मंडळी श्रावण पाळणार्यांची जाम पंचाईत झाली असेल नाही, कधी श्रावण सरतोय आणि कधी घासासोबत तो वास येतोय असं झालं असेल ना !! मग एक उपाय आहे ती म्हणजे ही पाकृ, श्रावण पाळल्याचं समाधान आणि मासळी खाल्ल्याचं सुख (काहीजणं दुधाची तहान ताकावर म्हणतील याला). तसा आमचा बाराही महिने श्रावण पण पाकृ आहे ती खास मछलीबिन सावन के पानी में तडपने वालों के लिये. आज पहिल्यांदाच मिपावर पाकृ डकवत आहे त्यामुळे जरा भीती आहे मनात (मिपाकरांच्या भन्नाट प्रतिक्रिया वाचत असतो )
तर साहित्यः कच्ची केळी ३
हळद, लाल तिखट, बारीक रवा, मीठ, तळणासाठी तेल.
कृती:
कच्ची केळी (म्हणजे काप करण्यासाठी वेगळी केळी मिळतात, आकाराने लहान असतात) घ्यावीत.
त्यांची साल सुरीने नीट सोलून काढावी.
आणि मग पातळ काप करुन ते काप पाण्यात टाकावे.
हे पाण्यात न टाकल्यास काप काळे पडतात.
त्यानंतर ते काप पाण्यातून नीट निथळून त्याला हळद व मीठ लावून ५ ते १० मिनीटे मुरत ठेवावे, म्हणजे केळ्याचा चिकटपणा निघून जाईल.
त्यानंतर एका भांड्यात बारीक रवा, तिखट, हळद, मीठ एकत्र करुन घ्यावे. मीठ बेताचे घालावे कारण आधीच आपण हळद व मीठात काप मुरत ठेवले आहेत.
तर हे मुरत ठेवलेले काप वरील रव्याच्या मिश्रणात घोळवून तव्यावर मंद आचेवर तळावे.
काप छान तळून जेवणासोबत तोंडी लावायला किंवा असेच चहासोबतही छान लागतात.
मंडळी फोटो पण डकवत आहे, दिसत नसल्यास कृपया डकवण्याची योग्य पद्धत सांगणे.
प्रतिक्रिया
21 Aug 2010 - 12:19 am | प्रियाली
फोटो फ्लिकर किंवा पिकासावर चढवा आणि नंतर मिसळपावावर लावा. तुमच्या हार्डडिस्कवरून फोटो सरळसोट नेटावर प्रकाशित करता येत नाहीत.
21 Aug 2010 - 1:17 am | कुक
मला आठवतय मि माझ्या बहीणीच्या घरी असे केळ्याचे काप खाले आहेत
21 Aug 2010 - 1:25 am | मराठमोळा
आम्ही आमच्या एका मित्राला केळ्या म्हणायचो, "केळ्याचे काप" धागा वाचुन अंमळ हसायला झाले. ;)
असो,
पाकृ चांगली वाटतेय..फोटु लवकर टाका. :)
21 Aug 2010 - 3:15 am | रेवती
पाकृ खमंग असणार यात शंका नाही.;)
फोटो येण्याची वाट बघू.
21 Aug 2010 - 10:48 am | विसोबा खेचर
फोटो?
22 Aug 2010 - 2:21 pm | सूड
22 Aug 2010 - 2:47 pm | चिंतामणी
पन येक मिश्टेक झाली राव. फोटूची लिंक कापी करताना
Select sizeमधे Origanal size 640 px करून कॉपी करायला पाइजे व्हती.
फुडल्या येळेला करेक्ट करा भौ.
21 Aug 2010 - 10:53 am | अर्धवट
फोटो नाही.. सबब लेखातल्या कुठल्याही वाक्यावर विश्वास ठेवता येत नाही.. क्षमस्व.
पाकृ चा फाउल धरला आहे..
21 Aug 2010 - 2:12 pm | मेघवेडा
पाकृ गच्चीवर वाळत टाकलेली आहे. ;)
21 Aug 2010 - 1:47 pm | परिकथेतील राजकुमार
केळ्याची साल सुरीने ? डिंपललाच बोलावावे लागेल मग.
22 Aug 2010 - 1:37 pm | सूड
परा अहो केळी कच्ची आहेत सुरी लागणारच ;)
स्वगत (याला काही लोक खुद से बाता म्हणतात) ह्म्म्म तर स्वगत : { आता ती सोलायला डिंपल येणार की ट्विंकल ते तुम्ही ठरवा,}
21 Aug 2010 - 11:08 pm | पैसा
आमच्या गोव्यात बटाटे विलायती फणस (नीरफणस) सुरण इ. चे असेच काप करतात. त्यात किँचित हिँग पण घालतात. अतिशय चविष्ट.
23 Aug 2010 - 5:24 pm | सूड
पैसा,
अहो नीरफणसाच्या कापाची पाकृ असेल तर लिहा जरा आणि नीरफणस म्हणजे काही निराळा असतो का ??
3 Apr 2014 - 11:06 pm | पैसा
http://en.wikipedia.org/wiki/Breadfruit
हे बघ नीरफणस.
कापांची कृती तू दिलीस तशीच, फक्त हळद, रवा, तिखट, मीठ यात किंचित हिंग पण घालतात. आणि त्यात घोळवून तव्यावर तेलात दोन्ही बाजूंनी परतून काढतात.
या ताटात डाव्या बाजूला तळलेले दिसत आहेत ते नीरफणसाचे काप.
उत्तर द्यायला जरा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व!
:D
3 Apr 2014 - 11:09 pm | दिव्यश्री
उत्तर द्यायला जरा उशीर झाला>>> जरा ??? ;) :D
4 Apr 2014 - 9:18 am | ब़जरबट्टू
जरा.. जरा जास्तच झालाकिकी हो +)) =))
4 Apr 2014 - 5:05 pm | बॅटमॅन
नीरफणस बाकी भारी दिसतो आहे.
पण 'जरा' जरा जास्तच झाला एकदम =)) अगदी सहमत आहे =))
4 Apr 2014 - 5:02 pm | सूड
धन्यवाद. इथं मंडईत कुठं मिळायला असले फणस !!
22 Aug 2010 - 11:21 am | सचिन कुलकर्णी
फोटो दिसत नाहीयेत..
22 Aug 2010 - 11:32 pm | हेमा
खुप सुन्दर लागतात.
27 Aug 2010 - 2:40 pm | जागु
सुधांशू मस्तच रेसिपी. असे काप मसाल्या ऐवजी मिरपुड लावुनही करता येतात. तसच केळ्याची भजीही करता येते.
27 Aug 2010 - 3:04 pm | सूड
ठांकु ठांकु,
27 Aug 2010 - 3:08 pm | सूड
धन्यवाद.
रेसिपी ज्यांना आवडली, ज्यांनी शंका, कुशंका ....इत्यादि इत्यादि उपस्थित केल्या त्या सार्यांना धन्यवाद.
3 Apr 2014 - 10:53 pm | दिव्यश्री
अरे व्वा ...मस्त पाककृती . फोटू पण भारी हं . :)
4 Apr 2014 - 5:00 pm | सूड
अर्र!! हे मी लिहीलंय यावर आता विश्वास बसत नाहीये वाचून. माझंच लिखाण मला मिळमिळीत वाटतंय. ;)
10 Apr 2014 - 11:14 pm | शुचि
मिळमिळीत वगैरे काही नाही. नवखे होता म्हणून काळजीपूर्वक, अदबशीर लिहीले आहे :)
छान आहे पाकृ.
4 Apr 2014 - 9:41 pm | अजया
छान आहे की पा.कृ. ! दुसरी झणझणीत लिखाणाची येऊ दे मग!
11 Apr 2014 - 5:36 pm | सूड
हम्म !! प्रयत्न करायला हरकत नाही. पण इथे मुळातच इतके बल्लव, सुग्रणी आहेत की म्या पामरानं काय लिहावं असा प्रश्न पडतो. त्यातल्या त्यात इथे न आलेली पाकृ करुन पाह्यलीच, तर डकवतो.
11 Apr 2014 - 12:23 am | मुक्त विहारि
झक्कास