ई टिव्ही मराठी वरची मालिका: श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
5 Jul 2010 - 10:14 pm
गाभा: 

ई टीव्ही मराठी वर सोम- शुक रात्री ९:०० वाजता "श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी" ही मालिका सुरू झालेली आहे.
नितीन चंद्रकांत देसाईंनीच ही सुद्धा मालिका बनवली आहे. त्यांची यापूर्वीची मालिका "राजा शिवछत्रपती" ही स्टार प्रवाह वरून प्रसारित व्हायची आणि ती गाजली असून त्याच्या आता डी.व्ही.डी. सुद्धा निघाल्यात.

"श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी"ही मालीका सुद्धा नक्कीच छान जमून आली आहे असे माझे मत आहे.

मालिकेची मला जाणवलेली वैशिष्ट्ये-
- श्रीमंत निर्मिती मूल्ये
- चित्रपटाला लाजवेल असे भव्य सेट
- थरारक, जीवंत युद्धचित्रण
- सर्वच कलाकारांची उत्तम निवड
- बाजीरावाची संवाद्फेक उत्तम आणि लाजवाब
- कथेची उत्तम मांडणी

जे बघत नसतील त्यांनी ही मालीका बघावी असे सुचवावेसे वाटते.
मिसळपाव वरचे जे सदस्य ही मालीका बघत असतील तर येथे त्या मालिके विषयी, त्यातील पात्रां विषयी, इतर संबंधीत गोष्टी आणि त्या अनुषंगाने मूळ कथा या संदर्भात चर्चा करण्यासाठी हा प्रस्ताव.

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

6 Jul 2010 - 6:28 pm | अमोल केळकर

ही मालिका चांगली आहे

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पक्या's picture

7 Jul 2010 - 12:51 am | पक्या

अरे वा. चांगली असेल मालिका तर बघायला हवी. माहितीबद्द्ल धन्यवाद.
मागे बर्‍याच वर्षापूर्वी दूरदर्शन वर बहुधा, बाजिराव मस्तानी ही स्मिता तळवलकरांची मराठी मालिका आलेली होती. त्यात मनोज जोशी बाजीराव तर अश्विनी भावे नी मस्तानी ची भूमिका केली होती.
आताच्या मालिकेत बाजिराव मस्तानी च्या भुमिका कोण करत आहेत?
महाराष्ट्र , जय मराठी !

सविता's picture

7 Jul 2010 - 10:08 am | सविता

ती राऊ मालिका होती आणि ना.स्.इनामदारांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित होती.

------------
आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा......

जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....

पक्या's picture

7 Jul 2010 - 9:55 pm | पक्या

हो बरोबर ..राऊ नाव होते त्या मालिकेचे.

आताच्या मालिकेतील कलाकार ठीक वाटले. बाजिराव मस्तानी जरा तरी बरे पण ती काशिबाई झालेली अभिनेत्री काशिबाई म्हणून अजिबात शोभत नाहिये.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

स्पंदना's picture

7 Jul 2010 - 10:50 am | स्पंदना

हो! मला पण हेच विचारायच आहे..मस्तानी कोण आहे?
आणी काशीबाई (हेच नाव ना त्यांच्या पत्नीचे?) कोण?

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

आवडाबाई's picture

7 Jul 2010 - 3:11 pm | आवडाबाई

बाजीराव - अंगद म्हसकर
मस्तानी -प्रचिती म्हात्रे
काशीबाई - स्मिता शेवाळे

कुठेतरी वाचले की, मालिका पूर्णपणे बाजीराव मस्तानी ह्यांच्या प्रेमकहाणीवरच आहे

मालिकेत दाखिवल्याप्रमाणे ह्या दोघांचं काही लग्नाआधी प्रेम वगैरे नव्हतं, हे लग्न बाजिरावने १००% राजकारणासाठी केलं होतं.
मग त्यांचं प्रेम लग्नानंतर (तरी) झालं का ? की नेहेमीच राजकारणच राहिलं (निदान बाजीरावासाठी तरी) ? जाणकार खुलासा करतील काय ?

टारझन's picture

7 Jul 2010 - 3:16 pm | टारझन

"होल अँड सोल" हा शब्दप्रचार कसा ईण्व्हेंट झाला असेल बरं ?

पुष्करिणी's picture

8 Jul 2010 - 1:03 am | पुष्करिणी

मस्तानीशी लग्नात काय राजकारण होतं? ती राजकुमारी वगैरे नव्हती ना....

पुष्करिणी

टारझन's picture

8 Jul 2010 - 12:49 am | टारझन

श्या !!! आमच्या शेजारी येणार्‍या कामवालीला उत्तम मेकप केला तर हिच्यापेक्षा बरीच उजवी दिसल ती :)

-(कामगार) टारझन फर्णांडिस

मैत्र's picture

7 Jul 2010 - 3:31 pm | मैत्र

भव्य सेटस आणि वेषभूषा हे सोडता रुचली नाही.
थोरल्या बाजीरावांचे वर्णन सहसा त्यांच्या उत्तम शरीरसंपदा, भारदस्त आणि छाप पाडणारे व्यक्तिमत्व आणि सहज नेतृत्व या गोष्टींनी भरलेले असते. सिरियल मधील बाजीराव, सवाई माधवरावा प्रमाणे मृदू, कृश अंगकाठीचे वाटतात. मस्तानी आयुष्यात नंतर आली. तोवर बाजीरावाचा जम बसला होता. राखो बाजी लाज म्हणणार्‍या बुंदेलांकडून आलेली मस्तानी बाजीरावाच्या मर्दानी देखणेपणाला आणि सरळ वृत्तीला भाळली असावी. (विशेष इतिहास माहीत नाही. आणि इथे अनेक मतभिन्नता आहेत. मूळात पूर्ण मस्तानी प्रकरणाबद्दल बरेच वाद आहेत. मस्तानी होती. कोथरूडच्या बागेत आणि नंतर काही काळ वाड्यात आणि शेवट पाबळला झाला असे काही मान्य संदर्भ आहेत).
त्या मानाने बाजीराव शोभत नाही मालिकेत.

राऊ मध्ये - मनोज जोशी होता. ग्रेट नाही पण किमान त्या व्यक्तिमत्वाला योग्य असा. आणि मस्तानी बद्दल क्या कहने!!
त्यापुढे हे लहान वाटतात दोघेही.

प्रमोद्_पुणे's picture

7 Jul 2010 - 4:07 pm | प्रमोद्_पुणे

अत्यंत टुकार..भव्य सेटस आणि वेषभूषा उत्तम.. कलाकार अगदीच यथातथा (विशेषकरून बाजीराव आणि मस्तानी)..

पुष्करिणी's picture

8 Jul 2010 - 12:34 am | पुष्करिणी

+ १, असंच म्हणते
पुष्करिणी

विशाल कुलकर्णी's picture

8 Jul 2010 - 10:32 am | विशाल कुलकर्णी

१००% सहमत ! खासकरुन बाजीराव .... "बाजी" वाटतच नाही. तो फारतर नारायणराव वाटू शकेल. आणि मस्तानीच्या रुपात अश्विनी भावेला पाहिले असल्याने ही मस्तानी कायतरीच वाटते.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

जे.पी.मॉर्गन's picture

8 Jul 2010 - 10:57 am | जे.पी.मॉर्गन

एकच भाग पाहिला... मस्तानीला पुण्यात आणतानाचा. साधारण १४ लोकं होती त्या मिरवणुकीत. डोंबल भव्य!

बाकी बाजीराव आणि मस्तानीबद्दलच्या कमेंट्सशी १४१.२९ टक्के सहमत!

जे पी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jul 2010 - 11:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी बाजीराव आणि मस्तानीबद्दलच्या कमेंट्सशी १४१.२९ टक्के सहमत!

जेपी, तुमच्याकडून १४९.२९% वर एरर किती आहे हे ही देण्याची अपेक्षा होती! ;-)

मी टीव्हीपासून आलिप्त असल्याने बाजीराव हंक नसला (अगदी आमच्या जॉनसारखा) तरी मला काहीही फरक पडत नाही.

(३_१४ खोडसाळ) अदिती

जे.पी.मॉर्गन's picture

8 Jul 2010 - 12:20 pm | जे.पी.मॉर्गन

एरर... आमच्या कमेंट्सचं सुद्धा सिक्स सिग्मा केलंय आम्ही. तो बाजीराव म्हणजे शनिवारी उपास करून शनीचा काटा काढण्यासाठी शनिपाराला जाऊन, भिकारदास मारुती करून शनिवारवाड्यात परत जात असेल असा वाटतो. मस्तानी बद्दल न बोलणे बरे. सुजाताची मँगो मस्तानी हिच्यापेक्षा कधीही चांगली.

जे पी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jul 2010 - 2:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =))

असं असेल तर आम्ही "जॉनप्रेमी"च बरे! ;-)

अदिती

कवितानागेश's picture

8 Jul 2010 - 11:20 am | कवितानागेश

हल्ली सगळ्या बायका-मुली एकसारख्या का दिसतात?
.......आणी सगळ्याच 'भय्याणी' भासतात.
ती झाशीची राणी पण मराठी दिसत नाही!
ही मस्तानी कॉलेज क्वीन दिस्तेय.
..मला शन्का येते, एकन्दरीत मनुष्यप्राण्यात काही 'जेनेटिक' बदल होत आहेत की काय?
============
( पारशी दिसणारी) मराठी माउ

पुष्करिणी's picture

8 Jul 2010 - 2:08 pm | पुष्करिणी

पण मस्तानी बहेनजीच होती ना ?

पुष्करिणी