भिगवण भटकंती भाग २

jaypal's picture
jaypal in कलादालन
4 Jun 2010 - 10:12 pm

भिगवण भटकंती भाग १

दुपारी १.३०/१.४० पर्यंत हे फ़ोटोग्राफ़ी चालु होती. आता पोटात पण कावकाव चालु झालेली. थंडीचे दिवस असले तरी दुपार रणरणीत तापलेली, सोबत फ़्कत आर्धा लिटरच पाणी उरलेल. तासाभराची बोटीची सफ़र संपल्यावर त्याच नावाड्याला खाण्या विषयी म्हणजे हॊटेल वगैरे आहे का विचरल्यावर परत एकदा निराशा झाली. तळ्या काठाने उन्हात थोडा पुढे भटकत गेल्यावर एका उथळ जाग्यावर भरपुर डुंबुंन घेतल.(चांगल पोहता येत मला तरी पण न पोहता डुंबलो कारण सॆकची काळजी आणि अनोळख्या जागच्या पाण्याची मी कधीच रिस्क घेत नाही) भिगवणच्या तळ्या काठी स्थानिक मच्चीमारांची १०/१२ पाल किंवा शेतातील खोपी असल्यासारखी कुडाची कच्ची घर आहेत. भुक असह्य झाली होती आणि सोबतची बिस्कीटे, खजुर व राजगिरा+शेंगदाणा चिकीचा केव्हांच फ़डशा पडला होता. मनाशी ठरवल त्या मच्छी मारांच्या घरासमोर ओंम भिक्शाम देही म्हणायच. आवाज दिला ..........
मी :"कुणी हाय का घरात ताई ?" आणि आतुन खरोखरीच एक ताई(बाई) आली. तिला सरळ विचारल "मला जेवण हव आहे .पैसे द्यायला तायार आहे. मिळेल का?".
ती : "भाजी संपलीया सायब. मासं तेवढ हाईत. चालत्याल का?"
मी : (मनातल्या मनात आव चालत्याल काय? पळत्याल) चालत्याल की त्यात काय ? खर कशी प्लेट?
ती : आधी खावा अन आवडल तर समजुन द्या काय द्यायच ते?
१० मिनीटाच्या आत माझ्या समोर गरमा गरम तव्यातुन डायरेक ताटात भाकरी सोबत मश्याचा अप्रतिम चुलीवरचा रस्सा , लसुण चटणी, आणि तांब्याभर पाणी हजर. विनंती वरुन कांदा पण आला. काय सांगु त्या जेवणाची चव आहाहा!! आयुष्यात कधिच विसरणार नाही. साताजन्माचा उपाशी असल्यागत नमोजता पोट भरेसतो भाक-या हाणल्या. वट्ट रु.१००/- बील खुषीने देउन त्रुप्तीची ढेकर देत बाहेर आलो. आता कुठे जरा मेंदु चालायला लागला. मी याच झोपडीच्या दाराशी का आलो? त्या झोपडीतुन येणा-या चुलीवरच्या दरवळाने माझे पाय आपोआप तिकडे खेचले गेले होते. मी गेलो नव्हतो.
घड्याळात एव्हाना ३ वाजले होते. जेवण जड झालं होतं आणि वर उन्हाचा तडाखा. सेक उश्याला घेउन एका लिंबच्या झाडा खाली जरा (२५/३० मिनट) डुलका काढला.
अचानक फ़डफ़ड आणि कलकलाट ऐकु आला म्हणुन उठलो तर माझ्या समोर १५०/२०० रोहीत (फ़्लेमिंगो) पक्श्यांचा थवा आकाशात
घिरट्या घालत पाण्यात उतरण्याच्या तयारीत होता. मी आयुष्यात पहिल्यांदाच थक्क होउन फ़्लेमींगो बघत होतो.

werw

ete

ere

rwrwr

trtt

etw

ghfh

त्यांनंतर या पेंटेड स्टॉर्क ने पण दर्शन दिल

lkjhj

asadfd

एव्हाना उन्ह कलली होती आणि पक्ष्यां ईतकीच माल पण परतीची ओढ लागली होती. परतीचा रस्ता तुडवत तुडवत.......

dad

आ अब लौट चले....

asfgk

तळ्यातिल पान वनस्पतिंचा गालीचा

cncb

fdgd

या सुर्यास्ताला साक्षि ठेउन
mnrt

शेकडो पक्ष्यांचा मी आता निरोप घेत होतो.

kjas

सोबत सोनेरी खजिना घेउन हा भटक्या भिगवण एसटी स्टँडात परतला.

gjlk

भिगवण भटकंटी समाप्त

कॅमेरा निकॉन डि९० लेन्स निकॉन ७०-३०० आणि निकॉन १८-५५

छायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रभो's picture

4 Jun 2010 - 10:18 pm | प्रभो

जहबहरा!!!! सुर्यास्ताचे फोटो लै आवडले...

श्रावण मोडक's picture

4 Jun 2010 - 10:39 pm | श्रावण मोडक

_/\_
ते तसं जेवण मिळायला लागणारं भाग्य कुठून आणलं आहेस तेवढं सांग!

प्राजु's picture

4 Jun 2010 - 10:49 pm | प्राजु

जयपाल भाऊ...
तुझ्यापुढे मी नतमस्तक!!
अशक्य आहेस. काय जबरदस्त तो सुर्यास्त... तो सोनेरी खजिना!! सगळेच थिटे पडले त्यापुढे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

टारझन's picture

4 Jun 2010 - 10:56 pm | टारझन

जियो जैपाल जियो .... उडणारा बगळा झकास !!

- द्वारपाल

आळश्यांचा राजा's picture

4 Jun 2010 - 11:11 pm | आळश्यांचा राजा

फोटो आणि भटकंती दोन्ही!

(आपण कसे बिनकामाचे आहोत हे जाणवून देणार्‍या लोकांचे काय करावे?)

आळश्यांचा राजा

स्वाती२'s picture

4 Jun 2010 - 11:33 pm | स्वाती२

मस्त! सोनेरी खजिना खास!

चतुरंग's picture

4 Jun 2010 - 11:38 pm | चतुरंग

संपलो!! <०()8=<

(रोहित)चतुरंग

भारद्वाज's picture

5 Jun 2010 - 12:00 am | भारद्वाज

व्वा...तबियत बेहद खुश !!!
जय हिंद जय भिगवण

पुष्करिणी's picture

5 Jun 2010 - 12:29 am | पुष्करिणी

अहाहा, अत्यंत सुंदर ...बगळे आणि सूर्यास्त अप्रतिम
पुष्करिणी

येडाखुळा's picture

5 Jun 2010 - 12:34 am | येडाखुळा

=D>

सुर्यास्त रापचिक आहे रे बाबा...खल्ल्लास..

(रापचिक हा शब्द बर्याच दिवसांनी वापरला :? )

संजा's picture

5 Jun 2010 - 1:36 pm | संजा

मस्त फोटो.
बायको पोरांनी भटकायला मोकळा सोडणं याला नशिब लागत बाबा.

लै भारी.

संजा

भाग्यश्री's picture

5 Jun 2010 - 2:51 pm | भाग्यश्री

सूर्यास्त कसला मेजर देखणा आहे !!

हुप्प्या's picture

5 Jun 2010 - 9:29 pm | हुप्प्या

हे फोटोही सुंदर.
काळ्या डोक्याचा आणि पांढर्‍या शरीराचा पक्षी आहे तो ऐबिस. त्याच्या बाजूची बदकाची जोडी ही ब्राह्मणी गूस या नावाने ओळखतात.

मनःपुर्वक आभार / धन्यवाद.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

भडकमकर मास्तर's picture

10 Jun 2010 - 2:32 am | भडकमकर मास्तर

हाच हाच तो चित्रबलाकाचा अलारिपु बरं...

पाषाणभेद's picture

10 Jun 2010 - 3:57 am | पाषाणभेद

>>>> चांगल पोहता येत मला तरी पण न पोहता डुंबलो कारण सॆकची काळजी आणि अनोळख्या जागच्या पाण्याची मी कधीच रिस्क घेत नाही

खरं आहे बाबा. दोन्ही वस्तू कधी दगा देतील ते सांगता येत नाही अनोळखी ठिकाणी.

अन सुर्यास्ताचा फोटो मस्तच.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

शुचि's picture

10 Jun 2010 - 4:06 am | शुचि

सूर्यास्त आणि वर्णन मस्तच.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मदनबाण's picture

10 Jun 2010 - 8:23 am | मदनबाण

खल्लास...
जयपालाराव लयं भारी फोटो टिपले आहेत तुम्ही... :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget