आईस्ड टी (बर्फाळ लिंबू चहा)

अरुंधती's picture
अरुंधती in पाककृती
18 May 2010 - 10:33 pm

साहित्य :

२ ग्लास पाणी
२ टीबॅग्ज/ अर्धा टी-स्पून चहा (कोणताही चालेल - शक्यतो ग्रीन टी वापरतात, नेहमीची चहा पावडर ही ओके. पण फार स्ट्राँग नको)
४ टीस्पून साखर
२ टीस्पून लिंबाचा रस (गाळून)
४-५ पुदिना पाने
बर्फाचा चुरा/ क्यूब्ज

सजावटीसाठी :

लिंबाच्या आडव्या गोल चकत्या, पुदिना पाने.

आईस्ड टी: छायाचित्र स्रोत : विकीपिडीया

कृती :

पाण्यात साखर, पुदिना पाने घालून पाणी उकळावे. उकळी आल्यावर चहा घालून लगेच गॅस बंद करावा व चहाचे पातेले झाकावे. ३-४ मिनिटांनी झाकण दूर करून तो चहा दुसर्‍या भांड्यात गाळून घ्यावा. चहा गार झाल्यावर फ्रीजमध्ये किमान तासभर तरी गार करावा.

सर्व्ह करताना त्यात ताजा लिंबाचा रस घालावा. एका मोठ्या उभट ग्लासमध्ये तळाशी बर्फाचा चुरा/ क्यूब्ज घालून त्यावर हा चहा ओतावा. वर पुदिन्याची पाने घालून सजवावे. ग्लासच्या कडेला लिंबाची चकती खोचावी. गारेगार आईस्ड टी पिण्यासाठी तय्यार!

अधिक टीपा :

ह्यात टी बॅग्ज वापरल्यास पाण्यात साखर विरघळवून ते पाणी, पुदिना असे उकळून, गाळून टी बॅग्जवर ओतावे व १५-२० मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर टी बॅग्ज काढून टाकाव्यात. पुढील कृती वर दिल्याप्रमाणेच!

अनेकजण साखरे ऐवजी मधही वापरतात. पण जर मध वापरणार असाल तर तो आयत्या वेळी घालावा. मध घालून पाणी उकळू नये. एक ग्लासाला साधारण १ ते २ चमचे मध पुरतो.

पुदिन्याची चव आवडत नसल्यास पुदिना वगळूनही हा आईस्ड टी अफलातून लागतो. काहीजण ह्या चहात आलेही घालतात. तसेच काहीजणांना हा चहा वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या सिरप्सबरोबर मिसळून प्यायला आवडतो. उदा: पीच, लाईम, चेरी इत्यादी.

वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीत ह्या चहाचे स्थान अविभाज्य असून त्याच्या रेसिपीज, पिण्याच्या पध्दती इत्यादींमध्येही बरेच वैविध्य आहे. दुपारी किंवा अन्य वेळी प्यायलाही हे पेय उत्तम असून लिंबाचा रस, पुदिना व चहा ह्या संयोगामुळे ताजेतवाने, थंड करणारे आहे.

प्रतिक्रिया

शुचि's picture

18 May 2010 - 10:35 pm | शुचि

मला खूप आवडतो. पाकृ बद्दल धन्यवाद.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2010 - 10:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा .... थंड वाटलं!

अदिती

अरुंधती's picture

18 May 2010 - 10:55 pm | अरुंधती

उकाड्यावर इन्स्टन्ट इलाज! :D

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2010 - 10:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आईस्ड टी बनवून उद्या फोटोच पाठवते गुरूदक्षिणा म्हणून!

अदिती

मस्त कलंदर's picture

18 May 2010 - 11:09 pm | मस्त कलंदर

पाकृ छानच...
यावेळी अदिती मला कॉफी ऐवजी आईस्ड टी पाजेल... मग मी पण ट्राय करेन!!!! ')

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

अनामिक's picture

18 May 2010 - 10:46 pm | अनामिक

मला पुदिना आवडत नाही, त्यामुळे मी आईस-टी मधे फ्लेवर यावा म्हणून कधी बेसीलची पाने, तर कधी वेलची घालतो. ज्यांच्या कडे तुळस आहे त्यांनी तुळशीची पाने घालुन बघावे.

-अनामिक

अरुंधती's picture

18 May 2010 - 10:52 pm | अरुंधती

तुळशीची पानेही मस्तच लागतात स्वादाला! आईस्ड टी मध्ये छान लागतील! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

Nile's picture

18 May 2010 - 11:14 pm | Nile

हा बनवणारच. मद्रासच्या विमानतळावर एके ठिकाणी आईस-लेमन टी बेश्ट मिळायचा त्याची आठवण झाली.

-Nile

सहज's picture

19 May 2010 - 12:26 pm | सहज

तुर्की मिंट टी लै भारी!

(रोज ग्रीन टी पिणारा) सहज

विंजिनेर's picture

19 May 2010 - 12:36 pm | विंजिनेर

छान. पण मला जास्मिन टी जास्त आवडतो.
(कोचा पिणारा) विंजिनेर

kaka's picture

19 May 2010 - 2:04 pm | kaka

म्स्त; पण डायब॑टीसवाल्याला॑काना सा़खर॑शीवाय चाल॑ल का?
त॑वडीच मजा य॑इल का?

अरुंधती's picture

19 May 2010 - 4:59 pm | अरुंधती

काका, साखर/ मधाऐवजी शुगर-फ्री गोळ्या घालून आईस्ड टी बनवता येईल!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

Govind Gore's picture

26 Jun 2010 - 3:39 pm | Govind Gore

वा....खुपच छान

जागु's picture

26 Jun 2010 - 7:29 pm | जागु

वा. गार गार वाटल.

वाहीदा's picture

26 Jun 2010 - 8:03 pm | वाहीदा

आता कसं गार गार वाटतय !
अहाहा !
अवांतर :
अरुंधती,
हैद्राबादी ईराणी चहाची रेसिपी आहे का ग तुझ्याकडे ?? मी एकदा ट्राय करुन बघितला होता लेकीन वोह हैद्राबादी ईराणी रेस्टॉरंट का मजा नहीं आया :-(
इथे http://www.iranichai.co.in पण बघितले काही फायदा नाही झाला बहुतेक काही स्पाईसेस कमी पडले असावेत (cinnamon , cardamon , saffron )
माहीत असेल तर सांगशिल का ग ?
~ वाहीदा