** या बायकाना शिक्षा कोण करणार? **

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
25 Jul 2010 - 9:04 am
गाभा: 

या बायकाना शिक्षा कोण आणि कधी करणार?

http://epaper.telegraphindia.com/TT/TT/2010/07/24/ArticleHtmls/24_07_201...

प्रतिक्रिया

कवटी's picture

25 Jul 2010 - 9:39 am | कवटी

आता तुम्हीच पुढाकार घ्या.

कवटी

अशोक पतिल's picture

25 Jul 2010 - 9:45 am | अशोक पतिल

विषय खरोखर विचार करण्यासारखा आहे.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

25 Jul 2010 - 10:37 am | जाई अस्सल कोल्हापुरी

...का बरे इतके वैतागला आहात? ~X( ...??

शिल्पा ब's picture

25 Jul 2010 - 10:43 am | शिल्पा ब

अशा किती टक्के बायका आहेत समाजात? तुमचा अशा बाबतीत बराच अभ्यास दिसतोय म्हणून विचारलं..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

युयुत्सु's picture

25 Jul 2010 - 10:56 am | युयुत्सु

नक्की टक्केवारी कळण्यासाठी पुरुषांनी बोलते होण्याची गरज आहे. पण पुरुषांच्या आत्महत्यांची टक्के वारी बायकांच्या पेक्षा नक्कीच जास्त आहे.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

विनायक प्रभू's picture

25 Jul 2010 - 1:05 pm | विनायक प्रभू

=))

बहुतांश पुरूषांच्या आत्महत्या बायकांनी दिलेल्या त्रासानं होतात असाही विदा आहे काय?

युयुत्सु's picture

26 Jul 2010 - 10:57 am | युयुत्सु

असा विदा उपलब्ध नसला तरी उपलब्ध विदा वरून तुम्ही म्हणता ते नक्की सूचित होतं. आणि कल्पना करा की असा विदा उपलब्ध झाला तर विद्या बाळांसारखे स्त्रीवादी आणि समाज फकत मुंडी कापलेल्या कोंबड्या सारखे थैमान घालतील.

सत्य स्वीकारणं किती कटु असतं हे माहित नसेल तर माझ्या अगोदरच्या लिखाणावरील लोकांच्या प्रतिक्रिया वाचा!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jul 2010 - 10:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्याला ब्वॉ मुंडी कापलेल्या कोंबड्यांसारखं घातलेलं थैमान पहायला आवडतं; मग ते कोणीही का घालेनात! तस्मात असले धागे मी मुद्दामून उचकटून वाचते आणि प्रतिसाद देते.

तुम्ही स्वतःच आधी अभ्यास करून, आकडेवारी बनवून आणि नंतर ती इथे देऊन मग मुंडी कापलेल्या कोंबड्यांसारखं घातलेलं थैमान बघण्याची इच्छा का पूर्ण करत नाही?

युयुत्सु's picture

27 Jul 2010 - 4:58 pm | युयुत्सु

या वेळेला झाडावर चढून बसला नाहीत? 'या बायकांना शिक्षा कोण देणार' या मूळ प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही याची गंमत वाटली.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jul 2010 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार

जाउद्या युयुत्सु साहेब.
कुठे निरर्थक वाद घालत बसला आहात ? तुमचे श्रम असे वाया घालवण्यापेक्षा दोन छानसे लेख येउ द्या बरे :) वाट बघतोय तुमच्या लेखनाची.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jul 2010 - 5:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही हो, आता वेगळा वाक्प्रयोग, मुंडी कापलेल्या कोंबड्यांसारखं घातलेलं थैमान, आवडला म्हणून वापरला! अर्थात हे पहायला झाडावरच मस्त जागा आहे ना!!

तुमचा मुद्दा किंचित, अगदीच किंचित, पटतो. माझ्याही ओळखीत एक केस आहे, हा आमचा मित्र, त्याचे आईवडील, घरचे तिच्या आत्महत्येमुळे आणि आईमुळे खूप सहन करत आहेत. पण म्हणून 'बर्न्स' वॉर्डमधल्या डॉक्टरांचे अनुभव, हुंडाबळीच्या बातम्या, शिकलेल्या, हुशार मुलींना नोकरी न करता आल्यामुळे आलेलं फ्रस्ट्रेशन, इ.इ.इ.इ.इ. याची माझ्या माहितीतली उदाहरणं किती आणि उलट्या गोष्टी किती माहित आहेत याचा हिशोब लावला की तुमचा मुद्दा पटणार नाही याची खात्री आहे.

मला तुमचा मुद्दा पटणार आणि तुम्हाला माझा! त्यापेक्षा जे आवडलं ते घेतलं ना, "मुंडी कापलेल्या कोंबड्यांसारखं घातलेलं थैमान" हा वाक्प्रयोग!!

स्पंदना's picture

25 Jul 2010 - 1:00 pm | स्पंदना

खरच जाम बदडायला पाहिजे अश्या बाइला!!
त्या पोलिसाचा पण तसाच नमुना केला पाहिजे. खरतर त्याच्या शिकवणी मुळेच ती कायद्याचा गैर उपयोग करुन दाखवण्याची धमकी देत असावी. पन बाइ म्हणुन वा एक व्यक्ती म्हणुन आपल चुकत असताना नाक वर करुन दुसर्‍याला धमकवायच म्हणजे जरा अतिच !!

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

आता तुम्ही आणि युयुत्सु मिळून त्या बाईला चांगलाच धडा शिकवा...म्हणजे पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही..

क्रेमर's picture

26 Jul 2010 - 5:42 am | क्रेमर

.

नगरीनिरंजन's picture

26 Jul 2010 - 8:22 am | नगरीनिरंजन

अत्त्याचार करणारे आणि ते सहन करणारे दोन्हीकडे असतात, त्यात लिंगभेद नाही. जसे सगळेच पुरुष अत्त्याचारी नसतात तशाच सगळ्या स्त्रीयाही अबला नसतात. पण शिकलेले लोकही अत्त्याचाराविरुद्ध कायद्याची मदत घ्यायची सोडून आत्महत्त्या वगैरे करतात हे पाहून वाईट वाटते. न्यायव्यवस्थेवर कमालीचा अविश्वास आणि टोकाची मते याचाच हा परिपाक आहे.

युयुत्सु's picture

26 Jul 2010 - 10:49 am | युयुत्सु

पण शिकलेले लोकही अत्त्याचाराविरुद्ध कायद्याची मदत घ्यायची सोडून आत्महत्त्या वगैरे करतात हे पाहून वाईट वाटते.

अडाणी दिसताय. परदू:ख शीतल असते असं का म्हणतात ते तुमच्या मतप्रदर्शनावरून समजलं. कायद्याची कोणतीही मदत उपलब्ध नसेल तर आत्महत्येशिवाय कोणता पर्याय उरतो?

नगरीनिरंजन's picture

26 Jul 2010 - 11:06 am | नगरीनिरंजन

शिवाय मूर्ख आशावादीही आहे.
भारतात कायदेशीर घटस्फोट घेता येतो असं मला वाटत होतं. पण तुम्ही म्हणताय म्हणजे तसं काही नसावं.

युयुत्सु's picture

26 Jul 2010 - 11:11 am | युयुत्सु

भारतात कायदेशीर घटस्फोट घेता येतो असं मला वाटत होतं.

कायदेशीर घटस्फोट ही तुम्हाला चहा पिण्यासारखी सोपी गोष्ट वाटत असावी. घटस्फोटानं प्रश्न संपतात अशी ब-याच जणांची गोड गैरसमजूत असते. घटस्फोटानं नवे प्रश्न निर्माण होतात.

नगरीनिरंजन's picture

26 Jul 2010 - 11:16 am | नगरीनिरंजन

प्रश्न निर्माण झाले तरी ते सोडवण्याऐवजी आत्महत्या करणे कसे काय समर्थनीय ठरते? जे असे दुर्बळ आहेत त्याना जिवंतपणी इतरांनी त्रास दिला यात आश्चर्य काय?

निसर्गाने प्रत्येकाला समस्या सोडविण्याची कुवत्/क्षमता सारखी दिली नाही हे तुम्हाला माहित असेलच....

नगरीनिरंजन's picture

26 Jul 2010 - 11:56 am | नगरीनिरंजन

होय आणि निसर्गात दुर्बळांचा नेहमीच बळी जातो हे ही मला माहिती आहे.

सहज's picture

26 Jul 2010 - 10:20 am | सहज

जोवर मिपा संपादक मंडळाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा नसेल तोवर चालू द्या! :-)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Jul 2010 - 11:39 am | परिकथेतील राजकुमार

अतिशय वादग्रस्त विषय कायमच संयमीरीत्या मांडण्याच्या युयुत्सु ह्यांच्या कौशल्याचे मला कायमच कौतुक वाटत आले आहे :)

मृत्युन्जय's picture

26 Jul 2010 - 12:27 pm | मृत्युन्जय

कायदा आला म्हणजे त्याचा दुरुपयोग देखील होणारच. प्रस्तुत माण्सासमोर जी समस्या होती त्याला आत्महत्या हा पर्याय नव्हता. मुलाने घटस्फोट घेणे हा पर्याय होता. वरती कोणितरी लिहले आहे की घटस्फोटानं नवे प्रश्न निर्माण होतात. पण आता या इसमाने जी आत्महत्या केली आहे त्यामुळे कितीतरी जास्त समस्या निर्माण होतील. आणि त्याशिवाय घटस्फोट तर होइलच.

आणि माझे वैयक्तिक मत आहे की जर पोलिसात तक्रार करण्याइतपत वाइट वेळ आली असेल तर सरळ घट्स्फोट घ्यावा. जी बाई सासु सासरे आणि नवर्‍याविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवु शकते ती घट्स्फोट नाही का घेउ शकत? मग ४९८अ चा जाचक बडगा का आणि कशासाठी? तक्रार नोंदवुन संसार सुरळीत चालु राहु शकतो का? आणि जर संसार करायचाच नसेल तर ४९८ अ च का हवा. घटस्फोट आणि फौजदारि खटला (४९८अ शिवाय) याने काम नाही का भागु शकत?

जाचक सासरच्यांसाठी हे कलम उत्तमच आहे. पण मग यात निरपराध लोक पण भरडले जात असतील तर मग हा अन्याय नाही का?

आपला कायदा " १०० अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होउ नये" या तत्वावर आधारीत आहे. मग हे कलम अन्याय्य नाही का?

युयुत्सु's picture

26 Jul 2010 - 3:34 pm | युयुत्सु

मुलाने घटस्फोट घेणे हा पर्याय होता.

घटस्फोट घेणे हा पर्याय असला तरी तो तात्त्विक पातळीवर. तो प्रत्यक्षात आणण्यात जी गुंतागुत निर्माण झाली आहे त्याची आपण कल्पना करायचा प्रयत्न तरी केला आहे का

४९८अ ची केस चालू झाली की कमीत कमी ३ वर्षे त्याचा निकाल लागल्या शिवाय घटस्फोटाच्या केसची गुणवत्ता (मेरिट) कुटुंब न्यायालयला ठरवता येत नाही.

जी बाई सासु सासरे आणि नवर्‍याविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवु शकते ती घट्स्फोट नाही का घेउ शकत?

लाख मोलाचा प्रश्न विचारलात. घटस्फोट झाला की नवरा आणि सासरचे ताब्यातून निसटतात. त्याना स्वतःच्या लहरीनुसार नमवता येत नाही. शिवाय पुनर्विवाहाची शक्यता रूप आणि वय यावर अवलंबून असते.

मृत्युन्जय's picture

26 Jul 2010 - 4:49 pm | मृत्युन्जय

घटस्फोट घेणे हा पर्याय असला तरी तो तात्त्विक पातळीवर. तो प्रत्यक्षात आणण्यात जी गुंतागुत निर्माण झाली आहे त्याची आपण कल्पना करायचा प्रयत्न तरी केला आहे का

अगदी पुरेपुर प्रयत्न केला आणि लक्षात आले की आत्महत्या केल्यामुळे आता जे प्रश्न निर्माण झाले असतील ते खुपच भयानक असतील. त्यापेक्षा घटस्फोट हा एक बरा पर्याय होता. आणि घटस्फोट तर आताही होइल. म्हणजे आत्महत्येमुळे जे प्रश्न निर्माण झाले ते घटस्फोटामुळे निर्माण होणार्‍या गुंतागुंतीपेक्षा असेही जास्त आहेत.

युयुत्सु's picture

26 Jul 2010 - 6:16 pm | युयुत्सु

त्यापेक्षा घटस्फोट हा एक बरा पर्याय होता.

फार वरवरचा विचार करत आहात. घटस्फोट मिळणे हे अनेक घटकांवर अवलंबून असते. वकीलांनी स्वतःच्या अशीलासाठी किती गुंतागुंत निर्माण केली आहे हा त्यातला मोठ्ठा घटक असतो. न्यायाधीशाची मानसिकता हा दूसरा घटक असतो. प्रतिपक्षाचे डावपेच हा तिसरा घटक असतो. दोन्ही पक्षांचे न्यायालयातले वर्तन हा पण एक घटक असतो.

या केस मध्ये वाईटातले चांगले एवढेच की आत्महत्येमुळे मुलाची बाजु आता निश्चित भक्कम झाली आहे.

मृत्युन्जय's picture

26 Jul 2010 - 7:36 pm | मृत्युन्जय

घटस्फोटासाठी अर्ज केल्यावर ३९८अ लावता येते का? तो अर्ज केल्यानंतर पण केस स्ट्राँग झाली असतीच ना?घटस्फोट मिळणे न मिळणे ही दुसरी गोष्ट.

युयुत्सु's picture

26 Jul 2010 - 9:41 pm | युयुत्सु

भारतासारख्या देशात जिथे राष्ट्रपतींवर पकड वॉरट काढता येते, तेथे मेलेल्या नव-यावर पण ४९८-अ लावता येईल. कारण काय तर नवरा स्वप्नात येऊन छळतो म्हणून...

असो. माझ्या माहिती प्रमाणे judicial separation जो पर्यंत होत नाही तोपर्यंत काहीही करता येईल.

असा कोणताही नियम अस्तित्त्वात नाही. ४९८-अ प्रलंबित असल्यास घटस्फोटाच्या दाव्याची गुणवत्ता कुटुंब न्यायालयाने ठरविण्यास कशाचाही बाध येत नाही.

युयुत्सु's picture

27 Jul 2010 - 9:20 am | युयुत्सु

दिशाभूल चांगली करत आहात. वकीली करता असं दिसतय. भारतात नियम अस्तित्वात नसले तरी अनेक गोष्टी होऊ शकतात. या उदाहरणात स्त्रीवर अन्याय होऊ नये म्हणून घट्स्फोटाचा अर्ज प्रलंबित ठेवावा असा युक्तीवाद केला की न्यायालय लगेच पाघळते. कारण a man is guilty until proven innocent हे कुटुंब कायद्याचे आधार तत्त्व आहे.

शिल्पा ब's picture

27 Jul 2010 - 9:29 am | शिल्पा ब

<<a man is guilty until proven innocent हे कुटुंब कायद्याचे आधार तत्त्व आहे.

हे कशावरुन? .... बाकी तुमचा स्त्रीदुस्वास लक्षणीय आहे. असे का बरे?

युयुत्सु's picture

27 Jul 2010 - 10:01 am | युयुत्सु

फॅमिली कोर्टात चालू असलेल्या केसेस पैकी कोणतीही केस डोळे मिटून उचला. त्यात पुरुषाच्या बाजूने नैसर्गिक न्याय म्हणून किती विचार झाला हे मला सांगा.

बहुतांश स्त्रीया जर नवर-या कडे rapist म्हणुन बघत असतील तर तो दूस्वास नाही का? मी फकत कायद्याचा दुरुपयोग करणा-या स्त्रीयांचा दूस्वास केला कारण त्या काहीही करून नामानिराळ्या राहू शकतात.

शिल्पा ब's picture

27 Jul 2010 - 8:36 pm | शिल्पा ब

नवरा रेपिस्ट? अरे बापरे!!! हे तर पहिल्यांदाच ऐकतेय...आणि नवर्यालाच जर रेपिस्ट म्हणायचे तर शारीरिक भूक कोणाकडून भागवायची?
(आमचे आपले साधे सोपे प्रश्न असतात.)

मृत्युन्जय's picture

27 Jul 2010 - 10:15 am | मृत्युन्जय

हुंड्यासाठी नवर्‍याला जाळले जाण्याच्या घटना किती आहेत ते ही सांगा. बदफैली बायको आणि बदफैली नवरा यांचेही गुणोत्तर काढा. छळ करणारा नवरा आणि छळ करणारी बायको यांचेही गुणोत्तर काढा. एक उदाहरण पुरेसे नाही भाऊ.

४९८अ च्या मीही विरोधात आहे. पण ते वेगळ्या कारणांसाठी. त्याचा बायकांसाठी उपयोग होत असला असता तर मलाही आनंद होता. पण दुर्दैवाने त्याचा फायदा कोणालाच नाही. तोटा मात्र निरपराध्(काही)ससासरच्यांना (काही मुलीच्या सासरच्यांना) होतो आहे त्यामुळे मी त्याच्या विरोधात आहे.

याचा अर्थ असा मात्र नव्हे की संपुर्ण स्त्री जमात ४९८अ चा दुरुपयोग करत आहे. किंबहुना ज्यांनी केला पाहिजे त्या करत नाहीत. आणि केला तरीही तुम्ही मला मारलेत आता पोलिस तुम्हाला मारतील हा आनंद मिळण्याव्यतिरिक्त त्याचा काहीही फायदा होत नाही. पण हे ही निर्विवाद सत्य आहे की ९०% केसेस मध्ये विक्टीम ही स्त्रीच असते.

युयुत्सु's picture

27 Jul 2010 - 11:03 am | युयुत्सु

माझा एकच मूलभूत प्रश्नआ आहे जशा पुरुषांना आत्महत्येसाठी कारणीभूत होण्यासाठी शिक्षा आहेत तशा बायकाना का नाहीत?

तुम्हाला हवी असलेली सर्व गुणोत्तरे National Crime Beaurau च्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत

शानबा५१२'s picture

27 Jul 2010 - 12:29 pm | शानबा५१२

बाईचा त्रास झेपत नाही म्हणुन आत्महत्या करणारे जन्म होताच मरायला हवेत.
आणि असल्या पुरुषांचे(?) समर्थन करणा-यांच आश्चर्य वाटत.

युयुत्सु's picture

27 Jul 2010 - 1:13 pm | युयुत्सु

तुमची पुरुषत्वाची नक्की व्याख्या काय आहे?

शानबा५१२'s picture

27 Jul 2010 - 1:31 pm | शानबा५१२

सर्,एक स्त्री पुरुषाकडुन रक्षणाची अपेक्षा करते तेव्हा तिला धीट्,धाडसी कींवा कमीत कमी भेकड नसलेला पुरुष अपेक्षित असतो.आता हेच पुरुष स्त्रीचा अन्याय सहन करायला लागला तर?
आणि हो त्यांच्या आजुबाजुच वातावरण कसही असो त्यांना इतर पुरुषांकडे बघुन अन्यायाला तोंड देण्याची ताकद मिळायला हवी होती.
एखादा गे पुरुष व ह्यांच्यात काही फरक नाही.दोन्हीही तसे बनतात कारण त्यांना बनायच असत.
(इथे एक नमुद करावस वाटत की लैंगिक क्षमता व पुरुषार्थ ह्याची मी सांगड घालत नाही.एकदा झी मराठीवरच्या 'ह्याला जीवन ऐसे नाव' मधे एक माणुस आलेला त्याला त्याची बायको लाथाबुक्यांनी मारायची,त्याला दोन मुलगे होते.त्याने ते कॅमेरात शुट करुन टीव्हावर दाखवल होत.
असो,पण 'मला माझी बायको मारते' अस टीव्हीवर येउन सांगणारे महान रे बाबा!!)

युयुत्सु's picture

27 Jul 2010 - 2:15 pm | युयुत्सु

त्यांच्या आजुबाजुच वातावरण कसही असो त्यांना इतर पुरुषांकडे बघुन अन्यायाला तोंड देण्याची ताकद मिळायला हवी होती.

या विधानासाठी माझ्याकडे एकच विशेषण आहे ते म्हणजे 'बालिश'

शानबा५१२'s picture

27 Jul 2010 - 2:25 pm | शानबा५१२

ह्याला प्रेरणा घेण म्हणतात,तशी उदाहरणं आहेतच.
पण जर 'मीच खरा' हे पटवण्यासाठी तुम्हाला त्याला बालिश ठरवायच असेल तर......................
जय महाराष्ट्र,जय बिहार्,जय पंजाब्,जय हरीयाणा,जय आसाम्,जय पंजाब व जय बंगाल.

बाकी चालु द्या ही बकवास!!

तुमचं नाव या वर्षीच्या नोबेल पुरस्कारासाठी पाठवले जावे अशी मी जाहिर सूचना करतो.

शानबा५१२'s picture

27 Jul 2010 - 2:32 pm | शानबा५१२

नोबेलसाठी नाव सुचवणा-या पाच समितींमधे एकही भारतीय नाही.
वरुन आपण सुचवलत तर काय भलतच मत व्हायचं त्यांच!

युयुत्सु's picture

27 Jul 2010 - 1:41 pm | युयुत्सु

बाईचा त्रास झेपत नाही म्हणुन आत्महत्या करणारे जन्म होताच मरायला हवेत.

बाईचा त्रास झेपणार की नाही हे जन्मतः कसे ठरवणार?

बाईचा त्रास झेपणार की नाही हे जन्मतः कसे ठरवणार?

जॉक!!!

अवांतर : तुम्ही इतर चांगल्या विषयांवर चर्चा घडवुन आणु शकता मग काही ठराविक विषयांवरच मर्यादीत का राहता?