डिस्क्लेमरः थोडक्यात महत्वाचे/उपयुक्त अशा सदरासाठी कोनताच विभाग या इथे नाहिय्ये त्यामुळे नाईलाजाने मला हे पाककृती या सदरात ही माहिती लिहावी लागत्येय.
कृपया ही माहिती पाककृती या सदरात का लिहिली असा डोक्याला षॉट्ट लागेल असले प्रश्न विचारू नयेत.
खाली दिलेली महिती प्रत्येकाने स्वतःच्या आणि फक्त स्वतःच्या जबाबदारीवर प्रयोगून पहावे. काही गोड गैरसमज निष्पन्न झाले तर त्याची जबाबदारी इतर कोणावर विषेशतः विजुभाऊ या लेखकावर रहणार नाही......
इस्त्री करायचा एक मस्त आणि स्वस्त उपाय .
अगदी तीन चार रुपयात एकाच वेळेस मल्टीपल कपड्याना मस्त इस्त्री होते
रुमाल ओढण्या लुंग्या प्यान्ट( ट्राउझर्स) वैगरेना इस्त्री या उपकरणाची गरज भासत नाही. हे कपडे व्यवस्थीत घडी करून गादीखाली ठेवायचे आणि एखादा बळकट वजनदार रुंद शेजारणीला घरी चहाला बोलवावे. नेमके जेथे कपडे गादीखाली ठेवले आहेत त्याच ठीकाणी त्याच गादीवर तीची स्थापना करावी. चहा देण्यापूर्वी इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्यात. चहाला भरपूर वेळ लावावा. ती रुंद शेजारीण त्या विवक्षीत जागेवरून हलणार नाही अशी दक्षता घ्यावी. साधारण पंधरा मिनिटानन्तर शेजारणीला निरोप द्यावा. आता गादीखालील कपडे जादुने आपोआप इस्त्रीचे झालेले असतील
खर्चः तीन ते चार रुपये ( चहा/ग्यास्/साखर वगैरे)
बचतः प्रती कपडा रू पाच प्रमाणे इस्त्रीचा खर्च/ विद्यूत बचत
सोशल नेटवर्किंग ची उत्तम संधी/ आसपासच्या बातम्या फुकटात मिळतात/ आपल्याला
अफवा पसरवता येतात.
वापरलेले गेलेले भौतीक शास्त्रीय तत्व : गुरुत्वाकर्षण
वापरलेले गेलेले समाजशास्त्रीय तत्वः शेजार्यावर प्रेम करा
धोक्याची सूचना: अवांतर विषयावर गप्पा मारण्यासाठी सासू हा विषय ओपन स्वतःच्या जबाब्दारीवर करावा
प्रतिक्रिया
26 Jun 2010 - 10:54 am | II विकास II
आता गादीखालील कपडे जादुने आपोआप इस्त्रीचे झालेले असतील
== गादी गरम करायची का?
26 Jun 2010 - 11:07 am | प्रमोद देव
गादी गरम करायची का?
:)) :)) :))
26 Jun 2010 - 12:07 pm | मी-सौरभ
:?
-----
सौरभ :)
26 Jun 2010 - 12:41 pm | प्रभाकर पेठकर
शेजारीण गेल्यावर गादीला आणि कपड्यांना सेंट मारून घ्यावे. (ते खर्चात धरलेले नाही). तापलेल्या इस्त्रीचा वास कपड्यांना चटकन लागतो म्हणतात.
------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
26 Jun 2010 - 12:46 pm | वेताळ
माझे काही मित्र झोपण्याआधी गादी खाली कपडे नीट घडी करुन ठेवत असत. सकाळी इस्त्रीचे कपडे मिळत असत त्याना.
वेताळ
26 Jun 2010 - 7:55 pm | पाषाणभेद
हि इस्त्री कोठे विकत मिळेल. नाही एखाद्याला घरीच कायमची इस्त्री हवी असेल तर तो काय करेल?
बाकी विजूभौ, आता कोणत्या फळांवर लेख लिहीताय?

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
27 Jun 2010 - 6:53 pm | तिमा
घट्ट व अंगावर तंग बसणारे कपडे घालावेत. थोड्याच वेळात आपोआप फुकटात इस्त्री होते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
27 Jun 2010 - 6:57 pm | वेताळ
पण जवळ सुई-दोरा सतत बाळगावा लागेल त्याचे काय?
वेताळ
27 Jun 2010 - 7:05 pm | टारझन
=)) =)) =)) विजुभाऊ फुल फॉर्मात :)
- टारझन
आम्ही शेजारणीवर प्रेम करु :)
27 Jun 2010 - 9:58 pm | शैलेन्द्र
पण जड (इ)स्त्री नसेल शेजारी तर?
शिवाय कडक इस्त्रीसाठी बुडही कडक हवे, म्हणुन (इ)स्त्रीपेक्षा (इ)सम बरा..
28 Jun 2010 - 10:28 am | विजुभाऊ
म्हणुन (इ)स्त्रीपेक्षा (इ)सम बरा..
पसंद अपनी अपनी.
आणखी काय सांगु?
28 Jun 2010 - 10:38 am | Nile
विजुभाउ जपुन, स्त्री वैतागली तर तुम्हालाच 'सरळ' करुन जाईल हो! (कसे ते इजुभौंनाच इचारने)
-Nile
29 Jun 2010 - 3:40 pm | कानडाऊ योगेशु
हे कपडे व्यवस्थीत घडी करून गादीखाली ठेवायचे
जपानी गादी का? :D
अहो त्या जपानी गादीची लेखमाला पूर्ण करा बुवा!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
29 Jun 2010 - 3:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कशाला? आहे त्या गादीवर तुम्हाला नीट झोप येते ना ... मग झालं तर!
अदिती
26 Sep 2011 - 6:00 pm | विजुभाऊ
हॅ हॅ हॅ
26 Sep 2011 - 10:43 pm | आशु जोग
आज कळलं उत्तरेतले लोक
स्त्रीला इस्त्री का म्हणता
--
27 Sep 2011 - 12:02 am | चिंतामणी
वापरलेले गेलेले भौतीक शास्त्रीय तत्व : गुरुत्वाकर्षण
वापरलेले गेलेले समाजशास्त्रीय तत्वः शेजार्यावर प्रेम करा
धोक्याची सूचना: अवांतर विषयावर गप्पा मारण्यासाठी (वेळ वाया घालवू नका. कृती करा)
समजायच्या गोष्टी न समजून घेता भलत्याच गोष्टींवर चर्चा नका करू.
27 Sep 2011 - 12:53 am | आशु जोग
गादीखाली कपडे ठेवताना त्यात माणूस नाही ना याची खात्री करून घ्यावी
29 Sep 2011 - 4:13 pm | उदय के'सागर
बापरे! मेलो हसुन हसुन. (ऑफिस मधे कसलं बोर होत होतं पण सहज जुने धागे काढु म्हंटल अणि हा धागा सपड्ला, मनोरंजना साठी मनापसुन धन्स सगळ्यांना)
=)) =)) =))