विडंबन सम्राट

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
26 Mar 2008 - 3:02 pm

सध्या मनोमिसळवर विडंबनाची लाट आली आहे (ज्यात आम्ही वाहून गेलेलो आहोत, नाकातोंडात पाणी गेल्याने हातपाय झाडतोय कसेतरी).

पण सगळ्या विडंबनकारांचा गुरु आणि माझा आवडता एक आणि एकच. जसपाल भट्टी. ज्याच्या फ्लॉप शो, उल्टा पुल्टा ने एकेकाळी लोकांना वेड लावले होते. जो दूरदर्शन सारख्या सरकारी वाहिनीवर खुशाल टेलिफोन, सरकारी बाबू लोक, कंत्राटदार इ.इ. ची टोपी उडवायचा. तो, त्याची बायको आणि विवेक शक म्हणजे भन्नाट तिकडी. ह.ह.पु.वा.

मला तर वाटते की त्याने मंडी हाऊस मधले लोक पैसा कसा खातात आणि भिकार कार्यक्रम कसे मंजुर करतात ह्यावर पण एक भाग बनविला होता पण दूरदर्शनवाल्यांनी त्यावर दुष्टपणे कात्री चालवली.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 Mar 2008 - 3:06 pm | विसोबा खेचर

जसपाल भट्टीचे कार्यक्रम मलाही खूप आवडायचे! अर्धा तास अगदी मजेत, निखळ आनंदात जायचा! :)

तात्या.

प्रशांतकवळे's picture

26 Mar 2008 - 5:39 pm | प्रशांतकवळे

जेव्हा कांद्याचा भाव गगनाला भिडला होता, तेव्हा त्याने त्यावर पण एक कार्यक्रम केला होता.

प्रशांत

प्राजु's picture

26 Mar 2008 - 10:54 pm | प्राजु

जस्पाल भट्टीप्रमाणेच पंकज कपूर चे सुद्धा "ऑफिस ऑफिस" सारखे कार्यक्रम उत्तम असतात. सगळ्या बँका, सरकारी कार्यालयातून चालणारे घोटाळे यावर उत्तम विडंबनात्मक कार्यक्रम सादर करतो पंकज कपूर.
- (सर्वव्यापी)प्राजु

विसुनाना's picture

27 Mar 2008 - 12:12 pm | विसुनाना

असेच म्हणतो. उल्टापुल्टा आणि ऑफिस ऑफिस दोन्ही आवडते होते/आहेत.

सृष्टीलावण्या's picture

27 Mar 2008 - 12:22 pm | सृष्टीलावण्या

जसपालचा अभिनय लंबरेषेत होता तर पंकज कपूरचा क्षितिजसमांतर. जसपालला फक्त विनोद रस जमायचा तर पंकज वीर, करुण, भीषण, शृंगार इ. प्रकारच्या कुठल्याही रसात अभिनय करू शकायचा. पंकज कपूरच्या अभिनयाची व्याप्ती मोठी होती. म्हणून तो रोजा, एक डॉक्टर की मौत वैगरे चित्रपटांत सुद्धा चमकला. खरोखर गुणी कलावंत.

>
>
मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला ।
सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

मनस्वी's picture

27 Mar 2008 - 12:21 pm | मनस्वी

जसपाल भट्टी + ऑफीस ऑफीस +
घडलंय बिघडलंय पण मला आवडते. आधी रोज असायचे आता आठवड्यातून एकदाच असते बहुतेक.
जबरदस्त विडंबन + राजकारण्यांना टोले.
त्यातील आतिषा नाईकचा अभिनय आणि चेहेर्‍यावरील भाव अप्रतिम!
शिवाय सतीश तारे + आनंद इंगळे मस्तच.

मनस्वी

आनंदयात्री's picture

27 Mar 2008 - 12:29 pm | आनंदयात्री

राजा अन वेताळ पण उत्तम ... वेताळाची कोकणी भाषा दमदार ...

(खाल्लस ना श्यान .. चाल्लय मी आता ... खयं काय विचारतय ?)
- आनंदवेताळ

डॉ.प्रसाद दाढे's picture

27 Mar 2008 - 8:20 pm | डॉ.प्रसाद दाढे

ऑफिस ऑफिस अप्रतिम आहे. प॑कज कपूर आणि त्याची सगळीच टीम लई भारी! आसावरी जोशी, मनोज पाहवा इ. सध्या मात्र एक नवीनच पात्र आले आहे (ज्याने 'कहो ना प्यार है' मध्ये ऋतिकच्या पिपाणेवाल्या मित्राचे काम केले होते) तो फारच बोअर मारतो. अगोदर ते काम (नहि तो॑ दो बाते॑ हो जायेगी' म्हणणारा) करणारा ऍक्टर चा॑गले काम करायचा (साल॑ नावच आठवत नाही.) त्याने 'जो जिता वोही सिक॑दर' मध्ये आमिरच्या ढापण्या मित्राचे काम केले होते..

देवदत्त's picture

27 Mar 2008 - 8:48 pm | देवदत्त

ऑफिस ऑफिस मला आवडायचे. नेहमी बघायचो. नंतर माझ्या ऑफिसच्या कामामुळे वेळ मिळायचा नाही. पण आता त्यात तोच तोचपणा आला असे वाटते.

ज्याने 'कहो ना प्यार है' मध्ये ऋतिकच्या पिपाणेवाल्या मित्राचे काम केले होतेह्याचे नाव वृजेश हिरजी. तो तसा चांगला अभिनय करतो पण ह्या धारावाहिका मध्ये बोअर करतो असे मलाही वाटले.

अगोदर ते काम (नहि तो॑ दो बाते॑ हो जायेगी' म्हणणारा) करणारा ऍक्टर चा॑गले काम करायचा (साल॑ नावच आठवत नाही.)
देवेन भोजानी. ह्याने 'देख भाई देख' मध्ये करिमाचे काम चांगले केले होते.

देख भाई देख वरून आठवले... शेखर सुमनचा ही कार्यक्रम होता मूवर्स अँड शेकर्स. ह्यातही सुरूवातीला चांगले मनोरंजन होत होते. पण नंतर कंटाळा यायला लागला.

धोंडोपंत's picture

27 Mar 2008 - 8:45 pm | धोंडोपंत

जसपाल भट्ट्याच्या विडंबनात्मक कार्यक्रमाची चर्चा, मनोमिसळवर विडंबनाची लाट आलेय आणि आम्ही त्यात वाहून गेलोय, नाकातोंडात पाणी गेलाय वगैरे नक्राश्रुंचे सिंचन न करताही सुरू करता आली असती.

जसपाल भट्टी मोठा असेल पण आमच्यासाठी माय मराठीतून लेखन करणारे आमचे या घरातील विडंबनकार जास्त मोलाचे आहेत.

एखाद्याची स्तुती करतांना आपल्याच लोकांना हिणविण्याची गरज नाही.

मिसळपावावरील केशवसुमार, अविनाश ओगले इत्यादी विडंबनकारांच्या लेखनामुळे आमच्या आयुष्यातील काही क्षण आनंदात गेले हे वास्तव आहे. आम्ही मिसळपावावरील विडंबनकारांचे सदैव ऋणी आहोत.

आपला,
(चाहता) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

देवदत्त's picture

27 Mar 2008 - 8:50 pm | देवदत्त

जसपाल भट्टींचे कार्यक्रम चांगलेच होते. त्यांचा विनोद दर्जेदार असतो. विडंबन असले तरी त्यात एक निखळता असायची. गेल्या २/३ वर्षांत आलेल्या लाप्फ्टर शो, हास्यसम्राट हे जरा पातळी सोडून विनोद करायचे असे वाटले. ह्याबाबत एका वाहिनीवर जसपाल भट्टी ह्यांनी त्यांना सांगितलेही होते की "मी कधी एखाद्याच्या शारीरीक व्यंग किंवा शरीराच्या रचनेवरून कधी विनोद नाही केला."(पक्षी: अदनान सामी)

आताही जसपाल भट्टींचे दर्शन होत असते अधून मधून (सिनेमा, कार्यक्रमातून) पण तेवढी मजा नाही येत.