आमच्या घरचा व्हेज पिझ्झा

मस्तानी's picture
मस्तानी in पाककृती
25 Jun 2010 - 9:28 pm

मिसळपाव वर पाककृती ज्या प्रकारे सादर केल्या जातात ते पाहून एकदा मला पण हुक्की आली आपण देखील असं करून पहावं ... पण मुळातच पाक-कला-गुण अंगी नसल्याने करायचं काय न फोटो कशाचे काढायचे हा विचार करण्यात काही दिवस गेले ... मग शेवटी मनाचा हिय्या केला आणि एक प्रयोग करायचा ठरवला. प्रयोग यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही कारण त्यानंतर पुन्हा "घरचा पिझ्झा" बनवण्याची फर्माईश आली. काल - परवाच पुन्हा बनवला आणि आठवण झाली, म्हटलं चला आज मिसळपाव बरोबर थोडा पिझ्झा देखील द्यावा सर्वांना :)

मी वापरलेलं साहित्य :
पिझ्झा बेस साठी : "बेट्टी क्रोकर" चे पिझ्झा क्रस्ट (पीठ)
मोझारेल्ला आणि पार्मेशान चीज
प्रेगो चा इटालियन टोमेटो sauce (tomato आणि sauce मराठीत कसं लिहायचं ?)
वेगवेगळ्या रंगाच्या ढब्बू मिरच्या (लाल - पिवळी - हिरवी - केशरी या मला मिळाल्या)
कांदा
ओलिव्ह
आलापिनो
इटालियन सिझनिंग
कुकिंग स्प्रे

मी केलेली कृती :
१. "बेट्टी क्रोकर" चे पिझ्झा क्रस्ट एक पाकीट थोडे कोमट पाणी घालून पीठ माळून घ्यावे

२. मळलेले पीठ १० मिनिटे झाकून ठेवावे

३. कांदा, टोमेटो, ढब्बू मिरच्या, ओलिव्ह इत्यादी छान बारीक कापून घ्यावे

४. नऊ इंची ओवन डिश मध्ये तळाला कुकिंग स्प्रे घालावा आणि मग झाकून ठेवलेले पीठ पसरावे, शक्य तितके समान पसरावे

५. ओवन ३५० ते ३७५ पर्यंत 'बेक' वर तापवून घ्यावा आणि तापमान सेट झाल्यावर २ मिनिटासाठी पीठ पसरलेली डिश ओवन च्या वरच्या खणात ठेवावी
६. २ मिनिटाने डिश बाहेर काढून थोडासा फुगलेला पिझ्झा बेस डिशच्या तळाला चिकटलेला नाही याची खात्री करून घ्यावी

७. या थोड्या फुगलेल्या पिझ्झा बेस वर प्रथम प्रेगो चा इटालियन टोमेटो sauce घालून पसरावा

८. मोझारेल्ला आणि पार्मेशान चीज त्यावर पसरावे

९. बारीक चिरून ठेवलेले ढब्बू मिरच्या, कांदा, टोमेटो, ओलिव्ह, आलापिनो इत्यादी सर्व हवे त्या प्रमाणात पसरावे आणि शेवटी इटालियन सिझनिंग (हवे असल्यास किंचित मीठ) भुरभुरावे

१०. ३७५ वर १५ मिनिटे बेक करावे !!!
... झाला पिझ्झा तय्यार :)

मित्रमंडळी येणार असतील तर "बेट्टी क्रोकर" चे पिझ्झा क्रस्ट२ पाकिटे वापरून १३ बाय ९ इंचाच्या डिश मध्ये मोठ्ठा पिझ्झा बनवा !

तसा साधा सुधाच प्रयत्न होता पण आमचा छोटुकला "this one is like the Pizza Hut pizza" असं म्हणाला त्यात सर्व आलं :)

प्रतिक्रिया

प्रभो's picture

25 Jun 2010 - 9:34 pm | प्रभो

मस्त !!!!!! पार्सल पाठवा..

(पिझ्झाहट आणी पापा जॉन पिझ्झा प्रेमी) प्रभो

अर्धवट's picture

25 Jun 2010 - 9:35 pm | अर्धवट

बाय.. दे तु भ क.

टारझन's picture

25 Jun 2010 - 9:37 pm | टारझन

तो पिझ्झाबेस पाहुन नव्या मुंबैतल्या एका मेसच्या चपात्यांची आठवण झाली :)

- सुस्तानी

सहज's picture

25 Jun 2010 - 9:39 pm | सहज

दिसतोय छान पण "this one is like the Pizza Hut pizza" असं म्हणाला त्यात सर्व आलं यामुळे परत साशंक.

:-)

मराठे's picture

25 Jun 2010 - 9:46 pm | मराठे

पिझ्झा मस्तच! आणि फोटोही छान.

जागु's picture

25 Jun 2010 - 9:50 pm | जागु

वा फोटो पाहुन खावासा वाटतो.

मस्त कलंदर's picture

25 Jun 2010 - 10:19 pm | मस्त कलंदर

मस्तच दिसतोय..

पिझ्झाहट पिझ्झाप्रेमी-मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

स्मिता चावरे's picture

25 Jun 2010 - 10:35 pm | स्मिता चावरे

पण तुम्ही कुठे रहाता?
तुम्ही वापरलेलं साहित्य :
पिझ्झा बेस साठी : "बेट्टी क्रोकर" चे पिझ्झा क्रस्ट (पीठ)
मोझारेल्ला आणि पार्मेशान चीज
प्रेगो चा इटालियन टोमेटो sauce

आलापिनो
इटालियन सिझनिंग
कुकिंग स्प्रे......... हे सगळं मुंबईत कुठे मिळेल?

रेवती's picture

25 Jun 2010 - 11:33 pm | रेवती

आईशप्पत! अवघड प्रश्न आहे!

रेवती

रेवती's picture

25 Jun 2010 - 11:26 pm | रेवती

फोटो आणि पाकृ छान!
रंगीबेरंगी भाज्या मस्त दिसताहेत.
पदार्थ मुलांना आवडला म्हणजे आपलं काम झालं!
सॉस लिहिण्यासाठी s + shift o + s
टोमॅटो लिहिण्यासाठी shift t+ o + m + shift e

रेवती

टारझन's picture

25 Jun 2010 - 11:34 pm | टारझन

मॅडम टोमॅटो आण ,
अ‍ॅडम सॉस पी ,
ग्रॅपी टॉमीला फिरवुन आण ...
जमलं जमलं ..... माला पण जमलं

- टॅरझन

नेत्रेश's picture

29 Jun 2010 - 6:25 am | नेत्रेश

डॉमीनो आणी पिझ्झा हट चा पिझ्झा स्वस्त पडतो आणी आम्ही घरी केलेल्या पिझ्झा पेक्षा चांगला लागतो म्हणुन जास्त कष्ट घेत नाही.

बरेच वर्षांपुर्वी घरी केला होता, पण आता तुमचा पिझ्झा पाहुन परत या शनीवारी करीन म्हणतो.