अत्यावश्यक निवेदन...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
15 May 2010 - 5:27 pm
गाभा: 

नमस्कार,

गेले काही आठवडे माझ्या अनुपस्थितीत धनंजय आणि निल गंधार यांनी लिहीलेल्या लेखांना उत्तर देण्यासाठी म्हणून हे निवेदन तुमच्या वाचनासाठी ठेवत आहे.

माझ्या वैयक्तीक स्वरुपाच्या काही अडचणीमुळे मी हे निवेदन लवकर देऊ शकलो नाही पण आज वेळ मिळताक्षणी हे काम पूर्ण करत आहे.
ही सत्य परिस्थिती आहे की मिपाच्या खालील सदस्यांसोबत माझे आर्थिक व्यवहार आहेत .त्यांची यादी मी सोबत देत आहे.

१ सुधीर काळे
२ चतुरंग
३ विकास
४ वेदनयन
५ सुनील
६ समीर गोगटे
७ कुंदन
८ मुक्तसुनीत
९ शेखर
१० पिम्पळखरे
११ धनंजय
१२ संतोष जोशी

पण रक्कम किती आणि कोणत्या बोलीवर घेतली आहे याची माहीती सध्या गोपनीय ठेवत आहे. हा व्यवहार खाजगी स्वरुपाचा असल्यामुळे ही गोपनियता पाळणे हा माझा आणि त्यांचाही हक्क आहे. परंतू बुडीत खाते आणि बुडीत खाते २ या लेखात आणि त्यानंतर झालेल्या चर्चेची पूर्तता करावी म्हणून हे निवेदन करीत आहे.

१) माझे आणि वर उल्लेखीत सदस्यांचे आर्थिक व्यवहार खाजगी स्वरुपाचे आहेत. माझ्या अनुपस्थिती आणि संपर्काचा अभाव यामुळे धनंजय यांना पब्लीक फोरमचा उपयोग करावा लागला . माझ्याकडून झालेल्या दिरंगाईसाठी मी दिलगीर आहे. आता हे सगळे व्यवहार ताबडतोब पूर्ण करण्यासाठी आजच्या घडीस मी असमर्थ आहे. पण माझी जबाबदारी मी नाकारत नाही आहे. आजची घडी उद्याला टिकत नाही. जरी उशीर झाला असला तरी योग्य वेळ आणि संधी या दोन्हीचा उपयोग करून मी हे सर्व आर्थिक व्यवहार मी पूर्ण करीन याची ग्वाही मी आपल्या सर्वांसमोर देत आहे. आर्थिक व्यवहारासाठी मी जे आवाहन सगळ्यांना केले होते आणि त्या आवाहनला ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांची फसवणूक करणे हा माझा उद्देश नव्हता. मी फसलो आणि त्यामुळे ते ही फसले.परंतू ह्या सदस्यांच्या संपर्कात कायम न राहू शकल्यामुळे जो गैरसमज झाला त्याची जबाबदारीही माझीच आहे.या सर्व सन्माननीय सदस्यांनी मला काही वेळ द्यावा अशी मी विनंती करत आहे.

२) मी कॅन्सर ग्रस्त महीलेच्या मदतीसाठी केलेले आवाहन कपोलकल्पीत कहाणी आहे असा समज होऊ देउ नका. मला थोडा वेळ मिळाल्यास त्या कुटुंबासोबत मी त्या सदस्यांशी रुजवात करून देईन ज्यांनी मला मदतीसाठी पैसे पाठवले होते. इतर सदस्यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही.
तरीपण ज्या सद्स्यांनी त्या महीलेच्या साठी निधी पाठवला होता त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत

१) गणपा
२) नंदन
३) एकलव्य
४) प्रभाकर पेठकर
५) सायली पानसे
६) अमोल
७) भोचक

३) हे सर्व व्यवहार करताना मी संपादकांना त्याची माहीती दिली नव्हती .त्यामुळे माझे इतरांशी असलेले व्यवहार त्यांना माहीती नव्हते. सदस्यांनी संपादकांविषयी असलेला गैरसमज काडून टाकावा ही विनंती.आतापर्यंत ज्या प्रेमभावनेनी संपादकांनी जबाबदार्‍या पार पाडल्या त्याबद्दल मी आभारी आहे आणि माझी नियमीत येणे होईपर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळावी ही विनंती.

४) सध्या मी आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलो तरी मी दिवाळखोर नाही. घरच्या काही अडचणींमुळे वेळेची कमतरता आहे. याचा फायदा मिपा च्या हितशत्रूंना मिळू नये म्हणून हे निवेदन करीत आहे.यापुढे ज्या सदस्यांना मला संपर्क करायचा असेल त्यांनी पूर्ववत व्यनी करावेत आणि उत्तराची वाट बघावी.थोडा उशीर होण्याची शक्यता आहे पण उत्तर मिळेल.

५) मिपाच्या मालकीहक्काचा प्रश्न आवश्यकता नसताना वारंवार उभा केला जात आहे. याबाबत मला इतकेच म्हणायचे आहे की हे संस्थळ खाजगी मालकीचे आहे. तात्या अभ्यंकर यांचे आहे.यातील वाद आणि हक्क(जर असतील तर) याची पूर्तता खाजगी पत्रव्यवहारातून होईल.सदस्यांना अकारण मालकी हक्काबद्दल प्रश्न उभे करण्याचा आणि वाद घालण्याचा हक्क नाही.कदाचीत आज माझ्याकडे ताबा नसेल पण मिपाचे तूर्तास सर्व हक्क असलेल्या नीलकांतने तसे जाहीर केल्याशिवाय मिपा हे संस्थळ हे माझ्या मालकीचे आहे, असणार आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

६) माझ्या अनुपस्थितीत जे लेख आणि प्रतिसाद आले त्यामुळे मालकासोबत संस्थळाची बदनामी होत असल्याचे पाहून फार वाईट वाटले. ह्या निवेदनानंतर झालेल्या प्रकरणात संस्थळाची वाढ थांबू नये म्हणून हे निवेदन लिहीत आहे.मिपा फुलण्यात सर्वच सदस्यांचा सहभाग आहे .मी मिपाला पूर्ण वेळ देऊ शकेन अशी घडी बसेपर्यंत आपण सदस्यांनीच मिपाला सांभाळायचे आहे. मालक असोत नसोत मिपा सदस्यांशिवाय फुलणार नाही.

७) या निवेदनावर हवी तेव्हढी चर्चा करावी पण त्यात संस्थळाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी.

८) मा. नीलकांत : हा धागा जेव्हा मागच्या पानावर जाईल तेव्हा जाऊ देत पण ह्याच विषयावर आणखी नवे धागे आले तर ते आपण संपादीत करावेत.दंगलीचा फायदा घेऊन आपसातील उणेदुणे मिटवणारांना थारा मिळू नये हीच इच्छा.

९) ह्या सर्व समस्यंतून बाहेर येण्याची प्रामाणीक धडपड मी करतो आहे पण आपल्या सगळ्यांच्या सदभावना आणि ईश्वरी कृपेशिवाय हे शक्य होणार नाही.

१०) जेव्हा शक्य होईल तेव्हा मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करीनच पण तोपर्यंत व्यनीचा वापर करावा .

माझे हितचिंतक व मिपाचे एक जेष्ठ सन्माननीय सदस्य श्री रामदास यांचे हे निवेदन लिहिण्याकरता मला मोलाचे सहकार्य झाले याबद्दल मी कृतज्ञ आहे...

आपलाच,
तात्या अभ्यंकर.

प्रतिक्रिया

वेताळ's picture

15 May 2010 - 5:39 pm | वेताळ

आज तुम्ही व निलकांत दोघानी येवुन खुलासा केल्यामुळे वातावरण निवळण्यास मदत होईल.
वेताळ

प्रमोद देव's picture

15 May 2010 - 5:41 pm | प्रमोद देव

ह्या सदस्यांच्या संपर्कात कायम न राहू शकल्यामुळे जो गैरसमज झाला त्याची जबाबदारीही माझीच आहे.या सर्व सन्माननीय सदस्यांनी मला काही वेळ द्यावा अशी मी विनंती करत आहे.

केव्हांपासून हेच निवेदन हवे होते...पण हरकत नाही...देर आये दूरूस्त आये.

मी कॅन्सर ग्रस्त महीलेच्या मदतीसाठी केलेले आवाहन कपोलकल्पीत कहाणी आहे असा समज होऊ देउ नका. मला थोडा वेळ मिळाल्यास त्या कुटुंबासोबत मी त्या सदस्यांशी रुजवात करून देईन ज्यांनी मला मदतीसाठी पैसे पाठवले होते.

हा खुलासाही महत्वाचा आहे...आधीच केला असतास तर?

इंग्लीश मध्ये एक म्हण आहे...स्टीच इन टाईम, सेव्हज नाईन.
वेळेला फार महत्व आहे बाबा.

पर्नल नेने मराठे's picture

15 May 2010 - 5:57 pm | पर्नल नेने मराठे

केव्हांपासून हेच निवेदन हवे होते... +१

सासरेबुवांचा जयजयकार असो. <:P
तुमच्यामुळे तात्या लिहुन शकले व गैरसमज दुर झाला/होइल्/झाला असेल.

चुचु :D

स्वाती२'s picture

15 May 2010 - 5:51 pm | स्वाती२

निवेदनाबद्दल धन्यवाद!

चित्रा's picture

15 May 2010 - 6:15 pm | चित्रा

निवेदनाबद्दल आभार. पण हे निवेदन बरेच आधी आले असते तर खूप बरे झाले असते. संपादकांना आरोपांमुळे झालेला मनस्ताप टळला असता असे वाटते.

मुळात वैयक्तिक बोलायचे तर पैसे उशीरा मिळतील किंवा मिळणारच नाहीत ह्याबद्दल आमची (माझी आणि विकासची) तयारी होती, पण कॅन्सरग्रस्त महिलेच्या नंतर ऐकू आलेल्या गोष्टीमुळे ह्या गोष्टीला वेगळे वळण मिळाले हे माझ्याबाबतीत सत्य आहे.

चित्रा's picture

15 May 2010 - 6:24 pm | चित्रा

रामदास यांचेही आजवर मानलेले नाहीत, पण येथे या प्रश्नाची तड लावण्याच्या प्रयत्नांबद्दल जाहीर आणि मनापासून आभार मानते.

ऋषिकेश's picture

15 May 2010 - 6:16 pm | ऋषिकेश

निवेदन स्पष्ट आहे, थेट मुद्द्याला हात घालणारे आहे, आवश्यक ती माहीती उघडपणे देणारे आहे म्हणूनच स्वागतार्ह आहे.
असो. तूर्तास इतकेच

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

प्रियाली's picture

15 May 2010 - 6:19 pm | प्रियाली

या निवेदनाने कंड्या पिकवणे, आरोपबाजी आणि मनस्ताप यांना थोडाफार आळा बसेल असे वाटते.

दत्ता काळे's picture

15 May 2010 - 6:28 pm | दत्ता काळे

ह्यामुळे अकारण कंड्या पिकणे नक्कीच थांबेल. धन्यवाद.

चित्रा's picture

16 May 2010 - 6:57 am | चित्रा

गेले दोनतीन दिवस आम्ही हेच म्हणत होतो की याबाबतीत तुम्ही विश्वास ठेवायला हवा - की यात एका व्यक्तीखेरीज इतर कोणीही जबाबदार असल्याची शक्यता कमी आहे तेव्हा आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला काही सदस्यांची तयारी नव्हती. पण तेच आता जेव्हा हीच गोष्ट जी व्यक्ती या सर्व गोंधळाला कारण झाली आहे, तीच जेव्हा हे सांगत आहे, तेव्हा मात्र आपण सर्वांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आहे. त्यात मी आलेच, पण मनुष्यस्वभावाची ही एक गंमत वाटली. असो.

मुक्तसुनीत's picture

15 May 2010 - 6:37 pm | मुक्तसुनीत

असेच म्हणतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 May 2010 - 6:54 pm | बिपिन कार्यकर्ते

देर आये, दुरूस्त आये...

बिपिन कार्यकर्ते

विकास's picture

15 May 2010 - 7:15 pm | विकास

उशिरा का होईना पण, निवेदन केलेत हे चांगले झाले. त्यात स्वतःची जबाबदारी देखील मान्य केली आहे. मात्र ही जबाबदारी केवळ आर्थिक गोष्टींपुरतीच मर्यादीत नाही आहे हे लक्षात असूंदेत असे म्हणावेसे वाटते.

आज या गोष्टीमुळे अनेकांना विश्वासघात झाल्याचे वाईट वाटलेले आहे. त्यात ज्यांनी पैसे दिलेत तेव्हढेच मर्यादीत संख्येने नाहीत.

वर चित्राने म्हणले त्या संदर्भात, हा विश्वासघात आम्ही पैसे दिले त्यामुळे नव्हता. कारण ते कायदेशीर दिले आहेत. तात्याला ओळखायला लागलो होतो, ज्याने (मराठी असून) हातात घेतलेला संकेतस्थळाचा संकल्प पूर्ण केला, काही तरी धमक दाखवली (संपादक होतोस का, हा प्रश्न विचारला तेंव्हा देखील केवळ याच कारणाने मी व्यक्तीगत तयारी दाखवली होती.). त्याच्या वारंवार येणार्‍या फोन/इमेल्स वरून काहीतरी आर्थिक प्रश्न असतील हे मनोमन जाणले. अडचणीच्या वेळेस माणसास मदत मागायला लाज वाटू शकते हे विचारात घेतले आणि पैसे दिले. एका अर्थी उदक सोडून - याचा अर्थ पैसे परत नकोच या अर्थाने नाही पण "परहस्त गतं धनम" या अर्थाने...

मात्र तसे घडत असताना अजूनही व्यवहार असेल आणि तो देखील इतका व्यवहार असे वाटले नव्हते. ते समजायला मार्च अखेर उजाडली आणि तरी देखील वरील सर्व नावे वर वाचेपर्यंत माहीत नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी कॅन्सरचे प्रकरण समजले. (जो पर्यंत "रुजवात" होत नाही तो पर्यंत दुर्दैवाने आत्ताच्या घडीस याला प्रकरणच म्हणावेसे वाटत आहे). आणि जे काही झाले ते केवळ विश्वासाला धक्का नसून अक्षम्य आणि कुठल्याही तराजूमधे अनैतिक वाटले.

बाकी हा संवाद त्याने या मधे ज्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली त्यांच्याशी नीट केला असता तर बरेच काही न बिघडता राहीले असते. पण तसे झाले नाही आणि उरलीसुरली विश्वासार्हतापण राहीली नाही.

बाकी उरला मिपाच्या हितशत्रूंचा मुद्दा: या संदर्भात परत गीतेतील "आत्माची अपुला बंधू, आत्माची रीपू आपला" , अर्थातच आपणच आपले शत्रू अथवा मित्र असतो ही ओळ आठवली. तात्या हे काही झाले तरी मिपाचे आत्मा होते आणि आहेत, त्यांनीच मिपा प्रामुख्याने वाढवलेले आहे. मात्र जो पर्यंत ते स्वतःभोवतीच्या अविश्वासाचे गढूळ झालेले वातावरण निवळत नाहीत तो पर्यंत तेच प्रामुख्याने मिपाचे हितशत्रू देखील ठरत आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. नीलकांतला सर्व अधिकार देऊन एका अर्थी त्यांनी चांगली सुरवात केली आहे. त्यांनी सध्या यासर्व जबाबदार्‍यांपासून अलिप्त रहाणे हे त्यांच्यासाठी आणि मिपासाठी योग्य ठरेल. मिपामालकी वगैरेची काळजी त्यांनी तुर्तास करू नये अथवा तो विषय येथे इतरांनी देखील चर्चेचा करू नये ही विनंती.

शेवटी अजून काही:

एक म्हणजे एक रुपया असूंदेत,एक $ असूदेत अथवा मिलियन्स रू/$ असूंदेत. कोणी कसे मिळवलेत, गोर्‍या कातडीकडे काम करून का ब्राऊन कातडीकडे चाकरी करून हा मुद्दा गौण आहे. कुणाकडे किती आहेत हा प्रश्न नाही, पण जर ते आपण घेतलेत तर ते परत करावेत अथवा किमान सुयोग्य संवाद करावा. तसेच एकाचे पैसे हे दुसर्‍याकडून उधार घेऊन तर परत करत नाही ना याची देखील काळजी घ्या.

नीलकांतला एक विनंती:

तुर्तास नीलकांतचे आणि तात्याच्या निवदेनाचे दुवे हे मुख्यपानावर राहतील याची व्यवस्था करावी. त्यात मिपाची बदनामी होत नसून, जे काही गैर झाले आहे त्यातून संबंधितांची बाहेर पडण्याची आणि परत असे घडू नये ह्या प्रयत्नाची करेक्टीव्ह अ‍ॅक्शन दिसते, जी स्पृहणीय आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रमोद देव's picture

15 May 2010 - 8:41 pm | प्रमोद देव

विकासराव अतिशय मुद्देसूद लिहिलंत...अभिनंदन.
आपल्या वरील विचारांशी पूर्णपणे सहमत आहे.
योग्यवेळी संवाद साधला नाहीतर गैरसमज निर्माण होतात आणि जसजसा काल वाढत जातो...तसे ते गैरसमज दृढ होत जातात किंबहूना ते समजांमध्ये रुपांतरीत होतात...आत्ता झालंय तसं.

चित्रा's picture

15 May 2010 - 11:09 pm | चित्रा

मिपामालकी वगैरेची काळजी त्यांनी तुर्तास करू नये अथवा तो विषय येथे इतरांनी देखील चर्चेचा करू नये ही विनंती.
नीलकांतचे आणि तात्याच्या निवदेनाचे दुवे हे मुख्यपानावर राहतील याची व्यवस्था करावी.

असेच म्हणते. आणि मिसळपावच्या मालकीचा विचार करण्यापेक्षा स्वत:च्या विश्वासार्हतेचा विचार तात्यांनी करावा आणि त्यादॄष्टीने आपल्या खाजगी समस्येतून मोकळे होण्याचे प्रयत्न करावे ही विनंती.

टारझन's picture

15 May 2010 - 7:20 pm | टारझन

खुलाश्या बद्दल धन्यवाद ,
आणि शुभेच्छा ही ... (मिपाची बदणामी करण्याचा प्रश्नंच उद्भवत नाही)
आर्थिक व्यवहार चांगले चांगले संबंध खराब करु शकतात ! लवकर सगळं "जैसे थे" व्हावं .. हल्ली मिर्‍या वाटण्यास हक्काचं "आवडतं" माणुस नसल्यानं अवकळा आल्यासारखी वाटते.

- (बायको चा भाऊ ... ) टारझन

अरुण मनोहर's picture

15 May 2010 - 7:44 pm | अरुण मनोहर

खुलाश्या बद्दल धन्यवाद ,

अक्षय पुर्णपात्रे's picture

15 May 2010 - 7:49 pm | अक्षय पुर्णपात्रे

पारदर्शकता दाखवल्याबद्दल आभार. धनंजय व नील गंधार यांचे लेख अप्रकाशित केले आहेत. ते पुनर्प्रकाशित केल्यासच या अत्यावश्यकतेमागील प्रेरणा ध्यानी येऊ शकेल. आजारी महिलेविषयी माहिती न देण्यामागचे कारण समजले नाही. कमीतकमी ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना तरी आता याबद्दल माहिती दिली जावी, असे वाटते.

कदाचीत आज माझ्याकडे ताबा नसेल पण मिपाचे तूर्तास सर्व हक्क असलेल्या नीलकांतने तसे जाहीर केल्याशिवाय मिपा हे संस्थळ हे माझ्या मालकीचे आहे, असणार आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

हे कळले ते बरे झाले.

सहज's picture

15 May 2010 - 7:59 pm | सहज

रामदास धन्यु!

आनंदयात्री's picture

15 May 2010 - 8:01 pm | आनंदयात्री

प्रतिसाद वाचुन अंमळ मौज वाटली.
नीलकांतचे निवेदन येउपर्यंत विटंबना का चालत राहिली हे सर्वसामान्यांसाठी कोडेच. सविस्तर प्रतिसाद लिहतोच. आता लिहण्याची वेळ आली आहे हे नक्की !

इन्द्र्राज पवार's picture

15 May 2010 - 8:04 pm | इन्द्र्राज पवार

काही म्हणजे काही कळेना झालयं !!

माझी अशी समजूत की, मिपा हे मराठी भाषेच्या वृध्दीसाठी, काही मराठी प्रेमींनी (प्रसंगी पदरमोड करून....) राज्यात, देशात, तसेच विविध कारणांसाठी साता समुद्रापल्याड वास्तव्यास असलेल्या मराठी बंधुंसाठी आपली संस्कृती टिकविण्यासाठी, वाढविण्यासाठी केलेला एक स्तुत्य प्रयत्न ... पण गेला आठवडा "बुडीत खाते" धाग्यांवरून जी काही राळ इथे उडत आहे तिचा ठसका आम्हा नव्या सदस्यांना चांगलाच जाणवू लागला आहे.

अशा घटना निव्वळ क्लेशदायक नसून व्यक्तिव्यक्तीमधील सौहार्दाचे वातावरण गढूळ करण्यास कारणीभूत ठरणारे आहे. उदाहरणार्थ > "खरडीमुळे" एखाद्या "अ" चे "ब" सदस्याबरोबर मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आणि "ब" केव्हा तरी म्हणाला की, "मी तुझ्या गावी येतो... एक काम आहे..." आता "अ" ची अशीच समजुत होणार की जो येतो आहे तो पैशासाठीच येत आहे. काय साधणार असे मैत्रीचे बंध निर्माण करून आपण ?

फार वाईट वाटत आहे हे लिहिताना.....!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

बेसनलाडू's picture

15 May 2010 - 10:16 pm | बेसनलाडू

अशा घटना निव्वळ क्लेशदायक नसून व्यक्तिव्यक्तीमधील सौहार्दाचे वातावरण गढूळ करण्यास कारणीभूत ठरणारे आहे. उदाहरणार्थ > "खरडीमुळे" एखाद्या "अ" चे "ब" सदस्याबरोबर मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आणि "ब" केव्हा तरी म्हणाला की, "मी तुझ्या गावी येतो... एक काम आहे..." आता "अ" ची अशीच समजुत होणार की जो येतो आहे तो पैशासाठीच येत आहे. काय साधणार असे मैत्रीचे बंध निर्माण करून आपण ?
याच्याशी पूर्ण असहमत. मिसळपावच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये खाजगी आर्थिक व्यवहार घडण्याची शक्यता निर्माण झली, तर त्यात मिसळपावचा काहीच संबंध नाही. मात्र एखाद्याची आर्थिक गरज किती 'जेन्युइन्' आहे, याबद्दल मात्र धनकोंच्या मनात शंकाकुशंकांचे वादळ निर्माण होईल, हे नक्की. त्यामुळे ज्या व्यक्तीस अशी निकड आहे, तिचे अंशतः (वेळेच्या, तातडीच्या बाबतीत) नुकसान शक्य आहे.
(संतुलित)बेसनलाडू

इन्द्र्राज पवार's picture

15 May 2010 - 11:48 pm | इन्द्र्राज पवार

"...तर त्यात मिसळपावचा काहीच संबंध नाही...."

नक्कीच नाही; अन् मी दुरान्वयानेदेखील तसे म्हटलेले नाही. माझा मुद्दा इतकाच की, या प्लॅटफॉर्मखेरीज सदस्यांचा अन्यत्र प्रत्यक्ष कुठे संबंध आला तर भेटण्याअगोदरच आरसा तडकलेला असण्याची शक्यता असेल.... (अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे, आग्रह नाही...)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

स्पंदना's picture

15 May 2010 - 8:06 pm | स्पंदना

असेच म्हणायचे आहे

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

तात्यांची त्यांच्या वैयक्तिक समस्यांमधून मुक्तता होवो, असे शुभचिंतन. तात्या सर्वांना दीर्घ मुदतीच्या लेखी प्रॉमिसरी नोटा, किंवा हिशोबाची लेखी नोंद पाठवतील तर मग हे प्रकरण दीर्घ मुदतीसाठी निस्तरेल.

मिसळपाव संकेतस्थळाचे तांत्रिक व्यवस्थापन उत्तम आहे. गेली कित्येक वर्षे साहित्य-माहिती-समाज या अंगांनी येथे मला फार आनंद मिळालेला आहे. त्याबाबत स्थळ-संस्थापक आणि बिनपगारी आणि सेवाभावी व्यवस्थापक-संपादकांचे आभार.

या निवेदनानंतर मालकीबद्दल संदिग्धता राहिलेली नाही. खाजगी मालकी तात्या अभ्यंकरांची आहे. मालकांनी व्यवस्थापकाला काय हक्क द्यावेत, आणि दिल्यानंतर ते काढून घ्यावेत, याचा सर्वाधिकार मालकाकडे असतो. व्यवस्थापकांचे निवेदन जणू काही मालकांचेच निवेदन आहे, असे गृहीत धरून मी पुढील भाग लिहितो आहे.

यातून मिसळपाव संस्थेची भविष्यातील स्थिती मजबूत व्हावी अशी इच्छा आहे.

- - -
मुद्दा १ : संकेतस्थळाचा मालकाच्या खाजगी आर्थिक स्थितीशी अवश्यसंबंध

संकेतस्थळ खाजगी मालकीचे आहे : वैयक्तिक मालमत्ता म्हणून संकेतस्थळ हे तात्यांच्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारात आपोआप येते. मी बँकेकडून किंवा मित्रांकडून घेतलेली कर्जे फेडली नाहीत, तर माझी यच्चयावत मालमत्ता बँक किंवा धनको मित्र जप्त करू शकतात. भारतात यावेगळी स्थिती असल्यास फार आश्चर्य वाटेल.

जर "वैयक्तिक" आणि "संस्थाविषयक"या दोन वर्तुळांत मर्यादा घालायच्या असतील, तर संकेतस्थळाची "मर्यादित कंपनी" (limited company) असती. तशी आजतागायत नाही.

तात्यांच्या वैयक्तिक आर्थिक अडचणींची झळ मिसळपावाला लागू नये, असे वाटत असल्यास तशी कायदेशीर सोय तात्यांनी करावी. व्यवस्थापकांना या बाबतीत काहीही हक्क नाही.

मालकीच्या कायद्याबद्दल माझे ज्ञान चुकलेले आहे काय? मालकाच्या वैयक्तिक कर्जांपासून "मिसळपाव" या खाजगी मालमत्तेला धोका पोचत नाही, असा कायदा आहे काय? असेल तर तो आधार सांगून सुविद्य लोकांनी माझी चूक सुधारावी.

- - -
मुद्दा २: पूर्व-जबाबदारी आणि पश्चात-जबाबदारी

मिसळपावावरून पाठवलेल्या निरोपांची पूर्वजबाबदारी मिसळपाव संस्थेवर नाही. मिसळपावाच्या Disclaimerमध्ये तसे स्पष्ट लिहिलेले आहे. हे योग्यच आहे, मान्य.

मात्र हाच प्रकार पुढे होऊ नये म्हणून मिसळपावाची धोरणात्मक जबाबदारी आहे काय? त्याबद्दल तात्यांनी कुठली वैयक्तिक हमी दिलेली नाही. व्यवस्थापनाच्या निवेदनातूनही पश्चात-जबाबदारीबद्दल काहीच कल्पना येत नाही.

याबाबत पुढील मामले विचार करण्यालायक आहेत.
(२अ) क्रेग्सलिस्टच्या जबाबदारीचा खटला
"क्रेग्सलिस्ट" या संकेतस्थळावर लैंगिक-सेवांबद्दल केलेल्या जाहिरातींमधून माहिती काढून कोणीतरी काही स्त्रियांचा खून केला. जाहिराती व्यक्तिगत होत्या म्हणून खुनांची जबाबदारी क्रेग्सलिस्टवर आली नाही. मात्र ४० राज्यांमधील सरकारी वकिलांनी क्रेग्सलिस्टवरती खटला गुदरला, की अशी बाब भविष्यात घडू नये म्हणून संकेतस्थळाने काही करावे. संकेतस्थळाने सुरक्षा उपाय कार्यान्वित केल्यानंतर खटला मागे घेतला. पैकी कनेक्टिकट राज्याच्या सरकारी वकिलाचे निवेदन येथे बघावे. त्यामुळे पश्चात-जबाबदारीबद्दल काही नैतिक आणि कायदेशीर मान्यता असावी, असे दिसते. शिवाय, सुधारणा काय ते गुप्त न ठेवता उघड सांगितल्या तर बरे, असेच या "क्रेग्सलिस्ट" मामल्यावरून दिसते. त्या सुधारणा स्पष्ट नमूद करून, त्यांची प्रशंसा करूनच सरकारी वकिलांनी क्रेग्सलिस्ट व्यवस्थापनावरील खटला मागे घेतला.

(२आ) अन्य यशस्वी सेवादात्यांचे पश्चात-जबाबदारीबद्दल धोरण

मिसळपावाप्रमाणे मी अन्य काही खजगी सेवादात्यांकडून महाजालावर सेवा मिळवतो. पैकी एक आहे "याहू" (Yahoo!). हा सेवादातासुद्धा वैयक्तिक नुकसानामध्ये आपली जबाबदारी नसल्याचे स्पष्ट करतो. (याहू सेवेचे Terms of Service)

YOU EXPRESSLY UNDERSTAND AND AGREE THAT YAHOO! AND ITS ... OFFICERS, ... SHALL NOT BE LIABLE ... FOR ANY ... DAMAGES, ... RESULTING FROM: ... (d) STATEMENTS OR CONDUCT OF ANY THIRD PARTY ON THE YAHOO! SERVICE...

म्हणजे पूर्वजबाबदारी नाही.

तरी याहूच्या सेवादाता धोरणांपैकी पुढील वाक्ये मला महत्त्वाची वाटतात. महत्त्वाच्या शब्दांना मी अधोरेखित केलेले आहे.

You agree to not use the Yahoo! Services to:
...
(a) upload, post, email, transmit or otherwise make available any Content that is unlawful, harmful, threatening, abusive, harassing, tortious, defamatory, vulgar, obscene, libelous, invasive of another's privacy,...
...
(g) upload, post, email, transmit or otherwise make available any unsolicited or unauthorized advertising, promotional materials, "junk mail," "spam," "chain letters," "pyramid schemes," or any other form of solicitation, except in those areas (such as shopping) that are designated for such purpose

कमीतकमी "असे करू नका" म्हणून संकेतस्थळ उपभोक्त्यांना सांगते. मिसळपाव सदस्यांकडून असे काहीही कबूल करून घेत नाही. आणि याबद्दल संकेतस्थळाचे मतही आपल्याला माहीत नाही. अर्थातच असे धोरण असायला संकेतस्थळ बांधील नाही. परंतु यशस्वी संकेतस्थळांकडून काही शिकावे.

ग्राहकाने मर्यादांचे उल्लंघन केले तर "याहू" संकेतस्थळाचे धोरण काय आहे?

You agree that Yahoo! may, without prior notice, immediately terminate, limit your access to or suspend your Yahoo! account, any associated email address, and access to the Yahoo! Services. Cause for such termination, limitation of access or suspension shall include, but not be limited to, (a) breaches or violations of the TOS or other incorporated agreements or guidelines, ... (f) engagement by you in fraudulent or illegal activities...

म्हणजे अशा बाबतीत कोणी "वैयक्तिक" उल्लंघने केली तर संकेतस्थळ त्यांच्याच्यावर कार्य करू शकते. संकेतस्थळाला पश्चात-जबाबदारीची काही चाड आहे, असे त्या धोरणामधून ध्वनित होते.

मिसळपावाने पूर्वजबाबदारी नाकारणे योग्यच आहे. पण काही उघडकीस आले तर तसे पुन्हा होऊ नये म्हणून काही पश्चात-जबाबदारीचे धोरण असल्याचे सांगितल्यास सदस्यांना तेवढाच थोडा दिलासा मिळेल.

शिल्पा ब's picture

15 May 2010 - 9:10 pm | शिल्पा ब

मिपा ने वरील मुद्यांचा अमलात आणण्याबद्दल विचार करावा....भविष्यात असे काही होऊ नये हि इच्छा...तात्यांनी निवेदन देऊन गढूळता दूर केली...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

आनंदयात्री's picture

16 May 2010 - 8:56 am | आनंदयात्री

तुम्ही सायबर गुन्हा नोंदविण्याच्या लिंकवर गुन्हा नोंदवला होता हे स्मरते. त्याचे काय ? तो तुम्ही मागे घेणार का ?
तुम्हाला कायदेशीर कारवाई करण्याची इच्छा होती असे स्मरते, ती तुम्ही करणार का ?

धनंजय's picture

16 May 2010 - 9:44 am | धनंजय

नवीन घटना नोंदवायची सोय आहे.

कागदपत्रे मिळताच त्याची नोंद करीन. गुन्हा नाहिसा होईल.

आनंदयात्री's picture

16 May 2010 - 10:02 am | आनंदयात्री

धन्यवाद. आनंद वाटला :)

आनंदयात्री's picture

16 May 2010 - 12:38 pm | आनंदयात्री

धन्यवाद. आनंद वाटला :)

बेसनलाडू's picture

15 May 2010 - 10:11 pm | बेसनलाडू

कठीण परिस्थितीशी लढतानाही वेळात वेळ काढून हे निवेदन येथे देऊन तंग वातावरण निवळण्यास मदत केली, हे स्तुत्य आहे. संकेतस्थळाने किंवा काही सदस्यांनी (मालक, व्यवस्थापक, संपादक इ. इ. भूमिकांमधून) गमावलेला विश्वास आणि प्रेम पुनर्स्थापित होण्यास याची नक़्कीच मदत होईल, असा विश्वास आहे.
(समजूतदार)बेसनलाडू

भडकमकर मास्तर's picture

16 May 2010 - 1:34 am | भडकमकर मास्तर

हे निवेदन पाहून थोडे बरे वाटले...

तात्या,
"देर आये, दुरुस्त आये" एवढेच म्हणतो.
"आपण होऊन स्पष्टीकरण द्या" हा सल्ला गेले ३-४ महिने मी तुम्हाला देतोय् पण तुम्ही मनावर घेतले नाहींत. असे स्पष्टीकरण ज्यांच्याकडून पैसे घेतेले आहेत त्यांना दिले गेले असते तर अशी चव्हाट्यावर चर्चा झाली नसती व हे avoidable होते.
मी माझ्या प्रतिसादात लिहिले होते कीं तुम्ही मित्रांना फसवाल असे मला वाटत नाहीं. आजच्या या जाहीर खुलाशाने ते सिद्ध झाले व अर्धे काम झाले. पण याहून जास्त पटण्यासारखा खुलासा ज्यांच्याकडून पैसे घेतेले आहेत त्यांना मिळायला हवा!
आपल्याला अक्षय तृतियेनिमित्त्य हार्दिक शुभेच्छा!
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

माझ्या वरील प्रतिसादातील पहिला मुद्दा रद्द ("संकेतस्थळाचा मालकाच्या खाजगी आर्थिक स्थितीशी अवश्यसंबंध") आहे, आणि खोडून टाकण्यास हरकत नाही. मिसळपाव संकेतस्थळाला तात्यांच्या वैयक्तिक आर्थिक स्थितीची झळ पोचणार नाही अशी प्राथमिक योजना झालेली दिसते. ही योजना पूर्ततेस नेण्याची कुवत मिसळपाव व्यवस्थापनास आहे, असा माझा विश्वास आहे.

दुसर्‍या मुद्द्यावर अमल अत्यंत सहजरीत्या होऊ शकेल, म्हणून त्याविषयी मला फारशी काळजी नाही.

- - -
या धाग्यासंबंधाने :
तात्या व्यक्तिगत स्तरावर योग्य कृती करतील अशी आशा आहे, आणि त्यांच्यावरील सावट कालांतराने दूर होवो, या शुभेच्छा कायम आहेत.

अमोल केळकर's picture

16 May 2010 - 11:05 am | अमोल केळकर

निवेदनाने शंका दुर झाल्या
धन्यवाद

अमोल केळकर

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विंजिनेर's picture

16 May 2010 - 6:10 pm | विंजिनेर

किंचित त्रोटक आणि उशीरा आलेल्या खुलाशाने मिपावरचे संशयाने गढुळलेले वातावरण थोडे तरी निवळायला मदत व्हावी...
आर्थिक व्यवहारांबाबत वेळोवेळी न दिलेले स्पष्टीकरण (संबंधित सदस्यांना) ही अक्षम्य बाब आहे. क्लेश तर होतातच पण "बूंद से गयी..." हे ही आहेच.

भारद्वाज's picture

16 May 2010 - 6:55 pm | भारद्वाज

माझ्यासारखे नवसदस्य तर याबाबतीत अनभिज्ञ होते. काय समज-गैरसमज असतील ते लवकर दूर होवोत.
मला तर एवढेच म्हणायचंय की-
तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे !

सुमीत भातखंडे's picture

17 May 2010 - 2:11 pm | सुमीत भातखंडे

खूप बरं वाटलं निवेदन वाचून.
सगळं लवकरात-लवकर सुरळीत होवो हीच प्रार्थना

नील_गंधार's picture

17 May 2010 - 2:32 pm | नील_गंधार

निवेदनाबद्दल आभार.
ह्या निवेदनाने निश्चितच मिपावरील गढुळ वातावरण निवळावयास जरूर मदत होईल.
लॉंग लिव्ह मिसळपाव.
:)

नील.

टुकुल's picture

17 May 2010 - 2:37 pm | टुकुल

चांगल केलत तात्या..सगळं लवकरात-लवकर सुरळीत होवुन तुम्ही परत रोशनी चे पुढचे भाग लिहाल हिच आशा.

--टुकुल

टारझन's picture

17 May 2010 - 2:43 pm | टारझन

>> तुम्ही परत रोशनी चे पुढचे भाग लिहाल हिच आशा.
ए इल्यास ... चल जल्दी ... डब्बल भुर्जी और दो पांव एक्ष्ट्रा ... बिणा मांगे लेके आ .. बॉइल्ड अंडेका प्लेट खाली हो तो रिफील करते रेहना :)

- (रोषणी प्रेमी) गजणी

प्रभाकर पेठकर's picture

17 May 2010 - 2:49 pm | प्रभाकर पेठकर

तात्या,
निवेदनास अक्षम्य उशीर झाला आहे हे तुम्हास मान्य दिसते आहे. ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना नुसतीच आर्थिक झळ पोहोचली असे नाही तर मनस्वी मनःस्तापही झाला आहे.
फसवणूक केली किंवा नाही, झाली किंवा नाही ह्यावर चर्चा होऊ शकते.
कॅन्सरग्रस्त सदस्याबाबत 'रुजवात' होईल तेंव्हा होईल पण तो पर्यंत (मागूनही त्यावर काही माहिती तुम्ही देत नाही म्हणून..) ती एक फसवणूकच म्हणावी लागेल.
ह्या तुमच्या निवेदनाने थोडाफार वेळ तुम्हाला मिळाला आहे त्या वेळेत सर्वांचे आर्थिक नुकसान भरून यावे, निदान त्यासाठीची वेळेच्या मर्यादेची हमी तरी तुमच्याकडून सर्व मदतकर्त्यांस मिळावी अशी किमान अपेक्षा आहे.

------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्‍या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.

भोचक's picture

17 May 2010 - 3:18 pm | भोचक

तात्या, उशिरा का होईना खुलासा केलात ते बरंच केलंत. परंतु, कॅन्सरग्रस्त महिलेसंदर्भात अधिक खुलासा हवा होता. आम्ही केलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली की नाही. त्यांची तब्येत कशी आहे? आणि ज्या योगे पैसे परत केले जाणार होते, त्याचे काय झाले हे कळाले असते तर बरे झाले असते.

(भोचक)
महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव

पण परदेशात आणि स्वयंपाक्यावर खाण्याच्या बाबत अवलंबून असताना तू डॉक्टर गाठावास हे उत्तम. वर अजयाने दिलेला सल्ला मोलाचा आहे. त्वचारोग तज्ञाकडे लवकरात लवकर जाऊन ये.

सहमत.

नायलॉन ची गादी वापरल्यावर अंगावर कुठेही गांधीलमाशी चावल्यावर, सुरवंट लागल्यावर खाज सुटून सूज येते तशी सूज येते आहे

यावरती "कॅरीमॅट" हा एक उत्तम उपाय आहे. "कॅरीमॅट" अंथरूण म्हणून वापर. :-D

माझा सल्ला लैच ऑट साईड ऑफ लेग अंपायर वाईड बॉल वाटू लागला आहे अचानक!! ;-)

स्पंदना's picture

8 May 2013 - 6:40 pm | स्पंदना

ऑ?

ही गल्ली कशी काय चुकली म्हणायची?
अ‍ॅलर्जीवर लिहिता लिहिता खाज खरुज गजकर्ण मधी आल्या सारख वाटल.

पैसा's picture

8 May 2013 - 6:40 pm | पैसा

गल्ली चुकलं का वं?

प्यारे१'s picture

8 May 2013 - 6:50 pm | प्यारे१

काय हे?
'त्याला' आपलं म्हणा.
किती ते टोमणे माराल? ;)

प्यारे१'s picture

8 May 2013 - 6:59 pm | प्यारे१

संपादकांना विनंती,
जमल्यास मोदकाला 'कॅरीमॅट'सकट उचलून 'योग्य स्थळी' नेऊन सोडावे.
कॅरीमॅट हे एक मोदकाचे अतिशय उपयुक्त साधन आहे.

मोदक's picture

8 May 2013 - 7:07 pm | मोदक

:-(

स्पंदना's picture

8 May 2013 - 7:13 pm | स्पंदना

उठसुट संपादक काय ते? ऑ?
तशीही तुम्हाला अ‍ॅलर्जी आहे. मग सल्ल पोहोचला हे काय कमी झाल? आता इथे बघाव तेंव्हा नवे धागे निघताहेत, कुठे शोधाय्चा तो अ‍ॅअल्र्जी धागा?
आता हा प्रतिसाद घेउन काही उपाय होतो का ते पहा.

:(
हाताचेच अंगठे धरुन मान खाली घालून उभा असलेला प्यारे.

काय झाल? पायाच्या अंगठ्यांची अ‍ॅलर्जी आहे काय?

प्यारे१'s picture

8 May 2013 - 7:40 pm | प्यारे१

>>>पायाच्या अंगठ्यांची अ‍ॅलर्जी आहे काय?
क्काय चाल्लंय काय? ऑ???
धाग्याचा विषय काय?
तात्यांनी एवढ्या सीरियसली धागा टाकलाय. मिसळपावचा एवढा महत्त्वाचा धागा आहे हा.
त्यावर अवांतर व्हायला लागलं म्हणून मी म्हटलं, वेगळा धागा काढलाय त्यावर प्रतिसाद शिफ्ट करा जमल्यास तर मलाच???
आज दिवस वाईट आलेत मला, अ‍ॅलर्जी आहे तर त्याची अशी खिल्ली उडवली जाते?
हे बघा आपातै, आमी रिस्पेक्ट करतो बाईमाणसाचा पण म्हणून काय पण ऐकून घेणार नाही आधीच सांगून ठिवतो हा!
- नाराज प्यारे :(

सूड's picture

8 May 2013 - 8:30 pm | सूड

तुम्हाला मदत करायलेत तं असं कशापायी बोलताय्सा? तुम्हाला अ‍ॅलर्जीवरच उपाय पाह्यजे ना मग कंच्याबी धाग्यावं का मिळंना, असं म्हनायचं आसंल त्येस्नी. बाकी आंबे खावा की राव, कंच्याबी झाडावरले का आसंना?

प्यारे१'s picture

8 May 2013 - 8:36 pm | प्यारे१

उद्या उत्तर देतो.
आज काळ खराब आहे.

अवांतर - तुमचा आजचा सुविचार हे तुम्ही मिपाचे पहिल्या बाकावरचे अ. वि. असल्याचे चिन्ह मानावे काय? ;-)

अतिअवांतर - स्वाक्षरीतले लेखन मूळ आयडीने आणि त्यावरचे डूआयडीने केले आहे काय? की उलट? :P

प्यारे१'s picture

8 May 2013 - 10:03 pm | प्यारे१

बडी जालिम दुनिया है यारों
हमारा दर्द किसीको दिख ही नही रहा,
अवांतर पे अतिअवांतर किये जा रहे है.

मोदका, मोदका येत्या संकष्टीला चंद्रोदयाआधीच खाणार बघ तुला. :(

मोदका, मोदका येत्या संकष्टीला चंद्रोदयाआधीच खाणार बघ तुला.

आँ ? मोदकाची अ‍ॅलर्जी आहे ना प्यारेभौ तुम्हाला ?

प्यारे१'s picture

8 May 2013 - 10:26 pm | प्यारे१

आयला , खरंच की. बरेच दिवस मोदकच नाही खाल्ला. अ‍ॅलर्जी आहे की नाही ते खाल्ल्यावरच कळेल.
बाकी तुम्हाला साखरेचा मोदक आवडतो का गुळाचा?

श्रावण मोडक's picture

8 May 2013 - 6:59 pm | श्रावण मोडक

माझा सल्ला लैच ऑट साईड ऑफ लेग अंपायर वाईड बॉल वाटू लागला आहे अचानक!!

हाहाहा... होतं असं कधी कधी... अर्थात, वाईड बॉल असला तरी पिचवरच आहे हे भारीच. ;-)

प्यारे१'s picture

8 May 2013 - 7:02 pm | प्यारे१

>>>>वाईड बॉल असला तरी पिचवरच आहे हे भारीच.
'हे विश्वची माझे पिच' असं कुणाथोर संतांनी 'मागे 'च म्हणून ठेवलंय श्रामो. आम्रिकेत देखील लोक यॉर्करवर नाचतात तसे वाईडबॉल वर त्यामुळं.

तिकडे कुणाला श्रावण घेवड्याची अ‍ॅलर्जी आलीय ते पाहिल का श्रामो?

श्रावण मोडक's picture

8 May 2013 - 8:09 pm | श्रावण मोडक

तिकडे म्हणजे कुठं? जरा दुवा दे की... :-)

मोदक's picture

8 May 2013 - 9:42 pm | मोदक

वेताळ बुवांना श्रावण घेवड्याची अ‍ॅलर्जी आहे. कृपया प्यारेच्या अ‍ॅलर्जीच्या धाग्यावर पहावे!

हा धागा मी कधीची शोधतेय. मिळाला एकदाचा.
बघा लिहण्याच कसब बघा.
अशी लेखणी असावी माणसाची.

jaypal's picture

8 May 2013 - 6:51 pm | jaypal

लेखणी

विकास's picture

8 May 2013 - 7:41 pm | विकास

बघा लिहण्याच कसब बघा.

खरे आहे.

सुधीर's picture

8 May 2013 - 9:13 pm | सुधीर

बापरे असं काही झालं होतं यावर "विश्वास" नाही बसत. मी सगळेच धागे वाचत नाही. पण या निमित्ताने काही धागे वाचण्यात आले आणि काही घटना कळल्या. असो, "विश्वास" खूप मोठी गोष्ट असते. खास करून पुन्हा संपादन करणं खूपच कठीणं. काय खरं-खोटं देव (आणि मंडळी) जाणो. पण संस्थाळावर साहित्य, चर्चा आणि खास करून "प्रतिसादांच्या धमालीचं" रोपटं सदा बहरत राहो ही शुभेच्छा!

पिंपातला उंदीर's picture

8 May 2013 - 9:21 pm | पिंपातला उंदीर

आईला लाईच स्फोटक धागा आहे. आमच्यासारख्या नवीन लोकाणा हे काहीच माहीत नव्त. भयानक.