तुम्ही पाहीलेले अति टुकार चित्रपट

मराठे's picture
मराठे in काथ्याकूट
13 Apr 2010 - 8:43 pm
गाभा: 

आजकाल मराठीत आणि हिंदीत वेगवेगळ्या विषयावरचे फार चांगले चित्रपट येउ लागलेले आहेत. पण त्याच बरोबर कधी कधी इतके पाच्कळ आचरट सिनेमेपण येतात. आणि कधीतरी एखाद्या गाफिल क्षणी आपण ते बघतो सुद्धा... नंतर आपण अमूक एक सिनेमा पाहिला हे चारचौघांसमोर बोलायची पण शरम वाटते. उदाहरणार्थ, हे सिनेमे मी (का?) पूर्ण पाहीलेले आहेत (प्लीज कुठे सांगू नका) दिल बोले हडिप्पा, पेईंग गेस्ट (नवा), वगैरे...
तुम्हाला असं काही कन्फेशन करायचं असेल तर इथे टाका.
त.टी. (१) : तुम्ही जे काही सांगाल ते ह्या संस्थळाच्या चार व्हर्चुअल भिंतिच्या आत राहील (अशी कोणतीही ग्यारंटी नाही)
त.टी. (२): त.टी. म्हणजे तळटीप (उगाच कल्पना लढवू नका)

प्रतिक्रिया

प्रशु's picture

13 Apr 2010 - 8:45 pm | प्रशु

१. टशन
२. झुम बराबर झुम
३. गजनी
४. शाहरुखचे आजलाल येणारे सगळेच..

टारझन's picture

16 Apr 2010 - 2:25 am | टारझन

बर्‍याच वर्षांपुर्वी पैसे खर्च करुन बिनष्टोरी न बिनडायलॉगच्या पिच्चर च्या षिड्या आणल्या होत्या ... त्या तद्दन टुकार आणि फालतु निघाल्या :) पैषे गेल्याने फार जिव जळला होता :) त्या पिक्चरला काही खास नाव नसल्याने लक्षात नाही राहिलं :)

असो !@!

मुक्तसुनीत's picture

13 Apr 2010 - 8:48 pm | मुक्तसुनीत

धागा रोचक आहे. दैनंदिन घडामोडींमधे अनेक घटना दुर्लक्षणीय असतात. नेमक्या या गोष्टींबद्दलच कशाकरता बोलायचे त्यामागची मीमांसा करता आली तर ऐकायला आवडेल.

अनिल हटेला's picture

13 Apr 2010 - 8:50 pm | अनिल हटेला

प्रिन्स .... X( X-(

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D

हम आपके है कौन
बरसात
सोल्जर
त्रिमुर्ती
रुद्राक्ष
द्रोण
ढोल
चुप चुपके

(हे सर्व खरंतर विनोदी म्हणूनही बघता येतील)

सन्जोप राव's picture

14 Apr 2010 - 10:36 am | सन्जोप राव

ढोल हा भन्नाट सिनेमा आहे. ( असे माझे मत)
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

मिसळभोक्ता's picture

13 Apr 2010 - 9:22 pm | मिसळभोक्ता

मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव चे सर्व चित्रपट.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सन्जोप राव's picture

14 Apr 2010 - 10:38 am | सन्जोप राव

लक्ष्मीकांत बेर्डॅ ( कदाचित मी एक विदूषक हा अपवाद), सचिन, अशोक सराफ आणि महेश कोठारेचे सर्व 'इनोदी' चित्रपट
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

मिसळभोक्ता's picture

14 Apr 2010 - 11:01 pm | मिसळभोक्ता

कदाचित मी एक विदूषक हा अपवाद

तुम्हाला "एक होता विदूषक" म्हणायचे असावे. माझ्या मते, तो अतिशय कंटाळवाणा आणि टुकार चित्रपट होता. पुलं (पटकथा) आणि जब्बार (दिग्दर्शक) ह्यांच्या कारकीर्दीतला एक काळा धब्बा.

चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे महानोरांची गाणी, आणि आनंद मोडकांचे संगीत.

(त्यातली 'शब्दांचा हा खेळ मांडला' ही नांदी चंद्रकांत काळे, रवी साठे, आणि मुकुंद फणसळकरने उत्कृष्ट म्हटली आहे. तसेच 'मी गाताना, गीत तुला लडिवाळा' ही अंगाई आशाताईंनी !)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सन्जोप राव's picture

15 Apr 2010 - 10:40 am | सन्जोप राव

हो, हाच तो चित्रपट. निळूभाऊंचे काम अप्रतिम (मिभो, आता मत बदलणार का? 'प्रेमा'ची आठवण ठेऊन बोला!)
बाकी काळा 'धब्बा' वगैरे मला ठाऊक नाही ('धब्बा' हा शब्द लोक का वापरत असावेत?) 'कदाचित' हा शब्द वापरुन मूळ प्रतिसादात मी पळवाट शोधून ठेवलेली आहेच!
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

मिसळभोक्ता's picture

16 Apr 2010 - 12:18 am | मिसळभोक्ता

निळूभाऊंचे काम अप्रतिम (मिभो, आता मत बदलणार का? 'प्रेमा'ची आठवण ठेऊन बोला!)

अर्थातच !

बाकी, निळूभाऊंचे काम अप्रतीम नाही, असा एखादा सिनेमा माहिती आहे का ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सन्जोप राव's picture

16 Apr 2010 - 7:22 am | सन्जोप राव

निळूभाऊंचे काम अप्रतीम नाही, असा एखादा सिनेमा माहिती आहे का ?
बरेच आहेत. हिंदीतले सगळेच. 'कुली' वगैरे. मराठीत खलनायक म्हणून भूमिका केलेले बरेच. 'सामना' आणि 'सिंहासन' मधलेही काही सीन्स.
वस्तुनिष्ठ व्हा, मिभो. अंध भक्ती नको.
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

भडकमकर मास्तर's picture

17 Apr 2010 - 1:01 am | भडकमकर मास्तर

वा.. सामना ;) रंगतोय ...
चालूद्यात

मिसळभोक्ता's picture

20 Apr 2010 - 8:13 am | मिसळभोक्ता

वस्तुनिष्ठ व्हा, मिभो. अंध भक्ती नको.

निष्ठ आहोतच. वस्तु कोणती ते ठरवून ;-)

(ता. क. हा साला मास्तर उगाच का टाळ्या पिटतोय ?)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अविनाशकुलकर्णी's picture

13 Apr 2010 - 9:35 pm | अविनाशकुलकर्णी

महुआ..अति भयाण चित्रप्ट मला ३ वेळा नाईलाजाने बघावा लागला.

स्वतन्त्र's picture

13 Apr 2010 - 9:57 pm | स्वतन्त्र

इथे सर्वांनी हिंदी चित्रपटांचीच नावे घेतली आहेत ! पण आपले मराठीही कुठे कमी पडले नाहोयेत त्या बाबतीत !
जसे आत्ताच एक उत्सुकता होति (कशाची हे विचारू नका) म्हणून पहिला :-
पिकनिक (मराठी)

आशिष सुर्वे's picture

13 Apr 2010 - 11:29 pm | आशिष सुर्वे

मराठी: मकरंद अनासपुरे चे बरेचसे चित्रपट
हिंदी: चांदनी चौक टू चायना .. (पहिल्यांदा बंगलूरू-मुंबई बस प्रवासात पाहिला होता.. अक्षरशः बेशुध्द पडलो होतो.. दुसर्‍यांदा परतीच्या प्रवासात पाहिला.. दुसर्‍या रांगेतल्या आसनावर बसल्याने अगदीच इलाज नव्हता.. आणि आवाज बर्‍यापैकी मोठा ठेवल्याने (कि हया चित्रपटाच्या भितीने?) निद्रादेवी काही केल्या आशिर्वाद द्यायला येत नव्हती..
इंग्रजी: बिवूल्फ आणि क्लॅश (कि क्लेश?) ऑफ दी टायटन्स..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

डावखुरा's picture

14 Apr 2010 - 12:30 am | डावखुरा

रेनकोट...........
सध्यातरी हाच आठवतोय...
"राजे!"

मी-सौरभ's picture

14 Apr 2010 - 12:51 am | मी-सौरभ

मराठी
लक्श्मीकांत चे काही टुकार चित्रपट
मकरंद अ. चे 'काय द्याच बोला' सोडून
भरत जाधव चे सगळे

हिंदी
लव स्टोरी २०५०
आप का सुरूर
एकलव्य
ब्लू
कंब्ख्त ईश्क
टशन
..
...
...
..... (यादी खूप मोठी आहे)

-----
सौरभ :)

मराठे's picture

14 Apr 2010 - 1:06 am | मराठे

मला वाटतं की बर्‍याच लोकांची यादी खूप मोठी आहे.. मग थोडं चेंज करुया... असे सिनेमे जे बघण्यासाठी तुम्ही थेटरमधे गेलात आणि मग मध्यांतरात किन्वा त्याही आधीच सभात्याग करून परत आलात... माझ्या आठवणीतला पिच्चरः "मुझे कुछ कहेना है"...
गजगामिनी (तोच हुसेन साहेबांचा माधुरी दिक्षित वाला) टी व्ही वर एकदा लागला होता. पण त्यात सायकल वर बसुन येणारा "कालीदास" आणि सि.व्ही. रामन आणि द विन्ची यांचं संभाषण, मधुनच उपटणारा 'मदन' वगैरे पाहून मला उर्ध्व लागायची वेळ आली होती.

डावखुरा's picture

14 Apr 2010 - 1:20 am | डावखुरा

कुठे मिळेल???
गजगामिनी (तोच हुसेन साहेबांचा माधुरी दिक्षित वाला)

"राजे!"

भडकमकर मास्तर's picture

15 Apr 2010 - 9:43 am | भडकमकर मास्तर

गजगामिनीला टुकार म्हणणं शक्यच नाही...

त्याइतका नितांतसुंदर विनोदी चित्रपट मी पाहिलेला नाही....
सर्व मित्रांनी मिळून थिएटरमध्ये एन्जॉय केलेला सिनेमा...

II विकास II's picture

14 Apr 2010 - 7:40 am | II विकास II

रानी मुखर्जी आणि अमिताभचा
बाबुल.
मराठीतील कित्येक

भारद्वाज's picture

14 Apr 2010 - 11:15 am | भारद्वाज

मराठीत ....जत्रा

हिंदीत .... गोविन्दाचा हद करदी आपने (हद्दच केली होती ...खरंच)
टशन

चिऊ's picture

14 Apr 2010 - 11:17 am | चिऊ

सगळ्यात वाईट होता...
उफ्फ्..क्या जादु मुहाब्बत हे...

अतिशय बकवास...आणि वाईट याचे वाटते कि मी तो सिनेमागृहात पाहिला होता.. :-(

जे.पी.मॉर्गन's picture

14 Apr 2010 - 12:02 pm | जे.पी.मॉर्गन

टुकारपणाची तुमची व्याख्या डिफाइन करा बुवा ! आम्हाला बरेच टुकार पिक्चर आवडतात ! त्यात परदेशात राहात असाल तर "एकलव्य" पण भारी वाटतो असा अनुभव आहे. आम्ही शिरीष कणेकरांचे भक्त ! त्यांचं "माझी फिल्लमबाजी" ऐकून त्यात उल्लेखिलेले काही चित्रपट बघायचं भाग्य लाभलं ! पण काही मात्र जागतिक दर्जाचे टुकार चित्रपट होते. कित्येक सिनेमांची तर नावं देखील आठवत नाहीत.. .ह्यातच सगळं आलं.

"आज का दौर" - कला: पद्मिनी कोल्हापुरे, जॅकी श्रॉफ, निरूपा राय आणि कादर खान !
"दो गज जमीन के नीचे" - रामसे बंधू
"बाँबे एक्स्प्रेस" - कमल हसन आणि (बहुधा) मनीषा कोईराला
पण सगळ्यात जागतिक टुकार चित्रपट जर कुठला असेल तर आमीर खानचा "अव्वल नंबर" ! तसे आपण दिप्ती भटनागर हिरॉइन असलेले पण चित्रपट पाहिले आहेत ! तेव्हा कणेकरांच्याच भाषेत सांगायचं तर "आपली सहनशक्ती किती जबरदस्त आहे आणि जीवनलालसा किती तीव्र आहे" ह्याचं मोजमाप तुम्ही पाहिलेल्या टुकार चित्रपटांच्या यादीवरून होऊ शकतं.

धागा झकास !

जे पी

भारद्वाज's picture

14 Apr 2010 - 12:29 pm | भारद्वाज

कणेकरांच्याच भाषेत सांगायचं तर "आपली सहनशक्ती किती जबरदस्त आहे आणि जीवनलालसा किती तीव्र आहे" ह्याचं मोजमाप तुम्ही पाहिलेल्या टुकार चित्रपटांच्या यादीवरून होऊ शकतं.

हेहेहेहेहेहेहे....खरंच

सन्जोप राव's picture

14 Apr 2010 - 2:32 pm | सन्जोप राव

मुंबई एक्सप्रेस हा भन्नाट चित्रपट होता. विजयराज आणि त्याचे सहकारी, ओम पुरी, शरद सक्सेना आणि कमल हासन यांची कामे जबरी होती. 'ब्लॅक कॉमेडी' च्या अंगाने जाणारा हा चित्रपट होता. अजूनही कुठल्या टीव्ही चॅनेलवर लागला असेल तर मी बघतो.
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

II विकास II's picture

14 Apr 2010 - 7:22 pm | II विकास II

'मुंबई एक्सप्रेस' मलाही आवडला होता.

मराठे's picture

14 Apr 2010 - 7:20 pm | मराठे

मी पण तुमच्यासारखाच फिल्लमबाज आहे. प्रुव्ह करण्यासाठी: "अव्वल नंबर" मी पण पाहिला आहे, आमिर खान, एकता कपूर (तिचा हा पहिला आणि बहुतेक शेवटचा पिच्चर), देव आनंद (निर्देशक), आदित्य पांचोली (हा देव आनंदचा भाउ आणि व्हीलन).
जर शाळेचा अभ्यास इतका चांगला लक्षात राहीला असता तर आज मी इथे किबोर्ड बदडत बसलो नसतो. :(

भारद्वाज's picture

15 Apr 2010 - 12:01 am | भारद्वाज

आठवलं आठवलं.....ह्यात आमीर क्रिकेटपटू असतो...बरोबर? (लगान मधला क्रिकेटपटू नव्हे)
मी पण पाहीलाय लहान असताना.....आपल्या दूरदर्शनवर.....
आमीरला चेंडू लागून तो खाली पडतो आणि heroin ने दिलेली " I luv u " ची टेप ऐकून परत उठतो....काहीतरीच !!!!

परिकथेतील राजकुमार's picture

14 Apr 2010 - 8:00 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत आहे.

माझ्यामते अखिल आर्यावर्तात आजवर निघालेला सर्वात टुकार सिनेमा म्हणजे गोवींदाचा 'शिकारी' !

कणेकर गुर्जीवर जीव असलेला
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

भडकमकर मास्तर's picture

15 Apr 2010 - 9:49 am | भडकमकर मास्तर

शिकारी मला फारच आवडलेला सिनेमा.. विशेषतः चंद्राबाबू नार्वेकरांचं दिग्दर्शन...
आजही मी थिएटरला जाऊन पाहतो...

राणा जंग बाहादुर यांचं इन्स्पेक्टरचं काम वाखाणण्याजोगं..अनिल नागरथ आणि पुष्पा वर्मा तर अप्रतिमच...

भडकोपराव

वारा's picture

14 Apr 2010 - 12:28 pm | वारा

१) २०१२
२) अवतार
३) फिफ्थ एलेमेन्ट
४) ट्रान्स्फोरमर (नवीन)

२०१२ बघुन अस वाटल की प्रत्येक वेळी यान्चि गाडी किवा विमान किवा हे स्वतः मरता मरता अगदी शेवटच्या क्षणी कसे काय सुखरुप बाहेर पडतात?

इन्द्र्राज पवार's picture

15 Apr 2010 - 12:22 am | इन्द्र्राज पवार

"......२०१२ बघुन अस वाटल की प्रत्येक वेळी यान्चि गाडी किवा विमान किवा हे स्वतः मरता मरता अगदी शेवटच्या क्षणी कसे काय सुखरुप बाहेर पडतात?"

व्वा !!!! क्या बात है ! अगदी एक नम्बरी निरिक्षण आहे ! निव्वळ सुखरुप नव्हे तर न खरचटता !! आयोडिन देखील नको !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्रियाली's picture

15 Apr 2010 - 1:20 am | प्रियाली

२०१२ बघून आजच २१ डिसेंबर २०१२ का नाही असे वाटून गेले. जग बुडले असते तर आख्खा चित्रपट बघावा तरी लागला नसता.

टुकार!!

असो. आज चीनमध्ये भूकंप झाला. २०१२ जवळ येतो आहे. ;)

पक्या's picture

16 Apr 2010 - 7:39 am | पक्या

आणि युरोप मध्ये आइसलँड जवळ मोठा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे.
जिवितहानि काही नाही पण ४००० फ्लाईट्स रहित झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले.
निसर्ग हल्ली अनेक रौद्र रूप धारण करताना दिसतोय.

महाराष्ट्र , जय मराठी !

पुष्कर's picture

14 Apr 2010 - 7:24 pm | पुष्कर

गुंडा (मिथुन.... मोहन जोशी - व्हिलन)

नंबर २ - लोहा (धर्मेंद्र, मिथुन, गोविंदा, मनिषा कोईराला एत्यादि.... मोहन जोशी - व्हिलन)

(दोन्ही चित्रपट - कांती शहा)

त्यात करणकपूर (शशी कपूरचा मुलगा), मंदाकिनी, जितेंद्र (बहुतेक) आणि अमरीश पूरी व्हिलन होता.

अनेक टुकार पिक्चर बघितले पण सध्याचा लेटेस्ट फेवरेट म्हणजे "कुर्बान".

ग्रुपमधे हे पिक्चर बघताना प्रचंड मजा येते. मनसोक्त शिव्या देता येतात. कॉमेंटस करताना क्रिएटीव्हीटी पणाला लागते..मेंदू ताजातवाना होतो..

पुष्कर's picture

15 Apr 2010 - 10:58 am | पुष्कर

माझ्याकडे आत्ता सुद्धा लोहा ची सॉफ्ट कॉपी आहे. मी लिहिलेली कास्ट बरोबर आहे. तुम्ही कदाचित कुठला तरी वेगळा लोहा म्हणत असाल. हा कांती शहाचा आहे.

नवीन आहे.
मी म्हणतो तो १९८७ मधला आहे.

सागरलहरी's picture

14 Apr 2010 - 7:58 pm | सागरलहरी

१. रब ने बनादी जोडी
२. फना
३. जब वुइ मेट
४. आओ विश करे (आफ्ताब शिवदासानी)
५. रक्षक (चिरंजीवी चा डब केलेला )

कवितानागेश's picture

14 Apr 2010 - 9:22 pm | कवितानागेश

हल्लिचे,
अवतार (इन्ग्लिश)
(हिन्दी) वेलकम , कम्बख्त इश्क
पुर्वीचा, मदर इन्डीया (प्रचन्ड डोकेदुखी!)

============
माउ

अर्धवटराव's picture

15 Apr 2010 - 12:49 am | अर्धवटराव

यादी बरीच लांबलचक आहे !! पण त्यातल्यात्यात
१) हॅलो ब्रदर (सलमान खान)
२) यादे (सुभाष घई)

(सहनशील)अर्धवटराव
-रेडि टु थिन्क

अश्विनीका's picture

15 Apr 2010 - 1:07 am | अश्विनीका

यादी तर मोठी आहे पण नजीकच्या काळात पाहिलेले अत्यंत टुकार सिनेमे म्हणजे
समांतर - अमोल पालेकर आणि शर्मिला टागोर
क्षण - प्रसाद ओक.
सिनेमा संपेपर्यत डो़क जड होऊन दुखायला लागलं होतं.
- अश्विनी

अम्रुताविश्वेश's picture

15 Apr 2010 - 3:23 am | अम्रुताविश्वेश

तशन
रब ने बना दी जोडी
लागा चूनरी मे दाग

मराठी मधे
भरत जाधव आणि मकरन्द अनासपूरे चे सगळे चित्रपट

इन्ग्लिश मधे

२०१२

यादी खूप मोठी आहे.पण हे नव्यानी पाहिलेले काहि चित्रपट.

:)

अगोचर's picture

15 Apr 2010 - 9:54 am | अगोचर

रुद्राक्ष : सुनिल शेट्टी, बिपाशा

ह्या चित्रपटाबद्दल काहिच माहित नव्हते म्हणुन गेलो होतो.
टुकारातला टुकार होता .. रामायण, महाभारत, द मेट्रीक्स, हॅरी पॉट्टर एकत्र केल्यासारखा वाटला.

पण परिक्षा नुकतिच संपल्याचा उत्साह होता त्यामुळे फरसाण लाह्यांबरोबर गोड मानुन घेतला.

:)

---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

भडकमकर मास्तर's picture

15 Apr 2010 - 9:55 am | भडकमकर मास्तर

मी रामगोपाल वर्म यांचा "रामगोपाल वर्मा के शोले " नावचा सिनेमा थिएटरला पाहिला...

:))

परिकथेतील राजकुमार's picture

15 Apr 2010 - 5:08 pm | परिकथेतील राजकुमार

मी रामगोपाल वर्म यांचा "रामगोपाल वर्मा के शोले " नावचा सिनेमा थिएटरला पाहिला...

मास्तर तुम्हाला 'अफाट सहनशक्तीचा माणूस' असा पुरस्कार आपल्याकडून भेट.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अनिल हटेला's picture

15 Apr 2010 - 6:50 pm | अनिल हटेला

(वरीजनल शोले प्रेमी) :)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D

मी-सौरभ's picture

16 Apr 2010 - 12:53 am | मी-सौरभ

गोष्ट जर रा.गो.व. ला कळाली तर????

-----
सौरभ :?

तिमा's picture

15 Apr 2010 - 10:07 am | तिमा

मध्यंतराआधीच बाहेर पडलो तो अमिताभ बच्चन याचा 'बंधे हाथ' हा सिनेमा पाहून! बरीच वर्षे झाली त्याला. आता थेटरात जाऊन सिनेमे बघणे टाळतो.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

मस्तानी's picture

15 Apr 2010 - 7:51 pm | मस्तानी

हम आपके दिल मे रहेते है ... अनिल कपूर व काजोल चा ... भयंकर चित्रपट ...
आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून कॉलेज नंतर बघायला गेलो होतो ... आजूबाजूच्या बाया - बापड्या रडत होत्या आणि आम्ही सर्व जणी खो खो हसत होतो ...

इनोबा म्हणे's picture

16 Apr 2010 - 1:13 am | इनोबा म्हणे

आमच्या मिथूनदाचे सिनेमे सोडले तर सगळे सिनेमे टूकारच असतात असा आमचा वैयक्तिक अनूभव. बाकी चालू द्या.

मिथूनदासारखी सिरीयस कॉमेडी आजपर्यंत कुणालाही जमली नाही आहे.

लिमिटेड माज!

टारझन's picture

16 Apr 2010 - 2:27 am | टारझन

मिथूनदासारखी सिरीयस कॉमेडी आजपर्यंत कुणालाही जमली नाही आहे.

=)) =)) =)) =)) ठळक शब्द काळजाला भिडला =)) कुठं भेटला कुठं हा शब्द तुम्हाला ?

- \\ लोळे \\

इनोबा म्हणे's picture

16 Apr 2010 - 2:30 am | इनोबा म्हणे

त्या तिकडे शुद्धलेखकूंच्या प्रदेशात बरीच चर्चा चालली होती यावरुन.

लिमिटेड माज!

JAGOMOHANPYARE's picture

20 Apr 2010 - 10:42 am | JAGOMOHANPYARE

वीर... फुकटात लक्झरी बस मध्ये बघितला.

फूंक २.........
सरकार राज....

रागोव चे १०० अपराध कधी भरणार?

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll