प्राक्तन

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
7 Aug 2010 - 12:44 pm

थोडं अंतर राहिलय आता... तो ठिपका अगदी जवळ आलाय.

किती तास, दिवस, महिने, वर्ष की युगे
अशीच लोटली माहित नाही
काळ जणु काही थबकुन गेलेला
प्रकाश अंधार ह्या कालाच्या खुणा कधी संपल्या माहित नाही...

किती काळ लोटला
त्या गुढ प्रकाशाच्या दिशेने जात आहे
जिकडं पहावं तिकडं फक्त अंधार
आणि
मिच्च काळ्या अंधारावर
फिक्कटसा दिसणारा तो ठिपका
चालत आहे अनंत काळापासुन त्याच्याच दिशेने...

वाटेत कित्येक पाय-या लागल्या
बुळबुळीत निसरड्या
पाय ठेवताच धप्पकन पाडुन परत माघारी पाठवणा-या...

कित्येक टोकदार काटेरी
पावलांमधे कचकन घुसुन
रक्तबंबाळ करणारे शिंपले अंगावर धारण करुन असलेल्या...

कित्येकदा गळ्यापर्यंत
रुतलेल्या चिखलाने थपथपत
तर कधी अकारण कोंडलेल्या
श्वासाने धापा टाकत टाकत ...

पण चालतच होतो त्याच्या दिशेने.
कित्येकदा त्याच्यापर्यंत पोहोचलो
झिरझिरीत तलम पांढुरक्या पडद्याच्या जवळ पोहोचलो
अनामिक उत्सुकतेने,
सुटकेच्या आशेने,
धडधडत्या छातीने,
पडदा ओलांडणार...
तोच पाय सटकायचा अन्
परत कोसळायचो खाली ...
परत चालु व्हायचा प्रवास ... तसाच अगदी तसाच
किती तरी वेळा असंच झालं.

आता परत तिथेच पोहोचलो आहे
मागच्या चुका परत करणार नाही
पाय सटकणार नाही याची काळजी नक्की घेईन
उगाच घाई करणार नाही
असं मनाला वारंवार बजावत
मी परत त्या पडद्यापाशी आलो आहे
आज ज्या ठिपक्याकडे पहात पहात मी हा प्रवास केला
कधी थकलो, दमलो, रक्तबंबाळ झालो
कधी चिडलो, ओरडलो, निराश झालो
कधी थांबलो, धावलो, तिरिमिरीत पडलो
तो हा प्रवास नक्की पूर्ण होईल...

बस्स ...
आता एक क्षण पुरे.
सुटका आता...
फक्त एक क्षणानंतर.
हा काळ सुद्धा किती लांब वाटत आहे
संपतच नाही
पाउल टाकले ... टाकले... टाकले.
पडद्याला ओलांडले.

आणि समजले ....
.....पायाखाली जमीनच नाही.

मुक्तक

प्रतिक्रिया

प्रभो's picture

7 Aug 2010 - 12:52 pm | प्रभो

नान्या,

प्रतिभेला सध्या पाझर फुटलेला दिसतोय.... ;)
क्वालिटी नानास्टाईल लिखाण चालूय जोरदार...

ठाकठिक.. जुनेच रुपक
सर्वत्र इतका प्रकाश असताना असा अंधार खरेच जाणवतो का?

लिखाण थोडे लांब वाटले. अजून घोटवून लहान झाले तर चांगले असे वाटले. तसेच पायर्‍या निसरड्या असण्याच्या कडव्यानंतरचे कडवे वेगळे असल्याने ते पायरीबद्दल आहे की चालणार्‍याबद्दल ते वाचताना निटसे समजले नाही. वाचून झाल्यावर कळाले.

पु ले शु

sneharani's picture

7 Aug 2010 - 12:56 pm | sneharani

मस्त लिखाण...!
लिहीत रहा.

नाना म्हणजे घोर अंधार
नाना म्हणजे स्वच्छ दुपार
नाना नाना, भलता माज,
नाना कोळुन प्याला लाज,
नाना सांगे तत्वज्ञान
नानासंगे बरमग्यान
नाना हळवे दुखरे शब्द
नाना हळवी जखम, रक्त
नाना इनोदी छप्परफाड
असेच लेखन अजुन पाड.

छोटा डॉन's picture

7 Aug 2010 - 1:24 pm | छोटा डॉन

नान्या हे असे मुक्तक भारी लिहतो आणि समर्थपणे पेलतो ह्यात वादच नाही.
हा लेखही आवडला पण तितकासा समजला नाही.
पण चान चान आहे हे नक्की ;)

असो, मला खरोखर नाही कळाला.
नक्की काय म्हणायचे आहे किंवा काय मांडायचे आहे हे समजले नाही ?

प्रवास कुठला आहे ? नक्की कुठे चालला आहे ?
जिकडे चालला आहे ते भ्रम आहे काय ?
मृगजळ म्हणावे तर इथे त्याला स्पर्श केला आहे, मग ते मृगजळ कसे म्हणावे ?
'अंतिम सत्य किंवा सर्वोच्च सुख' शोधत असाल तर ते 'अस्तित्वातच नाही' असे म्हणायचे आहे काय ?

असो, लेख उत्तम आहे ह्यात वादच नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

7 Aug 2010 - 2:50 pm | परिकथेतील राजकुमार

नान्या हे असे मुक्तक भारी लिहतो आणि समर्थपणे पेलतो ह्यात वादच नाही.

+१ अगदी हेच शब्द मनात आले होते.

हा लेखही आवडला पण तितकासा समजला नाही.
पण चान चान आहे हे नक्की

असो, मला खरोखर नाही कळाला.
नक्की काय म्हणायचे आहे किंवा काय मांडायचे आहे हे समजले नाही ?

असो, लेख उत्तम आहे ह्यात वादच नाही.

-१ (हे बळच वाकड्यात घुसण्यासाठी)

हे थोडे कानफ्युज करुन गेले ;) लेख कळालाच नाही - समजलाच नाही तर मग तो उत्तम आहे हे कशावरुन ठरवले ? आणि मग तो आवडला कसा काय ?

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Aug 2010 - 1:57 pm | llपुण्याचे पेशवेll

नान्या लई टुकार कविता आहे. (हल्ली नान्याला टूकार म्हणायची पद्धत आली आहे म्हणून सर्वांचा मान राखून. )

नि३'s picture

7 Aug 2010 - 2:42 pm | नि३

मस्त रे नान्या

चालुन चालुन पाय दुखले रे !!! ;) आता एकही पाउल पुढे टाकवत नाहीये !!! ;)
-
-
-
मुक्तक आवडले... :)

निखिल देशपांडे's picture

7 Aug 2010 - 9:01 pm | निखिल देशपांडे

मस्त रे नाना

मितान's picture

7 Aug 2010 - 9:06 pm | मितान

व्वा !

प्राक्तन थोडं लांबल्या सारख वाटत. :)

विनायक प्रभू's picture

7 Aug 2010 - 10:49 pm | विनायक प्रभू

नानी लांब गेली की नानाचे असेच होते.

सहज's picture

8 Aug 2010 - 6:01 am | सहज

काही फारसे समजले नाही.

ते एखादे अनवट नृत्यनाटक असते तसे काहीसे वाटले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Aug 2010 - 2:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>काही फारसे समजले नाही.ते एखादे अनवट नृत्यनाटक असते तसे काहीसे वाटले.
असेच. पण नाना लिहित राहा. वाचतोय.

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

9 Aug 2010 - 10:57 am | अवलिया

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

सविता's picture

3 Nov 2010 - 3:48 pm | सविता

फारसे झेपले नाही... पण आवडले........