जीवन म्हणजे मुशायरा

अजय जोशी's picture
अजय जोशी in जे न देखे रवी...
2 Aug 2010 - 8:27 pm

बोचता गुलाबी गजरा
फाटला मनाचा सदरा

खळाळतो नेहमी जिथे
असतो तेथे उथळ झरा

र्‍हदय ओतले शेरातुन
म्हणा बरा की म्हणा खरा

शेर बनावे र्‍हदय र्‍हदय
जीवन म्हणजे मुशायरा

आयुष्याचा असे 'उला'
नंतरचा 'सानी' मिसरा

औषध घेऊ प्रेमाचे
करू जरासा अहं बरा

करू काळजी का तुमची?
असे मरा की तसे मरा

जितका हसतो मी, तितका-
मनीं खोलवर असे चरा

दु:ख दिलेस मला; असु दे ..,
तुझाच मी; नाही उपरा

जरी आज ओळखते जग
अजून थोडा धीर धरा

- अजय जोशी, पुणे

गझल

प्रतिक्रिया

शुचि's picture

2 Aug 2010 - 8:56 pm | शुचि

मस्त!