आल्मंड बटर

स्वाती२'s picture
स्वाती२ in पाककृती
31 Mar 2010 - 8:13 pm

आल्मंड बटर

आजकाल पीनट अ‍ॅलर्जी मुळे इथे बर्‍याच शाळा 'पीनट फ्री' असतात. माझ्या लेकाची शाळाही याला अपवाद नाही. त्यामुळे साहाजिकच पीनट बटर ऐवजी आल्मंड बटर वापरायला सुरुवात केली. पण हे आल्मंड बटर एक तर गावातल्या दुकानात मिळत नाही आणि दर वेळी ५० मैलावरच्या दुकानात तेवढ्यासाठी जायची माझी तयारी नव्हती, तेव्हा घरी प्रयोग केला. दोनदा ट्रायल अ‍ॅन्ड एरर केल्यावर लेकाला आवडेल असे आल्मंड बटर जमले.

साहित्य

१/२ कप बदाम
चिमुटभर मीठ
१ टी स्पून वेजिटेबल किंवा कॅनोला तेल

कृती

ओवन २५० F ला तापत ठेवा. ओवन तापला की ट्रे मधे बदाम ठेऊन ओवन मधे २०-२५ मिनिटे भाजुन घ्या.भाजताना शेवटच्या ५ मिनिटात लक्ष ठेवा. बदाम गार झाले की ग्राईंडर मधे तेल सुटेपर्यंत बारीक करुन घ्या. बोलमधे काढून त्यात चिमुटभर मीठ घाला. थोडे थोडे तेल घालत चमच्याने घोटून तुम्हाला हवे त्या कंसिस्टन्सीचे आल्मंड बटर तयार करा. घट्ट झाकणाच्या डब्यात भरून फ्रिज मधे ठेवा.

प्रतिक्रिया

रेवती's picture

31 Mar 2010 - 8:37 pm | रेवती

अगं पण माझ्या मुलाची शाळा नटफ्री आहे. आमंडस् ही चालत नाहीत. त्यामुळे सूर्यफुलाच्या बीयांपासून तयार केलेले बटर वापरायचा सल्ला मिळाला होता. मी अजून ट्राय नाही केले. पण हा प्रकार चांगला आहे.

रेवती

प्रभो's picture

31 Mar 2010 - 8:42 pm | प्रभो

च्यायला, पोरांना काय खायचय ते खाउ पण देत नाहीत राव शाळेत आजकाल...

शाहरुख's picture

31 Mar 2010 - 11:09 pm | शाहरुख

बर्‍याच शाळा 'पीनट फ्री'

व्हॉट अ "नट" !!
शाळेत असताना चड्डीच्या खिश्यातून शेंगदाणे घेऊन जायचो आणि दिवसभर खायचो त्याची आठवण झाली :-)

बाकी, बटरसाठी वेजिटेबल किंवा कॅनोला तेल कढवत असावेत असे वाटायचे मला.

चतुरंग's picture

31 Mar 2010 - 11:21 pm | चतुरंग

मीतर गूळ सुद्धा घेऊन जायचो खिशातून आणि उन्हाच्या दिवसात खिसे पाघळलेल्या गुळाने चिकट झालेले दिसले की आईची चिडचिड व्हायची! ~X(
(आजही घरात दाणे भाजले रे भाजले की बकाणा मारतोच मी दाणे आणि गूळ!)

(गूळदाणे प्रेमी)चतुरंग

संदीप चित्रे's picture

8 Apr 2010 - 11:49 pm | संदीप चित्रे

हे कॉम्बिनेशनही मस्तच असतं.
गूळदाणे तर एकदम वीक पॉईंट !

आमंड बटर कधी खाऊन पाहिले नाहीये स्वाती पण एकंदर प्रकार चांगला दिसतोय.

हे माझे उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुटीतील दुपारचे खाणे असायचे - आजी झोपली असताना स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच चोरून बनवून खाल्लेले! आणि दुसरे म्हणजे घरगुती लोणी + पावभाजी मसाला एकत्र कालवून पोळी किंवा ब्रेडशी खाणे ;-)
(स्मरणशील)बेसनलाडू

चतुरंग's picture

9 Apr 2010 - 12:00 am | चतुरंग

आणखीन एक माझं फेवरिट्ट
काळा मसाला + करडीचं कच्चं तेल + शिळी भाकरी = =P~ =P~ =P~ =P~ =P~

चतुरंग

शुचि's picture

1 Apr 2010 - 2:00 am | शुचि

भातुकलीत आम्हीसुद्धा २ अर्ध्या शेंगदाण्यांच्यामधे गूळ घालून ते एकमेकांना चिकटवून लाडू लडू खेळायचो.
पण ज्यांना ही "दाणे" अ‍ॅलर्जी असते त्यांना बिचार्‍यांना वासही सहन होत नाही. लगेच मळ्मळ/उलट्या सुरु होतात.
लहान बाळाला १ वर्षाच्या आधी शेंगदाण्याचं काही अथवा अंडं देऊ नये असं म्हणतात. अ‍ॅलर्जी उद्भवण्याचा धोका असतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

खादाड_बोका's picture

2 Apr 2010 - 11:26 pm | खादाड_बोका

बाबांनो हा इथला अमेरिकन प्रॉब्लेम आहे ;)

मला तर स्वप्नातही भुक लागते....

अरुंधती's picture

3 Apr 2010 - 12:01 am | अरुंधती

बदामाची चटणीच की ही! :D

माझी आजी असती तर म्हणाली असती, ''धत! एवढ्या चांगल्या बदामाची चटणी ती काय करायची!! त्यापेक्षा मूठ मूठ घेऊन खावेत हवंतर!'' :P

असो. ह्या पदार्थाची चव कशी असेल विचार करत आहे, पण लक्षात येत नाहीए.
वेगळा आहे प्रकार! धन्यवाद गं स्वाती!

त्या भाजक्या शेंगदाण्यांची आठवण मात्र उगाच केलीत राव....!!! :)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

समीर गोखले's picture

8 Apr 2010 - 8:07 pm | समीर गोखले

नवीन प्रकार आहे. करुन बघायला पाहिजे. बाकी शेन्गदाणे (मला अजुन शब्दाच्या वर टिम्ब . देता येत नाही म्हणुन मी शेन्गदाणे असे लिहीले. कोणितरी सान्गा कसा द्यायचा टिम्ब. ) आणी गुळ ह्याची आठवण मात्र छान !!
समीर

आकडा's picture

8 Apr 2010 - 8:15 pm | आकडा

(M ने अनुस्वार येईल)

मला पीनट बटर हा प्रकार फारसा काही आवडत नाही, मुळात मला दाणेच फार आवडत नाही. मात्र घरात कधी काजू, बदाम आले की फार दिवस टिकत नाहीत. पर्स, झोळी सगळ्यात भरून ठेवते.

चतुरंग's picture

8 Apr 2010 - 8:16 pm | चतुरंग

TiMb = टिंब

(टिंबातला)चतुरंग