नेमाडेंचे हिंदु एक समृद्ध अडगळ कोणी वाचले आहे का?

थोर्लेबजिराव's picture
थोर्लेबजिराव in काथ्याकूट
6 Aug 2010 - 3:42 pm
गाभा: 

नेमाडेंचे हिंदु एक समृद्ध अडगळ कोणी वाचले आहे का?

मिसळपाववर लिहिताना कृपया देवनागरी लिपीचा वापर करावा. - संपादक मंडळ

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

6 Aug 2010 - 3:46 pm | मेघवेडा

मी नाही वाचलेलं. पण आपला सदस्य कालावधी १ वर्षे ३९ आठवडे असा दिसत आहे. आपण मिपाचे धोरण व काही नवीन धागे नक्कीच वाचलेले दिसत नाहीत.

चालू द्या.

सुहास..'s picture

6 Aug 2010 - 3:54 pm | सुहास..

ओ ... दोन हजारात महिनाभर मस्तानी देणारे थोर्लेबजिराव ..मराठी लिहायच विसरलात की काय ??

मी वाचली आहे. का ? काय झाल ?

अवांतर :: कुठे होतास ??

चित्रा's picture

6 Aug 2010 - 5:21 pm | चित्रा

एका ओळीचे धागे काढू नयेत. तसेच विचारण्याचे प्रश्न मराठीत लिहावे.
या विषयीचे धोरण येथे वाचावे. http://www.misalpav.com/node/13199

नेमाड्यांच्या या पुस्तकाबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.

छोटा डॉन's picture

6 Aug 2010 - 5:42 pm | छोटा डॉन

वरील प्रतिसादाशी सहमत आहे ...

नेमाड्यांच्या हिंदुविषयी अधिक माहिती आपल्याली "येथेही" वाचायला मिळेल.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Aug 2010 - 5:44 pm | llपुण्याचे पेशवेll

नेमद्यन्चे हिन्दु वचलेले नहि.

नितिन थत्ते's picture

6 Aug 2010 - 6:22 pm | नितिन थत्ते

तरी अजून एकोळीचाच धागा आहे.
संपादक मंडलाची टीप ही दुसरी ओळ समजली जाते का? ;)

चित्रा's picture

6 Aug 2010 - 6:42 pm | चित्रा

http://www.misalpav.com/node/13199
६.नवे लेखन करताना एक-दोन ओळींचे लेखन करू नये. असे लेखन अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेऊ शकते याची नोंद घ्यावी.

भारतीय's picture

8 Aug 2010 - 10:37 am | भारतीय

एक ओळीच्या धाग्याने काय समस्या निर्माण होते का? कुतुहल म्हणून विचारतोय..

परिकथेतील राजकुमार's picture

6 Aug 2010 - 6:39 pm | परिकथेतील राजकुमार

कोण नेमाडे ?

नितिन थत्ते's picture

6 Aug 2010 - 6:44 pm | नितिन थत्ते

ते नाही का? टिळकांसारख्या उदाहरणार्थ मिशा आहेत त्यांच्या?

आमोद शिंदे's picture

6 Aug 2010 - 6:57 pm | आमोद शिंदे

कोण टिळक?
(माणसाच्या अज्ञानाला थांग नाही)

विकास's picture

6 Aug 2010 - 9:47 pm | विकास

ते नाही का? टिळकांसारख्या उदाहरणार्थ मिशा आहेत त्यांच्या?

टिळकांचे नाव आणायचे काय प्रयोजन?

असे जेंव्हा खोडसाळपणे गांधीजींचे (इतकेच काय अप्रत्यक्षपणे सोनीयाजींचे पण) नाव येते तेंव्हा सत्याग्रह चालतो. मग इथे काय करावे अशी अपेक्षा आहे?

नितिन थत्ते's picture

7 Aug 2010 - 8:46 am | नितिन थत्ते

जाहीर माफी.

"आधिकारिक धोरणा"नुसार टिळकांच्या मिशांची दुसर्‍या कोणाच्या मिशीशी तुलना केल्याने टिळकांची बदनामी होते असे आज कळले (केस लॉ). यापुढे असे होणार नाही.

अवांतर : मी अन्यत्र एका ठिकाणी सोनिया गांधींबाबत एका प्रतिसादावर आक्षेप घेतला होता. (जो मला आत्ता आठवत/सापडत नाही) त्याचा संदर्भ विकास यांच्या प्रतिसादात असावा असा अंदाज आहे. ज्यावर आक्षेप घेतला होता तेथे "पांढरे पाय" असा शब्दप्रयोग होता. तो त्यांच्या 'रंगा'मुळे होता असे म्हणून तो विशेष आक्षेपार्ह नव्हता असे म्हटले जाऊ शकते. पण "पांढरे पाय" या शब्दाचा मराठी भाषेत एक अतिशय हीन अर्थ होतो हे बहुतेक सर्वांना मान्य असेल.

विकास's picture

7 Aug 2010 - 9:01 am | विकास

केस लॉ हा आधिकारीक धोरणामुळे नसून तुमच्यामुळेच आहे. गांधीजींचे अथवा अहींसेचा नुसता प्रत्यक्ष विषय नसताना संदर्भ दिला तरी लगेच तुम्ही आक्षेप घेत आला आहात.

टिळकांच्या मिशांची दुसर्‍या कोणाच्या मिशीशी तुलना केल्याने टिळकांची बदनामी होते

उद्या कोणी बॉलीवूड मधला शेट्टी कोण असे विचारले आणि त्याच्या टकलावरून आठवण करून देताना अशिच काहिशी तुलना कोणी केली तर चालेल का? तेंव्हा आपले हे विधान पण खोडसाळपणाचेच वाटले. गांधीजींचे नाव घेत असे वागणे अधुनिक गांधीवादात बसत असावे. असो.

नितिन थत्ते's picture

7 Aug 2010 - 9:13 am | नितिन थत्ते

>>गांधीजींचे अथवा अहींसेचा नुसता प्रत्यक्ष विषय नसताना संदर्भ दिला तरी लगेच तुम्ही आक्षेप घेत आला आहात.

असे मी कधी केले असेल तर दाखवून द्यावे.

>>उद्या कोणी बॉलीवूड मधला शेट्टी कोण असे विचारले आणि त्याच्या टकलावरून आठवण करून देताना अशिच काहिशी तुलना कोणी केली तर चालेल का?

मला चालेल. बाकीच्यांचे माहिती नाही.

विकास's picture

7 Aug 2010 - 9:28 am | विकास

खोदून शोधावी लागेल आठवत नाही. पण कुठल्यातरी चालू असलेल्या चर्चेत मी अहींसा आणि गांधीवाद हे शब्द वापरले होते. तेंव्हा आपण तिथे आक्षेप घेतला होता. वेळेच्या फरकामुळे माझ्याकडून उत्तर देण्यास उशीर झाला. आत्ताच्या टिळकांच्या संदर्भासारखेच ते होते. त्या संदर्भात आपल्याला मी ५ मेला खालील खरड केली होती:

बुध, 12/05/2010 - 16:57

तुम्हाला आत्ताच कन्फर्म करायला खरड टाकणार होतो, तितक्यात प्रतिसाद पाहीला. जर काही गैरसमज झाला असेल तर गेला असेल असे समजतो.

धन्यवाद.

त्यावर आपली देखील खालील खरड आली:

नितिन थत्ते
बुध, 12/05/2010 - 16:46

संपादनाबद्दल धन्यवाद. Smile

असे अजूनही शोधल्यास मिळू शकेल. असो.

नितिन थत्ते's picture

7 Aug 2010 - 10:01 am | नितिन थत्ते

उद्धृत केलेल्या खरडी कशाविषयी आहेत ते आठवत नाही. पण तेथील वरचे खालचे संदर्भ पाहता त्या 'बुडीत खात्यां" विषयी असण्याची शक्यता आहे.

गांधींविषयी मी जे काय आक्षेप घेतो ते फक्त अहिंसा/स्वातंत्र्यलढा आणि मुस्लिमविषयक धोरण या अनुषंगाने लिहिल्या जाणार्‍या गोष्टींविषयीच घेतो. घरगुती सावरकर या धाग्यावर माझ्यामुळे झालेल्या मॅरॅथॉन चर्चेची सुरुवात गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यातील "गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर" या वाक्यामुळे झाली.

"दोन बाजूला स्त्रियांच्या खांद्यांवर हात टाकून चालणे" आणि "ब्रह्मचर्य" या विषयांवरून केलेल्या निंदेलाही मी कधी आक्षेप घेत नाही.

विकास's picture

7 Aug 2010 - 10:16 am | विकास

पण तेथील वरचे खालचे संदर्भ पाहता त्या 'बुडीत खात्यां" विषयी असण्याची शक्यता आहे.

शक्य आहे. त्या अथवा त्या वेळच्या धाग्यात मी गांधीजी/अहींसेचा संदर्भ देत काहीतरी लिहीले होते. त्यावर त्याचा काय संबंध म्हणत तुम्ही तेथेच आक्षेप घेतलात. त्यावर नंतर मी तुम्हाला (12 मे 2010 - 09:55 वाजता) व्य.नि. देखील केला होता. त्यावरच नंतर सकाळी तुमची वर दिलेली खरड आली.

अजूनही शोधता येईल. बोला विकांताला बिझी रहायचे आहे का? :-)

नितिन थत्ते's picture

7 Aug 2010 - 11:13 am | नितिन थत्ते

>>बोला विकांताला बिझी रहायचे आहे का?

नाही. मला तेवढा वेळ, उत्साह नाही आणि आवश्यकता ही नाही. मी कशाविषयी ठाम असतो ते मला चांगले ठाऊक आहे.

इन्सिडेंटली त्या काळातल्या एका व्यनित माझ्या (बुडित खात्याविषयीच्या) बिपिन कार्यकर्तेला केलेल्या खरडीविषयी आपला गैरसमज झाला होता आणि त्यावेळी तुम्ही माझ्या गांधीवादावरून मला छेडले असल्याचे स्मरते.

आमोद शिंदे's picture

7 Aug 2010 - 9:16 am | आमोद शिंदे

मिश्या हे शारिरीक व्यंग नाही. त्या ठेवायच्या की नाही, ठेवल्यास कशा ठेवाव्यात ह्याचे बहुतेक पुरुषांना स्वातंत्र्य असते. टकलाचे मात्र तसे नाही. बरेच पुरुष टकलाला व्यंग समजतात. हजारो रुपये खर्च करुन टक्कल घालवण्यासाठी प्रयत्न करतात त्यामूळे एखाद्याच्या टकलावरुन कमेंट करणे आक्षेपार्ह वाटू शकते.

तानाजीच्या मिशांवर सहा की सात लिंबे मावायची असे गौरवाने सांगितले जाते. कुणाच्या टकला विषयी तसे ऐकिवात नाही. एखाद्याच्या मिशा तानाजी सारख्या आहेत असे म्हणणे म्हणजे तानाजीचा अपमान नाही.

अर्थात थत्यांनी अहिंसे संदर्भात नेमका कशावर आक्षेप नोंदवला होता हे माहित नाही त्यामुळे त्यावर काही बोलू शकत नाही. पण टिळकांच्या सारख्या मिश्या आहेत असे म्हणणे म्हणजे टिळकांचा अपमान आहे हे फारच ओढून ताणून झाले.

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Aug 2010 - 9:22 am | llपुण्याचे पेशवेll

कुणाच्या टकला विषयी तसे ऐकिवात नाही
आमच्या एका मित्राला गमतीनी तुझ्या डोक्यावर आख्खा विमानतळ मावेल असे म्हणत असू.

आमोद शिंदे's picture

7 Aug 2010 - 9:24 am | आमोद शिंदे

इथे गमतीने हा शब्द महत्वाचा. गौरवाने नव्हे.

सुहास..'s picture

7 Aug 2010 - 9:33 am | सुहास..

आणी आमच्या एका रागीट आणी टक्कल पडलेल्या मित्राला गमतीने मात्र आम्ही ,त्याच्या घरी आमलेट करताना,तव्याचा वापर करायची गरज नसेल असे म्हणायचो..

विकास's picture

7 Aug 2010 - 9:23 am | विकास

आक्षेप कशावर आहे तर सर्वत्र समान न वागण्यावर. टिळकांच्या मिशांचा नको तिथे उगाच संदर्भ देण्यावर नाही.

आमोद शिंदे's picture

7 Aug 2010 - 9:28 am | आमोद शिंदे

'समान नाही' हे थत्त्यांचा आक्षेप काय होता हे समजल्या शिवाय कसे ठरवता येणार?

विकास's picture

7 Aug 2010 - 9:33 am | विकास

सर्व प्रथम, टिळकांचा अपमान झाला असे माझ्या मूळ प्रतिसादात मी म्हणलेले देखील नाही. तुम्ही कुठल्या संदर्भाने हे म्हणत आहात ते माहीत नाही. बाकी थत्यांना त्यांचा एक तात्काळ मिळू शकलेला संदर्भ दिला आहे. बाकी तुम्हाला काही ठरवायची विनंती केलेली नाही. माझी भुमिका पटली नाही तरी काही फरक पडत नाही. मी टिळकांना मानतो, तेंव्हा उगाच चूक नसताना माफी वगैरे काही मागणार नाहीच!

आमोद शिंदे's picture

7 Aug 2010 - 9:42 am | आमोद शिंदे

तुमचा आक्षेप दुटप्पी वागण्यावर आहे ते लक्षात आलं. पण थत्त्यांनी नेमके काय म्हंटले होते ते तुम्हाला आठवत नाही. असं असताना ते दुटप्पी वागले हे कसं ठरवायचं?

तुम्हाला कोण माफी सांगायला लावत आहे. काहीतरीच काय! उलट मी तर म्हणतोय योग्य माहिती अभावी थत्त्यांनाही माफी मागायला लागू नये.

असो. टिळकांचा अपमान झाला असे तुम्ही म्हंटले नसले, तरी थत्त्यांनी खोडसाळ विधान केले आहे असे तुम्ही म्हणालात. त्यांच्या मिशांचा उल्लेख तुम्हाला खोडसाळ का वाटतो?

विकास's picture

7 Aug 2010 - 9:44 am | विकास

तुमचा आक्षेप दुटप्पी वागण्यावर आहे ते लक्षात आलं.

धन्यवाद. मग उगाच टिळकांचा अपमान वगैरे अर्थ किमान माझ्या लिखाणातून आपण काढले नाहीत असे मी समजतो. तसे नसल्यास अवश्य सांगावे.

बाकी, थत्यांच्या लक्षात येईल इतका पुरेसा खरडीचा संदर्भ दिला आहेच. त्यांना पटतो का ते, तेच सांगू शकतील. त्यांचा सत्य बोलण्यावर विश्वास असल्याने एकवेळ ते गप्प बसतील, पण खोटे बोलतील असे अजिबात वाटत नाही.

बाकी सुरवातीस म्हणल्याप्रमाणे, तुम्हाला अथवा इतर कुणाला दुटप्पी कोण हे ठरवायची अजिबात विनंती केलेली नाही. काळजी नसावी. थत्यांना देखील माफी मागावी असे मी म्हणले नाही आणि त्यांनी देखील ती तेच म्हणतात त्याप्रमाणे "स्ट्रॅटेजिक तह" म्हणून त्यांना वाटली म्हणून मागितली आहे, स्वतःची चूक वगैरे मानून नाही.

आमोद शिंदे's picture

7 Aug 2010 - 9:49 am | आमोद शिंदे

टिळकांचा अपमान झाला असे तुम्ही म्हंटले नसले, तरी थत्त्यांनी खोडसाळ विधान केले आहे असे तुम्ही म्हणालात. त्यांच्या मिशांचा उल्लेख तुम्हाला खोडसाळ का वाटतो?

खरडीच्या संदर्भात नेमका मुद्दा काय होता ते आठवत नाही असे काहीसे तुम्ही लिहिले. अर्थात थत्त्यांना त्याचा क्लू लागून त्यांनी मान्य केल्यास विषयच संपला.

मी कुणालाही दुटप्पी ठरवत नाहीये. तुम्हाला असे का वाटले?

विकास's picture

7 Aug 2010 - 9:56 am | विकास

हा या संदर्भात अमोद शिंद्यांना शेवटचा प्रतिसाद आहे. कारण अपमान झाला हे सिद्ध करता आले नाही म्हणून अजून काही असा प्रकार कितीही वेळ चालत राहील. आणि हे मूळ लेखाला अतिअवांतर होत आहे, जे मला अयोग्य वाटत आहे. थत्यांचे म्हणणे आल्यावर नंतर हे सर्व प्रतिसाद सर्व संबंधितांच्या अनुमते उडवायचे ठरवले तर माझी हरकत नसेल.

तरी थत्त्यांनी खोडसाळ विधान केले आहे असे तुम्ही म्हणालात. त्यांच्या मिशांचा उल्लेख तुम्हाला खोडसाळ का वाटतो?

"त्यांच्या" म्हणजे टिळकांच्या म्हणायचे आहे असे मी गृहीत धरत आहे. मी मिशांवरून काहीच बोललेलो नाही. "टिळकांचे नाव आणायचे काय प्रयोजन?" इतकेच मी म्हणले आहे.

चर्चेचा विषय काय, तर, "नेमाडेंचे हिंदु एक समृद्ध अडगळ कोणी वाचले आहे का?". त्यावर आधी एकओळी धागा आणि त्यावरून संपादकांना चिमटे काढून झाले. नंतरच्या प्रतिसादात, "ते नाही का? टिळकांसारख्या उदाहरणार्थ मिशा आहेत त्यांच्या?" असे म्हणायचे. म्हणजे मूळ चर्चेला प्रतिसाद देणे राहीले लांब. असेच जर नाव गांधीजींचे, अहींसेचे आले तर त्यांना चालणार नाही. जे आपल्याला एका नेत्याविषयी चालत नाही ते इतर नेत्यांविषयी देखील करू नये इतकेच माझे म्हणणे आहे.

आमोद शिंदे's picture

7 Aug 2010 - 10:11 am | आमोद शिंदे

मूळातच एकोळी धागा फालतू आहे. तिथे थोडे अतिअवांतर झाल्यास काही हरकत नसावी. मला तर ही उपचर्चाच जास्त आवडली. हे माझे व्यक्तिगत मत.

तुमचा आक्षेप अवांतर प्रतिसादांवर असेल तर मूळात 'नेमाडे कोण?' ह्या खट्याळ प्रतिसादावर तुम्ही आधी आक्षेप घ्यायला हवा होतात. नेमाडे कोन हेच माहित नसेल तर त्यांच्या पुस्तकावरच्या धाग्यावर प्रतिसाद देण्याचे काय प्रयोजन?

राहता राहिला प्रश्न लोक नेत्यांचा. तर अश्या पब्ब्लिक फोरमवर कुठल्याच नेत्याची टवाळी होऊ नये असे माझे मत आहे. टिऴक असोत वा गांधीजी. पण म्हणून त्यांचे नावही उच्चारू नये असे वातावरण नसावे. थत्यांनी टिळकांची टवाळी केलेली नाही असे तुमचे मत दिसते. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद तुम्हाला त्या कारणाने खटकू नये.

शेवटचा मुद्दा म्हणजे थत्त्यांनी मागे असाच पोरकट आक्षेप घेतल्याचा. वादाकरता धरुन चालले की त्यांनी तसा आक्षेप घेतला होता. तर त्याचे तिथेच खंडन न करता त्यावर इथे तसाच आक्षेप घेऊन स्कोर सेटलिंग का चालले आहे?

परिकथेतील राजकुमार's picture

7 Aug 2010 - 10:46 am | परिकथेतील राजकुमार

तुमचा आक्षेप अवांतर प्रतिसादांवर असेल तर मूळात 'नेमाडे कोण?' ह्या खट्याळ प्रतिसादावर तुम्ही आधी आक्षेप घ्यायला हवा होतात.

ओ शिंदे काका ह्याला खट्याळ प्रतिसाद नाही तर ज्ञानजिज्ञासा असे म्हणतात.

आता नाही माहिती आम्हाला हे नेमाडे कोण ते, म्हणुन तसे विचारायचे नाही का ? आणि तसे नाही विचारले तर मग हे नेमाडे कोण ? उपजिवीकेसाठी काय करतात? त्यांच्या नावाने धागा निघण्यायेवढे ते का महत्वाचे आहेत ? ह्या आमच्या सगळ्या शंकांना उत्तरे कशी मिळणार ? आणि आमच्या ज्ञानात कशी भर पडणार ?

बर आता 'नेमाडे कोण?' हा प्रश्न नेमाडेंवरच्या धाग्यात नाही विचारायचा तर काय 'वाविप्र' मध्ये विचारायचा का ?

अवांतर :- माझ्या ज्ञानोपासनेच्या प्रयत्नांना 'खट्याळ प्रतिसाद' असे म्हणुन शिंदे सरकारांनी माझा जाहिर अपमान केलेला आहे, तरी त्यांनी मला जाहिर दारु पाजावी आणि पापक्षालन करावेअशी माझी मागणी आहे.

आमोद शिंदे's picture

7 Aug 2010 - 6:16 pm | आमोद शिंदे

मी तुमच्या प्रतिसादाला खट्याळ म्हंटले आहे खोडसाळ नाही ;)
मला खट्याळ प्रतिसाद फार आवडतात त्यामूळे तुम्हाला जाहीर दारू पाजायची तयारी आहे. (जायचं का थेउर ला? )

भारतीय's picture

8 Aug 2010 - 10:41 am | भारतीय

धागा काय.. विषय कुठे फरपटत चाललाय.. नेमाडे राहीले बाजूला अन ईथे टक्कल-मिशीचे द्वंद्व सुरू झालेय!!

आमोद शिंदे's picture

7 Aug 2010 - 9:19 am | आमोद शिंदे

>>जाहीर माफी.

समाज नावाच्या गुंतागुंतीच्या गोष्टीला बळी पडून माफी मागत असाल तर ते तुमच्या कडून अपेक्षीत नाही.

'मी शेंगदाणे खाल्ले नाहीत मी माफी मागणार नाही', हा बाणेदारपणा टिळकांकडूनच घेतला पाहिजे.

नितिन थत्ते's picture

7 Aug 2010 - 9:30 am | नितिन थत्ते

>>समाज नावाच्या गुंतागुंतीच्या गोष्टीला बळी पडून माफी मागत असाल तर ....

अहो, याला ष्ट्रॅटेजिक तह म्हणतात. ;) काय आहे , खाजगी संकेतस्थळ आहे. येथे लोकशाही असणे अपेक्षित नाही असे मला पटवून दिले गेले आहे. :) त्यामुळे "सिर सलामत* तो पगडी** पचास" असे धोरण सध्या मी ठेवले आहे.

*सिर सलामत या शब्दाचा अर्थ आंतरजालावर आयडी न गोठवला जाणे असा आहे.

**पगडी हा शब्द येथे लिहिण्यात पगडी घालणार्‍या कुठल्याही महान व्यक्तीचा उपमर्द करण्याचा हेतू नाही.

आनंदयात्री's picture

7 Aug 2010 - 10:51 am | आनंदयात्री

>>'मी शेंगदाणे खाल्ले नाहीत मी माफी मागणार नाही', हा बाणेदारपणा टिळकांकडूनच घेतला पाहिजे.

मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी माफी मागणार नाही.

ही सुधारणा करु इच्छितो, बाकी चालु द्या.

विकास's picture

7 Aug 2010 - 10:55 am | विकास

मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी माफी मागणार नाही.

मला या वरून आठवते त्याप्रमाणे "मी फोलफटे" उचलणार नाही असे ते म्हणाले होते.

विजुभाऊ's picture

13 Aug 2010 - 11:41 am | विजुभाऊ

शेंगां घेतल्या तर शेंगदाणे हीच एकमेव खायची वस्तु असते त्यात

अप्पा जोगळेकर's picture

7 Aug 2010 - 11:38 am | अप्पा जोगळेकर

अमुक एक बाई पांढर्‍या पायाची आहे असे म्हटले जाते हे ठाउक आहे. पण तो हीन अर्थ काय असतो ? व्यनि किंवा खरडवहीने कळवले तर चांगले होईल. 'टिळकांच्या मिशा' यावरुन जो वाद चालू आहे त्याबाबत श्री विकास यांच्याशी सहमत आहे.

आमोद शिंदे's picture

7 Aug 2010 - 6:22 pm | आमोद शिंदे

>>'टिळकांच्या मिशा' यावरुन जो वाद चालू आहे त्याबाबत श्री विकास यांच्याशी सहमत आहे.

म्हणजे तुम्हाला टिळकांचे नाव ह्या चर्चेत घेणे आक्षेपार्ह वाटते का? की त्यांच्या मिशांचा उल्लेख खटकतो? की अवांतर प्रतिसादावर रोख आहे? की थत्त्यांनी असे हलके फुलके प्रतिसाद देण्याचा नैतिक अधिकार घालवला आहे असे तुम्हाला वाटते?

विकास ह्यांची भुमिका ह्यापैकी एक (किंवा अधिक) आहे असा माझा त्यांच्या प्रतिसादातून समज झाला आहे.

आपण ह्यातल्या नक्की कशाशी सहमत आहात?

पाषाणभेद's picture

6 Aug 2010 - 9:54 pm | पाषाणभेद

नेमाडेंबद्दल आदर होता पण काहीतरी सनसनाटी लिहीणे यात त्यांचा हातखंडा आहे. हि कादंबरी लिहून त्यांनी तेच साधले आहे. "हिंदु- एक समृद्ध अडगळ' - हि कादंबरी फालतू अडचण" अशा अर्थाची एक कादंबरी लिहायला हवी. उगाचच इतिहासाची साधने न सांगता मनाने लिहीलेली कादंबरी आहे. "फिक्शनल " या कॅटेगीरीत मोडेल ती.
अवांतर: महाराष्ट्रातील हिंदूत्ववादी संघटनांनी अजूनपर्यंत एकही आक्षेप घेतला नाही हे पाहून आश्चर्य वाटले.

प्रदीप's picture

7 Aug 2010 - 8:53 am | प्रदीप

.....पण काहीतरी सनसनाटी लिहीणे यात त्यांचा हातखंडा आहे.

ह्या विधानास काही आधार असला(च) तर तो कृपया स्पष्ट करावा.

शिल्पा ब's picture

6 Aug 2010 - 10:11 pm | शिल्पा ब

नेमाडे काय लेन काय ... सगळाच आनंद

क्रेमर's picture

7 Aug 2010 - 1:54 am | क्रेमर

कादंबरी वाचलेली नाही पण वाचण्याचा मानस आहे.

चिंतामणी's picture

13 Aug 2010 - 8:32 am | चिंतामणी

किती वर्षात वाचण्याचा इरादा आहे???????????

आमोद शिंदे's picture

7 Aug 2010 - 10:21 am | आमोद शिंदे

>>म्हणजे मूळ चर्चेला प्रतिसाद देणे राहीले लांब.<<

खालीलपैकी कोणते प्रतिसाद मूळ चर्चेला आहेत सांगा.

>आपला सदस्य कालावधी १ वर्षे ३९ आठवडे असा दिसत आहे. आपण मिपाचे धोरण व काही नवीन धागे नक्कीच वाचलेले दिसत नाहीत.

>ओ ... दोन हजारात महिनाभर मस्तानी देणारे थोर्लेबजिराव ..मराठी लिहायच विसरलात की काय ??

>कोण नेमाडे ?
Visions Of The Future Are Better Than Dreams Of The Past.
अर्थात :- कालच्या हँगओव्हरचा विचार करण्यापेक्षा आज कुठे आणि कुठली प्यायची याचा विचार करावा.

>नेमाडे काय लेन काय ... सगळाच आनंद

पॅपिलॉन's picture

7 Aug 2010 - 11:22 am | पॅपिलॉन

नेमाडेंचे हिंदु एक समृद्ध अडगळ कोणी वाचले आहे का?

आम्ही नाही वाचले.पुढे?

अविनाशकुलकर्णी's picture

7 Aug 2010 - 12:03 pm | अविनाशकुलकर्णी

डराव डराव! डराव डराव!
का ओरडता उगाच राव?

पत्ता तुमचा नव्ह्ता काल
कोठुनी आला? सांगा नाव

बटबटीत डोळ्यांचे ध्यान
विचित्र तुमचे दिसते राव!
सांगा तुमच्या मनात काय?
जा गाठा जा अपुला गाव
आणि थांबवा डराव डराव!

हरकाम्या's picture

7 Aug 2010 - 10:30 pm | हरकाम्या

सध्या तरी कुठलेही नवीन पुस्तक वाचलेले नाही . त्यामुळे हा " नेमाडे " कोण बुवा ??

चिंतामणी's picture

13 Aug 2010 - 8:29 am | चिंतामणी

नक्की विषय काय आहे?

हिंदू या कादंबरीत त्या 'टिळकांच्या मिशा' 'टक्कल'
विषयी काही लिहीलेले आहे काय??????

चिंतामणी's picture

13 Aug 2010 - 8:30 am | चिंतामणी

नक्की विषय काय आहे?

हिंदू या कादंबरीत त्या 'टिळकांच्या मिशा' 'टक्कल'
विषयी काही लिहीलेले आहे काय??????