त्सुनामी मनांतले ! ! !

निरन्जन वहालेकर's picture
निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी...
9 Apr 2010 - 1:58 pm

परवा भारतातील सगळ्या टी. व्ही. चानेल ला एकाच बातमीने ग्रासले होते इंडोनेशियांत त्सुनामी येणार ! झालं ! सगळ्यांचे मला इंडोनेशियांत फोन जप रे बाबा ! कुठे बाहेर जाऊ नकोस बुधवारी ! वगैरे वगैरे ! ! माझ्या मनांत मात्र विचारांचे वादळ सुरु होते विदेशात नोकरीसाठी एकट्या राहणाऱ्या इतर अस्वस्थ भारतीयांप्रमाणे ……………………. !

त्सुनामी मनांतले ! ! !

त्सुनामी ! त्सुनामी ! !
येणार ! येणार !
सगळेच अस्वस्थ, भितिग्रस्त.
आले, आले ! गेले ! !
हु..S...S...श्य ! ! !
निभावले एकदाचे ! ! !

तू तिथे,
अन
मी येथे ,
दूर. S...S दूर !
साता समुद्रापलीकडे ! !
त्सुनामी ! त्सुनामी !
तिकडे , अन ईकडेही !
भावनांचे,
आठवणीचे,
विचारांच्या कल्लोळांचे ! !

घोंगावते, वेगांत.
कधी तुझ्याकडे.
तुझ्याकडून माझ्याकडे,
तुझ्याकडे,
माझ्याकडे,
नित्याचेच ! !

आठवणीच्या प्रचंड लाटा
आदळतात
नयनांच्या किनाऱ्यांवर .
ओले चिम्ब किनारे,
अन
अस्वथ मनांतील उमाळे ! ! !

लाटा ओसरल्यावर
शमतात हळूहळू
आवेग भावनांचे ,
अंतर सातासमुद्राचे
सहय होते विचारांनी,
आपल्या घरट्याच्या !
इवल्याशा,
पण अथांग प्रेमाच्या ! ! !

येते उधाण पुन्हा
उत्साहाला,
नव कल्पनांना,
खुप काही करण्याच्या,
करत राहण्याच्या,
माझ्यासाठी,
तुझ्यासाठी,
अन
आपल्या इवल्याशा घरट्यासाठी ! ! !

निरंजन वहाळेकर

कविता

प्रतिक्रिया

शुचि's picture

10 Apr 2010 - 2:05 am | शुचि

सुंदर : )
मनात कधी वावटळ, कधी वादळ, कधी तूफान उठतं ऐकलं होतं आता त्सुनामी देखील : )

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

टारझन's picture

10 Apr 2010 - 2:39 am | टारझन

लै म्हंजे लै म्हंजे लै म्हंजे लै म्हंजे लै म्हंजे लै भारी कविता !
वाह .. काय कविता आहे ! हेवा वाट्टो तुमचा साहेब :)

निरन्जन वहालेकर's picture

12 Apr 2010 - 12:41 pm | निरन्जन वहालेकर

मनोगत
सुचले जसे शब्द-शब्द, गुंफीत गेलो माळेत मी
एकेका शब्दासवे रिक्त केले हृदय मी,
अस्वथ मनाच्या व्यथा शब्दांत कांही मांडल्या
न्याय दिधला मम व्यथेला, काव्य दरबारी रंक मी.

उत्साहित केले ! प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

निरन्जन

प्राजु's picture

12 Apr 2010 - 10:29 pm | प्राजु

येते उधाण पुन्हा
उत्साहाला,
नव कल्पनांना,
खुप काही करण्याच्या,
करत राहण्याच्या,
माझ्यासाठी,
तुझ्यासाठी,
अन
आपल्या इवल्याशा घरट्यासाठी ! ! !

छान!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/