शांततेचं कार्टं चालु आहे ...

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in काथ्याकूट
6 May 2010 - 1:40 pm
गाभा: 

मित्रांनो, तुम्हाला 'शिवाजी पार्क' किंवा 'शिवतिर्थ' हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर काय येते ?
"माझ्या तमाम हिंदु/मराठी बंधु-भगिनीं आणि मातांना माझा नमस्कार" अशी साद घालुन आपल्या तडाखेबंद भाषणाची व बर्‍याच वेळ त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणर्‍या बाळासाहेब ठाकरे व आता राज ठाकरे ह्यांच्या लाखोंच्या सभा ....
भाजप-सेनेचे महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आल्यावर त्यांनी लोकांसमोर साजरा केलेला "ऐतिहासिक शपथविधी' समारंभ ...
आपल्या मिश्किल शैलीत बोलता बोलता विरोधकांना तोंडावर पाडणार्‍या शरद पवार ह्यांच्या लाखा-लाखांच्या सभा ....
शिवसेना आणि मनसे सारख्या पक्षांच्या स्थापनेच्या सभा ...
'संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या' वेळेला आचार्य अत्रे, प्रबोधनकार आणि इतर इतर नेत्यांच्या जंगी सभा ...
पाकिस्तानवर विजय मिळवल्यावर शिवाजी पार्कावर 'विजयसभा' घेणारे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण ...
शिवसेनेचा गेली ४० वर्षाहुन अधिक चालु असलेला 'ऐतिहासिक दसरा मेळावा' ....

ह्या आणि अशा इतर असंख्य घटनांची साक्ष आहे हे 'शिवाजी पार्कचे मैदान' आणि त्यावरील मातीचा प्रत्येक कण !

पण आता हे सगळे इथेच थांबणार आहे ...
तिथल्या परिसरात राहणार्‍या काही 'शांतताप्रिय नागरिकांच्या' अर्जावर सुनावणी म्हणुन काल कोर्टाने शिवाजी पार्क मैदान हा "सायलेन्स झोन" म्हणुन घोषीत केला.
आत इथुन पुढे तिथे एकही सभा होणार नाही कारण नव्या आदेशानुसार मैदानात 'शांततेचा भंग होऊ नये' म्हणुन लाऊडस्पिकर लावण्यास बंदी असेल व त्याविना सभा घेण्याचा विचारही मुर्खपणाचा ठरेल !
शिवाजी पार्क आता एका 'मुर्खपणाच्या शांततेत सुखाने नांदु' लागेल ह्याबाबत आमच्या मनात अजिबात किंतु नाही.

'शांतताप्रिय व आपल्या हक्कांची जाणीव असणार्‍या' आजच्या काळातल्या जागरुक नागरिकांचे अभिनंदन !
तुम्ही शांतता आणलीत पण लोकशाहीच्या आणि आजच्या काळात अत्यावश्यक असणार्‍या एका 'भाषणरुपी तेजाचा' गळा घोटलात त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन !
हक्क आणि त्यांच्या अंमलबजावणीचा अंध अट्टाहास ह्यातला फरक न समजणार्‍या व आपले हक्क बजावताना किमान तारतम्य विसरणार्‍या शांतताप्रिय नागरिकांचे पुन्हा एकदा अभिनंदन ...

शांतता आम्हाला आवडतेच, पण हे 'शांततेचं कार्टं' पार आमच्या ऐतिहासिक राजकीय संस्कॄतीच्या मुळावरच उठलं हे मान्य करायला हवच !
जे झाले ते योग्य नाही, न्यायालयात सर्वांनाच 'न्याय मिळतोच' असे नाही हे पटले ...

मित्रांनो, ही अशी घातक मनोवॄत्ती कुठेतरी रोखायला हवी.
हक्क हक्क हक्क म्हणुन अशा एकेक गोष्टी हिरावुन घेतल्या तर येणार्‍या नव्या पिढ्यांना आम्ही कशाचा वारसा देणार ?

( ता.क. : हापिसात भयंकर काम असतानाही राहवत नाही म्हणुन ह्या ४ ओळी खरडल्या. ह्यावर सविस्तर भाष्य करणारा लेख ह्याच ठिकाणी काही वेळात टाकेन. तुर्तास चर्चा चालु व्हावी म्हणुन आमच्यातर्फे ही ४ अक्षरे, मला मिपाकरांचे मत जाणुन घ्यायला आवडेल : ) )

अवांतर :
लेखासाठी मला काही छायाचित्रांची आवश्यकता आहेत. नवे / जुने नेते शिवाजी पार्कवर प्रचंड जनसमुदायाला संबोधित करतानाची छायाचित्रे हवी आहेत. मी आत्ता हुडकायचा प्रयत्न केला पण कामाच्या गडबडीत हवे ते मिळत नसल्याने ह लेख म्हणुन असा 'तात्पुरता' लिहला आहे.
कुणाकडे अशी छायाचित्रे असतील तर कॄपया इथे द्यावीत, मला त्याच्या मदतीने एक सडेतोड लेख लिहणे सोपे जाईल !
धन्यवाद !!!!

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

6 May 2010 - 3:16 pm | नितिन थत्ते

+१

सभा आणि लाऊडस्पीकरचा त्रास फक्त शिवाजी पार्क वरच्यांनाच होतो असे दिसते. अन्यथा एक विशिष्ट विभाग सायलेन्स झोन कोणत्या कायद्याअंतर्गत केले असेल? एरवी हॉस्पिटल वगैरेचा परिसर सायलेन्स झोन असतो.

राजकीय सभा, मोर्चे वगैरेंचा प्रस्थापितांना नेहमीच त्रास होत असतो.

तसा त्रास होऊ नये म्हणून काही वर्षांपूर्वी मंत्रालयाच्या जवळ मोर्चा आणण्यास बंदी घालण्यात आली. आझाद मैदानापर्यंतच मोर्चा आणता येतो. (याचे कारण मात्र नरीमन पॉईंट येथील ट्रॅफिकचा बट्ट्याबोळ होतो असे देण्यात आले.) आझाद मैदानावर केलेला 'आवाज' ३ किमीवरील मंत्रालयापर्यंत पोचण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे आता मंत्र्यांना मोर्चा वगैरेचा त्रास होत नाही.

अनेक जनहित याचिकांच्या मागे शासकीय विभाग "हॅण्ड इन ग्लव्ह असतात. मोर्चे येऊ नयेत असे मंत्र्यांनाच/सरकारलाच वाटत असते पण ते पोलिटिकली इनकरेक्ट असते. मग सरकारी अधिकारीच 'जागरूक नागरिकांना' जनहित याचिका करायला सांगतात. उदा नरिमन पॉईंटचे रहिवासी ट्रॅफिकला अडथळा होतो म्हणून मोर्चावर बंदी घालावी अशी याचिका दाखल करतात. सरकार अर्थातच यावर प्रतिवादी असते. (मोर्चा काढणारे या खटल्यात पक्षकार नसतात). सरकारी वकील या खटल्यात गुळमुळीत बचाव करतात. हा गुळमुळीत बचाव ऐकून (सरकार बचाव करण्यात अपयशी ठरल्याचे नोंदवून) कोर्ट ती याचिका मान्य करते आणि मोर्चावर बंदी घालायचा आदेश देते. अधिकारी पडत्या फळाची आज्ञा मानून मोर्चावर बंदी घालतात.
(मंत्री आणि जागरूक नागरिक एकमेकांना खाजगीत टाळी देतात). आणि आपण सारे मोर्चांच्या त्रासातून सुटल्याबद्दल नि:श्वास सोडतो. आपण या सगळ्यात आपला एक अधिकार गमावला हे आपल्या लक्षातच येत नाही.

(मोर्चे बंदीच्या किंवा सायलेन्स झोनच्या बाबतीत असेच झाले असेल असे मला म्हणायचे नाही. पण प्रक्रिया सांगितली. कुत्रे मारणे प्रकरणात असे झाले असण्याची दाट शक्यता आहे. पण निर्बिजीकरणाची टूम निघाल्यावर प्रकरण अंगाशी आले असेल).

नितिन थत्ते

धमाल मुलगा's picture

7 May 2010 - 6:08 pm | धमाल मुलगा

थत्त्यांचा संपुर्ण प्रतिसाद उत्तम!

मोर्चा जर दारात आला, तर त्याला ९९% वेळातरी सामोरे हे जावेच लागते - ती नैतिक जबाबदारी पाळावी लागते. आता ३ किमीवरुन कोणी किती बोंबललं तरी काय फरक पडतो? 'रहदारीचा खोळंबा आणि त्याविरोधात झटणारे "जागरुक नागरीक" ' हा मुखवटा चढवला की आपसुक पाहुण्याच्या काठीने साप मरतो.
हेच केलं गेलंय इथेही हे अगदी स्पष्ट दिसतंय.

>>अनेक जनहित याचिकांच्या मागे शासकीय विभाग "हॅण्ड इन ग्लव्ह असतात.
++१ :)
आणि त्यालाच राजकीय आशिर्वाद असं म्हणलं जातं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2010 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन, आजच्या दै. सामनात बातमी आहे. 'शिवतिर्थाचा आवाज बंद'
मला अगोदर वेगळीच शंका आली.
असो, बातमी वाचल्यावर शांतताप्रेमी लोकांची कर्तृत्त्वाची झलक दिसली. आता यापुढे केवळ पत्रपरिषदा होतील असे वाटते.

अर्थात काही ठराविक दिवशी सभांना परवानगी दिलेली आहे. आणि काही परवानग्या शासनाने द्यायच्या आहेत. :)

-दिलीप बिरुटे

रानी १३'s picture

6 May 2010 - 1:57 pm | रानी १३

हक्क आणि त्यांच्या अंमलबजावणीचा अंध अट्टाहास ह्यातला फरक न समजणार्‍या व आपले हक्क बजावताना किमान तारतम्य विसरणार्‍या शांतताप्रिय नागरिकांचे पुन्हा एकदा अभिनंदन .......
खरच मुर्खपणा चालला आहे नुसता.......आवरा कोनीतरी..........:(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 May 2010 - 3:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'शिवाजी पार्क'च्या परिसरात हॉस्पिटल आणि शाळेला परवानगी देणार्‍या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांच्या आयच्या घो! त्यांच्यामुळेच हा सगळा घात झाला!!

अदिती

चिंतातुर जंतू's picture

6 May 2010 - 3:35 pm | चिंतातुर जंतू

शांतता आम्हाला आवडतेच, पण हे 'शांततेचं कार्टं' पार आमच्या ऐतिहासिक राजकीय संस्कॄतीच्या मुळावरच उठलं हे मान्य करायला हवच !

  1. गणेशोत्सवात गल्लोगल्ली चालणारा ठणठणाट
  2. अनंत चतुर्दशीची मिरवणूक
  3. नवरात्रीतले गरबे
  4. पहाटेची बांग
  5. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे, वर्षभरात अनेकदा येणार्‍या शिवजयंत्या
  6. गल्लीबोळातल्या कुणाचीही लग्नकार्यं
  7. कुठल्याही राजकीय नेत्यांच्या सभा
  8. खुल्या मैदानांत चालणारे सांगीतिक जलसे
  9. अगदी ट्रॅफिक जॅममध्ये ठो ठो वाजणारे भोंगे

अशा निमित्तांनी चाललेल्या धांगडधिंग्याविषयी थोडी तक्रार केली की लगेच आम्हाला आमच्या महान संस्कृतीविषयी उठसूठ कोणी न कोणी धडे देऊ लागतं. त्यामुळे आम्ही असंही म्हणू इच्छितो:

आम्हाला आमची संस्कृती आवडतेच, पण हे 'संस्कृतीचं कार्टं' पार आमच्या मानसिक, शारिरीक आरोग्याच्या मुळावरच उठलं आहे, हे मान्य करायला हवंच!

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

चिरोटा's picture

6 May 2010 - 3:55 pm | चिरोटा

पण हे 'संस्कृतीचं कार्टं' पार आमच्या मानसिक, शारिरीक आरोग्याच्या मुळावरच उठलं आहे, हे मान्य करायला हवंच!

सहमत्.इतर राज्यांतले राजकारणी लाखा लाखाच्या सभा न घेता आपल्या राज्याचे/लोकांचे हित कसे जपतात ह्याचा आपल्या राजकारणी लोकांनी अभ्यास केला तरी बराच फायदा होइल.
भेंडी
P = NP

धमाल मुलगा's picture

7 May 2010 - 6:39 pm | धमाल मुलगा

इतर राज्यांतले राजकारणी लाखा लाखाच्या सभा न घेता आपल्या राज्याचे/लोकांचे हित कसे जपतात ह्याचा आपल्या राजकारणी लोकांनी अभ्यास केला तरी बराच फायदा होइल.

म्हणजे नक्की कोणते? :?
बिहार?
उ.प्र.?
पंजाब?
हरयाना?
गुजरात?
मध्य प्रदेश?

मी दक्षिण भारतातल्या राज्यांची नावंही टंकू शकत नाही.
आवडत्या राजकारण्यासाठी तिथे किती आणि कशी गर्दी करतात ते सर्वांना चांगलेच ठाऊक आहे.

*खुद्द बंगळुरात कुमारस्वामी देवेगौडाची कसलीशी सभा होती त्यादिवशी संध्याकाळी सगळं बंगळुर ट्रॅफिक जॅममध्ये अडकलं होतं...टॅक्सीमधुनच वेब चेकिन करुन स्पाईसजेटच्या कॉलसेंटरला फोन लावला तेव्हा त्या पोरीनं सांगितलं, "काळजी नको, आम्ही ही फ्लाईट दिड तास डिले केलीये...कोणीच वेळेत पोचु शकणर नाही असे कॉल्स आले होते प्रवाशांचे......

छोटा डॉन's picture

7 May 2010 - 7:05 pm | छोटा डॉन

धमालरावांशी सहमत !
"इतर राज्यांतले राजकारणी लाखा लाखाच्या सभा न घेता आपल्या राज्याचे/लोकांचे हित कसे जपतात" ही गंमतशीर माहिती कुठुन मिळाली ह्याचा शोध घ्यायला हवा ...

१. पंजाब, हरियाणा : इथे अकाली दलाच्या आणि खुद्द काँग्रेसच्या नेत्यांच्या लाखालाखांच्या सभा होतात, खुद्द 'अमॄतसर'मध्ये होतात.
आकडेवारी आणि इतर माहिती आंतरजालावर मिळु शकते.

२. युपी / बिहार : पुर्वीजे जयप्रकाश नारायण, बाबु जगजीवनराम, कर्पुरी ठाकुर आणि आताच्या काळातल्या लालुप्रसाद यादव, मायावती, मुलायम, गांधी-नेहरु घराणे ह्यांच्या किती आणि कशा सभा व्हायच्या आनि होतात ह्याचा एकदा विदा हुडका.
नुकत्याच 'पैशाच्या हारामुळे गाजलेल्या' मायावतीच्या सभेला किती लोक आले होते ह्याचा आकडा माहित आहे काय ?बरं, सभेचे निमित्त काय होते त्याची तरी आपल्या सभांशी तुलना करुन पहा.
डायरेक्ट राजकारणी नसले तरी शेतकर्‍यांचे नेते 'महेंद्रसिंग टिकैत' लाखांच्या सभा घेत होते.

३. आंध्र :
जास्त जुने मला माहित नाही. पण गेल्या १० वर्षात तरी राजशेखर रेड्डी, चंद्राबाबु आणि सुपरस्टार चिरंजिवी ह्यांची लोकप्रियता एवढी होती ही त्यांच्या सभांना अशीच लाखालाखांची गर्दी जमायची.
तेलंगाणा आंदोलनाचे नेते चंद्रशेखर रावांनीही त्या प्रश्नासाठी खरोखर तेवढ्या मोठ्ठ्या सभा घेतल्या आहेत.

४. तामिळनाडु :
अहो आजही जयललिता किंवा करुणानिधी ह्यापैकी कुणाचीही मोठ्ठी सभा असली तर एवढा मोठ्ठा जनसमुदाय असा सहज जमतो, आख्खी चेन्नई पॅक असते.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती सभा जर 'रुलिंग पार्टी'ची असेल तर सर्व सरकारी यंत्रणा ह्या सभेच्या कामाला जुंपली जाते, मग ते ऑफिशियली की अनॉफिशियली हा भाग अलहिदा.
आधीच्या काळात जर तुम्ही एमजीआर, आण्णादुराई, कामराज ह्यांच्या सभा आणि त्यांचे समर्थक ह्यांचा विदा हुडकलात तर चकित व्हाल !

त्यामाने आमचा महाराष्ट्र बराच सोशिक म्हणायचे असे एकेक आकडे आहेत.
काय म्हणता ?

------
(सविस्तर)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 May 2010 - 4:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी अगदी! तुमची यादी पूर्ण करण्याचं काम जिकीरीचं आहे पण माझ्याकडूनही थोडी भरः
शिवाय धुळवड, कृष्णजन्माष्टमी, आंबेडकर जयंती, निवडणूका, इ.इ.

अदिती

डावखुरा's picture

6 May 2010 - 5:07 pm | डावखुरा

१००% सहमत
पुर्वी सवाई गंधर्व महोत्सवाची मैफिल रात्रभर होत असे...
भिमसेन जोशी...अ हा हा.... आता १० नंतर सगळीकडे ...........
-------------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

धमाल मुलगा's picture

7 May 2010 - 6:56 pm | धमाल मुलगा

पुढे?

ज्यांना होतोय ना त्रास, मग त्यांनी कराव्या ना जनहितार्थ याचिका दाखल. नुसतेच धार्मिकतेवर बाजारगप्पा मारुन काय हशील?
नाहीतरी आजकालच्या कोर्टांना सर्वज्ञ असल्यामुळे अ ते ज्ञ सर्वच गोष्टींत 'निकाल' देण्याची सवय लागते आहे.

त्याद्वारे हेही सिध्द होईल की राजकीय आशिर्वाद नसेल तर याचिकेचं काय होतं आणि असेल तर काय होतं....

चित्रा's picture

6 May 2010 - 4:39 pm | चित्रा

शिवाजी पार्कला काही भाषणांसाठी जाण्याची मजा गेली हे ठीक आहे.
पण आम्ही लहानपणी शिवाजीपार्कला सायकली चालवायला जात असू. तेव्हा आताएवढे लाऊडस्पीकर नसत, पण मैदानात मस्त क्रिकेटचे सामने होत, लोक बाजूच्या फूटपाथवरून गोल फेर्‍या मारत, छान होते की सगळे. आता फक्त सभा लाऊडस्पीकरसह होणार नसतील तर काय बिघडले? बाकी काही करायला तर बंदी नाही ना?

शिवाय वर्षभरात पूर्वी एखाद-दुसरीच सभा होत असे, आता वर्षभरात सततच सभा चाललेल्या असतात. त्या नागरिकांना काही त्रास होत असेलच ना?

छोटा डॉन's picture

6 May 2010 - 8:32 pm | छोटा डॉन

>>शिवाजी पार्कला काही भाषणांसाठी जाण्याची मजा गेली हे ठीक आहे.
शिवाजी पार्कवरची बहुसंख्य भाषणे मजेसाठी होत होती आनि लोक ती केवळ मज्जा म्हणुन पहायला जात होती असे मला वाटत नाही.
अहो 'शिवाजी पार्क' वरच्या भाषणांचे महत्वच वेगळे होते आहे. "चलो शिवाजी मैदान ! शिवतिर्थाकडे चला !' अशा घोषणांनी माणसे 'भारुन' इकडे यायची, त्यातुन अनेकदा खुप काही उत्तम घडले आहे.
अहो ह्या ठिकाणी भाषणे करुन सो कॉल्ड गोंगाट करणार्‍या नेत्यांनी महाराष्ट्र चालवला, हा राष्ट्रगाडा चालवला, वेळोवेळी जनमत चेतवले, जनसमुहाला दिशा दिली, अनेक चांगल्या योजनांची मुहर्तमेढ इथे रोवली गेली.
स्वातंत्र्यपुर्व काळापासुन ते आजच्या राज ठाकर्‍यांपर्यंतच्या नेत्यांच्या, त्यांच्या पक्षांच्या व त्यांनी चालवलेल्या वेगवेगळ्या चळवळी ह्याच मातीत घडल्या. ही कोणा एका पक्षाची मक्तेदारी नव्हती तर स्गळ्यांचीच आहे. एक 'राजकिय संस्कॄती' इथे नांदली यावर आम्ही ठाम आहोत.
आता तुम्ही म्हणाल की 'बाळासाहेब ठाकर्‍यांच्या ४० वर्षाहुन जास्त अव्याहतपणे चालणार्‍या दसर्‍या मेळाव्यात कसली संस्कॄती आहे?' तर आम्ही फक्त 'असो' म्हणु, आमचा जीव जळतो आहे हे नक्की. २ वर्षापुर्वी बाळासाहेब सभेला येणार नाहीत म्हणल्यावर आमच्या काळजावर दगड पडल्यासारखे झाले ...

पण आम्ही लहानपणी शिवाजीपार्कला सायकली चालवायला जात असू. तेव्हा आताएवढे लाऊडस्पीकर नसत, पण मैदानात मस्त क्रिकेटचे सामने होत, लोक बाजूच्या फूटपाथवरून गोल फेर्‍या मारत, छान होते की सगळे.

अहो पण आताही ह्या गोष्टींसाठी वेगळी जागा राखिव ठेवता येईल की.
उद्या उठुन कोणाला क्रिकेटचा त्रास झाला तर आता ते ही बंद का ? खुद्द सचिन तेथे घडला हे विसरुन पुढेमागे तिथे 'शांतताप्रिय नागरिकांमुळे' क्रिकेटबंदीही येणार हे नक्की ...

पण सायकली चालवणे, गप्पा मारायला जागा, फेर्‍या किंवा जॉगिंगला जागा अशा शुल्लक कारणासाठी अख्खे मैदान राखिव ???

शिवाजी मैदान काही आजचे नाही, खुप जुने आहे, त्याला एक इतिहास आणि संस्कॄती आहे.
ज्या दवाखान्यांना आणि शाळांना परवानगी दिली गेली त्यांना त्यांच्या जवळ 'शिवाजी मैदान' आहे ही अक्कल नव्हती का ? उगाच आज २ शाळा आणि काही दवाखाने निघाले म्हणुन आख्खे मैदानच संपवा हा कुठला मुर्खपणा ?
शिवाय ज्यांना गर्दीचा त्रास होतो त्यांना दाट लोकवस्ती करताना आपण 'स्वातंत्रपुर्व काळापासुन नेत्यांनी जनतेला संबोधित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणा'पाशी रहायला जात आहोत ही अक्कल नव्हती का ?

म्हणजे कसे आहे मैदान आधीपासुन आहे, त्याची एक स्वतःची संस्कॄती आधीपासुन आहे.
लोकवस्ती व तिथल्या लोकांचा 'शांतताप्रियपणा' आज आला आहे, मग त्यासाठी बळी मैदानाचा व इथे नांदलेल्या एका संस्कॄतीचा.

>>आता फक्त सभा लाऊडस्पीकरसह होणार नसतील तर काय बिघडले?
चित्राताईंविषयी मला खुप आदर आहे म्हणुन मी 'सभा अशा लाऊडस्पिकरशिवाय घेणे शक्य नसते' असे सरळ उत्तर देतो.
अर्थात ह्याला तुमचे 'मग घेऊच नका ना सभा !' असे उत्तर असेल तर प्रश्नच मिटला.

>>बाकी काही करायला तर बंदी नाही ना?
राजकियदृष्ट्या सध्या 'बाकी काय काय शक्य' आहे हे कळाले तर आनंद होईल.
एक मात्र नमुद करु इच्छितो की मुकपणाने केले जाणार्‍या सत्यागॄहाचा जमाना गांधींबरोबरच संपला, ते सोडुन बोला.

>> शिवाय वर्षभरात पूर्वी एखाद-दुसरीच सभा होत असे, आता वर्षभरात सततच सभा चाललेल्या असतात. त्या नागरिकांना काही त्रास होत असेलच ना?
बरोबर आहे, त्रास होत असेल हे मान्य.
पण तिथे घर घेताना आपण 'शिवाजी पार्क'मध्ये घर घेतो आहोत व तिथे सभा असणारच हा कॉमन सेन्स घर घेताना कुठे होता.

केवळ १०० लोकांना शांतता लाभावी म्हणुन 'शिवाजी पार्क' वर भाषणबंदी लादुन १० लाख लोकांना मार्गदर्शन करणार्‍या व एक स्वतःची स्वतंत्र वेगळी संस्कॄती असणार्‍या 'राजकिय सभांचा गळा घोटणारा' निर्णय आम्हाला केव्हाही पटणे शक्य नाही.
आमचा निषेध आहेच ...

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

घाशीराम कोतवाल १.२'s picture

6 May 2010 - 9:08 pm | घाशीराम कोतवाल १.२

डॉन राव हे घ्या काहि फोटु

मनसे पक्ष स्थापना सभा


दसरा मेळावा

नितिन थत्ते's picture

6 May 2010 - 9:14 pm | नितिन थत्ते

अवो कोतवाल सायेब, डान्रावांना उलट दिशेचे (लाखांच्या सभांचे) फोटो हवे होते बहुधा.

नितिन थत्ते

छोटा डॉन's picture

6 May 2010 - 9:18 pm | छोटा डॉन

श्री. थत्ते ह्यांच्याशी सहमत ...

आम्हाला समोरच्या लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करणारा पाठमोरा नेता असे छायाचित्र हवे आहे.
उदाहरणादाखल आजच्या सामन्यातले बाळासाहेबांचे छायाचित्र पहा, इथे मैदान त्यातली गर्दी आणि नेता असे सगळेच येत आहे.

असो, मदतीसाठी आभार ...

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

घाशीराम कोतवाल १.२'s picture

6 May 2010 - 9:21 pm | घाशीराम कोतवाल १.२

डान्राव गुगल बाबाला अशा फोटुच वावड आहे काय करणार आम्ही घरी जाउन चढवतो आमच्या कड काही व्यक्तीगत छायाचित्र आहेत

घाशीराम कोतवाल १.२'s picture

6 May 2010 - 10:22 pm | घाशीराम कोतवाल १.२

@ डान्या हरकत नाय रे, घरी गेल्यावर दे.
माझ्या खवत दिली तरी चाललील.

आम्हास खवत लिहिण्याचा अधिकार नाही आहे डान्राव आम्ही ईकडच चिकटवु चित्र

चित्रा's picture

7 May 2010 - 3:53 am | चित्रा

..मी 'सभा अशा लाऊडस्पिकरशिवाय घेणे शक्य नसते' असे सरळ उत्तर देतो.
अर्थात ह्याला तुमचे 'मग घेऊच नका ना सभा !' असे उत्तर असेल तर प्रश्नच मिटला.

अहो, मान्य आहे.
आम्हालाही ठाकर्‍यांचे बोलणे ऐकायला आवडते हो. (विचार पटो, न पटो, बोलतात भारी).

शिवाजी पार्कला आम्ही जायचो तेव्हा क्रिकेटही चालायचेच. शिवाय ते मैदान एवढे मोठे आहे, की क्रिकेटचे सामने चालले तरी प्रश्न यायचा नाही. एक गल्ली होती, तिथे संदीप पाटील रहायचा म्हणून ऐकले होते, मग मुद्दाम तिथे घिरट्या मारायच्या, तो चुकून दिसतो का बघायला ;) असे धंदे आम्हीही केले आहेत. तेव्हा उद्या क्रिकेटच बंद झाले तर आम्हीही भांडूच की.
पण मोठ्या सभांसाठी, सुरक्षा व्यवस्थेसाठी हे पुरेसे आहे का?


पण तिथे घर घेताना आपण 'शिवाजी पार्क'मध्ये घर घेतो आहोत व तिथे सभा असणारच हा कॉमन सेन्स घर घेताना कुठे होता.

अहो साहेब, शिवाजी पार्क कधी तयार झाले? इ.स. २०१० मध्ये मैदानाचे आणि आजूबाजूच्या परिसराचे काय होईल, याचा कॉमन सेन्स १९६० च्या दशकात कसा यायचा?

असो. आमच्याही भावना पेटतात उगाचच कधीतरी, तेव्हा उगाच तुम्हाला बोलण्यात अर्थ नाही.

नितिन थत्ते's picture

6 May 2010 - 4:47 pm | नितिन थत्ते

सभा घेणे (संघटन करणे) हा बहुधा मूलभूत अधिकार आहे. कोर्टाने टेक्निकली सभा घ्यायचा अधिकार शाबूत ठेवला आहे पण लाऊडस्पीकर लावायला बंदी करून २००-३०० पेक्षा मोठी सभा घेता येणार नाही अशी व्यवस्था केली आहे.
(The letter is preserved but the spirit is lost).

शिवाय १० वाजेपर्यंत इतर सर्व आवाज करायला (सण उत्सवा पासून दिवाळीच्या फटाक्यांपर्यंत) परवानगी देणार्‍या कोर्टाला सभांचे संपूर्ण दिवस वावडे का असावे?

नितिन थत्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 May 2010 - 5:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शिवाय १० वाजेपर्यंत इतर सर्व आवाज करायला (सण उत्सवा पासून दिवाळीच्या फटाक्यांपर्यंत) परवानगी देणार्‍या कोर्टाला सभांचे संपूर्ण दिवस वावडे का असावे?

जवळच असलेल्या रुग्णालयातला एखादा डॉक्टर याचं उत्तर देऊ शकेल.

सभांचं संपूर्ण दिवस वावडं फक्त शिवाजी पार्कसाठी आहे. दहिसर गावाच्या बाहेर एखादी सभा घ्यायला न्यायालयाने मनाई केलेली नाही. सभा घेणं या मूलभूत हक्काचा न्यायालयाने संकोच केलेला नाही.

अदिती

छोटा डॉन's picture

7 May 2010 - 6:42 pm | छोटा डॉन

>>सभांचं संपूर्ण दिवस वावडं फक्त शिवाजी पार्कसाठी आहे.
का बरे ?
शिवाजी पार्कच का ?
त्याच्या आवारात शाळा आणि दवाखाने आहेत म्हणुन ?
गिरगाव चौपाटी अशा सभांसाठी बंद केल्यानंतर मुंबईत असे दुसरे कुठले मैदान आहे की जिथे ३-४ लाख लोकांची सभा होऊ शकते ?
'शिवाजी पार्क'चे महत्व आणि वैशिष्ठ्य टिकवुन ठेवण्यासाठी दवाखाने रिलोकेट होऊ शकत नाहीत का ?

>>दहिसर गावाच्या बाहेर एखादी सभा घ्यायला न्यायालयाने मनाई केलेली नाही.
का, दसिसरच का ?
दहिसरात काय दवाखाने आणि शाळा नाहीत का ? असल्यास त्यांना (तुमच्या म्हणण्याप्रमाणे) त्रास होणार नाही का ?

आयला ज्या ठिकाणी शाळा आणि दवाखाने नाहीत अशाच ठिकाणी सभा घ्यायच्या म्हणल्यावर एक तर चंद्रपुरमधले आदिवासी पाडे ( आजकाल सरकार तिकडेही वस्तीशाळा काढते आहे म्हणे ) किंवा डायरेक्ट अंतराळात किंवा समुद्रात एवढेच पर्याय शिल्लक राहतात ;)
पण समुद्रात सभा घेतल्यास तिथल्या समुद्रीजीवांच्या डोक्याला शॉट लागणार नाही ह्याची काळजीही घ्यायला हवी नाही, उगाच कशाला कुणावर अन्याय ?

>>सभा घेणं या मूलभूत हक्काचा न्यायालयाने संकोच केलेला नाही.
बरोबर.
आता फक्त न्यायालय आणि सदर निर्णय पटणार्‍यांनी 'लाखा-लाखांच्या सभा कुठे आणि कशा घ्यावात' हे सविस्तर सांगावे.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

तिमा's picture

6 May 2010 - 8:48 pm | तिमा

प्रत्येकाची आवाज सहन करण्याची क्षमता त्याच्या बुध्दीच्या व्यस्त प्रमाणात असते असं कोणीतरी मिपावर लिहिल्याचे स्मरते. वरील लेख वाचून त्याची खात्रीच झाली.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

धमाल मुलगा's picture

7 May 2010 - 7:06 pm | धमाल मुलगा

मला वाटतं ह्या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या बोलण्याची गरज नाही.
अशी सोय असलेलं/सोय-सवय लाऊन घेतलेले इतर ठिकाणं आहेत, विषयाला धरुनही वैयक्तिक चिखलफेक करत बसण्याची हौस तिथे भागवता येईल.

वरच्या प्रतिसादात सरळसरळ लेखाच्या लेखकाची बुध्दी काढल्याचे इथल्या एकाही ढुढ्ढाचार्याच्या नजरेस आले नाही? की सरळ डोळ्यांवर कातडे ओढुन घेतलं आहे? की चर्चेपुरतं उदात्त हेतु घेऊन येऊन पण बाकी बाबतीत "मला काय त्याचं?" अशी सोयीस्कर धारणा आहे?

कोणीही येऊन असं कोणाचीही जाहीरपणे बुध्दी काढण्याची लायकीच काय कोणाची?

सुवर्णमध्य काढता आला असता. असे म्हणीन.

सरसकट सर्व सभांना अटकाव न करता वर्षात जसे ४-५ दिवस सध्या रिकामे ठेवले आहेत सभांसाठी (१५ ऑगस्ट, २६ जाने सारखे) त्यांची संख्या वाढवता आली असती. वर्षात १५ सभा हा आकडा ओक्के आहे.

उठसुठ हे प्रदर्शन मांड, ह्याने हे मांडलं म्हणून त्याने ते प्रदर्शन मांड हा खेळ थांबवता आला असता.

नितिन थत्ते's picture

6 May 2010 - 8:59 pm | नितिन थत्ते

गेल्या वर्ष दोनवर्षांत शिवाजी पार्कावर अशा किती सभा झाल्या याचा काही विदा मिळू शकेल का?

वर कुणीतरी हल्ली सारख्याच सभा असतात असं लिहिलंय. त्यांना बहुधा कल्पना असावी.

रोगच झालेला नव्हता पण ऑपरेशन केले असे तर नाही ना?

नितिन थत्ते

आनंदयात्री's picture

6 May 2010 - 11:12 pm | आनंदयात्री

वर जमतील तेवढ्या सणांचे, धार्मिक उत्सवांचे नावे प्रतिसादातुन घुसाडण्याचा प्रयत्न केलेला दिसला .. अश्या अ‍ॅन्टीसोशल लोकांनी जंगलात जाउन का राहु नये ?

इनोबा म्हणे's picture

6 May 2010 - 11:34 pm | इनोबा म्हणे

अश्या अ‍ॅन्टीसोशल लोकांनी जंगलात जाउन का राहु नये ?
जंगलात राहणार्‍या प्राण्यांवर अन्याय केला जाऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे. बाकी चालू दे!

टारझन's picture

7 May 2010 - 12:01 am | टारझन

>>अश्या अ‍ॅन्टीसोशल लोकांनी जंगलात जाउन का राहु नये ?
>>जंगलात राहणार्‍या प्राण्यांवर अन्याय केला जाऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
बाजार उठला =))

आनंदयात्री's picture

7 May 2010 - 12:07 am | आनंदयात्री

>>हा हा हा

=)) =)) =)) =))

मग जंगलातल्या एका विशिष्ट भागाला 'जंगलक्रम' असे नाव दिले जाईल का ?

टारझन's picture

7 May 2010 - 12:20 am | टारझन

>>'जंगलक्रम'
आगायायाया =)) =)) णॉणस्टॉप हास्यकल्लोळ =)) काही प्राणी जंगलाच्या सगळ्याभागांत आपली झुप्पेदार शेपुट दाखवत पळतात हल्ली =))

- आंदेश जामहसवी