(माडीवरचा तो हात!)

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
15 Jun 2010 - 1:39 am
गाभा: 

ह्या लेखाची प्रेरणा ही विकासरावांचा "(गाडीवरचा तो हात!)" हा खर्‍या अर्थाने हृद्य (म्हणजे कसा ते मी डोक्यावरी बरीच केसं उपटली तरी कळलं नाही असा माझा कयास आहे ) अनुभव आहे. त्यावरून जरी खालील अनुभव लिहीत असलो आणि म्हणून कंसात शिर्षक दिले असले तरी, ते विकासरावांच्या लेखाचे हे कृपया विडंबन समजू नये ही धमकी. त्याच्या लेखात भारतीय राजकारणातल्या न भूतो न भविष्यती अशा डेबर्‍या आणि धुर्त (ज्याला १०० पिढ्यांचं हवरटांसारखं खाऊन देखील १०१व्या पिढीच्या खाण्याची भुक आहे असा माझा कयास आहे ) व्यक्तीमत्वाचा जसा अनुभव आहे, तसाच ह्या लेखात अजून एक व्यक्तीमत्व जे कुणाला आवड न आवडो (तसे वरवर तुम्ही व्हाईट कॉलर लोकं आवडलं नाहीच म्हणणार , पण ज्यांचे देठ अजुन हिरवे आहेत त्यांचे तरी डोळे पाणावतील असा माझा कयास आहे) , त्याच्या शिवाय 'त्या' दिवसाची आठवण सांगण्याची इच्छा पूर्ण होणार नाही अशा व्यक्तीचा जाता जाता अनुभव आहे. इतकेच काय ते साम्य...

माझं फोरासरोड वरचं कुतुहल लहानपणापासूनचं. मी साधारण दुसरीत, फार तर इंजिनियरींग च्या तिसर्‍या वर्षाला होतो असा माझा कयास आहे. खोटे वाटेल पण त्या वयात मी केलेले काही कारणामे पाहुन आणि ते वाढतंच चाललेले पाहून आमच्या तिर्थरुपांना माझी काळजी वाटायची हे त्यांच्या नजरेतून समजायचे. असो. हा विषय माझ्याबद्दलचा नाही तेंव्हा इतके पुरे (तरीबी तुमची लैच्च इच्चा आसलं तर व्यनि टाकाच ) ... तेंव्हा मी झमी झुमझुमबार मधे इंटरव्यु दिल्यावर तिथल्या मालकाने मला ऑन द स्पॉट ऑफर लेटर दिलं होतं ... पण मला झमेली बार वाल्याने ऑफर लेटर मधे जेवण भत्ता इनक्लुड केल्याने मला त्याची ऑफर खुणावत होती .. परंतु झुमझुमबार मधे मी इंटरव्यु द्यायला आलो तेंव्हा कोणी तरी एक हरकाम्या तिकडे डब्बल बुर्जी ची ऑर्डर घेऊन आला होता , त्याच्या तोंडुन काही उल्लेख ऐकले आणि मी झमेली बार ची खुल्लाऑफर नाकारुन झुमझुमबार मधे पार्ट टाईम म्यानेजर कम गल्लामॅन ची नोकरी पत्करली.
तसा मी पांढरपेशा समाजातला. वडील एका चांगल्या ब्यांकेत नोकरीला , आणि आई शिक्षिका. रोज "शुभंकरोती कल्याणम" पासुन ते "हनुमान चालिसा" असे ६१-६२ श्लोक/आरत्या/कविता म्हणन्याची सवय बालपणापासुनंच मला जाणिव पुर्वक लावली होती.(पुन्हा माझ्यावरंच आली का गाडी ? ... असो सवय आहे मला घुम फिर के स्वतःवरंच येण्याची.. ए कोण म्हणतोय रे "पुरे झाले स्वतःची आरती ओवाळणे " ... सखुबाईज शिक्रेट च पुस्तक देउन गप्प बसवा त्या पिवळ्या पानाला..काय म्हणता, काही फायदा नाही ? देठही पिवळाच ? अरेरे .. )

असो , तर मी काय म्हणत होतो ? ह्म्म.. तर मी झुमझुम बार जॉइन केला. पहिल्या दिवशी माझं इंडक्शन ट्रेणींग होतं.. पहिल्या सेशन मधे बारचा एरिया कुठपर्यंत आहे ? बार कोणकोणत्या दारु प्रोव्हाईड करतो ? बार मधे सुविधा काय ? (विशिष्ठ सुविधा काय काय ? ) बार चे मालक , संस्थापक , बिझनेस पार्टणर्स आणि हप्ता घेणारे ह्या सर्वांची माहिती होती ... दुसर्‍या सेशन मधे बार चा बिझनेस एरियात कसा पसरला आहे , कुठेकुठे कशी उधारी - वसुली आहे ? कोण भाई कोण चोर कोण भुरटा ह्याच बरोबर कोण माडीवाली ह्याची उत्तम माहिती करुन देण्यात आली , आणि मी सुद्धा गाण्याबझावण्यातला होतोच पण बाई-बाटलीतलाही असल्याने मी ह्या गोष्टी पटकन ग्रास्प केल्या. काही दिवसांतच मी पुर्ण बिझणेस हातात घेतला. मी एक नुस्तीच व्हाईट कॉलर विकत घेतली होती. कोणताही शर्ट (किंवा टिशर्ट किंवा स्वेटर)घातला की मी ती व्हाईट कॉलर अशी वरुन फक्त आडकवुन चालत असे .. आणि मी व्हाईट कॉलर म्हणुन मिरवुन घेत असे. गल्ल्यावर बसल्या बसल्या मी गाणं देखील गायचो ... ते ही खर्जातल्या आवाजात. तसा मी बाराणा घराण्यातला , माझा चमन रागावर फार जीव .. भल्याभल्यांणा केसं उपटायला लावणार्‍या ह्या रागामुळे तिथे माझा बर्‍यापिकी दरारा णिर्माण झाला होता असा माझा कयास होता. कोणीही पैसे बूडवत नव्हता , उधार घेत नव्हता, त्यामुळे धंद्याला नवी तेजी आली होती... मी सुद्धा एव्हाना खुप फेमस झालो होतो .. एके दिवशी मी बार वरुन माझी "शिप" संपुन निघालो होतो , रात्रीचे १२ वाजले होते ... कुठुन तरी "मला जाऊ द्याना घरी .. आता वाजले की..." चे सुर कानी पडत होते ... तेवढ्यात माझ्या व्हाईट कॉलर वर पच्च्च्य्याक्कन काळी काळी पिंक पडली ... वर पाहातो तो दुसरी पिंग थेट माझ्या तोंडावर ... माझा रंग आधीच उजळ , त्यात ही मिस्रीची पिंक !! मी रागावलो. ओरडलो, " कोण रांडीचा थुंकला रे .. भाडखाव ... समोर ये ... " कोणीच आलं नाही. एक हात बाहेर निघाला .. होय तोच तो .. "माडीवरचा तो हात " किती गुबगुबीत गोरापान हात होता तो .. मी एका इस्त्रीला शिवी दिल्याचं पाहुन मी खजिल झालो . माझं इतरवेळचं स्त्रीदाक्षिण्य जागं झालं ... मी म्हंटलं , क्षमा करा मला वाटलं कोणी बाप्या आहे , वरुन हातानेच "इट्स ओक्के" ,पाठोपाठ "खुलाश्याबद्दल धन्यवाद" चा इशारा आला आणि मनात म्हंटलं "विषय संपला".
दुसर्‍या दिवशी माझ्या डोक्यावर केळाची सालपटं पडली. पण मी चुकांची पुणरावृत्ती करत नाही. मी म्हणालो , "जरा उशिरा टाकल्याबद्दल धन्यवाद, कारण सालं थोडी आधी टाकली असती तर मला त्यावरुन घसरुन पडावं लागलं असतं .. त्यातुन मी कुल्लेदार, होणारा त्राहिमाम टळला", माडीवरच्या त्या हाताने मला " ओक्के , पुढे चला " चा इषारा दिला आणि मी चालु पडलो. आठवडाभर रोज माझ्या डोक्यावर कधी षिळं वरण पडे ,कधी कोरडा कोरडा भात , तर कधी भाजिपाल्याचा कचरा पडे... पण मी संयम सोडला नाही .. एक दिवस मी गल्ल्यावर गात बसलो होतो. तोच त्या माडीवरचा हरकाम्या आला. अगदीच शेंबडा ,किळसवाणा ,खाकी चड्डी करडी होईपर्यंत मळली होती , तिथल्या बायकांचे पिवळे-शिवळे डागाळलेले,इस्सट वासाची (ही अशी विषेशणं लावली की लेख कसा दर्जेदार / अभ्यासपुर्ण होतो , नै का ? ) कपडे धुणारा , पाठीला चोळायचा "निम्मा रोज" साबण नियमीत घेउन जाणारा , तो इल्ल्यास . इल्ल्यास आला आणि म्हणाला , "टार्‍या साब , आप को माडी पे बुलाया है .. " हे वाक्य ऐकताच मला झटका बसला ... इतके दिवस डोक्याची कचराकुंडी केल्याचं चिज झालं , मी गल्ला लॉक करुन इल्ल्यासच्या बोटाला पकडुन निघालो .. नंतर मी हाताचा वास घेतला ... तर माझ्या पांढरपेश्या नाकाला तो सहन झाला नाही , उमदळलंच मला. माडीवर गेलो ... आज प्रथमच माडीवरच्या हाताबरोबर बाकीची व्यक्ति पहायला भेटणार होती. तिचं रुप पाहुन भले भले हिरवे देठ पिवळे फट्ट होत असतील ह्याची जाणीव झाली. पण मी तिचं ते रुप पाहुन देठ आणि पानच काय ? खोडासकट पिवळा पडलो होतो. ती गच्चीवरंच भांडी घासायचं काम करे, ते गुबगुबीत दिषनार्‍या हातांना चिटकलेलं ते हत्तीचं रुप पाहुन मी कलंडायचाच बाकी होतो. तिनं तोंडात मिस्रीचा बकना भरला होता , आणि मिंटामिंटाला व्हेल माशासारखं मान वळवुन रोडवर पिंका टाकनं चालु होतं , मग एकेक खरगट्याचं भांडंही ती तिकडेच रिकामी करत होती. ३०अंशाच्या कोनात पुढे आलेले ते दात , कोणी तिच्या तोंडावर फाईट मारली तर त्या फाईट चे तुकडे तुकडे करण्यास सक्षम होती. आधी ती इल्ल्यास कडे पाहाते आहे असा माझा कयास होता पण तो साफ खोटा ठरला, ती माझ्याकडे पाहात होती. जर्राशी हेकणी असल्यानं तिचं सौंदर्य किती वाढलं होतं.. तिने माझी क्षमा मागितली. आणि माझे डोळे पाणावले.

हे व्यक्तीमत्व कोण हे सांगायची कदाचीत गरज भासणार नाही, तरी देखील समजले नसेल तर, फोरासरोडवरील माडीवरचा तो हात , म्हणजेच मोषणी (अंमळ लुज होती म्हणुन तिला "लुज मोषणी" देखील म्हणत)

प्रतिक्रिया

प्रभो's picture

15 Jun 2010 - 1:46 am | प्रभो

आयचा घो.......तू मला लाष्ट इयर ला सांगितलेली गोष्ट हीच तर.... ;)

बोलणार काय....टार्‍या ऑन होम** (काय टाकायचं ते टाका...पीच का काय ते....).

=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))

पंगा's picture

15 Jun 2010 - 1:48 am | पंगा

अत्यंत समयोचित लेख! :D धन्यवाद!

तपशिलाच्या एका छोट्याशा चुकीकडे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. जमल्यास सुधारण्याचा प्रयत्न करावा.

आधी ती मण्सुर कडे पाहाते आहे असा माझा कयास होता पण तो साफ खोटा ठरला, ती माझ्याकडे पाहात होती. तिने माझी क्षमा मागितली. आणि माझे डोळे पाणावले.

मण्सुर? की इल्ल्यास?

- पंडित गागाभट्ट.

प्रभो's picture

15 Jun 2010 - 1:50 am | प्रभो

मण्सुर उर्फ इल्ल्यास असं असावं..टारझन कडून उत्तराच्या प्रतिक्षेत.

टारझन's picture

15 Jun 2010 - 1:56 am | टारझन

प्रकाशित करण्यात घाई झाली , आधी मण्सुर होता, पण मण्सुर ने मोषणी कडे नुकतेच पेपर टाकले आणि त्याने रोशनी कडे जॉइन केलं होतं ,इल्ल्यास मण्सुरची रिप्लेसमेंट होता :)
सॉरी शक्तिमान .

पंगा's picture

15 Jun 2010 - 2:08 am | पंगा

सूचनेची दखल घेऊन त्वरित सुधारणा केल्याबद्दल आभारी आहे. काय आहे, एरवी निर्दोष कथेत अशी तपशिलाची एखादी चूक म्हणजे... जाऊदे, दुसरी चांगली उपमा आठवत नाही म्हणून क्लिशे वापरतो... श्रीखंडात मिठाचा खडा पडल्यासारखी खटकते.

आणखी एकाच तपशिलाच्या बारीक चुकीबद्दल त्रास देतो. तेवढी सुधारली, की बाकी आपले काहीही म्हणणे नाही. मग गोष्ट एकदम परफेक्ट व्हावी.

परंतु झुमझुमबार मधे मी इंटरव्यु द्यायला आलो तेंव्हा कोणी तरी एक हरकाम्या तिकडे डब्बल बुर्जी ची ऑर्डर घेऊन आला होता , त्याच्या तोंडुन काही उल्लेख ऐकले आणि मी झमेली बार ची खुल्लाऑफर नाकारुन झमझमबार मधे पार्ट टाईम म्यानेजर कम गल्लामॅन ची नोकरी पत्करली.

झमझमबार नव्हे. झुमझुमबार.

आगाऊ धन्यवाद. बाकी चालू द्या, मजा आली वगैरे वगैरे नेहमीचेच यशस्वी...

- (छिद्रान्वेषी) पंडित गागाभट्ट.

पाषाणभेद's picture

15 Jun 2010 - 5:12 am | पाषाणभेद

तो इल्ल्यासच होता पण लाडाने त्यास मण्सूर म्हणत.

बाकी एकदम समयोचीत लेख. डोळे पाणावले.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

इंटरनेटस्नेही's picture

15 Jun 2010 - 3:27 am | इंटरनेटस्नेही

टारझन, तुमच्या प्रतिभेला आणि बुद्धीमत्तेला त्रिवार प्रणाम.
अत्यंत उत्तम लेख!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

विकास's picture

15 Jun 2010 - 6:54 am | विकास

__/\__ __/\__ __/\__ __/\__

=D> =D> =D> =D>

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

डॉ.श्रीराम दिवटे's picture

15 Jun 2010 - 4:17 am | डॉ.श्रीराम दिवटे

माडीवरचा हात
मला वाटलं तो आता मांडीवर जातोय की काय पण दांडीवर यॉर्कर पडला.
एकूण मस्त शब्दयोजना! मजा आली.

*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...

सुनील's picture

15 Jun 2010 - 5:37 am | सुनील

झकास लेख!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शुचि's picture

15 Jun 2010 - 5:47 am | शुचि

>> त्यातुन मी कुल्लेदार, होणारा त्राहिमाम टळला>>
__/\__

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सहज's picture

15 Jun 2010 - 6:42 am | सहज

लेखन नेहेमीचेच हिणकसोत्कट.
अतिशय हीन प्रतिमा, एक हिणकस प्रसंग, पण ते योग्य त्या दृष्टीस पडले, की त्याचे कला़कृतीमधे परिवर्तन कसे होते, याचे आणखी एक जिवंत उदाहरण.

मला एक सौजन्यरावांची कविता आठवते - 'इथेतिथेपिंक' नावाची.
भयाण जालावर मध्यरात्री, अज्ञानाचे जिथे साम्राज्य आहे, जिथे सौजन्य नाही अशा ठिकाणी विडंबनाचे फूल फुलते, आणि ते त्याना दिसते - सर्व कविता आत्ता मला तोंडपाठ नाही - पण या आशयाची.

त्या अनुभवाच्या जवळपास जाणारा हा लेख, टार्यांचा विशिष्ट ठसा उमटलेला दिसतो त्याच्यावर.

पण टारुशेठ, काहीतरी अधिक भरीव लिहावेत अशी विनंती, ऑफव्हाइट कॉलर लिखाण तुम्हाला सहज शक्य आहे, ते तुम्ही करीत आलाच आहात. कसे?

आणि हो, टारुशेठ फोटो न काढल्याबद्दल धन्यु :-)

चतुरंग's picture

15 Jun 2010 - 7:00 am | चतुरंग

टार्‍या, अरे काय डोकं म्हणावं का काय तुझं? कुठले कुठले संदर्भ कुठे वापरावेत काही सुमार? <०()8=<

चतुरंग

स्वप्निल..'s picture

15 Jun 2010 - 7:41 am | स्वप्निल..

पहिले हसुन घेतो .. =)) =))

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

... आता आरामात वाचतो :)

अप्पा जोगळेकर's picture

15 Jun 2010 - 8:34 am | अप्पा जोगळेकर

:)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :))

अप्पा जोगळेकर's picture

15 Jun 2010 - 8:36 am | अप्पा जोगळेकर

लेखकांस णम्र विणंती ही की 'साडीवरचा तो हात' पण लिहावे.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jun 2010 - 8:42 am | बिपिन कार्यकर्ते

फालतु. मजा नाही आला. टार्‍याची काळजी वाटते.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

15 Jun 2010 - 9:09 am | टारझन

ह्हा ह्हा ह्हा !! आपल्या प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद , बिपीनदा :)
बाकी लेखाचं मुल्य किती आणि किंमत किती ? :)
सिरियस व्हा हो सिरियस व्हा =))

-() टारझण
लेख वाचुन एखाद्यातरी मायबाप वाचकाला मजा आली तरी लेख सत्कारणी पडला

शानबा५१२'s picture

15 Jun 2010 - 9:36 am | शानबा५१२

मोषणीच नाव एकुन तिचा पत्ता विचारणार होतो,पण ती आजकल अशी झाली आहे हे एकुन खुप दु:ख झाल.
बाकी तिच्या रुपाच वर्णन वाचुन आम्ही तिच्या सौंदर्याच्या आठणीत रमुन गेलो.

मी कोण.........????

रीमझीम बारचा मालक........आम्ही तिथे खुपजणींना,खुपजणांना रस्त्याला लावल............रस्त्याला लावल हो आम्ही.म्हणून आज बसुन कमवतायत.

- मिसभोक्ता

आंबोळी's picture

15 Jun 2010 - 10:11 am | आंबोळी

टार्‍यांनी हे व्यक्तिचित्र वेगळ्या शैलीतही लिहिलेले आहे.

काकांच्या आशीर्वादाने शिष्याची आपली छाप लेखनावर पडू लागली आहे. पंख झटकून घरट्याबाहेर उडण्यापेक्षा मोठी श्रद्धांजली वडीलधार्‍यांना आपण काय देऊ शकणार?

बाकी लाळ, अंगाचा दर्प वगैरे आजुन किळसवाणे संदर्भ देऊन लेखन जिवंत करता आले असते... त्याने लेखनाचा दर्जाही वाढला असता...

आपल्या हातखंडा लिखाणाला सलाम!

शेवटी येवढेच म्हनेन की टार्‍या हलकट आहे.

( ™ )आंबोळी

ज्ञानेश...'s picture

15 Jun 2010 - 2:49 pm | ज्ञानेश...

लेख =))

आणि

प्रतिक्रिया =)) =))

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jun 2010 - 11:32 am | परिकथेतील राजकुमार

टार्‍या साहिब आपल्या लेखणीला सलाम __/\__

जबरदस्त पंचेस रे एकेक ! खल्लास लिहिले आहेस भौ !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

नंदन's picture

15 Jun 2010 - 11:50 am | नंदन
अवलिया's picture

15 Jun 2010 - 11:51 am | अवलिया

लेख न उडल्याबद्दल अभिनंदन :)

लेख वाचुन प्रतिक्रिया देतोच...

--अवलिया

अवलिया's picture

15 Jun 2010 - 6:18 pm | अवलिया

जबरा रे टारोबा !!!

=))

--अवलिया

मी_ओंकार's picture

15 Jun 2010 - 2:05 pm | मी_ओंकार

ही अशी विषेशणं लावली की लेख कसा दर्जेदार / अभ्यासपुर्ण होतो , नै का ?

हे अगदी बरोबर..

- ओंकार

गणपा's picture

15 Jun 2010 - 2:46 pm | गणपा

कहर आहेस बाबा...
बरेच ठिकाणी एकदम ख्वॅक् करुन हसु आलं.

विशाल कुलकर्णी's picture

15 Jun 2010 - 3:27 pm | विशाल कुलकर्णी

टार्‍या, तु महान आहेस बाबा =)) =)) =)) =)) =)) =)) =))

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

II विकास II's picture

15 Jun 2010 - 4:18 pm | II विकास II

लेख वाचुन उगाच शुचि हवाच असे वाटले.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

रानी १३'s picture

15 Jun 2010 - 6:23 pm | रानी १३

बाप् रे .....काय डोक चालत या माणसाचे....(अर्थात टार्झन् रावाचे...........):)

कं लिवलस बाला कं लिवलस !!!
=D> =D> =D> =D> =D> =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन's picture

15 Jun 2010 - 9:44 pm | टारझन

सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रीया देणार्‍या सगळ्या प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार :)
मिसळभोक्ता प्रणाली वापरुन प्रत्येक प्रतिसादावर चर्चा उठवणारा प्रतिसाद टाकुन ५० प्रतिसाद करण्याचा मानस होता .. पण .. हॅहॅहॅ

योगी९००'s picture

15 Jun 2010 - 9:58 pm | योगी९००

मस्त मस्त मस्त..

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही...

मिसळभोक्ता प्रणाली वापरुन प्रत्येक प्रतिसादावर चर्चा उठवणारा प्रतिसाद टाकुन ५० प्रतिसाद करण्याचा मानस होता .. पण .. हॅहॅहॅ

खॅ खॅ खॅ ...मि.भो. प्रणाली शिवाय ५० प्रतिसाद येतील असे वाटतेय..टा.भा. प्रणाली असताना आणखी दुसरी कशाला?

खादाडमाऊ

विसोबा खेचर's picture

15 Jun 2010 - 9:50 pm | विसोबा खेचर

विडंबन करणं खूपच सोपं असतं.. वास्तवाची नक्की कल्पना नसेल तर अजूनच सोपं..!

तात्या.

मिसळभोक्ता's picture

15 Jun 2010 - 10:38 pm | मिसळभोक्ता

टार्‍याचा परप्रकाशित लेखनात हातखंडा आहे.

"टार्‍यापर्‍याच्या गोष्टी" आम्हाला खूप आवडतात.

लगे रहो टार्‍याभाय !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

टारझन's picture

15 Jun 2010 - 10:54 pm | टारझन

वरचे दोन्ही प्रतिसाद वाचुन डोळे पाणावले.
बाकी आम्ही सिद्धहस्त लेखक कुठे हो तात्या तुमच्या सारखे ? मनाला येईल ते खरडतो , त्यामुळे अवघड(पक्षी: बोजड ?) लिखाण जमतंच नाही मला !!

तसं ही लेखण जास्तितजास्त साधंसोप्प लिहीण्याचा आमचा प्रयत्न असतो :)
लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ;)

-(साधा-सरळ-सोपा) टारझन

अभिज्ञ's picture

15 Jun 2010 - 10:59 pm | अभिज्ञ

सहमत तात्या,

काहि वेळेला विडंबनाने मुळ विषयाचे गांभीर्य रहात नाही हे देखील पटते.
प्रस्तुत लेखक जर खरोखर अश्या वस्तीत वावरला असता तर असा लेख कदाचित आला नसता.

असो,

अभिज्ञ.

मृगनयनी's picture

17 Jun 2010 - 12:46 pm | मृगनयनी

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))

काय रे टार्या!.. हसवून हसवून मारणार का आम्हाला? ;)

बाकी ती "लूज मोशणी" अप्रतिम! ;)
ती तुला "सौरी" म्हाल्याबद्दल "इल्लियास" चे आभार!
;)

बाकी ते "इलियास" चे 'यल्लो 'वर्णन वाचून डोळे पाणावले! ;)

=)) =)) =)) =))

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||