कांद्याची पीठ लावुन भाजी

अवलिया's picture
अवलिया in पाककृती
18 Jun 2010 - 6:47 pm

मला येत नाही

ज्यांना येते त्यांनी समजावुन सांगावी (फटु सह)

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

18 Jun 2010 - 7:01 pm | पाषाणभेद

आधी 'कांद्याची पीठ' काय आहे ते पाठवून द्या. मग सांगतो.
आमच्याकडे 'कांद्याची पीठ' मिळत नाही.

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

शानबा५१२'s picture

18 Jun 2010 - 7:29 pm | शानबा५१२

कांद्याची भजी पीठ लावुन........अस वाचा बर का!

आता तुमच्या इथे 'कांद्याची पीठ' भेटतच नाही तर ते काय असत हे कळल्यावर काय साक्षातकार होणार आहे की आकाशवणी :D

आणि मग तुम्ही सांगाल की कस बनवायच ते!

रामदास's picture

18 Jun 2010 - 7:01 pm | रामदास

खूप सारा कांदा चिरावा लागतो कारण बेसन पेरलं की भाजी फारच कमी म्हणजे या धाग्याच्या लांबी इतकीच होते.

कांद्याची राजकुंवर भाजी म्हणजे काय हे माहीती आहे का ? बरीच वर्षे पाककृती शोधतो आहे.

गणपा's picture

18 Jun 2010 - 7:08 pm | गणपा

>>>बेसन पेरलं की भाजी फारच कमी म्हणजे या धाग्याच्या लांबी इतकीच होते.
गोSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSल

=)) =)) =))

सहज's picture

18 Jun 2010 - 7:26 pm | सहज

गोSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSल

=)) =)) =))

अवलिया's picture

19 Jun 2010 - 10:11 am | अवलिया

:(

--अवलिया

Nile's picture

23 Jun 2010 - 2:47 am | Nile

बायको नको नको म्हणता अन काय बायकी शौक हो? पकडा की एखादी कांद्याची भाजी करणारी.

-Nile

अवलिया's picture

23 Jun 2010 - 6:47 pm | अवलिया

>>>बायको नको नको म्हणता अन काय बायकी शौक हो?

यात बायकी शौक काय आणि कसे याचा श्री. निले यांनी खुलासा करावा.

संपादक वरील अनावश्यक प्रतिसादाची दखल घेतील काय?

--अवलिया

रेवती's picture

23 Jun 2010 - 7:54 pm | रेवती

सदस्य नाईल,
आपली व अवलिया यांची मैत्री अश्याप्रकारची चेष्टा करण्याइतपत नसेल तर कृपया धाग्यावर असे प्रतिसाद देवू नयेत. स्वयंपाक करणे (भाजी करणे) आणि तो चांगल्याप्रकारे करता येणे ही कला महिलांनीच शिकणे आवश्यक आहे असे नाही. त्यास 'बायकी शौक' म्हणण्याची गरज नाही असे माझे मत आहे. त्यातून स्त्रियांना कुठेतरी कमी लेखले जात आहे असे वाटते.
रेवती

मुक्तसुनीत's picture

23 Jun 2010 - 7:59 pm | मुक्तसुनीत

आपली व अवलिया यांची मैत्री अश्याप्रकारची चेष्टा करण्याइतपत नसेल तर कृपया धाग्यावर असे प्रतिसाद देवू नयेत.

मैत्री असूदेत किंवा नसू देत, असले सेक्सिस्ट प्रतिसाद देऊ नयेत.

अवांतर : प्रस्तुत धाग्यावर कोणीही कसलेही प्रतिसाद द्यावेत का हादेखील प्रश्न राहातोच. माझ्या मतानुसार असल्या एका ओळीच्या धाग्यावर देऊच नयेत.

Nile's picture

23 Jun 2010 - 10:15 pm | Nile

दोघांनाही धन्यवाद आणि आभार.

नविन प्रतिसाद असा घ्यावा.

वा काय सुंदर धागा आहे मिपा ला चार चाँद लागले! असे धागे काढत रहा अन लोकांनी मनाविरुद्ध प्रतिक्रीया दिल्या की खुशाल तक्रारी करत रहा.

-Nile

शिल्पा ब's picture

24 Jun 2010 - 7:55 am | शिल्पा ब

चालेल..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अवलिया's picture

24 Jun 2010 - 11:06 am | अवलिया

प्रस्तुत धाग्यावर कोणीही कसलेही प्रतिसाद द्यावेत का हादेखील प्रश्न राहातोच. माझ्या मतानुसार असल्या एका ओळीच्या धाग्यावर देऊच नयेत.

आपल्या मताचा आदर राखुन मला सदर भाजी कशी करायची हे माहित नसतांना तो प्रश्न कशा प्रकारे विचारला असता प्रतिसाद द्यावेत का नाही असा प्रश्न शिल्लक रहाणार नाही, तसेच धागा एक ओळीचा न बनता प्रतिसाद देण्यालायक बनेल याचा खुलासा केल्यास मजसारख्या पामरावर अतिशय उपकार होतील, तरी खुलासा करावा ही नम्र विनंती आहे.
प्रतिक्षेत....

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jun 2010 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार

आपल्या मताचा आदर राखुन मला सदर भाजी कशी करायची हे माहित नसतांना तो प्रश्न कशा प्रकारे विचारला असता प्रतिसाद द्यावेत का नाही असा प्रश्न शिल्लक रहाणार नाही, तसेच धागा एक ओळीचा न बनता प्रतिसाद देण्यालायक बनेल याचा खुलासा केल्यास मजसारख्या पामरावर अतिशय उपकार होतील, तरी खुलासा करावा ही नम्र विनंती आहे.

धागा साधारण असा हवा होता :-

कांद्याची पीठ लावुन भाजी ?

आज पाककलेचा फारच किडा / उत्साह आल्याने कांद्याची भाजी करायचा विचार करुन स्वयंपाकघराकडे वळलो.

साहित्य :- भुकेच्या प्रमाणात अथवा आपण पोळीला लावुन भाजी खाता का भाजीला लावुन पोळी खाता त्याचा विचार करुन २-४-६-८- अशा प्रमाणात कांदे, कांद्यांच्या प्रमाणात पिठ, गॅस अथवा स्टोव्ह, एक झारा अथवा डाव, तेल, मिठ, मिरच्या अथवा लाल तिखट, गॅस पेटवण्यासाठी लायटर.

सगळी तयारी तर पुर्ण झाली आणी लक्षात आले की, अरेच्या आपल्याला तर कृती माहितच नाही ! पिठ कुठले घ्यायचे ते पण माहित नाही...

ताबडतोब स्वयंपाकघरातुन धावत बाहेर आलो आणी मिपावर धाव घेतली. खुप भुकेलेलो आहे हो, कोणी मिपा सुगरण / बल्लवाचार्य मदत करेल काय ??

©º°¨¨°º© भुकेलिया ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

24 Jun 2010 - 11:59 am | अवलिया

छान ! पराच्या दिलेल्या सुचनेनुसार पुढील धागे काढणे खरेच सोईचे होणार आहे.

आता फक्त प्रतिक्षा आहे ती श्री मुक्त सुनीत यांच्या मार्गदर्शनाची, ते पराला अनुमोदन देतात की काही वेगळा खुलासा करतात याची वाट पहाणे आपल्या हाती आहे.

--अवलिया

वेताळ's picture

24 Jun 2010 - 12:10 pm | वेताळ

http://evenapencilhasfearto.files.wordpress.com/2008/04/dsc02847.jpg
असे जर दोन कांदे घेतले तर नानाचे इतर गोष्टीत वांदे होतील त्याचे काय?
सरळ असे लिहा नाना कि लहान आकाराचे दोन,तीन कांदे घेतले.
वेताळ

अवलिया's picture

24 Jun 2010 - 11:00 am | अवलिया

स्वयंपाक करणे (भाजी करणे) आणि तो चांगल्याप्रकारे करता येणे ही कला महिलांनीच शिकणे आवश्यक आहे असे नाही. त्यास 'बायकी शौक' म्हणण्याची गरज नाही असे माझे मत आहे. त्यातून स्त्रियांना कुठेतरी कमी लेखले जात आहे असे वाटते.

हेच मनात आले म्हणुन मी आक्षेप घेतला.

अन्यथा निले माझे चांगले मित्र आहेत त्यांनी शिव्या जरी दिल्या तरी त्या कबुल. :)

--अवलिया

प्रमोद देव's picture

18 Jun 2010 - 7:25 pm | प्रमोद देव

हिथं बगा की.

शानबा५१२'s picture

18 Jun 2010 - 7:31 pm | शानबा५१२

क्रुती सोपी आहे पण चांगली चव लागेल अस नाही वाटत.

धन्यवाद

मितालि's picture

18 Jun 2010 - 8:20 pm | मितालि

चवीला छान बनते ही भाजी.. मी बनवलेली ही पाककृती वाचुन.. हा पहा फोटो..

मस्त कलंदर's picture

18 Jun 2010 - 7:42 pm | मस्त कलंदर

मी हेच शोधायला तुमच्या ट्रॅकरवर गेले होते.. पण स्वतःचे धागे उडवायच्या लेंढारात तुम्हीपण सामील झालात असे दिसले... आणि नानासाठी पूर्ण पाकृ नि तेही फोटोसकट टाकायची?? हॅ!!!! म्हणून सोडून दिले होते..

असो..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Jun 2010 - 10:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =))

भयंकर आहेस बै!

अदिती

शुचि's picture

18 Jun 2010 - 7:46 pm | शुचि

पातीच्या कांद्याची पीठ पेरून भाजी माझ्याही आवडीची आहे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Jun 2010 - 8:33 pm | ब्रिटिश टिंग्या

तुझा पार जर्मनी + स्पेन + फ्रान्स झाला!

विसोबा खेचर's picture

18 Jun 2010 - 9:01 pm | विसोबा खेचर

नान्या, पाकृ टाकतो रे जमलं तर..

तात्या.

jaypal's picture

18 Jun 2010 - 9:06 pm | jaypal


***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

धमाल मुलगा's picture

18 Jun 2010 - 9:31 pm | धमाल मुलगा

हाण्ण तिच्यायला!
डायरेक्ट रेड कार्ड? आमच्या नान्यावर अन्याय?

Who is the father..
who is the father...
referee has no father..............
X(

रेवती's picture

18 Jun 2010 - 11:36 pm | रेवती

माननीय नाना,
कांद्याची पीठ पेरून भाजी खास आपल्या (फोटूच्या) मागणीमुळे केली. कृती व फोटू देत आहे.
साहित्य: ३ मध्यम आकाराचे कांदे (जाडसर चिरून), साधारण एक टे. स्पू. हरभरा डाळीचे पीठ, भरपूर कोथिंबीर धूवून चिरून, मीठ, साखर, लिंबूरस, फोडणीचे साहित्य, तेल, तिखट
कृती: नेहमीपेक्षा जरा जास्त तेल (साधारण ३ टे. स्पू.)कढईत घालावे. गरम तेलात मोहरी, जिरे, हळदीची फोडणी करावी. लाल तिखट घालावे. जाडसर चिरलेला कांदा त्यात घालून परतावा. झाकण ठेवून, आच मध्यम करावी. कांदा जवळजवळ शिजत आला कि चिरलेली कोथिंबीर घालावी. एखादी वाफ देवून चवीचे जिन्नस घालावेत. अगदी चार थेंब लिंबूरस घालावा. मीठामुळे कांद्याला थोडे पाणी सुटेल व साखरेमुळे चकचकितपणा येइल. कांदा फार कोरडा वाटल्यास किंचित पाणी घालावे. मग अंदाजाने पीठ घालून भाजी सारखी करावी. कोरडी वाटल्यास पाण्याचा हबका मारावा (अगदी थोडा). एक छान वाफ आणून बेसन शिजवून घ्यावे. नंतर आच बंद करून दोनेक मिनिटं भाजी तशीच ठेवावी म्हणजे कोरडी न होता लुसलुशीत होते.
टिपा: १)फोडणीतच लाल तिखट घालावे.
२)कोथिंबीर कांद्याबरोबर परतली जाणे आवश्यक.
३) फोडणीत जिरे असणे आवश्यक.

रेवती

प्रभो's picture

18 Jun 2010 - 11:48 pm | प्रभो

भारीच
ह्याचं पार्सल मला का मिळालं नसावं... ? :?

रेवती's picture

19 Jun 2010 - 1:16 am | रेवती

घरी आल्यावर आठवण कर, पटकन करून देइन.

रेवती

प्रभो's picture

19 Jun 2010 - 1:20 am | प्रभो

नक्कीच.... :D

चतुरंग's picture

19 Jun 2010 - 12:08 am | चतुरंग

( =P~ )चतुरंग

मस्त कलंदर's picture

19 Jun 2010 - 12:42 am | मस्त कलंदर

रंगाकाका पळाले वाट्टं घरी भाजी खायला!!!! आजचीच तारीख दिसतेय फोटूवर!!!!

खुद के साथ बातां: नानाला हा धागा टाकण्याची आयडिया खुद्द रंगोजीरावांनी तर दिली नव्हती ना??? ;;)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

रेवती's picture

19 Jun 2010 - 1:19 am | रेवती

नानाला हा धागा टाकण्याची आयडिया खुद्द रंगोजीरावांनी तर दिली नव्हती ना?
महत्वाचा मुद्दा माझ्या ध्यानातच आला नव्हता. आता मात्र मी सावधपणे वागणार!;)
रेवती

अवलिया's picture

19 Jun 2010 - 10:07 am | अवलिया

रेवतीजी धन्यवाद...

अहाहा ! काय सुंदर फटु आणि व्यवस्थित पाककृती.

जबरदस्त!!!

अवांतर - रंगोजीरावांनी कोणतीही सुचना केलेली नव्हती. घरच्या घरी त्यांचं अळुचं फदफदं बनवु नये ही नम्र विनंती (मानावीच असा आग्रह नाही)

--अवलिया

चतुरंग's picture

22 Jun 2010 - 8:23 pm | चतुरंग

घरच्या घरी त्यांचं अळुचं फदफदं बनवु नये ही नम्र विनंती
तुमच्या सगळ्याच विनंत्या मान्य होतात असं नाही ना!! :(

(फदफदीत)चतुरंग

अवलिया's picture

23 Jun 2010 - 6:48 pm | अवलिया

:)

--अवलिया

नि३'s picture

19 Jun 2010 - 12:04 am | नि३

हा नाना असे येड*वे धंदे करतो आणि मग धागा , प्रतीसाद ऊडाला कि, संपादकाच्या नावाने गरळ ओकतो..

अबे नाना सुधर कि लेका आता...

---नि३.

अवलिया's picture

19 Jun 2010 - 10:09 am | अवलिया

ते उडणारे लेख आणि प्रतिसाद "वेगळे" असतात. संपादक झालात कधी तर समजतील किंवा तसे लेख, प्रतिसाद टाकल्यावर उडण्यापुर्वी वाचले तर लक्षात येतील ;)

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jun 2010 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार

वा वा छान छान !

नानाच्या लेखांना (कसेही असले तरी) चांगले म्हणायची मिपावर फ्याशन आहे म्हणुन छान.

असे लेख उडणार नाही, असे असेल तर आता बाराखडी लिहुन धागा लिहिणे काय वाईट ?

©º°¨¨°º© परालिया ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विनायक प्रभू's picture

24 Jun 2010 - 7:37 am | विनायक प्रभू

धन्यवाद रे परा.
आता वरील पाकृ खाउन नानाची प्रकृती सुधारेल असे वाटते.

कच्चा पापड पक्का पापड's picture

22 Jun 2010 - 4:36 pm | कच्चा पापड पक्क...

:) ह्याच भाजीत डाळीच्या पीठा एवजी दाण्याचे कुट घातले तरी छान लागते. त्याला म्हाद्या म्हणतात.

कच्चा पापड

सुप्रिया's picture

22 Jun 2010 - 4:51 pm | सुप्रिया

आणि ह्याच भाजीत डाळीच्या पीठाऐवजी भाजणी घातली तर मस्त चव येते.

रेवती's picture

22 Jun 2010 - 8:06 pm | रेवती

मीही ऐकलय त्या भाजीबद्दल (म्हाद्या)!
खूप चवदार असते म्हणे पण पित्तकारकही असते!
मग मला वर्ज्य!
सुप्रियातै म्हणतात तशी भाजणी लावून मेथीची भाजीही मस्त लागते.

रेवती