आरसा तिच्या शयन गृहाचा !

निरन्जन वहालेकर's picture
निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी...
26 Apr 2010 - 8:30 am

आरसा तिच्या शयन गृहाचा ! ! !

तुझ्या शयन गृहाच्या आरशाची असूया मला
न्याहळत असतो तो जरा जास्तच तुला.

तूहि तितकीच निलाजरी.
नेत्रपल्लवी होता त्यासवे
खुदकन गोड गाली हसते,
होता नजरा-नजर माझ्यासंगे मात्र
लाज वदनी अन नजर तुझी खाली असते.

“ तासनतास काय चालते ग हितगुज तुमचे “ ?
आजतागत नाही कळले मला
माझ्यापरी सखा प्यारा तुझा
अन सख्खा वैरी माझा ! ! !

आसुसलेली नजर त्याची
जाण कशी नाही तुला ?
न्याहाळतो अंतरंग न अंतरंग तुझे
म्हणूनच त्याची असूया मला

वाटतं,
“ मीच व्हाव आरसा तुझ्या शयन गृहाचा.
करावं जतन तुझ्या छबिचं हृदयांत,
प्राषावं अमृत तुझ्या अधरांच,
विसावावं गर्द केशसंभारांत,
होऊन कुमकुम तुझ्या ललाटाचं ” ! ! !

निरंजन वहाळेकर

कविता

प्रतिक्रिया

पिंगू's picture

26 Apr 2010 - 11:59 am | पिंगू

माझ्यापरी सखा प्यारा तुझा
अन सख्खा वैरी माझा ! ! !

वाह उस्ताद वाह!!

डावखुरा's picture

26 Apr 2010 - 12:19 pm | डावखुरा

“ तासनतास काय चालते ग हितगुज तुमचे “ ?

न्याहळत असतो तो जरा जास्तच तुला.

निर्जिव वस्तुंवर सजीव्तेचा आरोप.....खुपच छान जुळुन ........आलीये रचना..
पुलेशु...

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

फ्रॅक्चर बंड्या's picture

26 Apr 2010 - 3:42 pm | फ्रॅक्चर बंड्या

“ तासनतास काय चालते ग हितगुज तुमचे “ ?
मस्तच ,...
binarybandya™

मड्डम's picture

27 Apr 2010 - 12:09 am | मड्डम

झक्कास

मराठी आणि मायभूमीचा अभिमान असलेला मायभूमी

निरन्जन वहालेकर's picture

29 Apr 2010 - 3:42 pm | निरन्जन वहालेकर

प्रतिसादा साठी धन्यवाद ! !
उत्साह वाढला ! !