कांद्याची भजी पीठ लावुन........अस वाचा बर का!
आता तुमच्या इथे 'कांद्याची पीठ' भेटतच नाही तर ते काय असत हे कळल्यावर काय साक्षातकार होणार आहे की आकाशवणी :D
आणि मग तुम्ही सांगाल की कस बनवायच ते!
खूप सारा कांदा चिरावा लागतो कारण बेसन पेरलं की भाजी फारच कमी म्हणजे या धाग्याच्या लांबी इतकीच होते.
कांद्याची राजकुंवर भाजी म्हणजे काय हे माहीती आहे का ? बरीच वर्षे पाककृती शोधतो आहे.
>>>बायको नको नको म्हणता अन काय बायकी शौक हो?
यात बायकी शौक काय आणि कसे याचा श्री. निले यांनी खुलासा करावा.
संपादक वरील अनावश्यक प्रतिसादाची दखल घेतील काय?
--अवलिया
सदस्य नाईल,
आपली व अवलिया यांची मैत्री अश्याप्रकारची चेष्टा करण्याइतपत नसेल तर कृपया धाग्यावर असे प्रतिसाद देवू नयेत. स्वयंपाक करणे (भाजी करणे) आणि तो चांगल्याप्रकारे करता येणे ही कला महिलांनीच शिकणे आवश्यक आहे असे नाही. त्यास 'बायकी शौक' म्हणण्याची गरज नाही असे माझे मत आहे. त्यातून स्त्रियांना कुठेतरी कमी लेखले जात आहे असे वाटते.
रेवती
आपली व अवलिया यांची मैत्री अश्याप्रकारची चेष्टा करण्याइतपत नसेल तर कृपया धाग्यावर असे प्रतिसाद देवू नयेत.
मैत्री असूदेत किंवा नसू देत, असले सेक्सिस्ट प्रतिसाद देऊ नयेत.
अवांतर : प्रस्तुत धाग्यावर कोणीही कसलेही प्रतिसाद द्यावेत का हादेखील प्रश्न राहातोच. माझ्या मतानुसार असल्या एका ओळीच्या धाग्यावर देऊच नयेत.
दोघांनाही धन्यवाद आणि आभार.
नविन प्रतिसाद असा घ्यावा.
वा काय सुंदर धागा आहे मिपा ला चार चाँद लागले! असे धागे काढत रहा अन लोकांनी मनाविरुद्ध प्रतिक्रीया दिल्या की खुशाल तक्रारी करत रहा.
-Nile
प्रस्तुत धाग्यावर कोणीही कसलेही प्रतिसाद द्यावेत का हादेखील प्रश्न राहातोच. माझ्या मतानुसार असल्या एका ओळीच्या धाग्यावर देऊच नयेत.
आपल्या मताचा आदर राखुन मला सदर भाजी कशी करायची हे माहित नसतांना तो प्रश्न कशा प्रकारे विचारला असता प्रतिसाद द्यावेत का नाही असा प्रश्न शिल्लक रहाणार नाही, तसेच धागा एक ओळीचा न बनता प्रतिसाद देण्यालायक बनेल याचा खुलासा केल्यास मजसारख्या पामरावर अतिशय उपकार होतील, तरी खुलासा करावा ही नम्र विनंती आहे.
प्रतिक्षेत....
--अवलिया
आपल्या मताचा आदर राखुन मला सदर भाजी कशी करायची हे माहित नसतांना तो प्रश्न कशा प्रकारे विचारला असता प्रतिसाद द्यावेत का नाही असा प्रश्न शिल्लक रहाणार नाही, तसेच धागा एक ओळीचा न बनता प्रतिसाद देण्यालायक बनेल याचा खुलासा केल्यास मजसारख्या पामरावर अतिशय उपकार होतील, तरी खुलासा करावा ही नम्र विनंती आहे.
छान ! पराच्या दिलेल्या सुचनेनुसार पुढील धागे काढणे खरेच सोईचे होणार आहे.
आता फक्त प्रतिक्षा आहे ती श्री मुक्त सुनीत यांच्या मार्गदर्शनाची, ते पराला अनुमोदन देतात की काही वेगळा खुलासा करतात याची वाट पहाणे आपल्या हाती आहे.
--अवलिया
स्वयंपाक करणे (भाजी करणे) आणि तो चांगल्याप्रकारे करता येणे ही कला महिलांनीच शिकणे आवश्यक आहे असे नाही. त्यास 'बायकी शौक' म्हणण्याची गरज नाही असे माझे मत आहे. त्यातून स्त्रियांना कुठेतरी कमी लेखले जात आहे असे वाटते.
हेच मनात आले म्हणुन मी आक्षेप घेतला.
अन्यथा निले माझे चांगले मित्र आहेत त्यांनी शिव्या जरी दिल्या तरी त्या कबुल. :)
--अवलिया
मी हेच शोधायला तुमच्या ट्रॅकरवर गेले होते.. पण स्वतःचे धागे उडवायच्या लेंढारात तुम्हीपण सामील झालात असे दिसले... आणि नानासाठी पूर्ण पाकृ नि तेही फोटोसकट टाकायची?? हॅ!!!! म्हणून सोडून दिले होते..
असो..
मस्त कलंदर..नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
माननीय नाना,
कांद्याची पीठ पेरून भाजी खास आपल्या (फोटूच्या) मागणीमुळे केली. कृती व फोटू देत आहे.
साहित्य: ३ मध्यम आकाराचे कांदे (जाडसर चिरून), साधारण एक टे. स्पू. हरभरा डाळीचे पीठ, भरपूर कोथिंबीर धूवून चिरून, मीठ, साखर, लिंबूरस, फोडणीचे साहित्य, तेल, तिखट
कृती: नेहमीपेक्षा जरा जास्त तेल (साधारण ३ टे. स्पू.)कढईत घालावे. गरम तेलात मोहरी, जिरे, हळदीची फोडणी करावी. लाल तिखट घालावे. जाडसर चिरलेला कांदा त्यात घालून परतावा. झाकण ठेवून, आच मध्यम करावी. कांदा जवळजवळ शिजत आला कि चिरलेली कोथिंबीर घालावी. एखादी वाफ देवून चवीचे जिन्नस घालावेत. अगदी चार थेंब लिंबूरस घालावा. मीठामुळे कांद्याला थोडे पाणी सुटेल व साखरेमुळे चकचकितपणा येइल. कांदा फार कोरडा वाटल्यास किंचित पाणी घालावे. मग अंदाजाने पीठ घालून भाजी सारखी करावी. कोरडी वाटल्यास पाण्याचा हबका मारावा (अगदी थोडा). एक छान वाफ आणून बेसन शिजवून घ्यावे. नंतर आच बंद करून दोनेक मिनिटं भाजी तशीच ठेवावी म्हणजे कोरडी न होता लुसलुशीत होते.
टिपा: १)फोडणीतच लाल तिखट घालावे.
२)कोथिंबीर कांद्याबरोबर परतली जाणे आवश्यक.
३) फोडणीत जिरे असणे आवश्यक.
रेवती
रंगाकाका पळाले वाट्टं घरी भाजी खायला!!!! आजचीच तारीख दिसतेय फोटूवर!!!!
खुद के साथ बातां: नानाला हा धागा टाकण्याची आयडिया खुद्द रंगोजीरावांनी तर दिली नव्हती ना??? ;;)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
नानाला हा धागा टाकण्याची आयडिया खुद्द रंगोजीरावांनी तर दिली नव्हती ना?
महत्वाचा मुद्दा माझ्या ध्यानातच आला नव्हता. आता मात्र मी सावधपणे वागणार!;)
रेवती
रेवतीजी धन्यवाद...
अहाहा ! काय सुंदर फटु आणि व्यवस्थित पाककृती.
जबरदस्त!!!
अवांतर - रंगोजीरावांनी कोणतीही सुचना केलेली नव्हती. घरच्या घरी त्यांचं अळुचं फदफदं बनवु नये ही नम्र विनंती (मानावीच असा आग्रह नाही)
--अवलिया
मीही ऐकलय त्या भाजीबद्दल (म्हाद्या)!
खूप चवदार असते म्हणे पण पित्तकारकही असते!
मग मला वर्ज्य!
सुप्रियातै म्हणतात तशी भाजणी लावून मेथीची भाजीही मस्त लागते.
रेवती
प्रतिक्रिया
आधी
कांद्याची
In reply to आधी by पाषाणभेद
या साठी
>>>बेसन
In reply to या साठी by रामदास
हा हा हा
In reply to >>>बेसन by गणपा
यु टु......
In reply to हा हा हा by सहज
बायको नको
In reply to यु टु...... by अवलिया
>>>बायको नको
In reply to बायको नको by Nile
सदस्य
In reply to बायको नको by Nile
+१ /-१
In reply to सदस्य by रेवती
दोघांनाही
In reply to +१ /-१ by मुक्तसुनीत
चालेल.. ***********
In reply to दोघांनाही by Nile
प्रस्तुत
In reply to +१ /-१ by मुक्तसुनीत
आपल्या
In reply to प्रस्तुत by अवलिया
छान !
In reply to आपल्या by परिकथेतील राजकुमार
ते ठिक आहे पण...
In reply to आपल्या by परिकथेतील राजकुमार
स्वयंपाक
In reply to सदस्य by रेवती
हिथं बगा की.
क्रुती
In reply to हिथं बगा की. by प्रमोद देव
चवीला छान
In reply to क्रुती by शानबा५१२
मी हेच
In reply to हिथं बगा की. by प्रमोद देव
भयंकर आहेस
In reply to मी हेच by मस्त कलंदर
पातीच्या
काय रे नान्या
नान्या,
ना$$$$$$$$$$$$$$$$ना
हाण्ण
In reply to ना$$$$$$$$$$$$$$$$ना by jaypal
माननीय
जीवघेणा फोटू!!!!
In reply to माननीय by रेवती
घरी
In reply to जीवघेणा फोटू!!!! by प्रभो
नक्कीच....
In reply to घरी by रेवती
ला ला लाला ला ला ला!!!
In reply to माननीय by रेवती
रंगाकाका
In reply to ला ला लाला ला ला ला!!! by चतुरंग
नानाला हा
In reply to रंगाकाका by मस्त कलंदर
रेवतीजी
In reply to माननीय by रेवती
नानासाहेब,
In reply to रेवतीजी by अवलिया
:)
In reply to नानासाहेब, by चतुरंग
हा नाना
ते उडणारे
In reply to हा नाना by नि३
वा वा छान
परा
In reply to वा वा छान by परिकथेतील राजकुमार
म्हाद्या
आणि ह्याच
In reply to म्हाद्या by कच्चा पापड पक्…
मीही ऐकलय
In reply to म्हाद्या by कच्चा पापड पक्…