(बघ त्याची आठवण येते का?)

अडगळ's picture
अडगळ in जे न देखे रवी...
5 Aug 2010 - 8:36 am

चिरमुरे अन खोबरं ट्रॉलीत उभारून खा
बघ त्याची आठवण येते का?

हात लांबव , फळीखालून काढ उरलेली वर्गणी,
इवलासा पेग पिऊन टाक.
बघ त्याची आठवण येते का?

वार्‍यावर झुलणारे धुराचे ढग नाकात घे,
धूर पी , तल्लीन हो.
नाहीच आवडलं काही तर खाली उतर , राऊंडात ये,
ते चेकाळलेले असतीलच , पायात पाय तुडवत नाचत रहा.
मोरया ओरडेल कोणीतरी , बघ त्याची आठवण येते का?

मग चालू लाग , उरलेल्या नोटा मोजून घे,
पीत रहा नोटा संपेपर्यंत , त्या संपणार नाहीतच , शेवटी परत ये ,
वाटेत घसरु नकोस, ट्रॉली विसरु नकोस , पुन्हा त्याच ट्रॉलीत ये.
आता वरचा बोर्ड बघ , बघ त्याची आठवण येते का?

कानाखाली वाजेल , तोल सावर , पोलीस असेल,
ओशाळून कान धर , लाथ तो स्वतःच घालेल.
तो विचारेल तुला तुझ्या पिण्याचं कारण , तू म्हण घशात खाजतंय.
तो हात सोडेल , तू पाया पड.
कोणितरी उठुन 'ए गणपत' लावेल , ते तू बंद कर,
'चिकमोत्याची' लाव , बघ त्याची आठवण येते का?

मग रात्र होईल , सेक्रेटरी खुशीत येईल , म्हणेल मला बिर्याणी आवडते,
तू ही तसंच म्हण,
ट्रॉलीत घमघमाट होईल , ढेकरांचा गडगडाट होईल,
तो त्या फळीखाली झोपेल , वरच्या पाठ्मोर्‍या मूर्तीकडे बघ ,
बघ त्याची आठवण येते का?

यानंतर भकास डोळ्यांनी पावतीपुस्तक बघायला विसरू नको.
यानंतर उरलेली वर्गणी फक्त मोजायचा प्रयत्न कर.
यानंतर कानावर बिडी ठेव , झोपी जाण्याचा प्रयत्न कर.
येत्या गणपतीत एकदा तरी ,बघ त्याची आठवण येते का?

विडंबन

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

5 Aug 2010 - 8:51 am | आजानुकर्ण

श्री अडगळ
तुमची नव्या प्रकृतीची सगळीच विडंबने आवडली आहेत. येऊ द्या आणखी.

चतुरंग's picture

5 Aug 2010 - 8:56 am | चतुरंग

तुमच्या विडंबनांनी नवीन विषयांचं वारं ह्या बनात आणलंय!!
मस्त, मस्त, अजून येऊ देत!!!

(मंडळाचाकार्यकर्ता)चतुरंग

सविता's picture

5 Aug 2010 - 9:29 am | सविता

सुंदर...

स्पंदना's picture

5 Aug 2010 - 9:57 am | स्पंदना

__/\__

मनीषा's picture

5 Aug 2010 - 1:20 pm | मनीषा

विडंबन/ कविता सुरेख !

महाबळ's picture

5 Aug 2010 - 2:49 pm | महाबळ

गणपती बाप्पा मोरया ....
लई भारी .... मिरवणूक डोळ्यासमोर उभी राहिली.... जशिच्या तशी ....
----------------------------
गणपतीची वाट बघणारा,
महाबळ

निखिल देशपांडे's picture

5 Aug 2010 - 4:57 pm | निखिल देशपांडे

विडंबनाचा वेगळा विषय आवडला..
मस्तच जमलयं हे...

नावातकायआहे's picture

5 Aug 2010 - 7:28 pm | नावातकायआहे

>>कानाखाली वाजेल , तोल सावर , पोलीस असेल,
ओशाळून कान धर , लाथ तो स्वतःच घालेल.
तो विचारेल तुला तुझ्या पिण्याचं कारण , तू म्हण घशात खाजतंय.
तो हात सोडेल , तू पाया पड.

--/\--

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2010 - 7:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदम फ्रेश ... झक्कास विडंबन.

अडगळ's picture

5 Aug 2010 - 8:11 pm | अडगळ

स्वयंपाकघरातून वेळात वेळ काढून कविता वाचल्याबद्दल मंडळ आभारी आहे.

(खजिनदार, आबा कावतोय मित्र मंडळ) अडगळ

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2010 - 12:13 am | मिसळभोक्ता

आवडले !

केशवसुमार's picture

6 Aug 2010 - 12:27 am | केशवसुमार

विडंबन आणि हा आभाराचा प्रतिसाद दोन्ही आवडले..
चालू दे..
(वाचक)केशवसुमार

राजेश घासकडवी's picture

6 Aug 2010 - 2:42 am | राजेश घासकडवी

इतका वेगळा विषय मुळात निवडल्याबद्दल अभिनंदन. शिवाय काव्यही समर्थ झालेलं आहे. नुकतंच एका खरडवहीत

च्यामारी.. एक संपादक म्हणतो दारू नको, एक म्हणतो पाध्ये नको, एक म्हणतो जुना मालक नको,एक म्हणतो मनातले लिहिले..काही वाचक म्हणतात बाई,बाटली, बाप नको..मग लिहायचे काय?
कुणी त्या कवींना सांगा.. तुमच्या कवितेत.. प्रेम,दु:ख,वेदना,चंद्र,तारे,मन वगैरे नको म्हणून..

असं लिहिलेलं दिसलं. तुम्ही एकदम भन्नाट विषय निवडून त्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे...

सहज's picture

11 Aug 2010 - 6:48 am | सहज

अडगळसाहेब तुमच्या कल्पकतेला सलाम!

वेगळाच विषय निवडलाय, आणि जमलय ही खुप छान. :)

vikas kulkarni's picture

7 Aug 2010 - 11:08 am | vikas kulkarni

chan khup ch chan

jiklas tu bhava jikalas

पॅपिलॉन's picture

7 Aug 2010 - 11:25 am | पॅपिलॉन

कविता फस्स्क्लास!

सागरलहरी's picture

10 Aug 2010 - 11:58 pm | सागरलहरी

एकदम झक्कास

मुक्तसुनीत's picture

24 Aug 2010 - 12:08 am | मुक्तसुनीत

आताच वाचली. फारच आवडली ! :-)