तारकर्ली - कोकण

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in कलादालन
13 Jul 2010 - 5:27 pm

तारकर्लीचा स्वच्छ पांढर्‍या रेतीचा समुद्रकिनारा

तारकर्लीचे एमटीडीसी रेसोर्ट

समुद्रकिनार्‍यावरुन एक रम्य सुर्यास्त

मालवण ते पोलाद्पुर रस्त्यावर - बहुधा बॅकवॉटर असावे. पाण्याने दुथडी भरुन वाहणारी नदी एरव्ही महाराष्ट्रात कुठुन बघायला मिळणार?

नदीच्या किनारी वसलेले एक टुमदार गाव

प्रवास

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

13 Jul 2010 - 5:35 pm | महेश हतोळकर

मस्त फोटो आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Jul 2010 - 5:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त आहेत फोटो! तथाकथित बॅकवॉटर, टुमदार गाव आणि सूर्यास्त विशेष आवडले.
अवांतरः गुरूदक्षिणा कधी रे देणार?

अदिती

सुनील's picture

13 Jul 2010 - 6:01 pm | सुनील

सुंदर फोटो.

बॅकवॉटरला मराठीत खाडी म्हणतात.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अर्धवट's picture

14 Jul 2010 - 8:25 am | अर्धवट

>>बॅकवॉटरला मराठीत खाडी म्हणतात.

धरणाचं असेल तर फुगवटा म्हणतात.

मस्त फोटो.

श्रावण मोडक's picture

14 Jul 2010 - 8:13 pm | श्रावण मोडक

मग पाणलोट कशाला म्हणतात?
फुगवटा हा बाकी टिपिकल सरकारी शब्द आहे!

चतुरंग's picture

14 Jul 2010 - 10:42 pm | चतुरंग

पाणलोट क्षेत्र - नदीच्या खोर्‍यात धरणामागे जिथे जिथे म्हणून पावसाचे पाणी उपनद्या, नाले, ओहोळ किंवा तत्सम स्रोतातून मुख्य धारेत जमा होईल असे क्षेत्र!

चतुरंग

संदीप चित्रे's picture

13 Jul 2010 - 8:53 pm | संदीप चित्रे

एमटीडीसी रिसॉर्टबद्दल अधिक माहिती व्यनि कराल का?

पक्या's picture

14 Jul 2010 - 7:50 am | पक्या

वा सुरेख आहेत सर्व फोटोज.
तारकर्ली नेमके कुठे आहे आणि कसे जायचे तिथे सांगाल का?

जय महाराष्ट्र , जय मराठी !

सहज's picture

14 Jul 2010 - 8:11 am | सहज

लहान मुलांना खेळ, मनोरंजनाकरता काही विशेष सुविधा आहेत काय?

मृत्युन्जय's picture

14 Jul 2010 - 1:39 pm | मृत्युन्जय

लहान मुलांसाठी विशेष असे काही नाही. सुंदर समुद्रकिनारा हेच आकर्षण. मुले धाडसी असतील तर स्नोर्केलिंग मात्र नक्की करता येइल. त्यात धोका असा काही नसतो. आणि मुलांना प्रत्यक्ष मासे बघताना खुप मजा येइल हे नक्की.

स्पंदना's picture

14 Jul 2010 - 8:26 am | स्पंदना

तुम्हाला डॉल्फिन दाखवायला नाही नेल?
आम्हाला नेल १००० चा गण्डा!!
एक ही डॉल्फिन नाही दिसला.

पण सोलकढी आणी घावन झकास.

फोटोज फार छान आलेत.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

अमोल केळकर's picture

14 Jul 2010 - 10:28 am | अमोल केळकर

तारकर्ली हा एक माझा अतिशय आवडता समुद्र किनारा आहे
फोटो छानच आले आहेत

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

नेहमी आनंदी's picture

14 Jul 2010 - 10:37 am | नेहमी आनंदी

हे स्थान नक्की कुठे आहे??
अनभिद्य्न

आनंदी :W

डोमकावळा's picture

14 Jul 2010 - 10:45 am | डोमकावळा

खास करून सूर्यास्ताचे खूपच छान...
या ठिकाणा बद्दल अजून माहिती मिळाली तर बरे होईल...
साधारण पणे इथे कसे जायच, रहाण्याच्या व्यवस्था, आजूबाजूला अजून काही पहाण्यासारखे आहे का वगैरे वगैरे....

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

Dhananjay Borgaonkar's picture

14 Jul 2010 - 11:16 am | Dhananjay Borgaonkar

फोटो छान आले आहेत :)
एम्.टी.डी.सी. चा फोन नंबर असल्यास व्यं नि कराल काय?

प्रमोद्_पुणे's picture

14 Jul 2010 - 11:39 am | प्रमोद्_पुणे

तालुक्यापासून ६-७ कि.मी. वर आहे. फारच सुंदर आहे समुद्रकिनारा..

बाकी पॅरी आपल म्रुत्युंजय फटू छानच..परत एकदा जावेसे वाटत आहे.
ते देवबागचे पण टाक ना. आपण त्या मालवणमधल्या एकमेव शाकाहारी खानावळीचे सर्वेसर्वा मा. श्री. वझे यांचा फटू काढायला हवा होता.. #:S काय अवलीया होता तो..

आता आंबाचे पण नक्की टाक दुसरा धागा काढून..

मृत्युन्जय's picture

14 Jul 2010 - 1:33 pm | मृत्युन्जय

अर्रे देवबागचे फाटु कुठे आहेत मरायला माझ्याकडे? कार्यालयीन कामकाजानिमित्त भ्रमणदुरध्वनी यंत्राला नव्हतो का चिकटुन बसलो? हा देवबाग म्हणजेच डोल्फिन पोईंट ना?

प्रमोद्_पुणे's picture

14 Jul 2010 - 7:28 pm | प्रमोद्_पुणे

डॉल्फीन चा वेगळा.. देवबाग म्हणजे ती नदी समुद्राला मिळते तो पॉइंट. ते फटु बहुदा माझ्याकडे आहेत. टाकतो मी.

मेघवेडा's picture

14 Jul 2010 - 8:22 pm | मेघवेडा

हा हा हा! एकमेव 'शुद्ध शाकाहारी' खानावळ म्हणा.. बाकी वझे साला खरंच अवलिया आहे! जोरदार चालते हां त्याची खाणावळ.
फटु बाकी प्रदर्शन भरोण्याच्या लायकीचे आसंत हा मालकानुं! मस्तच! :)

बाकी मालवण-पोलादपूर डायरेक रस्ता केव्हापासून झाला ब्वॉ? ;)

प्रमोद्_पुणे's picture

14 Jul 2010 - 10:30 pm | प्रमोद्_पुणे

आम्ही : आम्ही ७ जण आहोत. आत्ता जेवण मिळेल का?
वझे: किती जण आहात?
आम्ही: ७
वझे: ७?? (हो दचकताय का असे ७ च ७० नाही) नाही वेळ लागेल. सगळा स्वयंपाक संपला आहे.
आम्ही: किती वेळ लागेल? आम्ही थांबू.
वझे: सांगता येत नाही. वेळ लागेल.
आम्ही: काय काय देणार आणि?
वझे: आमच्या इथे फक्त २ पोळ्या, १ भाजी, भात आणि आमटी मिळते.
आम्ही: मग आम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी येणार असू तर कधी निरोप द्यावा लागेल?
वझे: संध्याकाळी येणार असाल तर मला ४ वाजेपर्यंत सांगा.
आम्ही: ठिक आहे आम्ही येतो संध्याकाळी. काजूची उसळ मिळेल ना? आणि उकडीचे मोदक?
वझे: हा सिजन ओल्या काजूंचा नाही. तेंव्हा काजूची उसळ मिळ्णार नाही. इतर ठिकाणी विचारा. ते कदाचित देतीलही पण चविची हमी देता येणार नाही. भाजी सुधा जी बाजारात उपलब्ध असेल तीच मिळेल. उगाच हीच हवी तिच हवी असे चालणार नाही. उकडीचे मोदक कुठे असे लगेच सांगून मिळतात का? तो तांदूळ धुवावा लागतो, वाळवावा लागतो, त्याची पिठी करावी लागते, नारळ खवणावा लागतो, सारण बनवावे लागते तेंव्हा कुठे मोदक होणार. मोदक हवे असतील तर निदान २ दिवस आधी सांगावे लागेल.
मग सांगा येणार आहात का संध्याकाळी?
७ही "पुणेकर" धारातीर्थी... आणि उगाच लोक पुण्यातल्या दुकानदारांना काहीबाही बोलतात. आहे का वझेंना competition?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 10:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तो म्रुत्युंजय बाटगा बारा गावचं पाणी प्यायलेला आहे, पुणेकर नाही काय तो!!

७ही "पुणेकर" धारातीर्थी

धारातीर्थी का हो, पुण्याबाहेरच्याने अशी इरसाल उत्तरं दिली म्हणून का?

अदिती

प्रमोद्_पुणे's picture

14 Jul 2010 - 10:41 pm | प्रमोद्_पुणे

अशी उत्तरे एकदम अनपेक्षीत होती आणि जाम भूक लागली होती त्यामुळे प्रत्युत्तरे सुधा नाही देता आली.. पण आता मात्र हा किस्सा आठवूनआठवून अजूनही हसतो. बाकी म्रुत्युंजय आता बरीच वर्षे तरी पुण्यातच आहे की.. म्हणजे पुण्यातलाच.

मेघवेडा's picture

14 Jul 2010 - 10:50 pm | मेघवेडा

नेमका पुणेकरांनाच बरा बोलला असं. हुश्शार आहे म्हणायचा. ;) आम्हाला कधीच असं बोलला नाहीये! :D

अस्मी's picture

14 Jul 2010 - 12:11 pm | अस्मी

एकदम मस्त...सूर्यास्ताचा फोटो तर अप्रतिम!!

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

विसोबा खेचर's picture

14 Jul 2010 - 1:06 pm | विसोबा खेचर

सुरेख..

मृत्युन्जय's picture

14 Jul 2010 - 1:13 pm | मृत्युन्जय

तारकर्ली पुण्यापासुन साधारण ३५० किमी अंतरावर आहे. पुणे - सातारा - कोल्हापुर - गगनबावडा - मालवण - तारकर्ली हा सर्वात चांगला रस्ता आहे. साधारण ८ तास लागतात कारण कोकणातले रस्ते खराब आहेत. संध्याकाळी ६.३० च्या आत तारकर्ली ला पोचाल अश्या अंदाजाने निघावे कारण ५० किमी चा शेवटचा पॅच खुपच एकाकी असतो. कोल्हापुरला दर्शन घेउन जाण्याचा प्लॅन असेल तर सकाळी ७ वाजताच पुण्याहुन निघणे उत्तम. दर्शनात थोडा वेळ जाऊ शकतो.

राहण्यासाठी एमटीडीसी सर्वोत्तम जागा. दिवसाला १८०० रुपये या दराने खोली मिळु शकते. राहण्याची व्यवस्था उत्तम आहे. रिसोर्टबद्दल खास गोष्ट म्हणजे रिसोर्ट हे अगदी बीच वर आहे. मध्ये डांबरी रस्ता देखील नाही. दारातुन थेट बीच वर. बुकिंग इथे करता येईलः

http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/mtdcrrs/Common/TariffChart.asp...

समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आहे. रेती पिवळी नसुन पांढरी आहे हे अजुन एक वेगळेपण. मालवण तारकर्ली पासुन केवळ ६ किमी वर आहे. तिथे स्नोर्केलिंगची उत्तम सुविधा आहे (म्हणजे पाण्याखाली जाउन रंगीबेरंगी मासे बघायचे. याच्यासाठी पोहता येण्याची गरज नसते. पाणी उथळ असल्यामुळे केवळ पाण्यात डोके घालुन बघितले तरी मासे दिसतात). डोल्फिन पोईंट देखील तारकर्ली पासुन जवळ आहे. डोल्फिन दिसण्याची मात्र काही शाश्वती नाही.

जाण्यासाठी उत्तम वेळ ओक्टोबर ते मार्च. उन्हाळ्यात जाण्याचे धाडस मात्र करु नये. फेब्रुवारी - मार्च मध्ये जायचे असेल तर वातानुकुलीत खोली मिळवणे उत्तम.

जेवणासाठी शाकाहारी लोकांसाठी फारश्या जागा नाहीत. एमटीडीसी किंवा मालवण मध्ये कामत या २ जागा बर्‍या आहेत. मालवण मधुन मसाले जरुर विकत घ्यावेत.

ऋषिकेश's picture

14 Jul 2010 - 2:24 pm | ऋषिकेश

तार्कर्ली जवळ स्कुबा डायविंगची सोय आहे असे ऐकले आहे. त्याबद्दल काहि माहिती देऊ शकाल का?
ती सोय असल्यास या दिवाळीत जायचा मानस आहे.. बघु जमते का!

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

जागु's picture

14 Jul 2010 - 2:56 pm | जागु

खुपच सुंदर देखावे आहेत.

मृत्युन्जय's picture

14 Jul 2010 - 3:08 pm | मृत्युन्जय

हेमंत नावाच्या माणसाला ९९२३५१५९७० या नंबरवर फोन करा. तो कदाचित पुर्ण माहिति देउ शकेल स्कुबा डायव्हिंग आणि स्नोर्केलिंग साठी. गेलो होतो तेव्हा घेऊन ठेवला होता. स्कुबा डायव्हिंगची सोय आहे तिथे हे मात्र नक्की. मालवण समुद्रकिनार्‍यावरुनच निघतात बोटी त्या साठी.

ऋषिकेश's picture

14 Jul 2010 - 6:18 pm | ऋषिकेश

अनेक आभार. नंबर साठवला आहे

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

अरुंधती's picture

14 Jul 2010 - 6:48 pm | अरुंधती

मस्त आहेत फोटो! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/