नवनिर्माण सूचना.

सरपंच's picture
सरपंच in काथ्याकूट
25 Jul 2010 - 11:21 pm
गाभा: 

नमस्कार,

मिसळपाव नवीन स्वरूपात सादर करतांना आनंद होतो आहे. मुख्य तांत्रीक बदलानंतर आज मिपा नव्या दमाने पुढे जायला तयार आहे. आता सर्व सदस्यांना विनंती आहे की मिसळपावच्या ह्या नवीन रूपातील काही दोष आढळल्यास ते येथे या धाग्यावर लिहावेत. मिसळपावच्या स्वरूपाबद्दल केवळ येथेच चर्चा व्हावी ही विनंती.

जे आवडलं त्याचे कौतुक आणि जे राहून गेलंय त्याची आठवण आणि ते पुर्ण होई पर्यंत त्याचा पाठपुरावा. हे सर्व येथे व्हावं. आता मुख्य काम झाल्यामुळे अधिकाधीक नवीन सोई देण्याकडे कल असेल. तुमच्या सूचनांचे स्वागतच आहे.

- सरपंच

प्रतिक्रिया

निखिल देशपांडे's picture

25 Jul 2010 - 11:29 pm | निखिल देशपांडे

नीलकांतचे फार कौतुक वाटते.
स्वता:च्या श्वासघेण्याचा वेळ नसलेल्या वेळापत्रकातुन वेळ काढुन मिपा ड्रुपल ६ वर न्यायची कामगिरी पार पाडली.
त्याच सोबत मिसळपावच्या नवनिर्माणाचा हा टप्पा पार पडल्याबद्दल त्याचे अनेक आभार.

विनायक पाचलग's picture

26 Jul 2010 - 10:07 am | विनायक पाचलग

नवीन मिसळपाव खुप म्हणजे खुप आवडले ..
हे नवनिर्माण करणार्‍या नीलकांत व त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या सहभागी असणार्‍या नवनिर्माण समितीचे आभार मानावे तितके थोडेच आहेत ..
कौतुक याचे वाटते की नवनिर्माण करताना मिसळपाव ची जुनी वैशिष्ट्ये सुद्धा राखलेली आहेत..
काही बदल सुचवत आहे ,
१. मुखपृष्टावर जे ४-५ लेख आहेत ,त्याच्या खालीच ,अधिक अशी लिण्क देऊन ती वरती असलेल्या लिंक वर द्यावी ..ज्यायोगे सर्व लेख पाहता येतील ..
२.. साईडबार डावीकडे असल्यास उत्तम ,मात्र उजवीकडे असल्याने फारसा फरक पडत नाही असे वाटते .
३. स्वाक्षरी आणि तत्सम ठिकाणी लिखाणातले बदल करण्यासाठी असणारा बार नाही ,तो दिला जावा ..
४. वाटचाल मध्ये आपण लिहिलेले व प्रतीसाद दिलेले लेख दिसतात ,त्याचबरोबर फक्त आपण लिहिलेले लेखही दाखवता आले तर उत्तम .. यासाठी ट्रॅकर ही सोय आहे ,मात्र आपल्या खात्यातच ही सोय मिळाल्यास ते जास्त फायद्याचे होईल असे वाटते.
५. अजुन काही ठिकाणी इंग्लिश चा प्रभाव दिसतो जसे व्य नि ,प्रकाशित करणे इत्यादी ..
याशिवाय अनेक छोट्या ,मोठ्या सुविधा ,बदल समिती करेल असा विश्वास आहे , मात्र त्यात हे माझे चार आणे ..
मिसळपाव मध्ये सर्वार्थाने झालेले नवनिर्माण ( धोरणात्मक आणि सर्वच प्रकारे ) ही एक नवी सुरवात आहे असे वाटते आणि मिपाकर असल्याचा अभिमान वाटतो ..
पुन्हा एकदा शुभेच्छा व धन्यवाद
आपला
विनायक

विनायक पाचलग's picture

26 Jul 2010 - 10:10 am | विनायक पाचलग

आताच लक्षात आले की मी लिहिलेल्या लेखाचे संपादन करण्याची सुविधाच उपलब्द्ध नाही आहे ..
ही एक अत्यंत गरजेची सुविधा आहे वाटते .. याशिवाय प्रतिसाद मोठा झाल्यास त्यापुढे टाईप करताना तो सारखा हलतो .. ब्लिंक होतो ..

दिपाली पाटिल's picture

26 Jul 2010 - 10:24 am | दिपाली पाटिल

संपादन करण्याची सुविधा फक्त मलाच नहीये की कुणालाच नाहीये?? मला माझ्या लेखनातील चुका सुधारायचा काहीच चान्स नाहीये??????

संपादनाचा हक्क हवाच..

दिपाली :)

विजुभाऊ's picture

27 Jul 2010 - 1:05 pm | विजुभाऊ

नवे रुपडे छान आहे.
एकदम पॉष आहे. पण त्यातला पूर्वी होता तसा घरगुती टच हरवल्यासारखा वाटतोय. काही दिवसानी सवय होईल बहुतेक.
फॉन्ट फार बारीक आहे.थोडासा मोठा करावा
खरडवहीत गेल्यावर मेन्यूबार नाही. तेथे चित्र/लिन्क किंवा बोल्ड वगैरे करायची सोय नाहिय्ये

मस्त कलंदर's picture

26 Jul 2010 - 1:08 am | मस्त कलंदर

मस्त वाटतेय हे ही रूप... फक्त आपला मिसळीचा फोटूपण टाका...
आणि हो.. तो गो टू टॉपचा बाऊन्सिंग इफेक्ट तर एकदम शॉल्लेट!!!

मेघवेडा's picture

26 Jul 2010 - 3:00 am | मेघवेडा

कट टू कट ऐसेच बोल्ताय!

मस्त कलंदर's picture

28 Jul 2010 - 11:48 am | मस्त कलंदर

तेवढा पुस्तकविश्वाच्या फीडचा ब्लॉकही परत आणल्यास बरे होईल....

मी-सौरभ's picture

26 Jul 2010 - 1:16 am | मी-सौरभ

त्ये डाव - उजव का केलय??
अचानक उर्दु पुस्तक हात्तात घेत्ल्यागत वाटलं..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jul 2010 - 7:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवे रुप चांगले आहे. सर्व सुविधा पाहतोय. सध्या उजव्या बाजूला असलेल्या सर्व गोष्टी डाव्या बाजूला आणाव्यात असे वाटते. ब्लॉग वर आल्यासारखे वाटते. पुर्वीची काही रंगसंगती आणता येईल काय ?
तुर्तास इतकेच....!

सध्या उजव्या बाजूला असलेल्या सर्व गोष्टी डाव्या बाजूला आणाव्यात असे वाटते.
सहमत.

निलकांताच आणि ज्या इतर कुणी या कार्यास हातभार लावलाय त्यांना धन्यवाद.

१) जमल्यास ऊजवी कडचे दुवे परत डावीकडे द्यावेत
२) पुर्वदृश्या सोबतच प्रकाशित करणाचं बटन दिलत तर ते सोयीच होईल.
२) लेखकाला/प्रतिसाद कर्त्याला पुर्वीप्रमाणेच स्वसंपादनाचे हक्क असावेत.
३) मायलीज् असाव्यात.
४) मिसळीचा फोटु पायजेच हा ;)
५) आइ ई ६ आणि फाफॉ मध्ये दोन्ही बाजुस १.५ ते २ इंच जागा नुसतीच मोकळी दिसते आहे?
त्यातल्या उजव्या बाजुस 'बॅक टु टॉप' च बटन दिसतय.
६) Input format बाय डिफॉल्ट Full HTML ठेवता येईल काय?
७) Save चं प्रकाशीत करा.

बाकी अजुन नवीन रुपडं न्यहाळतोय.. जस जसं काही सुचेल तशी भर टाकुच.

--२) लेखकाला/प्रतिसाद कर्त्याला पुर्वीप्रमाणेच स्वसंपादनाचे हक्क असावेत.
मुद्दा क्रमांक २ बाद :)

सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ५० प्रतिसादांची मर्यादा वाढवली आहे.
धन्स. :)

चित्तरंजन भट's picture

26 Jul 2010 - 1:28 am | चित्तरंजन भट

मिपाला ड्रूपल ६ वर सुखरूप आणल्याबद्दल नीलकांत ह्यांचे अभिनंदन.

नवी थीम रेडचिली छान झाली आहे. थीमनिर्माते विनायक अनिवसे ह्यांचे विशेष अभिनंदन. फक्त 'मेनकंटेट'ची रुंदी वाढवून बघा. ७००-७०५ पिक्सल करून पहा आणि उजवीकडचा साइडबार २२० पिक्सल. मी फायरबगवर वरील बदल करून पाहिले. कंटेटसाठी अधिक जागा मिळेल. अधिक चांगले दिसत होते.

पुढच्या वाटचालीस शुभेच्छा !

इनोबा म्हणे's picture

26 Jul 2010 - 1:34 am | इनोबा म्हणे

चित्तरंजन, तुमच्या सुचनेबद्दल आभारी आहे.
याबाबतीत दुपारीच नील आणि आनंदयात्री यांनी सुचवले होते. काही गोष्टी प्रायोगीक आहेत. फिडबॅकनुसार बदल केले जाऊ शकतील.

आता खोदकाम शक्य होणार आहे की नाही ? :?
कारण अधिक बटण दिसत नाही :(

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 1:50 am | क्रेमर

शुचितै, वर नवे लेखनवर टिचकी मारल्यास जुने धागे तसेच प्रतिसाद पाहता येतात.

हो हो जस्ट पाहीलं. मला नं सगळ्या चिंबोर्‍यांच्या पाकृंचे फोटो पहायचे होते. :P .... माझी कृती घातलीये ना काल म्हणून. धन्यवाद माहीतीबद्दल.

हजर सभासद बटण दाबल्यास -
Fatal error: Call to undefined function db_num_rows() in /home/misavcom/public_html/includes/common.inc(1699) : eval()'d code on line 11

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 2:11 am | क्रेमर

असेच म्हणतो.

निखिल देशपांडे's picture

27 Jul 2010 - 11:01 pm | निखिल देशपांडे

हजर सभासद पान पुर्ववत सुरु करण्यात आलेले आहे.

http://www.misalpav.com/node/13393

ढण्यवाद!

निख्या, आता माझे लेखन आणी खवमधे टेक्स्ट टूलबार चालू कर रे..

चिन्मना's picture

26 Jul 2010 - 1:37 am | चिन्मना

सकाळी सकाळी मिसळपाव उघडायला गेलो तर विश्रांती अवस्थेत असल्याचा मेसेज होता. विश्रांतीची वेळही बरीच होती. तेव्हाच वाटले काही मोठे बदल होतायत का काय? आत्ता पुन्हा प्रयत्न केला तर हे रुपडे डोळ्यांसमोर आले.

बदलाचे स्वागत. मात्र मकशी सहमत - मिसळपाववर मिसळीचा फोटो पाहिजेच! त्याशिवाय चुकचुकल्यासारखे होईल.. आमच्या आवडत्या ग्यानबा-तुकारामांना ठेवल्याबद्दल अनेकविध धन्यवाद!

बाकी काही कमी-जास्तीची प्रतिक्रिया नंतर. एकच अत्यंत महत्वाची गोष्ट - स्मायली कुठे आहेत? का मलाच दिसत नाहियेत? अनेक जण स्मायलींशिवाय लिहूच शकणार नाहीत.

चिन्मना

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 1:47 am | क्रेमर

वा! बदललेले मिपा पाहून सुखावलो. आता सर्व सुविधा वापरून पाहतो.

ऋषिकेश's picture

26 Jul 2010 - 1:53 am | ऋषिकेश

नव्या रुपड्याबद्दल अभिनंदन.
जरा फेरफटका मारून काहि दिसेल तसं पुढे तर कळवत आहे..

१. माझे लेखनवर वर क्लिकवल्यास एरर येतो आहे
२. फुटबॉल विश्वचषक हा विभाग कुठे गेला?

मस्त कलंदर's picture

26 Jul 2010 - 1:57 am | मस्त कलंदर

इथे बघ....
http://www.misalpav.com/mytrack

मला इथे काहीच एरर नाही दिसली...

मी याच पानावर माझे लेखन टॅब येतो ना त्याबद्दल म्हणतोय.
असो..

वाचनखुण कशी साठवायची?

पुष्करिणी's picture

26 Jul 2010 - 1:52 am | पुष्करिणी

मिपाचा नवा साज आवडला, सगळ्या सुविधा वापरून पहाते आता.

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 1:53 am | क्रेमर

दुवा दिल्यानंतर ज्या शब्दांखाली दुवा दिला आहे ते पुर्वीप्रमाणे सहजपणे ओळखता येत नाहीयेत. त्यांचा रंग थोडासा वेगळा करता येईल का?

नविन बदलाचे स्वागत. रुप चांगले आहे. वरती चित्त यांनी सांगितल्याप्रमाने साईडबार लहान केल्यास चालेल. पोस्ट्/कंटेट चा भाग वाढवलेला वाचावयास बरा ठरेल.

नवे लेखन वर टिचकी मारल्यावर जर त्यात नविन धाग्यांची वर्गवारी वेगवेगळ्या पद्धतीने करता आली तर उत्तम होईल (उपक्रमाप्रमाणे). (पुर्वी प्रमाणे नविन प्रतिसाद आल्यावर जर धागा वर येणार असेल, तर इतर वर्गवारीची आवश्यकता नाही. पण नविन प्रतिसाद अशी लिंक मिळाली तर नविन प्रतिसाद शोधण्यात थोडी सोय होईल. )

इतर सुचना जश्या सुचतील तश्या देण्याचा प्रयत्न करेन. शुभेच्छा आणि आभार.

मेघवेडा's picture

26 Jul 2010 - 3:03 am | मेघवेडा

>> पण नविन प्रतिसाद अशी लिंक मिळाली तर नविन प्रतिसाद शोधण्यात थोडी सोय होईल.

हेच म्हणतो.. नवीन प्रतिसाद शोधावे लागताहेत स्क्रोल करून करून! :(

चिन्मना's picture

26 Jul 2010 - 2:04 am | चिन्मना

एखाद्या असलेल्या धाग्यावरील फक्त नवीन प्रतिसाद कसे वाचायचे? अनुक्रमणिकेत पूर्वी 'क्ष' प्रतिसाद 'य' नवीन असे दिसत असे. आता असे काही दिसत नाही. धागा उघडल्यावर नवीन प्रतिसादावर नवीन असे दिसते. पण ते अनुक्रमणिकेतही हवे.

दुरुस्ती: "नवे लेखन" टॅबवर क्लीक केल्यावर प्रतिसादांखाली किती नवीन ते दिसत आहे. पण "चर्चा" वर क्लीक केल्यास तसे दिसत नाही. हे जाणून-बुजुन केले आहे का?

क्लिंटन's picture

26 Jul 2010 - 2:17 am | क्लिंटन

नवे रूप आवडले हे वेगळे सांगायला नकोच.तरीही पहिल्या पानावर ५-६ लेटेस्ट चर्चा दिसत आहेत. त्यापूर्वीच्या चर्चा कशा बघाव्यात?

क्लिंटन

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 2:19 am | क्रेमर

@क्लिंटन
वर असलेल्या चर्चा वर टिचकी मारा

मीनल's picture

26 Jul 2010 - 2:37 am | मीनल

प्रतिसाद टाईप करून झाल्यावर सेव्ह आहे. त्याऐवजी सबमिट अधिक योग्य होइल.

लिखाळ's picture

26 Jul 2010 - 2:49 am | लिखाळ

वा!
नवे रुप छान वाटत आहे. हळूहळू कमी जास्त काय ते कळेलच.
प्रतिसादाच्या वर Submitted by तसेच 26/07/2010 - 02:37 या प्रकारचा मजकूर बरा वाटला नाही.

अभिनंदन!

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 2:58 am | क्रेमर

पन्नासच्यावर प्रतिसाद जाऊनही पहिलेच पान सुरू आहे, असे काही जुन्या चर्चा चाळल्यावर आढळले. हा बदल अतिशय कौतुकास्पद आहे.

मी प्रयत्न केला तेंव्हा 'एडिट मोड' मध्ये दिसणारे 'insert/edit link' वगैरे आयकॉन्स दिसत नाहीत. बिघडत नाहीच, दुवा 'paste' करता येईलच, फक्त पूर्वीची सोय दिसली नाही म्हणून विचारतोय इतकंच.

मुक्तसुनीत's picture

26 Jul 2010 - 3:13 am | मुक्तसुनीत

नवे रूप आवडले. डाव्या-उजव्यात थोडा घोळ होतोय पण सवय होईलच.
- स्मायलीज दिसत नाहीत. (मला नसल्या तरी चालतील पण एक निरीक्षण)
- काही ठिकाणी बटणे इंग्रजीत. उदा. "Save" .
- "पुर्वदृश्य" नव्हे तर "पूर्वदृष्य"
- दर वेळी पूर्वदृष्य हवेच का ?
अभिनंदन व शुभेच्छा.

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 5:28 am | क्रेमर

- दर वेळी पूर्वदृष्य हवेच का ?

राहू द्या. माझ्यासारखे पादचारी लोक प्रतिसाद प्रसिद्ध केल्यानंतरही संपादन करण्याचा प्रयत्न करतात. आमच्यासाठी ही सुविधा असू द्या. पूर्वदृष्य आणि प्रसिद्ध करा/पाठवा/साठवा हे एकाचवेळी असण्याची व्यवस्था करता आली तर अतिउत्तम.

प्रतिसाद देताना प्रथम फक्त पुर्वदृष्य पर्याय आहे. नेहमीच (अ)शुद्ध लिहणार्‍यांना पुर्वदृष्य करावे लाग नाही ;) दोन्ही पर्याय सुरुवातीपासुन दिलेत तर लै बेस होईल.

-नेहमीचाच

प्रभो's picture

26 Jul 2010 - 3:47 am | प्रभो

झकास...

निलकांता, आता खेळ विभागाचं बघ रे...

बबलु's picture

26 Jul 2010 - 3:58 am | बबलु

मिपाचे नविन रूप आवडले.

-- फाँट जरा आडवा दिसतोय (compared to earlier look). कदाचित माझ्या लॅपटॉप सेटिंगममध्ये बदल करावा लागेल.
-- वर मुक्तसुनीत यांनी म्हटल्याप्रमाणे पूर्वदृष्यची step वगळता येइल का ?
-- स्माइलींविना करमेना.

बाकी मस्तच. एका शब्दात सांगायचे तर "Sophisticated" झालाय Look.

अभिनंदन !!!!

...बबलु

राजेश घासकडवी's picture

26 Jul 2010 - 4:16 am | राजेश घासकडवी

वेळात वेळ काढून हा अपग्रेड केल्याबद्दल व्यवस्थापनाचे धन्यवाद.

दिसायला छान आहे...उघडल्याबरोबर एकदम फ्रेश वाटलं. रंगसंगती सुंदर आहे.
त्यापलिकडे नोंदलेल्या चांगल्या गोष्टी
- थोडं खाली गेलं की उजव्या बाजूला बॅक टू टॉपची खूण आहे. ती उपयुक्त आहे.
- पन्नासपेक्षा अधिक प्रतिसाद एकाच पानावर. वा.
- नवे लेखनशेजारीच माझे लेखन टॅब आहे.

काही खटकलेल्या गोष्टी (त्यातल्या काही इतरांनीही सांगितल्या आहेत व प्रायोगिक आहे हे माहीत आहे)
- पहिल्या पानावर खूप जागा मोकळी आहे. आधी एका पानावर प्रत्येक विभागातले नवीन पाच व नवे लेखन एकत्र दिसायचं.
- नवे लेखनमध्ये देखील खूप स्क्रोल करावं लागतं. विभाग, तारीख या कॉलमना जास्त रुंदी दिली तर ते एकाच ओळीत मावतील...
- उजवीकडचा भाषा बदला, मिसळपाववर स्वागत वगैरेचा कॉलम खूपच रुंद झालेला आहे. तो कमी करून लिखाणाचा भाग वाढवला तर उत्तम.

मला माझे लेखन टयाब दिसत नाही तो..

शिल्पा ब's picture

26 Jul 2010 - 4:27 am | शिल्पा ब

मस्त...आवडलं हे रुप..पण स्मायली कुठे गेल्या?

प्रियाली's picture

26 Jul 2010 - 4:28 am | प्रियाली

नवे रूप आवडले. सध्या वापरण्याचा सराव सुरु आहे.

सर्वांचे अभिनंदन!

प्रतिसाद पाठवताना सेव्ह च्या ऐवजी पाठवा असे टाकता येईल.

ही तात्पुरती technical glitch असेल अशी आशा आहे, कृपया ही सुविधा चालू ठेवा.

(प्रतिसादांनंतरची संपादन सुविधा काढून घेणं एकवेळ समजू शकतो, पण दीर्घ लेख लिहिल्यानंतर प्रसिद्ध करतांना सर्वच वाक्यं पूर्णपणे तपासणं कधी कधी शक्य होत नाही [माझ्या स्वतःच्या 'कव्वाली'वरच्या लेखात अशा काही चुका राहिल्याचं माझ्या लक्षात आलं], अशा वेळी राहून गेलेल्या शुद्धलेखनाच्या चुका दुरूस्त करण्याचा आधिकार लेखकाला असायलाच हवा असं आग्रही मत आहे. आणि याच कारणासाठी 'पूर्वदृष्य' ही सुविधाही चालू ठेवायला हवी; अन्यथा घाईमुळे चुकून typographic error होण्याने राहिलेल्या काही चुका विनाकारण गैरसमज निर्माण करू शकतील, आणि ते निस्तरण्यात [धागालेखकांचा आणि संपादकांचाही!] कितीतरी पटीने आधिक वेळ वाया जाईल असं वाटतं.)

सहज's picture

26 Jul 2010 - 5:32 am | सहज

बरेचदा साध्या चुका दुरुस्त करण्याकरता संपादकांना त्रास द्यायला नको.त्यामुळे पूर्वदृष्य हवे व संपादन देखील. बर्‍याच धागालेखकांचे हेच मत असेल असे वाटते.

प्रियाली's picture

26 Jul 2010 - 6:26 am | प्रियाली

प्रकाशनानंतर संपादन करता येऊ नये. महत्त्वाच्या बाबींसाठी (जसे चित्रे न दिसणे, फॉर्मँटिंग वगैरे) संपादक मदत करू शकतात. सबमिट बटणावर क्लिक करायची घाई केली नाही तर वरीलपैकी बर्‍याच समस्या सुटतील.साध्यासुध्या सुधारणा प्रतिसादातून देता येतील.मिसळपावावर शुद्धलेखनाची सक्ती नाही हे आपल्याला माहित असेलच तेव्हा साधारण चुका राहील्याच तर फारसे बिघडणार नाही. ढळढळीत चुकांसाठी संपादक मोकळे असल्यास मदत करतील.

काही सदस्य सातत्याने लेख टाकून त्याला अपेक्षित प्रतिसाद आले नाहीत तर लेख काढून टाकताना दिसले आहेत. त्यासाठी स्वसंपादनाची सोय काढणे आवश्यक होते.

ही सोय काढलेली असल्यास धन्यवाद!

सहज's picture

26 Jul 2010 - 6:51 am | सहज

>काही सदस्य सातत्याने लेख टाकून त्याला अपेक्षित प्रतिसाद आले नाहीत तर लेख काढून टाकताना दिसले आहेत. त्यासाठी स्वसंपादनाची सोय काढणे आवश्यक होते.

पण अश्या किती केसेस आहेत? जास्त नसाव्यात. उपरती होउन धागा काढला तर तेही बरेच आहे की :-) अश्या केसेस मधे संपादक मंडळाने स्वतंत्र उपाय काढावा.

त्याकरता बर्‍याच धागालेखकांची गैरसोय कशाला? असे मला तरी वाटते.

बाकी इन्पुट फॉर्मेट, बाय डिफॉल्ट फुल एचटीएमएल केला तर उत्तम!

विंजिनेर's picture

26 Jul 2010 - 6:58 am | विंजिनेर

मिपाच्या नवीन रूपाची सवय होते आहे. आवडलंय तर नक्कीच.

काही सदस्य सातत्याने लेख टाकून त्याला अपेक्षित प्रतिसाद आले नाहीत तर लेख काढून टाकताना दिसले आहेत. त्यासाठी स्वसंपादनाची सोय काढणे आवश्यक होते.

आता वर म्हटल्याप्रमाणे स्वसंपादनाची सुविधा काढली असल्यास ती परत चालू करावी ही आग्रहाची विनंती.
माझा आग्रह किरकोळ मुद्रित शोधनापलिकडे (नंदन, शब्द बरोबर आहे ना? ;-) ) आहे. - स्वसंपादनाची सुविधा नसणे हा लेखकाच्या मुलभूत ह्क्काची कोंडी करणारी बाब आहे.
कुठल्याही लेखाचे हक्क ते मिपावर प्रसिद्ध झाले असले तरी लेखकाच्याच स्वाधीन असतात. तेव्हा लेखन काढायचे किंवा प्रसिद्ध करायचे हे लेखकावर सोडणे उत्तम. केवळ संपादकांना वाटते म्हणून (लेखकाच्या इच्छेविरूद्ध) तो लेख मिपावर रहावे हे पटत नाही(लक्षात घ्या माझा मुद्दा लेखन प्रकाशित करण्याबद्दल आहे - ते "अप्रकाशित" करण्याबद्दल नव्हे. अप्रकाशनाचे हक्क आणि नियम मिपाच्या आधिकारिक धोरणात मांडलेले आहेत ते - मिपाच्या स्वास्थ्याचा विचार करता - मान्यच आहेत.). राहता राहिली बाब "काही सदस्यांची". मिसळपावच्या १०,०००वर सदस्य संख्या असलेल्या स्थळावर असे सद्स्य किती? त्यांचे लेखन मिपावर अढळ राहवे ही "काळजी" संपादकांना कशाला?
कृपया विचार व्हावा..

+१.

स्वसंपादनाची सोय असावी. अनेक चुका दुरुस्त करता येतात.

(संपादकांना त्रास होतो याची कल्पना आहे, त्याकरता सदस्याने उडवलेले लेखन संपादकांना काही काळ दिसेल अशी सोय केली तर उत्तम!)

राजेश घासकडवी's picture

26 Jul 2010 - 9:07 am | राजेश घासकडवी

स्वसंपादनाची सोय हवी.

-कितीतरी वेळा लेखमाला लिहिताना सर्व लेखांत मालिकेतल्या सर्व पुष्पांचे दुवे देणं सोयीचं ठरतं. हे दरवेळी संपादकांना सांगत राहावं काय? संपादक आपल्या जबाबदाऱ्या संभाळून संपादन सांभाळतात, तेव्हा त्यांच्यावरचा बोजा का वाढवावा?

-काही क्षुल्लक चुका होतात व त्यांवरून चर्चा भरकटण्याची शक्यता असते. अशा चुका वेळीच दुरुस्त करता आल्या तर बरं नाही का?

-काही मोठ्या चुका होतात, व त्या सुधारण्यासाठी लेख पुन: लिहिण्याशिवाय जवळपास पर्याय नसतो. इतर संस्थळांवरची गेल्या महिन्यातली किमान दोन उदाहरणं मला माहीत आहेत. अशा वेळी 'प्रिय संपादक, कृपया या परिच्छेदातल्या या ओळींऐवजी या ओळी घाला, व इकडे हा शब्द बदला' असं लिहिण्यापेक्षा संपादून टाकणं सोयीचं पडतं.

-काही वेळा आपला हा विशिष्ट लेख/कविता वाचकांना/संपादकांना आवडणार नाही किंवा तो चांगल्या अभिरुचीचा नाही अशी खात्री वाटते. काही प्रतिक्रियांनंतर तो अंदाज येतो.

-काही कवितांत वृत्ताच्या दृष्टीने वगैरे सुधारणा सुचवल्या जातात. त्या केल्या तर पुढच्या वाचकांचा अनुभव अधिक चांगला होतो.

हे इतके फायदे असताना, संभाव्य तोट्यांचा व्यर्थ बागुलबोवा होऊ नये असं वाटतं. अशा तोट्यांची ठोस उदाहरणं असतील तर गोष्ट वेगळी. त्यावरही उपाय म्हणून जर व्यवस्थापनाने आपल्या धोरणात स्वयंसंपादनाविषयी काही मार्गदर्शक तत्त्वं सांगितली तर तोटे कमी व्हायला मदतही होऊ शकेल. मार्गदर्शक तत्त्वांचा विषय निघालाच म्हणून - एकंदरीतच लेखनाविषयी, प्रतिसाद लेखनाविषयी मार्गदर्शक तत्त्वं आली तर बरं.
राजेश

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 9:15 am | क्रेमर

सहमत आहे.

इतर संस्थळांवरची गेल्या महिन्यातली किमान दोन उदाहरणं मला माहीत आहेत.

त्या संकेतस्थळापेक्षा कमीतकमी दहापट अधिक लेखन मिपावर होत असते. यावरून संपादकांवर पडणारा ताण ध्यानी यावा.

स्वसंपादनाची सुविधा असायलाच हवी मात्र लेखकास धागा उडवण्याचे स्वातंत्र्य असू नये. लेखकाला लेखन नको असल्यास मजकूर काढून टाकता यायला हवा मात्र धाग्यावर आलेल्या प्रतिसादांना उडवता येऊ नये.

नितिन थत्ते's picture

26 Jul 2010 - 9:20 am | नितिन थत्ते

काय फरक आहे दोन्हीत? लेखकाने साराच मजकूर कापला तर लेख उडवल्यासारखेच होईल.

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 9:27 am | क्रेमर

सध्या (म्हणजे मिपाच्या पूर्वरूपातील सर्व सुविधा आत्ताहे आहेत असे गृहीत धरून) लेखकाला दोन सुविधा आहेत. मजकुर संपादीत करता येणे, धागा पूर्णपणे काढून टाकता येणे.

मजकुर काढून टाकल्यास प्रतिसाद तसेच राहतील, मूळ लेख मात्र दिसणार नाही. यामुळे प्रतिसादकांचे त्यांच्या लेखनाबाबतचे स्वातंत्र्य तसेच राहते.

धागा काढून टाकल्यास प्रतिसादही अप्राअशित होतात. काही प्रतिसाद अभ्यासपूर्ण, वाचनीय असतात तेही काढून टाकले जातात. प्रतिसाद अभ्यासपूर्ण नसले तरीही प्रतिसादकांचे त्यांच्या लेखनावरचे स्वातंत्र्य हरवायला नको.

अवांतर: झोपायला जाण्यापुर्वी हा प्रतिसाद देण्यासाठी पुन्हा प्रवेश करावा लागला. उद्या सरपंचांनी हा धागा उडवला तर माझी मेहनत वाया जाईल ना.

आधी स्वाक्षरीतला मजकूरही पूर्वदृष्यात दिसत असे. आता तसा दिसत नाही. स्वाक्षरीतला मजकूर काही गंभीर धाग्यांवर अयोग्य व अनुचित वाटल्यास आधी काढून टाकता येत असे. तसे करणे आता जमत नाही.

१) मिसळीचा फोटो नाहीये :(
२)ओव्हरॉल लूक बदललाय. पूर्वी एका वेबसाइटवर आहोत असे वाटायचे तर आता एखाद्याच्या ब्लॉगवर आल्यासारख वाटतय..भलतच अरुंद :(
३) नवे लेखन मुखप्रुष्ठावर नाहीये.
४) प्रसिद्ध करा / publlish या ऐवजी save button का आहे ?
बाकी तांत्रिक गोष्टी अजून पाहिल्या नाहीत..

स्पंदना's picture

26 Jul 2010 - 10:42 am | स्पंदना

पुर्वीच रुप हे भारदस्त वाटत होत जिथे अप्पा जोगळेकर वगैरे लोक मांड्या घालुन एकदा चर्चेला बसले कि नुसत पहात रहाव्...ग्यानबा तुकाराम ही आपण जिथुन वाचायला सुरु करतो तिथे ..डाव्या बाजुला असायचे..म्हणजे आरम्भी त्यांच दर्शन्. हे नव रुप उभट वाटते , पॉश आहे, पण भारदस्त पणा गेल्या सारखा वाटला. उण्या अधिक शब्दांसाठी क्षमस्व.

सन्जोप राव's picture

26 Jul 2010 - 5:52 am | सन्जोप राव

मिसळपावचे हे नवे रुप खूप आवडले

नीलकांत आणि सर्व नवनिर्माण कार्यकर्त्यांचे अभिनंदन! :)

आवडलेल्या गोष्टी -
१ - 'मिसळपाव' हा हेडिंगचा फाँट्साईज एकदम योग्य वाटतोय.
२ - फाँट सुरेख आहे एकदम नेटका आणि प्रोफेशनल वाटतो आहे.
३ - बाऊंस टु टॉप एकदम आवडेश! ;)
४ - ५० पेक्षा जास्त प्रतिसाद एकाच पानावर हुश्श! संपादकांची मोठी सोय बघितल्याबद्दल धन्यवाद कांता! ;)

आता काही सूचना -
१ - मिसळीचा फोटू वरती हवा म्हणजे हव्वाच. ती आपली आयडेंटिटी आहे राव, नसून कसे चालेल?
२ - वरती अनेकांनी म्हटल्याप्रमाणे कंटेंट्च्या पानाची रुंदी वाढवावी.
३ - उजवीकडच्या कॉलममधल्या क्रमवारीबद्दल थोडे - सर्वात वरती ज्ञानोबा आणि तुकारामाची तसबीर आणि स्वागत, त्याखाली मिपाचे धोरण,त्याखाली भाषा बदला, त्याखाली समृद्ध व्हावे असे काही असा क्रम अस्सला तर अधिक आवडेल.
४ - लिखाणाच्या खिडकीखाली Input format हे 'इनपुट फॉर्मॅट' असं आवडेल (तसेच इतरही ठिकाणच्या मेन्यू बाबत जिथे जिथे सुघट पर्यायी शब्द अस्तित्त्वात असतील तिथे मराठीच वापरा जिथे नसतील तिथे देवनागरीतूनच लिहा.
५ - लिखाण Save करा च्या ऐवजी प्रकाशित करा हा शब्द छान वाटतो. तसा बदल व्हावा.

गायब झालेले काही -
१ - माझे लेखन हा टॅब मला दिसत नाहीये! :( असे सगळ्यांनाच दिसते आहे की काही जणांनाच दिसते आहे?
२ - हजर सभासद वर टिचकले तर फॅटल एरर येते आहे :(

सध्या एवढेच. आणखीन वापरेन तसे कळवीनच.

नितिन थत्ते's picture

26 Jul 2010 - 9:10 am | नितिन थत्ते

माझे लेखन हा दुवा आधीच गायब झाला होता. :(

संदीप चित्रे's picture

26 Jul 2010 - 11:27 pm | संदीप चित्रे

हा दुवा आधीच गायब झाला होता.
तो पुन्हा इथे आणण्यासाठी काय करावे लागेल?

नीलकांत आणि नवनिर्माण चमूचे अभिनंदन !

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jul 2010 - 6:35 am | बिपिन कार्यकर्ते

नवीन मिपा आवडले. तूर्तास इतकेच. :)

०१. नवीन लेखन मधे धागे सॉर्ट करता येतील ही सोय आवडली. फक्त कॉलमच्या शीर्षकावर क्लिक करायचे.

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 8:03 am | क्रेमर

'लेखन करा' वर टिचकी मारल्यावर प्रत्येक विभागावर दोन-तीन खुसखुशीत वाक्यांत त्या विभागाची (उदा. चर्चा, पाककृती) ओळख आहे. पण 'कौल' या विभागाची ओळख खालीलप्रमाणे इंग्रजी आहे. या विभागाचे वर्णन मराठीत करावे.

A poll is a question with a set of possible responses. A poll, once created, automatically provides a simple running count of the number of votes received for each response.

उदा. देवासमोर कौल लाऊन निर्णय घेण्याची परंपरा महाराष्ट्रात असल्याचे मराठी चित्रपट पाहतांना लक्षात येते. आजकालच्या समाजात मात्र लोकांचा कल पाहण्यासाठी जनताजनार्दनासमोर कौल लावला जातो. संकेतस्थळ हे तात्कालीन समाजाचे प्रतिबिंबच असल्याने सदस्य येथे कौल लाऊ शकतात. कौलात शक्य उत्तरांचे पर्याय दिलेले असतात. कौल लावल्यानंतर प्रत्येक पर्यायाला पडलेली मते आपोआपच मोजली जातात व पाहता येतात.

नितिन थत्ते's picture

26 Jul 2010 - 8:07 am | नितिन थत्ते

एकूण स्वरूप जास्त सोबर झाले आहे.

अजिबात न आवडलेली गोष्ट म्हणजे फॉण्ट.

आधीचा फॉण्ट सुबक दिसे. आता तो वाईट दिसतो आहे. (फा फॉ आणि क्रोमवर आधीही वाईट दिसायचा पण आय ई वर सुबक दिसायचा. तो आता आय ई वरही तसाच दिसतो. वाचनीयता कमी झाली.

मागच्या वेळी नवीन सर्वर वर मायग्रेट केले होते तेव्हाही एक दोन दिवस असा फॉण्ट दिसत होता. पण नंतर चांगला झाला होता.

नितिन थते

नितिन थत्ते's picture

27 Jul 2010 - 10:13 am | नितिन थत्ते

फॉण्ट सुबक झाला आहे.
(प्रतिसादाच्या खिडकीत वाईटच दिसतोय अजून. पण इतरत्र चाम्गला दिसतोय).

सह्यांच्या गोंधळ झाला आहे काय? अनेकांच्या सह्या दोनदा दिसत आहेत.

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 8:39 am | क्रेमर

बरेच लोक स्वाक्षरी पूर्वदृष्यात दिसत नसल्याने चिकटवत आहेत. हा प्रतिसाद पहावा.

नाय हो मास्तर!

आमच्या सगळ्या जुन्या प्रतिसादांत सह्या दोनदा दिसत आहेत. नविन ठिकाणी प्रॉब्लेम दिसत नाही आहे.

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 8:50 am | क्रेमर

माझ्या जुन्या प्रतिसादांत माझी नवीन आणि जुनी दोन्ही सह्या दिसत आहेत. घोळ आहेच.

Nile's picture

26 Jul 2010 - 8:56 am | Nile

पुर्वीच्या मोड्युलमध्ये सही उपडेट केली तरी पुर्वी दिलेल्या प्रतिसादात सही बदलत नसे. नविन मोड्युलमध्ये बहुदा नविन सही सर्व जुन्या प्रतिसादांना लागु झाली आहे, व मागील सही ही प्रतिसादाचाच भाग असे राहिल्याने दोन दोन सह्या झाल्या आहेत असे वाटते.

-अंदाजपंचे

आनंदयात्री's picture

26 Jul 2010 - 10:03 am | आनंदयात्री

बहुदा जुने मॉड्युल सही प्रतिसादाच्या मजकुराला कॉकॅट करायचे, म्हणुन जुन्या सह्या मजकुरात अ‍ॅड झालेल्या आहेत. त्यामुळेच आधी सही बदलली तर जुन्या प्रतिसादात ती तशीच रहायची. आता एकदा सही बदलली की ती सगळीकडे रिफ्लेक्ट होईल असे वाटते.

सरपंच's picture

26 Jul 2010 - 8:59 am | सरपंच

नमस्कार,

या प्रयत्नाला आलेली भरभरून दाद उत्साह वाढवणारीच आहे.

१) मिसळीचा फोटो तर पाहीजेच. मात्र आधी सहज यांनी दिलेला फोटो आताच्या थीम मध्ये बसला नाहीये. आता मिसळपाववर सुंदरसा मिसळीचा फोटो कुणाला सूचवायचा असल्यास स्वागतच आहे.

२) फॉन्ट हा लवकरच पहिल्यासारखा करण्यात येईल. नाही केला तर तात्या सोडणार नाहीत नीलकांतला :)

३) डावीकडचा समास उजवी कडे आणण्याचे कारण म्हणजे सर्च इंजीनला मिसळपावचे साहित्य लवकर नोंदल्या जावेत हे होय. याला सर्च इंजीन ऑप्टीमायजेशन असे म्हणतात.

४) मुख्य साहित्याच्या आकारात वाढ आणि उजवा समास थोडा छोटा असा बदल करण्यात येईल.

५) खोदकाम नक्कीच करता येईल. आता हळूहळू हव्या तश्या साहित्याच्या याद्या करता येतील.

६) हजर सभासदचे पान परत तयार करण्यात येईल.

७) दूव्याचा रंग वेगळा करण्याचा सुध्दा विचार आहे.

८) नवीन बांधणीत अनेक जागी इंग्रजीचे मराठीकरण करायचे राहून गेले आहे. ते तातडीने करण्यात येईल. कुणाला यात म्हणजे मराठीकरणात सहभागी व्हायचे असल्यास इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सरपंचांना व्य.नि. केले तर स्वागतच आहे.

९)व्य.नि. व खरडवहीत सघन संपादक लावल्यावर दूवा देणे शक्य होईल.

१०) स्माईलीज सध्या स्थगीत ठेवल्या आहेत. लवकरच त्या परत लावण्यात येतील.

११)कौलच्या मजकूराबद्दल सूचनेचे स्वागत, योग्य तो बदल केला जाईल.

अन्य काही सूचना असल्यास कळवा. मिसळपावच्या नवनिर्माणात सहभागी व्हा.

- सरपंच

Dhananjay Borgaonkar's picture

26 Jul 2010 - 11:38 am | Dhananjay Borgaonkar

सरपंच,

दुसरा कुठला नको फोटो. जो आधि मिसळ्पावाचा फोटो होता तोच लावा.
स्वत:च घर सोडुन दुसर्‍यच्या घरात गेलो आहे रहायला अस वाटतय.

नीलकांत's picture

30 Jul 2010 - 9:49 pm | नीलकांत

१) मिसळीचा फोटो तर पाहीजेच. मात्र आधी सहज यांनी दिलेला फोटो आताच्या थीम मध्ये बसला नाहीये. आता मिसळपाववर सुंदरसा मिसळीचा फोटो कुणाला सूचवायचा असल्यास स्वागतच आहे.

- काम प्रगतीपथावर आहे.

२) फॉन्ट हा लवकरच पहिल्यासारखा करण्यात येईल. नाही केला तर तात्या सोडणार नाहीत नीलकांतला Smile

- फॉन्ट लावला आहे.

३) डावीकडचा समास उजवी कडे आणण्याचे कारण म्हणजे सर्च इंजीनला मिसळपावचे साहित्य लवकर नोंदल्या जावेत हे होय. याला सर्च इंजीन ऑप्टीमायजेशन असे म्हणतात.

-- यावर अद्याप विचार चालला आहे.

४) मुख्य साहित्याच्या आकारात वाढ आणि उजवा समास थोडा छोटा असा बदल करण्यात येईल.

- बदल झालाय.

५) खोदकाम नक्कीच करता येईल. आता हळूहळू हव्या तश्या साहित्याच्या याद्या करता येतील.

- काम प्रगतीपथावर आहे.

६) हजर सभासदचे पान परत तयार करण्यात येईल.

- काम झालंय.

७) दूव्याचा रंग वेगळा करण्याचा सुध्दा विचार आहे.

- काम प्रगतीपथावर आहे.

८) नवीन बांधणीत अनेक जागी इंग्रजीचे मराठीकरण करायचे राहून गेले आहे. ते तातडीने करण्यात येईल. कुणाला यात म्हणजे मराठीकरणात सहभागी व्हायचे असल्यास इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सरपंचांना व्य.नि. केले तर स्वागतच आहे.
काम प्रगतीपथावर आहे.

९)व्य.नि. व खरडवहीत सघन संपादक लावल्यावर दूवा देणे शक्य होईल.

- काम झाले आहे.

१०) स्माईलीज सध्या स्थगीत ठेवल्या आहेत. लवकरच त्या परत लावण्यात येतील.

- परत लावल्या आहेत. :)

११)कौलच्या मजकूराबद्दल सूचनेचे स्वागत, योग्य तो बदल केला जाईल.

- बदल केला आहे.

नितिन थत्ते's picture

30 Jul 2010 - 9:54 pm | नितिन थत्ते

धन्यवाद व अभिनंदन.

मिपाची सिग्नेचर स्मायली =)) मात्र चालत नाहीये बहुतेक. :(

आणि स्मायलींचा मेनू नाही.

धन्यवाद रे निलकांता,

ही '=))' लोळायची स्मायली चालत नाही रे.. :(

४) मुख्य साहित्याच्या आकारात वाढ आणि उजवा समास थोडा छोटा असा बदल करण्यात येईल.

- बदल झालाय.

हा बदल अजूनही पुरेसा वाटत नाहीये. आधीच्या मिपाचे पान कसे रुंद होते तसे हवे. काही तांत्रिक अडचणी नसतील तर ते शक्य व्हावे असे वाटते त्याने मिपाचा हा "ब्लॉग"सदृश फील जायला मदत होईल!

नितिन थत्ते's picture

26 Jul 2010 - 8:59 am | नितिन थत्ते

५०च्या पुढचे प्रतिसादही एकाच पानावर.....

पार्टीईईईईईईईईईईईईईई

नितिन थत्ते's picture

26 Jul 2010 - 9:06 am | नितिन थत्ते

स्मायलींचा प्रॉब्लेम झालेला दिसतो.

इकडे मास्तर लोळतायत पण लोळताना दिसत नाहियेत.

हायपरलिंकचा रंगही डिस्टिंक्ट दिसत नाही.

दिपक's picture

26 Jul 2010 - 9:13 am | दिपक

नविन रुप आवडले निलकांत.. मस्तच.. :)
पण जुन्यालाही मिस करतोय.

समिधा's picture

26 Jul 2010 - 9:22 am | समिधा

नविन रुप छान आहे
पण

१. कुठल्याही लेखा खाली वाचनखुण साठवा
२. स्वतःच्या खात्यात साठवलेल्या वाचनखुणा

हे दोन्ही दिसत नाही. अनेक चांगले लेख आणी पाकृ. वाचनखुणात साठवल्या होत्या

शानबा५१२'s picture

26 Jul 2010 - 9:28 am | शानबा५१२

नवीन रुप जुन्या रुपाच्या तोडीचे नाही.

जुन एकदम युनिक होत.

स्मायलीज पण नाहीत.

ड्रुपल ६ व आणून तेच जुन रुप आणता आल तर बघा.
मिपाच वेगळपण त्या रुपातच होत.

अमोल केळकर's picture

26 Jul 2010 - 9:48 am | अमोल केळकर

एकंदर स्वरुप आवडले . अभिनंदन !!
मात्र मिसळपावचा पुर्वीचा फोटो मस्ट

अमोल केळकर
----------------------------------------------------------------------
'भविष्याच्या अंतरंगात'भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा

विजुभाऊ's picture

26 Jul 2010 - 9:55 am | विजुभाऊ

मिसळीचे चित्र हवे होते.... मिसळपावचे ते व्यवच्छेदक लक्षण आहे :)

अजून एक, खरडवही भरपूर स्क्रोल करावी लागतेय... ;(

प्रत्येक खरडीमधे खरडकाचा फोटो उजव्या किंव्या डाव्या कोपर्‍यात देण्याची सोय करता आली बघा हो सरपंच....

आधी फोटो आणी त्याखाली खरडीने स्पेस वाया जातेय.. :)

मेघवेडा's picture

26 Jul 2010 - 3:58 pm | मेघवेडा

वापिस कट टू कट ऐसाहीच बोल्ताय..

आंबोळी's picture

26 Jul 2010 - 10:10 am | आंबोळी

नविन रुपडे पहिल्या फटक्यात आवडले....
सर्व टिमचे अभिनंदन....

डोमकावळा's picture

26 Jul 2010 - 10:24 am | डोमकावळा

एकूणच मिपाचे हे नवे रूप आवडले....

सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन...

नवे लेखन सदरात 'सगळे नवे लेखन' आणि 'माझे लेखन' या दोन टॅब दिसतात.
पण 'माझे लेखन' उघडायला गेलं की 'पान सापडले नाही' असा मेसेज येतो आणि Error चा Stack Trace येतो.

warning: array_key_exists() [function.array-key-exists]: The first argument should be either a string or an integer in /home/misavcom/public_html/sites/all/modules/views/includes/view.inc on line 1296.
warning: mysql_real_escape_string() expects parameter 1 to be string, object given in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 321.
warning: Illegal offset type
.
.
.

वगैरे वगैरे

आताची रंगसंगती डोळ्याला भावत नाही. पूर्वीची रंगसंगती दिलखेचक होती.
असो! तरीही नविन रुपडे आवड्ले हे निश्चित. :)

बद्दु's picture

26 Jul 2010 - 10:42 am | बद्दु

एकडम बेश्ट...

स्वाती दिनेश's picture

26 Jul 2010 - 11:22 am | स्वाती दिनेश

नवे रुप वेगळे वाटले, आता जसेजसे वापरात येईल तसतसे फायदेतोटे समजत जातील..
अभिनंदन!
स्वाती

इन्द्र्राज पवार's picture

26 Jul 2010 - 12:54 pm | इन्द्र्राज पवार

महिन्याभराच्या सुट्टीनंतर आलो अन आता झटकन मिसळपावचे हे "देखणे" रुपडेच समोर झळकले. फार फार आनंद झाला हा बदल पाहून. आजचा दिवस हा बदल पाहण्यातच जाईल यात शंका नाही.

श्री.नीलकांत आणि या प्रक्रीयेत सामील असलेल्या अ पासून ज्ञ घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन. अनेकविध सूचनांना वर स्थान दिलेले वाचलेच आणि त्यानुसार स्वीकारण्यायोग्य बाबींचा संपादकीय पातळीवर विचार होणारच यात संदेह नाही, तरीही एक छोटीशी सूचना करण्याचा मोह होत आहे. ती अशी :

"स्माईलीज" आवश्यक आहेत हा विचार वर कित्येकांनी दिला आहे. त्यानुसार कार्यवाही होईलच, पण तसे करत असताना स्माईलींचा "अतिरेक" टाळता येईल अशी काही आज्ञावली करता येत असेल तर करावे. म्हणजे "हसून हसून लोळागोळा झालोय" ही भावना व्यक्त करण्यासाठी २५-५० तशा स्माईली टाकायच्या हे कितपत योग्य आहे? मिसळपाव असो वा अन्य संस्थळे, या सेवा सदस्यांना मोफत मिळत असतात, पण म्हणून बेसुमार बँडविड्थ वापरावी, असे करू नये असे वाटते. त्यापेक्षा कोणत्याही कारणासाठी एकच स्माईली प्रकाशीत होईल असा प्रोग्राम केल्यास ती बाब स्वागतार्ह वाटेल.
इन्द्र

मैत्र's picture

26 Jul 2010 - 2:07 pm | मैत्र

एक दोन सूचना / विनंती -

background color हा पूर्वी लख्ख पांढरा होता. आता थोडा फिकट आहे. तो तसाच ठेवला तर छान वाटेल. थोडा उदास वाटतो असा dull रंग.

इतरांनी म्हटल्याप्रमाणे मिसळीचा फोटो हवाच. पण वरची / खालची रंगाची पट्टी ही gradient करून गडद रंगाकडे छटा वाढत जाते. त्याच्या उलट केल्यास उल्हसित वाटेल. तपकिरी कडे झुकणारा लाल आहे त्यापेक्षा जुना bright रंग जास्त चांगला वाटेल आणि जुन्या मिपाशी तो एक दुवा राहील.

सर्व branding मध्ये एक विशिष्ट रंगछटा वापरली जाते. त्याच्या सलगतेतून त्या नावाशी, उत्पादनाशी, संस्थेशी संबंध जोडता येतो. तसा वापर त्या रंगाच्या पट्टीचा मिपाने करावा अशी विनंती.
साधारण आत्ताचा रंग carmine / crimson कडे जाणारा आहे त्याऐवजी bright red / scarlet चा वापर छान वाटेल.

रंगरुप हे प्रसन्न वाटावं अशी इच्छा.
तसेच - मिसळपाव हा शब्द त्या चंदेरी gradient मध्ये विनाकारण प्रोफेशनल वाटतो. नेहमीची हक्काची सलगी जाणवत नाही. त्याचीही रंगछटा थोडी ब्राईट करून इतर फॉन्ट प्रमाणे फॉन्ट वापरल्यास चांगले वाटेल. सध्या मराठीतला Times New Roman / Tahoma किंवा तत्सम formal font वाटतो आहे.

बॅक टू टॉप जबरदस्त सोय! पण जुन्याप्रमाणे सर्व प्रकारचे लेखन एकत्र सुरुवातीला दिसण्याची सोय असेल तर उपयोग होईल. प्रत्येक लेखन प्रकारात जाऊन शोधण्यापेक्षा ते फार बरे पडते.

नवनिर्माण मंडळाच्या कष्टांचे, प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे थोडे!

घाटावरचे भट's picture

26 Jul 2010 - 2:17 pm | घाटावरचे भट

नवीन रुपडे उतम आहेच. नीलकांत आणि तांत्रिक टीम (म्हणजे चेटुक वगैरे करणारे नव्हेत) चे हार्दिक अभिनंदन.
बाकी,

- मिसळीचा फोटो हवाच
- स्मायलीज हवेच
- उजव्या बाजूच्या टॅब्सचा क्रम ग्यानबा-तुकाराम, नॅव्हिगेशन, मिपाचे धोरण, समृद्ध व्हावे असे काही आणि शेवटी हजर सभासद असे असल्यास उत्तम.

इतर ठिकाणी जिथे इंग्रजी आहे तिथे मराठी करावे ही विनंती.

- भट

अभिरत भिरभि-या's picture

26 Jul 2010 - 4:34 pm | अभिरत भिरभि-या

सध्याचा background color मला पूर्वीच्या लख्ख रंगापेक्षा जास्त आवडला. सौम्य असल्याने डोळ्यांना सुखद वाटतोय.

जुना भडक लाल रंगाचा हपिसात बसून मिपा मिपा खेळणार्‍यांना त्रासदायक होतो. तशा लाल रंगामुळे सर्वांचे लक्ष उगाचच वेधले जाते. नवीन रंग छान आहे.
त्यामुळे समस्त हपिसकरीण जनतेतर्फे सरकारचे आभार !

मिसळीचे चित्र जुन्या मिपाशी दुवा म्हणून राहिल. त्या सूचनेवरही विचार व्हावा.

५०+ प्रतिसाद एकाच पानावर येताहेत, स्पीडही वाढल्यासारखा वाटत आहे ... Back to Top चा पर्याय ही छान आहे.

उजव्या बाजूला असलेला समास जुन्या लोकांना काही काळ गैरसोईचा वाटू शकतो पण हा सवयीचा प्रश्न आहे. थोडे दिवसांनी नवीन रूपड्याची सवय होऊ द्यावी असे वाटते.

हे सर्व करण्यामागे खूप कष्ट असणार आहेत हे जाणवते; तांत्रिकला टिमला आमचा सलाम !

अभिरत

छान दिसतयं मिसळ्पाव.

पण पानावर लेखाला फक्त ५०% च (आडवी)जागा आहे...विस्तारीत करावे ही विनंती.

शुभेच्छा!

मन's picture

26 Jul 2010 - 4:59 pm | मन

मस्त दिसतीये नवीन रचना सुद्धा.
मिसळीच्या फोटुची वाट बघतोय.

अवलिया's picture

26 Jul 2010 - 6:11 pm | अवलिया

वा ! चांगले झाले आहे नवे रुप.

जुनी रंगसंगती भडक असल्याने आमच्यासारखे लोक भडक लिहित होते ते आता नव्या रंगसंगतीत गप्प बसतील असे वाटते.

व्यनी अजुन चालु नसावा. अडत नाही...सहजरावांना अडचण होईल असो

प्रभो's picture

26 Jul 2010 - 6:12 pm | प्रभो

नान्या, चालूय रे व्यनी.

अवलिया's picture

26 Jul 2010 - 6:26 pm | अवलिया

येस्स.... नावं बदललीत.. जागा बदलली..

आमच्यासारख्या म्हाता-यांना येवढे बदल एकदम झेपत नाही रे...

वेळ लागेल जरा रुळायला...

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 7:58 pm | क्रेमर

हापिसातल्या कम्प्युटरवर अचानक प्रतिसादातील सदस्यनाम न दिसता त्याजागी चौकोन दिसत आहेत. बाकी प्रतिसाद व्यवस्थित दिसतो. 'हजर सभासद' वगैरे जागांवरही चौकोनच दिसत आहेत. काय गौडबंगाल आहे कळेना. तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.

क्रेमर's picture

27 Jul 2010 - 1:05 am | क्रेमर

आता सदस्यांची नावे दिसत आहेत. इतरत्र दिसणारे चौकोन जाऊन अक्षरे दिसत आहेत. फक्त तुकाराम,ज्ञानेश्वराचा फोटो दिसत नाही. आश्विनी व्हावे दिसती आहे.

चतुरंग's picture

27 Jul 2010 - 1:22 am | चतुरंग

व्हावे नाही.
(खुद के साथ बातां : रंगा, आता अश्विनीने ह्यांचे 'व्हावे असे ह्यांना वाटत असेल तर कोण काय करणार? ;) )

क्रेमर's picture

27 Jul 2010 - 1:25 am | क्रेमर

भावेचे/नी व्हावे असे वाटत नाही. किबोर्डावर v आणि b लागून लागून असल्याने (चित्र भावल्याने) टंकनदोष झाला.

काय लागुन असल्याने कसले दोष कुणाला कधी होतील काही सांगता येत नाही.

धनंजय's picture

26 Jul 2010 - 7:59 pm | धनंजय

वा! रूप देखणे आहे.

मेघना भुस्कुटे's picture

26 Jul 2010 - 8:19 pm | मेघना भुस्कुटे

मलापण सभासदांच्या नावांच्या जागी चौकोन दिसताहेत. उजवीकडे बरोबर दिसतंय. पण प्रतिसादात नावांच्य ठिकाणी चौकोन. :(
आणि मिसळीचा फोटो हवा ब्वॉ.

पंगा's picture

26 Jul 2010 - 9:06 pm | पंगा

व्यक्तिगत निरोप सुविधा नको असल्यास / स्वतःपुरती बंद करायची असल्यास / व्यक्तिगत निरोप स्वीकारायचे नसल्यास पूर्वी एक पर्याय उपलब्ध होता. (असाच एक पर्याय खरडवहीसाठीसुद्धा उपलब्ध होता.) आता हा पर्याय दिसत नाही. (खरडवहीसाठीचा पर्याय अजूनही उपलब्ध आहे.)

अरुंधती's picture

26 Jul 2010 - 9:27 pm | अरुंधती

छान दिसतंय नवं स्वरूप! आता वापर करत जाईन तशी त्यातील कमी-जास्त, अधिक-उणे कळेलच! :-)

नीलकांतच्या श्रमाचे कौतुक आहे. पण खर सांगायचं तर मिपाचे हे रुप नाही आवडले.
सदस्यत्व घेण्यापूर्वी बघताक्षणी मिपा आवडले होते कारण मिपाचा आकर्षक आणि युजर फ्रेंडली इंटरफेस.
आतामात्र ह्या संस्थळाचे बाह्यरुप हे एखाद्या ब्लॉग सारखे दिसत आहे. कंटाळवाणे वाटत आहे.
पूर्वी फटाफट नवीन काय लेखन आले आहे ते दिसत होते आता मात्र स्क्रोल करून पहावे लागत आहे.
डावी बाजू बदलून उजवीकडे टाकलेल्या गोष्टी डावीकडेच हव्यात असे वाटत आहे.
मिसळीचे चित्र हवेच हवे.
स्वसंपादनाची सोय हवी.

नविन प्रतिसाद दिलेले धागे आधी वरच्या नंबरला यायचे...आता शोधावे लागतेय कोणत्या धाग्यावर नवीन प्रतिसाद आलाय ते....नवीन प्रतिसाद आल्याची नोंद करणारं बटन परत लावा म्हणजे सोपं जाईल...आणि मला व्यनी सुविधा काही दिसत नाही...

स्वतःला आवडणारं कार्टून देता येतय. इट्स सो कूल :) मी बेट्टी बूप चं दिलय.
मिप मस्त होतय हळू हळू.

नमस्कार,

मिसळपावावरील अक्षरे अक्षरे अत्यंत लहान झाली आहेत. विशेषतः माझ्यासारख्या ऐनकावलंबी मनुष्यास वाचावयास अत्यंत त्रास होतो आहे. कृपया अक्षरे मोठी करावीत.

हैयो हैयैयो!

नितिन थत्ते's picture

27 Jul 2010 - 10:18 am | नितिन थत्ते

कोणकोण हजर आहे हे कसे पहायचे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jul 2010 - 10:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर आणि सोबर दिसत आहे मिपा. मला ही थीम आवडली. इनोबाचे विशेष अभिनंदन! नीलकांतचे आभार.

१. प्रत्येकाच्या संगणकाच्या स्क्रीन रेझोल्यूशनसाठी अ‍ॅडजस्ट होणारी लिक्वीड थिम वापरता येईल का? वाईड स्क्रीन संगणकावर उजव्या डाव्या बाजूला फारच जागा मोकळी दिसत आहे.
२. 'बॅक टू टॉप'मधे बाऊन्स दिसणं फारसं आवडलं नाही. मिपाच्या नवीन रूपाला शोभत नाही असं वाटलं.
३. मिपाचं मुखपृष्ठ मात्र पूर्वीसारखं, ज्यात नवीनतम प्रतिसाद आलेले लेख दिसायचे ते आवडायचं.
४. खव/व्यनीसाठी फार स्क्रोल करावं लागत आहे. ग्यानबा-तुकाराम मुख्य पानाच्या डाव्या बाजूला असले तर त्यांना अग्रक्रमही मिळेल शिवाय खवसाठी जास्त स्क्रोल करावं लागणार नाही.
४. भाषा बदलाचा पर्याय सतत वापरावा लागत नाही, तो डाव्या कॉलमच्या तळाशी ढकलला तरी चालावा, त्यामुळेही खव/व्यनीचा खोका वर येईल.

माझ्या संगणकावर (लिनक्स+ फाफॉ) फॉण्ट पूर्वीसारखाच सुंदर दिसत आहे. विण्डोजच्या फाफॉवर फॉण्ट पूर्वीसारखाच (खराब) दिसतो आहे. ५० प्रतिसादांनंतर पान उलटावं लागत नाही हे मस्तच.

अरुण मनोहर's picture

27 Jul 2010 - 12:02 pm | अरुण मनोहर

नीलकांत आणि टीमचे अभिनंदन.
छान रुपडे आहे. अक्षरे मोठी केल्यास वाचायला सोपे पडेल.

चिंतातुर जंतू's picture

27 Jul 2010 - 1:17 pm | चिंतातुर जंतू

खरडवहीत नवी नोंद झालेली असल्यास वा नवा व्य.नि. असल्यास पानाच्या अगदी वर तसा संदेश पूर्वी येत असे. आता मात्र प्रत्यक्ष ख.व. नि व्य.नि.च्या दुव्यांपर्यंत पोहोचल्यावरच ते कळते. सर्वात वर दिसणार्‍या 'नमस्कार <सदस्यनाम>; गमन' येथे 'ख.व. (१५ नवीन)', 'व्य.नि. (२ नवीन)' असे काही दिसल्यास सोयीचे जाईल.

इनोबा म्हणे's picture

27 Jul 2010 - 4:07 pm | इनोबा म्हणे

सर्व प्रतिसाद/सूचनांकरिता धन्यवाद!

डिझाईनसंदर्भात आगामी काळात केल्या जाणार्‍या काही बदलांविषयी:

  1. काही सदस्यांना ऑफीसमधून ब्राऊजींग करताना भडक रंग त्रासदायक वाटतात. त्यासाठी सद्ध्याच्याच डिफॉल्ट थीमबरोबर वेगवेगळ्या रंगसंगतीच्या थीम्स लवकरच दिल्या जातील.
  2. बहूतेक सर्वच सदस्यांची मागणी आहे की, हिडरमध्ये मिसळीचे चित्र हवे. ते चित्र लवकरच तिथे लावण्यात येईल. (मिसळपावचेच सदस्य सहज हे मिसळीचे चित्र पुरवणार आहेत.)
  3. डाव्या/उजव्या साईडबारबाबत विचार चालू असून लवकरच त्यासंदर्भात आपल्याला माहिती देण्यात येईल.

याशिवाय इतर काही सूचनांबाबत विचार केला जाईल.

-विनायक अनिवसे
सदस्य (नवनिर्माण समिती)

चतुरंग's picture

27 Jul 2010 - 4:54 pm | चतुरंग

१ - हजर सभासद हा टॅग अ‍ॅक्टिव नाहीये का? फक्त पहिल्या पानावरचेच सभासद दिसतात. कृपया तो अ‍ॅक्टिव करावा.
२ - नवे लेखन ह्या टॅबखाली 'प्रतिसाद' ह्या स्तंभातले सगळे आकडे इंग्रजी आहेत ते मराठी करता येऊ शकावेत.
1 new पेक्षा १ नवीन (किंवा जो काही आकडा असेल तो) हे जास्त चांगले वाटते.
३ - Last Post ह्या स्तंभाऐवजी 'शेवटची पोच' हे कसे वाटते? (तिथेही आकडे इंग्रजीतून मराठीत करावेत.)
४ - लेखात/प्रतिक्रियेत दुवा देताना त्या दुव्याचा शब्द हा आपोआप वेगळ्या रंगाचा होईल असे पहावे अन्यथा लेखात दुवा दिलेला आहे हे समजून येत नाही.
५ - सर्व लेखनाचे पृष्ठ क्रमांक इंग्रजीत दिसतात 1 2 3 पुढील > अंतिम>> असं दिसतंय त्याऐवजी मराठी आकडे चांगले.
(तसेच लेखाच्या खालचे प्रतिसाद बघताना.)
६ - पूर्वी 'माझे लेखन' असा एक टॅब असे त्यावर टिचकले की आपण लिहिलेले सगळे लेखन (प्रतिक्रिया नव्हेत) दिसत असे. तो टॅब आता गायब झालाय. अतिश्य उपयुक्त होता. कृपया परत आणावा.
७ - स्वगृह वरती पानाच्या मध्यभागी दिसणारे सगळे विभागांचे टॅब्ज हे अ‍ॅक्टिव करावेत म्हणजे 'काथ्याकूट' ह्यावर टिचकले की सगळे त्या विभागातले लेखन दिसेल इ.इ. (पानाच्या मथळ्यापाशीचे टॅब्ज अ‍ॅक्टिव आहेतच.)

विलासराव's picture

27 Jul 2010 - 8:09 pm | विलासराव

एकंदरीत........नविन रुपडे आवडले.

नितिन थत्ते's picture

28 Jul 2010 - 8:01 am | नितिन थत्ते

व्य नि आल्याची सूचना फक्त ई मेलनेच मिळते. ती पूर्वीसारखी पानाच्या वर देण्याची सोय करावी.

गुंडोपंत's picture

28 Jul 2010 - 8:12 am | गुंडोपंत

शोध सुविधा बदलली आहे का? म्हणजे पुर्वी काव्य सदरात फक्त विडंबने शोधता येत होती. आता मला तसे करता येत नाहीये
(- त्यामुळे केशवसुमारांच्या जुन्या विडंबनालाही मुकतो आहे , उदास वाटल्यावर मी बरेचदा ती शोधून वाचत असतो.)

की शोध घेण्यासाठी अजून काही आयड्याची कल्पना आहे?

मिसळपावचे नविन स्वरुप सुरेख आहे ... सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद !

* साठवलेल्या वाचनखूणा कशा बघायच्या?
* प्रवेश केल्या नंतर खात्याची सर्व माहिती असलेले पेज उघडते आहे , त्या ऐवजी मुख्य पान उघडले तर ...?

बहुगुणी's picture

28 Jul 2010 - 11:24 pm | बहुगुणी

मिपा वरची पुस्तकविश्व ची लिंक आणि माहिती दिसत नाही, बहुतेक नवीन घडणीत थोडा वेळ लागेल पहिल्या सर्व गोष्टी स्थिरस्थावर व्हायला, पण जमेल तेंव्हा परत येउ द्यात ती उपयुक्त माहिती मुख्य पृष्ठावर, धन्यवाद.

नितिन थत्ते's picture

29 Jul 2010 - 8:00 am | नितिन थत्ते

माझे खाते या पानावर जेथे स्वाक्षरी तयार करतो त्याखाली इनपुट फॉर्मॅटचा पर्याय आहे. तेथे Full HTML सिलेक्ट केल्यास माझे प्रतिसाद बाय डिफॉल्ट फुल HTML मध्ये येतील. ही चांगली सोय आहे.

ही सोय पूर्वी होती की नाही हे माहिती नाही.

अरेच्च्या!

हे आमच्या बाबतीत का होत नाहीए??

नितिन थत्ते's picture

29 Jul 2010 - 1:26 pm | नितिन थत्ते

फक्त सहीसाठीच अ‍ॅप्लिकेबल आहे हे.
प्रतिसादात पुन्हा फुल HTML सिलेक्ट करायला लागते.

नीधप's picture

29 Jul 2010 - 9:18 am | नीधप

बदलाच्या डोळ्यात भरेल अश्या सुरूवातीबद्दल अभिनंदन आणि आभार.
आता अर्थातच सूचना..
१. रंगसंगती आणि रूपडे हे जेनेरिक स्वरूपाचा फॉर्मॅट आणि स्क्रीनवर दोन्ही बाजूला सुटलेली मोकळी जागा यामुळे संकेतस्थळापेक्षा ब्लॉग असल्यासारखे दिसतेय. कस्टम मेड ले आउट आणि डिझाइन असावे. पूर्ण स्क्रीनभर असावे.
२. नवे लेखन हा विभाग पूर्वी बाहेर होता तसा असावा
३. मुख्यपृष्टावरची सर्व विभागांची शीर्षके(जनातलं मनातलं, काथ्याकूट, जे न देखे रवी इत्यादी) त्यावर टिचकल्यावर त्या त्या विभागाच्या लिस्टीत नेणारी असावीत.

बाकी उजवे/ डावे, खाली/ वर हा केवळ सवयीचा भाग. तेव्हा डिझाइन मधे जे योग्य वाटेल ते करावे.

संताजी धनाजी's picture

29 Jul 2010 - 10:46 am | संताजी धनाजी

सरपंच आणि मंडळी,
सर्वात प्रथम बदलाचे स्वागत!! बदल आवडला :)
वेगही वाढल्यासारखा वाटतोय

१. मिसळपावाचे चित्र हवेच हवे. ती तर मिपाची ओळख आहे. नाही का?
२. गुगल क्रोमवर संपादन करता येत नाही
३. स्मायलीज हव्यात

- संताजी धनाजी

नितिन थत्ते's picture

30 Jul 2010 - 1:10 pm | नितिन थत्ते

सहीचा मोठाच लोचा आहे. सही प्रतिसादाच्या मजकूरात मर्ज न होता प्रतिसादाला अ‍ॅपेण्ड होत आहे. माझ्या १ वर्षापूर्वी दिलेल्या प्रतिसादांवर माझी आजची सही दिसते.

त्यामुळे सही 'बनवून ठेवणे' या प्रकाराला आता काही अर्थ उरला नाही. काळानुरूप सही ठेवण्याची सोय उरली नाही.

नितिन थत्ते's picture

30 Jul 2010 - 1:32 pm | नितिन थत्ते

कौल या लेखनप्रकारात

१. प्रतिसादाची खिडकी नसते. ती मुद्दाम उघडून घ्यावी लागते.
२. नव्याने दिलेला प्रतिसाद सर्वात खाली न येता सर्वात वर येतो.

सुकामेवा's picture

30 Jul 2010 - 6:14 pm | सुकामेवा

तुंमच मिसळ्पाव नव्या रुपात असं लिहण्या ए॑वजी आपल मिसळ्पाव आता नव्या रुपात असे पाहिजे.

प्रचेतस's picture

31 Jul 2010 - 12:21 pm | प्रचेतस

सरपंच साहेब,
कलादालन विभाग हा त्यावरील नविन पाच लेखांसह मुख्य पानावर आणावा. तसेच त्या व इतरही विभागांच्या मथळ्यांना(उदा. जनातलं- मनातलं, कौल इ.) लिंका द्याव्या म्हणजे परत वरती स्क्रोल करत बसावे लागणार नाही व तिथूनच आत प्रवेश करता येइल. ही सूचना व विनंती.
म्हणजे आमच्यासारख्या कलाप्रेमींनाही त्याचा सहजतेने आस्वाद घेता येइल.

स्वाती दिनेश's picture

7 Aug 2010 - 11:10 am | स्वाती दिनेश

असे लक्षात आले की बरेच नवे आयडी कार्यान्वित झाले आहेत आणि त्यांची कॉमन अडचण म्हणजे देवनागरी टंकलेखन... पूर्वी म्हणजे हे अपग्रेडेशन होण्यापूर्वी नव्हे तर अगदी सुरूवातीला वरती डाव्या कोपर्‍यात टंकलेखन सहाय्य होते,त्यात एक तक्ता होता. तो ह्या नव्या लोकांना बराच उपयुक्त ठरु शकेल असे वाटते.
म्हणजे मग अनुस्वार कसा द्यायचा? किवा ट,ठ,ण, थ, ष ,ऑ,अ‍ॅ... इ. टाइप करणे त्यांना सोपे होईल.
ते परत तिथे आणता येईल का?
धन्यवाद,
स्वाती