झाझिकी..

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
31 Jul 2010 - 11:15 am

सध्या आमच्याकडे पारा ३५ अंशावर झेपावला आहे. युरोपातल्या मंडळींना कुठली इतक्या उच्च तपमानाची सवय? त्यात ह्या लोकांना घरात सिलिंगफॅन लावायला नकोत आणि ए सी ची आम्हाला गरज नाही म्हणतात.वर्षातून आठ दहा दिवस ३०/३२ अंश से.पर्यंत चढतं तपमान, उन्हाळ्यात २२/२५ अंश आणि एरवी तर सिंगल डिजिट किवा उणेच.. मग लागतात कशाला अशा गोष्टी? हा यांचा युक्तिवाद ३५/३७ अंश से. नी या उन्हाळ्यात अगदी हाणून पाडला आहे . मॉलमधली आइसक्रीम्स, दही पटापट संपायला लागले आहेत.
काल दुपारी त्सेंटा आजीकडे ह्याच गप्पा चालू होत्या. आजी म्हणाली ह्या हवेसाठी एकदम उत्तम रेसिपी म्हणजे ग्रीक झाझिकी ! आता हे काय प्रकर्ण आहे? हे विचारले तर म्हणाली चल, आपण आत्ताच करु यात सगळं साहित्य आहे घरात..
तर, ह्या साठी लागणारे पदार्थ -
१ काकडी, ७ते ८ लसूण पाकळ्या, एका पेराएवढं आलं, मीठ आणि घट्ट दही
झाझिकी बरोबर खायला व्हाइट ब्रेड!
हे पाहून अर्थातच प्रियालीच्या काकड्यांची आठवण झाली. (प्रियाली तुला अजून १ काकडी-रेसिपी )
करायला एकदम सोप्पे आणि खायला काय लागते म्हणून सांगू?
दही घट्ट नसेल तर थोडा वेळ फडक्यावर टाका. जर ग्रीक दही मिळाले तर फारच उत्तम ,ते एकदम घट्ट असते.
काकडीचे साल काढून घ्या आणि किसा. त्यात थोडे मीठ घालून ठेवा म्हणजे काकडीला पाणी सुटेल. हे पाणी काढून (पिऊन)टाका. काकडी पिळून पाणी जितके काढता येईल तितके चांगले.
लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरा. आले किसून घ्या. एवढे होईपर्यंत काकडीला परत पाणी सुटलेले दिसले तर ते परत पिळून काढून टाका.
काकडीच्या किसात किसलेले आले,बारीक चिरलेला लसूण घाला. दही घाला आणि मिक्स करा. चव घेऊन हवे असल्यास अजून थोडे मीठ घाला. (सैंधवही उत्तम लागते,हा आम्ही तिथल्यातिथे लावलेला शोध!)
झाले की तय्यार! व्हाइट ब्रेड बरोबर झक्कास लागते ही झाझिकी...
जोडीला ऑलिव्ह्ज,चीज आणि गोल्डस बेक असेल तर आणखीच छान...
संध्याकाळी लग्गेच आमचाही झाझिकी प्रयोग झालाच..

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

31 Jul 2010 - 11:33 am | प्रदीप

ची पाककृति दिलीत, धन्यवाद.

हे खरे तर पिटाबरोबर खावयास चांगले लागत असावे?

एक सूचना: परदेशातील नावांचे उल्लेख लेखात प्रथम आले की मराठी शब्दापुढे कंसात नाव रोमनमधून लिहावे.

स्वाती दिनेश's picture

31 Jul 2010 - 11:38 am | स्वाती दिनेश

प्रदीप,
तुमची सूचना चांगली आहे, परदेशी नाव देवनागरीत लिहिताना कधी कधी जरा गोंधळाचेच होते. आता हे झाझिकीच बघा ना.. स्पेलिंग zaziki पण उच्चारी झबल्यातला झ नाही.. त्सात्झिकी ला जवळपासचा उच्चार करतात ही मंडळी..
स्वाती

चित्रा's picture

31 Jul 2010 - 6:27 pm | चित्रा

असेच आमच्या जवळच्या मार्केटमध्ये मिळणार्‍या डब्यावर लिहीलेले असते.

स्वाती, पाककृती छान आहे. इथे त्यात "डिल" ही घालतात. आणि प्रदीप यांनी म्हटल्याप्रमाणे पिटा चिप्सबरोबर/पिटाबरोबर खातात.

स्वाती दिनेश's picture

31 Jul 2010 - 8:12 pm | स्वाती दिनेश

चित्रा,
त्सात्झिकी/झाझिकी च्या अनेक रेशिप्या आहेत. काही जण डिल घालतात तर काही जण ऑलिव्ह ऑइल, काहीजण आलं घालत नाहीत तर काही जण काकडी न किसता,सालं न काढता बारीक तुकडे करतात.
त्सेंटा आणि अकिम ग्रीस मधील क्रेटाबेटांवर दर वर्षी महिनाभर सुटी घालवायला गेली २५/२६ वर्षे जात असत. हल्लीच गेली २,३ वर्ष ते तिथे गेले नाहीयेत.. तिथे ते एका ग्रीक कुटुंबाने चालवलेल्या गेस्ट हाउस मध्ये राहत, तिथे त्सात्झिकी ह्या पध्दतीने केली जाते. तीच ही पाकृ...
स्वाती

चित्रा's picture

1 Aug 2010 - 12:49 am | चित्रा

घरगुती कोशिंबीर म्हणायची की मग ही.

मस्त. पाककृतीचा इतिहास माहिती असला की छान वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2010 - 3:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्रातै आणि स्वातीतै, डिल म्हणजे शेपू का?
(चित्रा आणि स्वाती ही दोन नावं एकापुढे एक कशी मस्त वाटतात ना! आकाशातपण दोन्ही तारे एकापुढे एक दिसतात.)

सोप्पी आहे पाकृ! एखाद दिवशी दुपारचं जेवण जास्त झालं तर रात्री नुस्तंच त्झाझिकी खायलाही माझी ना नाही.
(शॉर्टकटप्रेमी)

पण आता भारतातल्या दुकानांमधे घट्ट / ग्रीक दही कुठून मिळवायचं?
(आळशीपणाचा कहर) अदिती

लिखाळ's picture

31 Jul 2010 - 12:16 pm | लिखाळ

छान आहे :)
एकदा करुन पाहू .. ग्रीक पद्धतीची काकडीची कोशिंबीर !

केशवसुमार's picture

31 Jul 2010 - 3:47 pm | केशवसुमार

छान आहे
ग्रीक पद्धतीची काकडीची कोशिंबीर !
तुझ्या कडून वसुल करायच्या पदार्थांच्या यादीत अजून एक भर .. :D सप्टेंबर कधी येणार हा..
फोटोवरून टेबलाची रचना बदलेली दिसते :)

कधी ना कधी.....जाऊदे...

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jul 2010 - 12:33 pm | परिकथेतील राजकुमार

वाह चकण्याला उत्तम ;)

गणपा's picture

31 Jul 2010 - 3:31 pm | गणपा

एकदम सोप्पा प्रकार दिसतोय.
दह्या ऐवजी चक्का वापरला तर कस लागेल याचा विचार करतोय ?

स्वाती दिनेश's picture

31 Jul 2010 - 8:27 pm | स्वाती दिनेश

चक्का वापरायचा असेल तर लो फॅट चक्का घे. त्यात २,३ चमचे सोअर क्रिम मिसळ.
स्वाती

सहज's picture

31 Jul 2010 - 3:35 pm | सहज

छान!

अरुंधती's picture

31 Jul 2010 - 3:54 pm | अरुंधती

वेगळा आणि छान आहे हा ग्रीक कोशिंबिरीचा प्रकार! मी तो उच्चार करून पाहिला.... शीतली केल्यासारखे वाटले! ;-)
अशाच मस्त वेगवेगळ्या पाकृ देत जा, आणि त्यांचे उच्चारही! करायला, खायला आणि बोलायला तेवढीच गंमत!

चतुरंग's picture

31 Jul 2010 - 4:53 pm | चतुरंग

दुपारचा मस्त नाष्टा होईल!
(तसेही सध्या वजनाने असहकार पुकारल्याने लो कॅलरीजच खायचे आहे!)

प्रियाली's picture

31 Jul 2010 - 5:24 pm | प्रियाली

स्वाती,

मी कालच लहान लहान ब्रेड आणले. ऑलिव्ह ऑईल आणि स्पाईसेस बरोबर खायला. आता हे ही करून बघते.

धन्यवाद!!! :)

अरे वा!
वेगळीच पाकृ!
आपल्या कोशिंवीरीचा नवा अवतार दिसतोय.
आणि फोटू पाहून (इनो घेतला मगच ) छान वाटले.

बघतो करून . जमला तर नॉन आयटी बायकोचा सुगरण नॉन आयटी नवरा म्हणून मिरवायला मोकळा !!!!

स्वाती आता मीही करुन पाहते. बाजारात भरपुर काकड्या येतात आता.

प्रभो's picture

31 Jul 2010 - 10:02 pm | प्रभो

मस्त!!

पुष्करिणी's picture

31 Jul 2010 - 10:08 pm | पुष्करिणी

मला फार आवडते त्सात्झिकी, करतेच आता.

संजय अभ्यंकर's picture

31 Jul 2010 - 10:29 pm | संजय अभ्यंकर

चित्रातल्या ग्लासात काय आहे?

Keonig Ludwig Dunkel तर नाही?

स्वाती दिनेश's picture

2 Aug 2010 - 11:28 am | स्वाती दिनेश

जोडीला ऑलिव्ह्ज,चीज आणि गोल्डस बेक असेल तर आणखीच छान...
गोल्डस बेक आहे,
स्वाती

शाल्मली's picture

31 Jul 2010 - 11:45 pm | शाल्मली

एकदम सोप्पी दिसते आहे त्सात्झिकी!
आणि आत्ता ३०-३५ डिग्रीला तर एकदमच छान वाटत असेल.

त्सेंटा आजीलाही पाकृ आवडल्याचे सांग..!

ऋषिकेश's picture

1 Aug 2010 - 9:51 am | ऋषिकेश

अर्रे वा चक्क सोपी रेशिपी! लगेच करून बघतो
एरवी फोटो बघून नुसतीच लाळ (आणि इनो) गिळावी लागते.

दिपाली पाटिल's picture

2 Aug 2010 - 10:07 am | दिपाली पाटिल

मस्त दिसतंय झाझिकी... कुणी अचानक येणार असेल तेव्हा पटकन करता येण्यासारखी पाकृ आहे... ब्रेड नसल्यास गाजर, काकडीचे फिंगर्स, लेट्यूस, रंगीत ढब्बू मिरची आणि सेलरीसोबतही मस्त लागेल....

नंदन's picture

2 Aug 2010 - 3:12 pm | नंदन

इथल्या 'पिटा पिट'मध्ये हे नाव प्रथम ऐकलं होतं. पाकृ मस्तच.

स्वाती दिनेश's picture

2 Aug 2010 - 10:16 pm | स्वाती दिनेश

सर्व खवय्यांनो,
धन्यवाद!
वि.सू.- त्सात्झिकी खाताना एकदम गारेगार करुन खा, त्सेंटा आजी तर डिशासुध्दा फ्रिजमध्ये ठेवते गार करायला... स्टरलाइझच्या उलट,:)
स्वाती