मैत्री चिरायु होवो..a.k.a Long Live Friendship

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
1 Aug 2010 - 4:03 pm

मैत्री चिरायु होवो..Long Live Friendship.
येथील माझ्या सर्व मित्र मैत्रिंणींसाठी...
---------------------------------------
नको सम्राटपट मजला
नको इंद्रपद देवा..
मित्राचा हात सदा..
खांद्यावरती रहावा...

नको स्वर्गीय अमृत मजला
नको पंचपक्वान गोडधोड
मित्रासोबत खाता लागे
शिळी भाकर मजला गोड..

नको अफाट पैसा मजला..
नको गाडीबंगला काही...
मैत्रीची लाभो श्रीमंती सदैव मजला..
बाकी मागणे काही नाही..

नको मानमरातब मजला..
मिरवणुकीची गर्दी नको ती..
डोळे मिटता न्यावे मजला..
मित्रांनी वाजतगाजत खांद्यावरती...

Happy Friendhisp Day to All.!

---------योगेश जोशी.

कविता

प्रतिक्रिया

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

1 Aug 2010 - 4:12 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

..... आपणांस सुद्धा मैत्री दिनाच्या शुभेच्छा.....!
...... मित्र नावाची संपत्ती (कधी-कधी आपत्ती सुद्धा बरं का!) तुमच्या -आमच्यावर अशीच बरसत राहो....

"मैत्रीचा सुगंध असाच अंतरात सदेव रवळत राहो....... !!"

..... आपणांस सुद्धा मैत्री दिनाच्या शुभेच्छा.....!