ऐका हो ऐका!

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
5 Apr 2010 - 3:42 pm
गाभा: 

समस्त पुरूषांसाठी आज एक खबर आहे. ती जर आपण ऐकली किंवा वाचली तर खुषखबर ठरेल याची मला खात्री आहे. आज सकाळ मध्ये पान क्र सात वर डॉ. मधुरा विप्र यांचा एक लेख आहे. या लेखात त्यानी असे म्हटले आहे की मानव आणी चिपांझी हा उत्क्रांतिमध्ये जो बदल घडला तो वाय या गुणसूत्रातील बदलांमूळे घडला. असे संशोधन केंब्रिजमध्ये एका संस्थेत झाल्याचे नेचर या मासिकात प्रकाशित झालेल्या एका बातमीचा हवाल देऊन म्हतले आहे.

नेचर मधिल बातमीचा दूवा - http://www.nature.com/news/2010/100113/full/463149a.html

आजवर असा समज प्रचलित होता की मानव आणि माकडे यांच्यातील जनुकीय फरक फक्त २% एवढाच आहे. पण हा फरक गुणसूत्र २१ ( एक्स?) पुरताच मर्यादित असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. मानव आणि माकडे यांच्या वाय गुणसूत्रातील फरक खूप मोठा आहे.
या संशोधनातून काही मजेशीर गोष्टी सूचित होतात.

१. एक्स हे गुणसूत्र उत्क्रांतीमध्ये बदलले नाही. स्त्रीयांमध्ये दोन एक्स असतात. म्हणजे मानवी स्त्रिया आणि माकडांच्या स्त्रीया यांच्यातला फरक १% पेक्षा कमी आहे. :)
२. मानवाचे माकडांपासून वेगळे होण्यात स्त्रीयांचे नाही तर पुरुषांचे कर्तृत्व निर्णायक आहे.

जगातील पुरुषानो एक व्हा!

प्रतिक्रिया

II विकास II's picture

5 Apr 2010 - 5:11 pm | II विकास II

धन्यवाद, माहीतीबद्दल.

--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

अरुंधती's picture

5 Apr 2010 - 5:14 pm | अरुंधती

तुमची निष्कर्षशक्ती ;) अफाट आहे. अजून काय काय सूचित होते ते पण येऊ देत! :D

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

5 Apr 2010 - 5:18 pm | प्रकाश घाटपांडे

डॉ मधुरा विप्र यांचा छोटा लेख वाचला. पण त्याविषयी अधिक माहिती हवी आहे.
सुचित गोष्टी तरी कशा तयार केल्या?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

सूचित गोष्टी कल्पक डोक्यातून.

(नेचर मासिकातला मूळ लेख वाचला. तोही रोचक आहे, पण वैज्ञानिक दृष्टीने.)

शुचि's picture

5 Apr 2010 - 5:25 pm | शुचि

अच्छा म्हणजे "य" जनुक असणे हे फक्त पुरुषाचं "कर्तृत्व" काय? असो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
But the moon is death.
Its cold rocks fill my belly as if I had
swallowed song of birds
and awakened in a tree.

युयुत्सु's picture

5 Apr 2010 - 5:31 pm | युयुत्सु

चुकीचा अर्थ लावलात.

मानव जमात आज जशी आहे ती य जनुकातील बदलांमुळे...

युयुत्सु
------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

चंबा मुतनाळ's picture

5 Apr 2010 - 6:13 pm | चंबा मुतनाळ

ट्रिपल एक्स जनुके असलेला प्राणी कुठला? :D :-D

योगेश गाडगीळ's picture

5 Apr 2010 - 7:42 pm | योगेश गाडगीळ

भाषा जरा हार्श वाटल्यास माफ करा, पण पुन्हा असा टुकार जोक करू नका. >:P तीन एक्स क्रोमोसम असणे, ही एक भयानक जेनेटिक सिंड्रोम मानली जाते-टर्नर्स सिंड्रोम! ही सिंड्रोम फक्त स्त्रियांमधेच असते. लक्षणं विदारक आहेत:
१) ओव्हरी डेव्हलप होत नाहीत.
२) गर्भाशय तयारच होत नाही.
३) जबडे वेडेवाकडे वाढतात.
३) स्तन डेव्हलप होत नाहीत.
४) उंची कमी असते.
५) वेब्ड नेक.
६) क्युबिटस व्हल्गस.
७) ओव्हरी नीट डेव्हलप न झाल्याने स्त्री हार्मोन्सही तयार होत नाही, आणि त्यामुळे अर्थातच कुठलेही फेमिनाईन इन्स्टिंक्ट्स नसतात.
#:S

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्|
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे||

अश्फाक's picture

6 Apr 2010 - 9:31 pm | अश्फाक

गाड्गीळ साहेब , थोडेसे चुकलात हो , टर्नर्स सिंड्रोम मधे फक्त १ च X chromosome अस्तो , original disease is given below

dr.ashfaq

Triple X syndrome

(also called 47,XXX or trisomy X):

This syndrome results from an extra copy of the X chromosome in each of a female's cells. Females with trisomy X have three X chromosomes, for a total of 47 chromosomes per cell. The average IQ of females with this syndrome is 90, while the average IQ of their normal siblings is 100 [1]. Their stature on average is taller than for normal females. They are fertile and their children do not inherit the conditionगाद्डद

Triple X syndrome

(also called 47,XXX or trisomy X):

This syndrome results from an extra copy of the X chromosome in each of a female's cells. Females with trisomy X have three X chromosomes, for a total of 47 chromosomes per cell. The average IQ of females with this syndrome is 90, while the average IQ of their normal siblings is 100 [1]. Their stature on average is taller than for normal females. They are fertile and their children do not inherit the condition

युयुत्सु's picture

5 Apr 2010 - 6:56 pm | युयुत्सु

अरेच्चा आज झाडावर कुणीच चढून बसलेले दिसत नाही. काही जैविक सहज प्रेरणा काही केल्या जात नाहीत हे वैज्ञानिक सत्य आज परत एकदा पटले :)

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

अरुंधती's picture

5 Apr 2010 - 7:27 pm | अरुंधती

लेखाच्या लिंकबद्दल धन्यवाद! त्याखालील कॉमेन्ट्सही वाचण्यालायक आहेत! :)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Apr 2010 - 9:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुळातला संपूर्ण लेख वरवर चाळला. तिथल्या प्रतिक्रिया वाचायला वेळ झालेला नाही. पण नक्की काहीतरी रोचक आणि वाचनीय असावं.

आश्चर्य आहे की हे माकडापेक्षा 'वेगळे' (स्ट्रेट) पुरूष पाठी लागतात ते मात्र माकडीणींशी साधर्म्य दाखवणार्‍या स्त्रियांच्याच; तेव्हा माकडीणी चालत नाहीत. काहीतरी फरक नक्कीच आहे बा माकड आणि पुरूषांमधे ... स्त्रियांना मात्र ... असो.

असो. माझी झाडावर चढायची वेळ झाली आहे. कोणी येणार असाल तर पॉपकॉर्न घेऊन या गं!

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Apr 2010 - 9:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचे एक मित्र श्री. रमताराम यांच्याकडून प्रतिसाद (त्यांना अजून मिपाचं सदस्यत्व मिळालं नसल्याने त्यांचा प्रतिसाद मी टाकत आहे.)

"मर्दा, अरे काळाच्या ओघात फक्त वाय गुणसूत्र उत्क्रांत झाले/प्रगत झाले असेल तर याचा दुसरा अर्थ हाही नाही का की, स्त्रिया - ज्या आजच्या काळात जवळजवळ सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत - त्या पुरूषांच्या आजच्या उत्क्रांत स्थितीला काही हजार वर्षांपूर्वीच पोचल्या होत्या?"

बाकी तुम्ही पुढे मुद्दाविस्तात नीट करालच. -- रमताराम

मी झाडावर चढल्यामुळे मला मुद्देविस्तार करता येणार नाही, पण असा विचार करण्यासाठी स्त्री असणं गरजेचं नाही.

अदिती

युयुत्सु's picture

5 Apr 2010 - 10:43 pm | युयुत्सु

- त्या पुरूषांच्या आजच्या उत्क्रांत स्थितीला काही हजार वर्षांपूर्वीच पोचल्या होत्या?

बालीश आणी विनोदी विधाने आहेत. जर स्त्री पुरुषांबरोबर उत्क्रात झाली तर जनुकीय ÿपातळीवर माकडीणींबरोबर का राहिली. या शिवाय x गुण्सूत्रामध्ये य पेक्षा कितीतरी जास्त जनुके असतात असे ऐकले आहे. त्यामुळे उत्क्रांत व्हायची संधी स्त्रीला असूनही ती बदलली नाही. का?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

अनामिक's picture

6 Apr 2010 - 1:29 am | अनामिक

तुमचाच गैरसमज होतोय असे दिसते... रमताराम स्त्री उत्क्रांत झाली असं म्हणतच नाहियेत.... याउलट ते म्हणताहेत की पुरुषांना उत्क्रांत होऊन आजच्या स्त्रीच्या (तुमच्या म्हणन्याप्रमाणे माकडीणींच्या) पातळीवर यायला हजारो वर्षे लागलीत.

पॉपकॉर्नवर बटर घालू का गं अदिती??

-अनामिक

टारझन's picture

6 Apr 2010 - 6:47 pm | टारझन

त्या पुरूषांच्या आजच्या उत्क्रांत स्थितीला काही हजार वर्षांपूर्वीच पोचल्या होत्या?

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
एकसे एक सिद्धांत ... कोणी पुरुषांच्या बाजुने बोलो .. वा इस्रीयांच्या ... मनोरंजन फुल अनलिमिटेड आहे .=))

एकेकाला साडीचा/धोतराचा पदर खोचुन भांडतांना पाहुन मौज वाटते ह्या ह्युह्युत्स्तुच्या धाग्यावर !!

-(आमच्या स्त्रीच्या उत्कर्षावर अंमळ खुष ) टारझन

धनंजय's picture

6 Apr 2010 - 11:29 pm | धनंजय

(आमच्या स्त्रीच्या उत्कर्षावर अंमळ खुष )

हेच म्हणतो. ओळखीची स्त्री उत्कृष्ट आहे, हे समजायला पेशींच्या चाचण्या करायची काय गरज?

युयुत्सु हातकाकणाला डीएनएचाचणीच्या आरशाने तपासत आहेत.

दोष हातात आहे, डोळ्यांत आहे, की काकणात आहे?

टारझन's picture

7 Apr 2010 - 12:12 am | टारझन

दोष हातात आहे, डोळ्यांत आहे, की काकणात आहे?

बहुतेक त्यांच्या स्वप्नात दोष असेल =))

धनंजय's picture

7 Apr 2010 - 12:15 am | धनंजय

स्वप्नातल्या परापर्‍यांना डीएनए नसते, असे वाटते.

सोम्यागोम्या's picture

6 Apr 2010 - 1:30 am | सोम्यागोम्या

>>ज्या आजच्या काळात जवळजवळ सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत - त्या पुरूषांच्या आजच्या उत्क्रांत स्थितीला काही हजार वर्षांपूर्वीच पोचल्या होत्या?"
बायकांना खूष करायचे हे [कांग्रेसी] लांगुलचालनाचे धोरण समस्त पुरुषांस घातक आहे. तेव्हा स्त्रीत्वाचा विनाकाराण उदोउदो करणा-या (स्त्री व पुरुषां)नो जरा जपून.

शुचि's picture

6 Apr 2010 - 3:37 am | शुचि

वैज्ञानिक कारणही दिलय या उत्क्रांतीचं ते वाचलत का?-

The rapid evolution of the Y chromosome is not a total surprise, because the Y chromosome has no partner during cell division and so largely avoids the exchange of DNA that occurs between partnered chromosomes and keeps modifications in check. "It's expected that they are going to be more different than the rest of the genome, but the extent of it is pretty amazing," says geneticist Christine Disteche at the University of Washington in Seattle.

"य" जनुकाला जोडीदार नसतो त्यामुळे त्याची काहीशी (DNA) देवाणघेवाण होऊ शकत नाही त्यामुळे त्याच्यात बदलाव येतो. कौतुकास्पद गोष्ट ही आहे की हा बदलाव खूपच झालेला आहे.

धाग्याबद्दल धन्यवाद.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता?
सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!

कवितानागेश's picture

6 Apr 2010 - 6:13 pm | कवितानागेश

"य" जनुकाला जोडीदार नसतो त्यामुळे त्याची काहीशी (DNA) देवाणघेवाण होऊ शकत नाही त्यामुळे त्याच्यात बदलाव येतो.
<<<<<<<<<<<<<
थोडकयात काय, तर पुरुषाना अजुनही सुधरणेस पुष्कळच वाव आहे!
तेंव्हा . . . . .

============
माउ

>>थोडकयात काय, तर पुरुषाना अजुनही सुधरणेस पुष्कळच वाव आहे!
म्हणजे बायका कधीच सुधरू शकत नाहीत हे तुम्हीच मान्य करता !!

कानडाऊ योगेशु's picture

6 Apr 2010 - 6:21 pm | कानडाऊ योगेशु

युयुत्सुंनी म्हणुनच आपल्या नावात दोन "य" जोडलेत वाटते..!!!

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

स्पंदना's picture

9 Apr 2010 - 8:05 am | स्पंदना

वाय क्रोमोझोन्स वाल्यान नो उडा उडा वाटाण्या सारखे उडा.
आम्हि तुम्हाला पटापट उचलुन खातो.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

टारझन's picture

9 Apr 2010 - 12:03 pm | टारझन

ह्या प्रतिसादाचे मराठी भाषांतर करणार्‍यास १ मिसळ (पाव स्वखर्चाने आणावेत)

- (वाटाण्यासारखा उडणारा Y-क्रोमो) संपुर्ण संशय
वाटाणे कसे उडतात ह्या शोधाचे पेटंट सुरक्षित !