(केव्हा तरी पहाटे)

llपुण्याचे पेशवेll's picture
llपुण्याचे पेशवेll in जे न देखे रवी...
21 Jul 2010 - 7:29 pm

केव्हा भल्या पहाटे उठवून माय गेली
खुलले जराच डोळे वरडून माय गेली

सांगू तिला कसा मी वेळ गाढ झोपण्याची
उडवून शाल, पाणी शिंपडून माय गेली

कळले मला न केव्हा चढली रात्री जराशी
कळले परि मला हो भडकून माय गेली

उठले घरात काही आवाज भांडणाचे
पेले चा-पाण्याचे आपटून माय गेली

स्मरते मला न तेव्हा वदलो मी काय रात्री
मग वेळ मेसेजाची दाखवून माय गेली

(काल रात्री घरी यायला अंमळ उशीर झाल्याने चिडलेल्या आमच्या आईने सकाळी लवकर न उठण्यावरून आमची चांगली हजेरी घेतली. त्यावेळच्या समर प्रसंगाचे हे संक्षिप्त वर्णन.)

**अन्यत्र पूर्वप्रकाशित

विडंबन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

21 Jul 2010 - 7:46 pm | श्रावण मोडक

पुन्हा वाचण्याचा आनंद मिळाला.

Dhananjay Borgaonkar's picture

21 Jul 2010 - 8:04 pm | Dhananjay Borgaonkar

वा पु.पे बुधवारच्या कविता मंगळ्वारी येऊ लागल्या.
छान आहे कविता.

---------------
धनंजय बोरगांवकर

गणपा's picture

21 Jul 2010 - 8:21 pm | गणपा

हा हा हा
=)) =)) =))
पुपे परत वाचली पण यावेळी अजुन मज्जा आली.
(तुमच रुपड डोल्या म्होर उब र्‍हायल बगा या येळी.)

मेघवेडा's picture

21 Jul 2010 - 8:32 pm | मेघवेडा

हाहाहा! असेच म्हणतो!

=)) =))

प्रभो's picture

21 Jul 2010 - 8:34 pm | प्रभो

लै भारी रे पुप्या!!

टुकुल's picture

21 Jul 2010 - 8:48 pm | टुकुल

लै भारी रे..
आधी पण वाचली होती आणी आता परत वाचली.

--टुकुल

मीनल's picture

22 Jul 2010 - 2:22 am | मीनल

ही ही ही ही ही :))
मायच्या आयडिया मस्त आहेत.
अजमावून पहायला हव्यात.

पण आमच्या घरात सर्वात उशीरा उठणारी मीच आहे. :$
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

राजेश घासकडवी's picture

22 Jul 2010 - 5:04 am | राजेश घासकडवी

अजून येऊ द्यात.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

22 Jul 2010 - 5:14 am | डॉ.श्रीराम दिवटे

केव्हातरी असंही होऊ द्यायचं असतं. उशिरा उठत चला पण लिखाणाच्या बाबतीत नको. कारण आपण पुण्याचे!

*************************************
माझं पुस्तक, माझा ब्लॉग.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2010 - 7:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे पुपे लगे रहो.........! :)

-दिलीप बिरुटे

विकास's picture

22 Jul 2010 - 9:10 am | विकास

मस्तच! याचे कोणीतरी रसग्रहण करावे ;) (का कवितेच्या मुळाशी रसग्रहणच आहे? :?)

सहज's picture

22 Jul 2010 - 9:31 am | सहज

पुपे पुन्हा वाचायला मजा आली. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2010 - 10:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पेशव्या, पुन्हा एकदा वाचायला मजा आली.

अदिती

Nile's picture

22 Jul 2010 - 10:45 am | Nile

हेच म्हंतो.

या निमित्ताने पुप्याने बुधवारचे सदर पुन्हा सुरु करावे.

-Nile

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

22 Jul 2010 - 10:27 am | जाई अस्सल कोल्हापुरी

हे रा़क्षसी हास्य होते....!
....अशी अस्सल हजेरी.....कोणी घेतली नाहि हो बरेच दिवसात... एकदम आठ्वण आली....
.....उद्या होउनच जाउ दे!....

अवलिया's picture

22 Jul 2010 - 10:56 am | अवलिया

मस्त

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

शुचि's picture

22 Jul 2010 - 5:50 pm | शुचि

मस्त! ह ह पु वा.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

टिउ's picture

22 Jul 2010 - 7:31 pm | टिउ

मस्तच!

यावर उपाय म्हणजे रात्री घरी यायला उशीर झाला न झाला तरीही सकाळी लवकर उठू नये!

धनंजय's picture

22 Jul 2010 - 8:31 pm | धनंजय

ताजा अनुभव, स्वानुभव, प्रामाणिक कथन हे सर्व असल्यामुळे हे विडंबन नेहमीच्या धोधो विडंबनांपेक्षा वेगळे आहे.
आवडले.

शानबा५१२'s picture

22 Jul 2010 - 8:37 pm | शानबा५१२

मस्त!

_________________________________________________
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

चतुरंग's picture

22 Jul 2010 - 8:39 pm | चतुरंग

वेगळेच विडंबन. ;)

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jul 2010 - 8:47 pm | llपुण्याचे पेशवेll

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील