हे आहेत बोंबिल
कालवणाचे साहित्य :
१ ते २ वाटे बोंबील ( डोके व शेपटी कापुन, स्वच्छ करुन.)
लसूण - ८-१० पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
१ ते २ चमचे मसाला
चिंचेचा कोळ
चविपुरते मिठ
१ मिरची मोडून
थोडी कोथिंबीर
तेल.
कालवणाची कृती :
तेलावर लसणाची फोडणी द्यायची मग त्यावर हिंग, हळद, मसाला, चिंचेचा कोळ टाकुन बोंबील टाकायचे. गॅस बारिक ठेवायचा. गॅस मोठा केला की बोंबील तुटतात. मग उकळी आली की त्यात मिठ, मोडलेली मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घालायची. व २ ते ३ मिनीटांत गॅस बंद करायचा.
तळण्यासाठी लागणारे साहित्य :
बोंबिल ५-६ साफ करुन
लसुण किंबा आल लसुण पेस्ट
हिंग, हळद,
२ चमचे मसाला
मिठ
तांदळाचे पिठ किंवा रवा
तेल.
तळण्याची कृती :
बोंबलाला आल लसुण पेस्ट, हिंग, हळद, मसाला मिठ लावुन ठेवावे. मग रवा किंबा तांदळाच्या सुक्या पिठात हे घोळून मिडीयम गॅस वर तळावेत. जर आल लसूण पेस्ट नसेल तर तेल तव्यात टाकल्यावर लसूण टाकावा व मग तळावेत.
अधिक टिपा :
पावसाळ्यात भरपुर प्रमाणात आणि एकदम फ्रेश बोंबील येतात.
वरील कालवण फोडणी न देता करण्याचीही पद्धत आहे. म्हणजे सगळ एकत्र करायच त्यावरच तेल टाकायच आणि फक्त उकळवायच. हेही खुप छान लागत.
तळलेले बोंबील खुपच रुचकर लागतात. अगदी नुसते सुद्धा मटकावता येतात.
बोंबील घेताना छोटे, मिडीयम फोटॉत दाखवल्याप्रमाणे घ्यायचे. जाड्या बोंबलांना जास्त चव नसते.
काही जण पाट्याखाली ठेवतात बोंबील मग त्यातल सगळ पाणी निघुन गेल की ते तळतात. ह्या प्रकारचेही खुप खरपुस लागतात.
प्रतिक्रिया
28 Jun 2010 - 12:50 pm | चिरोटा
मस्त्.आमटीतले बोंबील म्हणजेच कालवण का? ही आमटी हिरव्या रंगाची असते.सुके बोंबीलपण रुचकर असतात पण वास असह्य असतो.
P = NP
28 Jun 2010 - 12:57 pm | विसोबा खेचर
इथे शब्द संपतात..
28 Jun 2010 - 1:10 pm | गणपा
खल्लास!!!!!
हे पण नाही मिळत इथे :(
28 Jun 2010 - 6:12 pm | शुचि
बोंबील म्हणजे बाँबे डक :)
ते मुंबई खेरीज कुठेच मिळणार नाहीत.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
28 Jun 2010 - 6:40 pm | गणपा
अगो शुची तै दुबईला मिळायचे मला.
हा आता गावाला मिळतात तसे ताजे फडफडित नाही पण चालुन जायचे.
4 Jul 2010 - 10:03 am | प्रभाकर पेठकर
आख्या कोकणात, गोव्यात, पुण्यात तर मिळतातच पण मस्कतमध्येही मिळतात.
------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
28 Jun 2010 - 1:20 pm | सहज
छान पण कालवणाचाही फोटो टाका ना.
28 Jun 2010 - 4:45 pm | सुनील
तळलेल्या बोंबलांवर आमचा फार जीव!
मात्र काही ठिकाणी तळण्यापूर्वी त्याचे पाणी सगळे काठून अगदी पापडासारखे पातळ कुरकुरीत करतात. ते बरे लागत नाहीत. थोडातरी मांसल भाग राहीला पाहिजे!
बोंबलाच्या कालवणाला आमच्याकडे भुजणं म्हणतात. तेही अप्रतिमच!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Jun 2010 - 6:45 pm | प्रियाली
आंबट-तिखटातल्या आणि तळलेल्या बोंबलांवर फारच जीव.
सहमत. सगळे पाणी काढून टाकलेले बोंबिल खाण्यापेक्षा सुके बोंबिल बरे.
29 Jun 2010 - 5:03 am | लवंगी
बाकि जागु तुझ्या पोटात आज दुखणार आहे.. बोंबिल म्हणजे जीव कि प्राण.. पण इथे मिळत नाहि :(
28 Jun 2010 - 9:30 pm | विसोबा खेचर
ऑ? ;)
28 Jun 2010 - 6:19 pm | आशिष सुर्वे
संपलो!!
कोकण्याला अजून काय हवेय ओ!!
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
29 Jun 2010 - 11:03 am | जागु
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
सहज आता परत आणले की कालवण आणि तळलेल्या बोंबलांचे फोटो टाकेन.
प्रियाली, सुनील मलाही जास्त कुरकुरीत नाही आवडत. मी पण पाणी न काढताच करते.
लवंगी काल पोटात दुखल मग मी लवंग खाल्ल. #:S
आशिश अजुन कोकण्यांना लागणार टाकतेय मी हळू हळु.
भेण्डीबाजार, तोही रस्सा मी करते कधी कधी. फक्त मिरची , खोबर धणे, लसुण घालून वाटण करुन करतात तेच ना. तेही छान लागत.
विसोबा धन्यवाद.
शुची अग अलिबागला सुद्धा मिळतात बोंबील. ते नावाप्रमाणे नाहीत.
गणपा आता गावाला जात तेंव्हा ताजे फडफडीत बोंबील आणुन खा आधी.
30 Jun 2010 - 3:40 pm | निखिलराव
च्या मारी धरून फट्याक
30 Jun 2010 - 4:00 pm | आशिष सुर्वे
>>
धन्यवाद जागु तै!
'भरलेला पापलेट' जमल्यास येऊदेत की..
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
30 Jun 2010 - 4:12 pm | जागु
निखिलराव धन्यवाद.
आशिश टाकते हळू हळू.
1 Jul 2010 - 4:18 pm | स्वातीदेव
शुची
मला अमेरीकेत पण मिळाले होते बोंबील. चायनीज मार्केट मध्ये मिळतात कधीकधी.