पावसाची कविता

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
12 Jun 2010 - 4:29 am

मोगर्‍याचं पान सांगेल
भिजताना आलेली मजा
टपटपणार्‍या थेंबांतून
पसरणारा गारवा,
मग अनामिक थरथर
ताजी उब उगत असताना
निथळणारा प्रत्येक थेंब
अंतस्थ हालचालींना साद देतोय
शिरशिरणारा गारवा
हलकेच घालतोय फुंकर
ओलेत्या उबेवर
फुलेच वेडावून गेलीयेत..
आता....सुगंध कोण थांबवणार ?

मुक्तक

प्रतिक्रिया

शुचि's picture

12 Jun 2010 - 4:39 am | शुचि

मस्त आहे!!
वेडावणारी!!!

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||