नमस्कार,
गेले काही आठवडे माझ्या अनुपस्थितीत धनंजय आणि निल गंधार यांनी लिहीलेल्या लेखांना उत्तर देण्यासाठी म्हणून हे निवेदन तुमच्या वाचनासाठी ठेवत आहे.
माझ्या वैयक्तीक स्वरुपाच्या काही अडचणीमुळे मी हे निवेदन लवकर देऊ शकलो नाही पण आज वेळ मिळताक्षणी हे काम पूर्ण करत आहे.
ही सत्य परिस्थिती आहे की मिपाच्या खालील सदस्यांसोबत माझे आर्थिक व्यवहार आहेत .त्यांची यादी मी सोबत देत आहे.
१ सुधीर काळे
२ चतुरंग
३ विकास
४ वेदनयन
५ सुनील
६ समीर गोगटे
७ कुंदन
८ मुक्तसुनीत
९ शेखर
१० पिम्पळखरे
११ धनंजय
१२ संतोष जोशी
पण रक्कम किती आणि कोणत्या बोलीवर घेतली आहे याची माहीती सध्या गोपनीय ठेवत आहे. हा व्यवहार खाजगी स्वरुपाचा असल्यामुळे ही गोपनियता पाळणे हा माझा आणि त्यांचाही हक्क आहे. परंतू बुडीत खाते आणि बुडीत खाते २ या लेखात आणि त्यानंतर झालेल्या चर्चेची पूर्तता करावी म्हणून हे निवेदन करीत आहे.
१) माझे आणि वर उल्लेखीत सदस्यांचे आर्थिक व्यवहार खाजगी स्वरुपाचे आहेत. माझ्या अनुपस्थिती आणि संपर्काचा अभाव यामुळे धनंजय यांना पब्लीक फोरमचा उपयोग करावा लागला . माझ्याकडून झालेल्या दिरंगाईसाठी मी दिलगीर आहे. आता हे सगळे व्यवहार ताबडतोब पूर्ण करण्यासाठी आजच्या घडीस मी असमर्थ आहे. पण माझी जबाबदारी मी नाकारत नाही आहे. आजची घडी उद्याला टिकत नाही. जरी उशीर झाला असला तरी योग्य वेळ आणि संधी या दोन्हीचा उपयोग करून मी हे सर्व आर्थिक व्यवहार मी पूर्ण करीन याची ग्वाही मी आपल्या सर्वांसमोर देत आहे. आर्थिक व्यवहारासाठी मी जे आवाहन सगळ्यांना केले होते आणि त्या आवाहनला ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांची फसवणूक करणे हा माझा उद्देश नव्हता. मी फसलो आणि त्यामुळे ते ही फसले.परंतू ह्या सदस्यांच्या संपर्कात कायम न राहू शकल्यामुळे जो गैरसमज झाला त्याची जबाबदारीही माझीच आहे.या सर्व सन्माननीय सदस्यांनी मला काही वेळ द्यावा अशी मी विनंती करत आहे.
२) मी कॅन्सर ग्रस्त महीलेच्या मदतीसाठी केलेले आवाहन कपोलकल्पीत कहाणी आहे असा समज होऊ देउ नका. मला थोडा वेळ मिळाल्यास त्या कुटुंबासोबत मी त्या सदस्यांशी रुजवात करून देईन ज्यांनी मला मदतीसाठी पैसे पाठवले होते. इतर सदस्यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही.
तरीपण ज्या सद्स्यांनी त्या महीलेच्या साठी निधी पाठवला होता त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत
१) गणपा
२) नंदन
३) एकलव्य
४) प्रभाकर पेठकर
५) सायली पानसे
६) अमोल
७) भोचक
३) हे सर्व व्यवहार करताना मी संपादकांना त्याची माहीती दिली नव्हती .त्यामुळे माझे इतरांशी असलेले व्यवहार त्यांना माहीती नव्हते. सदस्यांनी संपादकांविषयी असलेला गैरसमज काडून टाकावा ही विनंती.आतापर्यंत ज्या प्रेमभावनेनी संपादकांनी जबाबदार्या पार पाडल्या त्याबद्दल मी आभारी आहे आणि माझी नियमीत येणे होईपर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळावी ही विनंती.
४) सध्या मी आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलो तरी मी दिवाळखोर नाही. घरच्या काही अडचणींमुळे वेळेची कमतरता आहे. याचा फायदा मिपा च्या हितशत्रूंना मिळू नये म्हणून हे निवेदन करीत आहे.यापुढे ज्या सदस्यांना मला संपर्क करायचा असेल त्यांनी पूर्ववत व्यनी करावेत आणि उत्तराची वाट बघावी.थोडा उशीर होण्याची शक्यता आहे पण उत्तर मिळेल.
५) मिपाच्या मालकीहक्काचा प्रश्न आवश्यकता नसताना वारंवार उभा केला जात आहे. याबाबत मला इतकेच म्हणायचे आहे की हे संस्थळ खाजगी मालकीचे आहे. तात्या अभ्यंकर यांचे आहे.यातील वाद आणि हक्क(जर असतील तर) याची पूर्तता खाजगी पत्रव्यवहारातून होईल.सदस्यांना अकारण मालकी हक्काबद्दल प्रश्न उभे करण्याचा आणि वाद घालण्याचा हक्क नाही.कदाचीत आज माझ्याकडे ताबा नसेल पण मिपाचे तूर्तास सर्व हक्क असलेल्या नीलकांतने तसे जाहीर केल्याशिवाय मिपा हे संस्थळ हे माझ्या मालकीचे आहे, असणार आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
६) माझ्या अनुपस्थितीत जे लेख आणि प्रतिसाद आले त्यामुळे मालकासोबत संस्थळाची बदनामी होत असल्याचे पाहून फार वाईट वाटले. ह्या निवेदनानंतर झालेल्या प्रकरणात संस्थळाची वाढ थांबू नये म्हणून हे निवेदन लिहीत आहे.मिपा फुलण्यात सर्वच सदस्यांचा सहभाग आहे .मी मिपाला पूर्ण वेळ देऊ शकेन अशी घडी बसेपर्यंत आपण सदस्यांनीच मिपाला सांभाळायचे आहे. मालक असोत नसोत मिपा सदस्यांशिवाय फुलणार नाही.
७) या निवेदनावर हवी तेव्हढी चर्चा करावी पण त्यात संस्थळाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी.
८) मा. नीलकांत : हा धागा जेव्हा मागच्या पानावर जाईल तेव्हा जाऊ देत पण ह्याच विषयावर आणखी नवे धागे आले तर ते आपण संपादीत करावेत.दंगलीचा फायदा घेऊन आपसातील उणेदुणे मिटवणारांना थारा मिळू नये हीच इच्छा.
९) ह्या सर्व समस्यंतून बाहेर येण्याची प्रामाणीक धडपड मी करतो आहे पण आपल्या सगळ्यांच्या सदभावना आणि ईश्वरी कृपेशिवाय हे शक्य होणार नाही.
१०) जेव्हा शक्य होईल तेव्हा मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करीनच पण तोपर्यंत व्यनीचा वापर करावा .
माझे हितचिंतक व मिपाचे एक जेष्ठ सन्माननीय सदस्य श्री रामदास यांचे हे निवेदन लिहिण्याकरता मला मोलाचे सहकार्य झाले याबद्दल मी कृतज्ञ आहे...
आपलाच,
तात्या अभ्यंकर.
वाचने
27864
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद तात्या
ह्या
केव्हांपा
In reply to ह्या by प्रमोद देव
निवेदनाबद
निवेदन दिल्याबद्दल आभार
रामदास
In reply to निवेदन दिल्याबद्दल आभार by चित्रा
निवेदन
निवेदनाबाबत धन्यवाद
नेमके, मुद्देसूद निवेदन
मनुष्यस्वभावाची गंमत
In reply to नेमके, मुद्देसूद निवेदन by दत्ता काळे
निवेदनाबद्दल आभार
देर आये, दुरूस्त आये...
जबाबदारी
पूर्णपणे सहमत!
In reply to जबाबदारी by विकास
मुख्यपानावर
In reply to जबाबदारी by विकास
खुलाश्या
शुभेच्छा
पारदर्शकतेचा स्तुत्य पण अपुर्ण प्रयत्न
धन्यु
प्रतिसाद
गोंधळाचे वातावरण...!
असहमत
In reply to गोंधळाचे वातावरण...! by इन्द्र्राज पवार
आरसा...
In reply to असहमत by बेसनलाडू
असेच
सद्भावना, संकेतस्थळाचे धोरण
मिपा ने
In reply to सद्भावना, संकेतस्थळाचे धोरण by धनंजय
तुम्ही
In reply to सद्भावना, संकेतस्थळाचे धोरण by धनंजय
नवीन घटना नोंदवता येतात
In reply to तुम्ही by आनंदयात्री
धन्यवाद
In reply to नवीन घटना नोंदवता येतात by धनंजय
धन्यवाद
In reply to नवीन घटना नोंदवता येतात by धनंजय
स्तुत्य
हे निवेदन
आपल्याला अक्षय तृतियेनिमित्त्य हार्दिक शुभेच्छा!
शुद्धिपत्र - वरील प्रतिसादात बदल
निवेदनाने
किंचित
मिपा
खूप
निवेदनाबद
चांगल केलत
>> तुम्ही
In reply to चांगल केलत by टुकुल
अक्षम्य उशीर...
तात्या,
पण परदेशात आणि स्वयंपाक्यावर
पण परदेशात आणि स्वयंपाक्यावर खाण्याच्या बाबत अवलंबून असताना तू डॉक्टर गाठावास हे उत्तम. वर अजयाने दिलेला सल्ला मोलाचा आहे. त्वचारोग तज्ञाकडे लवकरात लवकर जाऊन ये.सहमत.नायलॉन ची गादी वापरल्यावर अंगावर कुठेही गांधीलमाशी चावल्यावर, सुरवंट लागल्यावर खाज सुटून सूज येते तशी सूज येते आहेयावरती "कॅरीमॅट" हा एक उत्तम उपाय आहे. "कॅरीमॅट" अंथरूण म्हणून वापर. :-D माझा सल्ला लैच ऑट साईड ऑफ लेग अंपायर वाईड बॉल वाटू लागला आहे अचानक!! ;-)ऑ?
In reply to पण परदेशात आणि स्वयंपाक्यावर by मोदक
का वं?
In reply to पण परदेशात आणि स्वयंपाक्यावर by मोदक
काय हे?
In reply to का वं? by पैसा
संपादकांना विनंती,
In reply to काय हे? by प्यारे१
(No subject)
In reply to संपादकांना विनंती, by प्यारे१
उठसुट संपादक काय ते? ऑ?
In reply to संपादकांना विनंती, by प्यारे१
हाताचेच अंगठे धरुन मान खाली
In reply to उठसुट संपादक काय ते? ऑ? by स्पंदना
काय झाल? पायाच्या अंगठ्यांची
In reply to हाताचेच अंगठे धरुन मान खाली by प्यारे१
>>>पायाच्या अंगठ्यांची अ
In reply to काय झाल? पायाच्या अंगठ्यांची by स्पंदना
ओ प्यारेकाका !!
In reply to >>>पायाच्या अंगठ्यांची अ by प्यारे१
उद्या उत्तर देतो.
In reply to ओ प्यारेकाका !! by सूड
अवांतर - तुमचा आजचा सुविचार
In reply to ओ प्यारेकाका !! by सूड
बडी जालिम दुनिया है यारों
In reply to अवांतर - तुमचा आजचा सुविचार by इनिगोय
मोदका, मोदका येत्या संकष्टीला
In reply to बडी जालिम दुनिया है यारों by प्यारे१
आयला , खरंच की. बरेच दिवस
In reply to मोदका, मोदका येत्या संकष्टीला by सस्नेह
हाहाहा
In reply to पण परदेशात आणि स्वयंपाक्यावर by मोदक
>>>>वाईड बॉल असला तरी पिचवरच
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
तिकडे कुणाला श्रावण घेवड्याची
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
तिकडे
In reply to तिकडे कुणाला श्रावण घेवड्याची by स्पंदना
वेताळ बुवांना श्रावण
In reply to तिकडे by श्रावण मोडक
हा धागा मी कधीची शोधतेय.
धारदार
In reply to हा धागा मी कधीची शोधतेय. by साऊ
+१
In reply to हा धागा मी कधीची शोधतेय. by साऊ
असं पण झालं होतं काय?
आईला लाईच स्फोटक धागा आहे.