यांचे मूळ समजले.

जयंत कुलकर्णी's picture

19 Jul 2011 - 10:15 pm | जयंत कुलकर्णी

:-) नकोच यात पडायला

चित्रगुप्त's picture

19 Jul 2011 - 11:19 pm | चित्रगुप्त

ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही, वगैरे प्रश्नांमध्ये अनुस्युत असणारा मुख्य प्रश्न असा, कि कोणत्याही पद्धतीने का होइना, भविष्य जाणून घेता येते किंवा नाही? माझ्या वैयक्तिक अनुभवाप्रमाणे असे भविष्य सांगू शकणारे लोक आहेत, बहुतेकदा त्यांना पतंजली ज्याला प्रत्यक्षज्ञान असे संबोधतात, त्या पद्धतीने भविष्य कळते, परन्तु प्रत्येक वेळी त्यांचे भविष्य कथन खरे ठरतेच, असेही नाही.

शाहिर's picture

20 Jul 2011 - 10:34 am | शाहिर

शास्त्र म्हनजे काय अभिप्रेत आहे ??

तुमच्या द्रुष्टी ने शास्त्राची व्याख्या काय आहे ??

अजातशत्रु's picture

21 Jul 2011 - 1:38 pm | अजातशत्रु

आता असे म्हणायची वेळ आली :)

ज्योतिष हे शास्त्रच ! ...
आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र.
हे इतके ठासून सांगितल्याने मलाहि खरे वाटू लागले आहे,

डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे .
M.A.;M.Phil.;M.D.;M.Com.LL.B.D.B.M.;D.H.E.

B.A.; M.A.(FIRST IN UNI -GOLD MEDAL);M.Phil.;LL.B.D.H.E; ALL MUM UNIVERSITY
M.D. INDIAN BOARD OF ALT .MED (RECOGNIZED BY W.H.O AND G.O.I)

B.A.; M.A.(FIRST IN UNI -GOLD MEDAL);M.Phil.;LL.B.Laughing out loud.H.E; ALL MUM UNIVERSITY
M.D. INDIAN BOARD OF ALT .MED (RECOGNIZED BY W.H.O AND G.O.I

या तुमच्या पदव्या आहेत ? ( एखादि राहिली असल्यास क्षमस्व )
(यातल्या काहि समजण्यापलिकडच्या आहेत, ओळखीच्या नाहीत हे प्रामाणिकपणे कबूल करतो,हे आमचे अज्ञान, माफ करा)
आपला इतका प्रचंड अभ्यास पाहून आज खरेच एक मराठि असण्याचा अभिमान वाटला,
आणि आपल्याविषयी आदरहि,
मला एवढेच म्हणायचे आहे की,
आपण देश हितासाठि. एखाद्या विधायक कामात योगदान का करत नाही?
आपले ज्ञान/ आपल्या सारख्यांची आज देशाला गरज आहे
केले असेल/करत असाल तर क्षमस्व,
तुमच्या सारखे प्रकांडपंडित जर यावर विश्वास ठेवत असतील तर, आमच्या सारख्या सामान्य बुध्दि असलेल्या लोकांनी तर त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला हवा,
म्हणून म्हणले काय डॉ.तुम्हि सुध्दा ?

अवांतरः तुम्हि मिळवलेल्या डिग्र्यांचा उल्लेख इतरांवर दडपण आणन्यासाठि केला आहे काय?
त्या पाहून कुणि प्रतिवाद करणार नाही,केलाच तर दबकत दबकत करेल?
कारण तसे दडपण माझ्यावर तर आलेय बुवा.
तसे नसेल तर पुन्हा एकदा माफि असावि,

असो,
मिपावर स्वागत आहे !
पु.ले.शु.

.
.
.
.
.
.
.
.
.
.

{नंदिबैल}

शाहिर's picture

1 Aug 2011 - 5:45 pm | शाहिर

@..अजातशत्रु.
प्रतिसादा मधे उगीचच जागा का अडवता ?
लांब प्रतिसादाचा अभिमान आहे का ?

शाहिर's picture

1 Aug 2011 - 5:45 pm | शाहिर

@..अजातशत्रु.
प्रतिसादा मधे उगीचच जागा का अडवता ?
लांब प्रतिसादाचा अभिमान आहे का ?