From bisuit shevpuri 2
साहित्य :
From bisuit shevpuri 2
कांदा, टमॅटो बारिक चिरावे.
From bisuit shevpuri 2
उकडलेले बटाटे मॅश करावेत.
From bisuit shevpuri 2
गोड चटणी : खजूर, चिंच, लाल तिखट, मीठ, गूळ, जीरे भिजवून एकत्र वाटून घ्यावे.
From bisuit shevpuri 2
हिरवी चटणी : कोथिंबीर, पुदीना, मिरची, मीठ एकत्र वाटून घ्यावे.
From bisuit shevpuri 2
मोनॅको बिस्किटं, बारिक शेव
From bisuit shevpuri 2
प्रथम मोनॅको बिस्किटं ताटलीत घ्यावीत.
From bisuit shevpuri 2
त्यावर उकडलेला बटाटा ठेवावा.
From bisuit shevpuri 2
त्यावर चिरलेले कांदा, टमॅटो ठेवावेत.
From bisuit shevpuri 2
त्यावर दोन्ही चटण्या घालाव्यात.
From bisuit shevpuri 2
त्यावर बारिक शेव घालावी. चवीपुरतं मीठ, कोथींबीर घालावी.
प्रतिक्रिया
28 Jun 2010 - 11:46 am | सहज
छान!
28 Jun 2010 - 12:02 pm | निखिलराव
वा!
28 Jun 2010 - 12:07 pm | अमोल केळकर
मस्त आयडिया.
गोल पुरीतून ( पाणी पुरीच्या ) मिळणार्या शेवपुरीला चपट्या पुरीची सर नाही. मात्र बिस्किटाचा पर्याय मस्तच :)
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
28 Jun 2010 - 12:19 pm | परिकथेतील राजकुमार
खायला कधी येऊ ??
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
28 Jun 2010 - 12:28 pm | सुप्रिया
:)
पुणे-मुंबई प्रवासखर्च जमेस धरता तुम्हाला पुण्यातच् शेवपुरी स्वस्तात पडेल.
28 Jun 2010 - 1:41 pm | टारझन
मला परवडेल पुणे - मुंबै :) मी कधी येऊ ? :) अंमळ मोघम बनवा मात्र :)
28 Jun 2010 - 2:12 pm | सुप्रिया
बापरे! टारझनची ड्र्मभर भेळेची रेसिपी आठवली. :)
"अंमळ मोघम बनवा मात्र "
- हा धोका लक्शातच आला नव्हता.
:S
28 Jun 2010 - 12:25 pm | विसोबा खेचर
लै भारी गं.. :)
तात्या.

28 Jun 2010 - 12:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मलापण, मलापण हवी!
अदिती
28 Jun 2010 - 12:43 pm | सुप्रिया
:) नेदरलँडवरून येताना वाट वाकडी करून मुंबईला ये, तुलापण देते.
28 Jun 2010 - 1:02 pm | जागु
अरे वा. खुपच छान. लहान मुलांना वेगळीच बिस्किट पुरी छान आहे.
28 Jun 2010 - 1:02 pm | जागु
अरे वा. खुपच छान. लहान मुलांना वेगळीच बिस्किट पुरी छान आहे.
28 Jun 2010 - 1:03 pm | अस्मी
मस्त...यम्मी :)
- अस्मिता
28 Jun 2010 - 2:04 pm | खादाड
ह्म्म्म्म्म!!!!
28 Jun 2010 - 5:40 pm | रेवती
मला फोटू दिसत नाहीत.:(
शिर्षकावरून पदार्थ भारी असणार असं वाट्टय.
रेवती
28 Jun 2010 - 5:40 pm | संदीप चित्रे
पाकृ बघून शेव-पुरी लगेच खावीशी वाटतेय.
निदान फोटो पाहून म्हणून तू दिलेल्या दुव्यांवर गेलो तर असं दिसतंय....
"Oops... there's nothing to see here. Either you do not have access to these photos, or they don't exist at this web address. Please contact the owner directly to gain access."
28 Jun 2010 - 5:55 pm | सुप्रिया
मी पिकासावरचा फोल्डर डिलीट केला. उद्या परत अपलोड करेन.
28 Jun 2010 - 7:11 pm | प्रभो
मस्त!!
28 Jun 2010 - 7:22 pm | वेताळ
8>
मुलांपेक्षा मलापण आवडेल खायला.
वेताळ
28 Jun 2010 - 7:25 pm | रेवती
फोटो दिसले.
दिसायला तरी नेहमीच्या शेवपुरीसारखीच दिसते आहे.
चवीला कशी लागते ते बघायला हवे.
रेवती
28 Jun 2010 - 7:30 pm | अखिलराजे
मस्तच!!!
अखिलराजे
29 Jun 2010 - 4:49 am | पक्या
पुरीसाठी बिस्कीटाचा पर्याय ठि़क वाटतोय. खाल्ल्यावरच समजेल आवडले की नाही ते.
बाकी, बटाटे स्मॅश नाही मॅश करतात. स्मॅश व मॅश दोन्हीचे अर्थ वेगळे आहेत.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
29 Jun 2010 - 4:16 pm | कच्चा पापड पक्क...
कालच घरी बनवली . मस्तच

कच्चा पापड
9 Jul 2010 - 12:20 pm | रश्मी
मस्तच् आहे. करून बघायला पाहिजे.