लवासा सिटि

धिन्गाना's picture
धिन्गाना in काथ्याकूट
21 Mar 2010 - 5:39 pm
गाभा: 

दोन वर्षान्पुर्वि लवासा सिटिला गेलो होतो.देवड्या आणि चौक्याना तोन्ड द्यावे लागले.मोठ्या मिनतवारिने प्रवेश मिळाला.सहा गावे सम्पादुन हि सिटि तयार केलि आहे.किति गावकरि विस्थापित झाले असतिल कोन जाने.टेकड्या पायरि पायरि सपाट करत नवि फुलझाडे लाविलि होति.जुन्या व्रुक्शाना तिलान्जलि दिलि असेल.धनदान्डग्याच्या बोटिन्ग साठि नदि अडवुन पाणि साठविले आहे. पुढच्या लोकानि काय केले असेल?आता टाइम्स ओफ इन्डियमध्ये पर्यावरना वर लवासावाले व्याक्खान देत आहेत्.पर्यावरन्तज्द्न माधव गाडगिल ह्यान्च्याबरोबर बोलले. कोनि लक्श घालित नाहि. असो.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

21 Mar 2010 - 5:59 pm | चिरोटा

'साहेबां'चाच प्रकल्प ना तो? उद्या लवासावाल्यांना पर्यावर संबंधित कुठले पारितोषिक पण मिळेल.तिकडचे बरेचसे बंगले केव्हाच विकले गेले आहेत.१ कोटी वगैरेना मुंबईतल्य बर्‍याच श्रीमंत लोकांनी तिकडे गुंतवणूक केली आहे.
P = NP

अरुंधती's picture

21 Mar 2010 - 6:00 pm | अरुंधती

लवासाबद्दल लोकांना जरा विस्ताराने माहिती दिलीत तर त्यांना प्रतिक्रिया देता येतील. मध्यंतरी मेधा पाटकरांनी लवासा संदर्भात तेथील सोयीसुविधांसाठी इतर गावांच्या वाटचे पाणी अनधिकृतपणे कसे वळवले जात आहे ह्याविषयी भाषणात सांगितले होते. आकडेवारी, ठोस सन्दर्भ देता आले तर बघा.

विषय चांगला आहे!

धन्यवाद!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मला जितपत माहीत आहे.. या परिसरात अशी काही घनदाट वृक्ष राजी नव्हती जी तुटली.. मुळात गावकरी सरपणा च्या गरजेने झाडे ठेवतात कुठे फारशी..

इंटरनेटस्नेही's picture

22 Mar 2010 - 12:17 am | इंटरनेटस्नेही

कोणत्याही प्रकल्पावर अशी सरसकट टीका करणे योग्य नाही. नवनिर्माण करणे कठीण आहे, टीका करणे सोपे.

नितिन थत्ते's picture

22 Mar 2010 - 8:12 am | नितिन थत्ते

या प्रकल्पात इतर समाजाने बलिदान करावं असं नवनिर्माण काय होत आहे हे कळलं तर बरं होईल.

नितिन थत्ते

तिमा's picture

22 Mar 2010 - 11:05 am | तिमा

कोणीतरी 'लवासा' वर खात्रीलायक माहिती द्यावी. एवढ्या पानभर जाहिराती येतात तेंव्हा काहीतरी पाणी मुरत आहे हे नक्की!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

अरुंधती's picture

22 Mar 2010 - 12:51 pm | अरुंधती

ही १ लिन्क :
http://en.wikipedia.org/wiki/Lavasa

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती's picture

22 Mar 2010 - 1:11 pm | अरुंधती

आणि मेधा पाटकर ह्यांचे मतप्रदर्शन :
http://www.indianexpress.com/news/water-being-diverted-to-lavasa-alleges...

आणि हा १ वर्षापूर्वी चा डी एन ए मधला लेख :
http://www.dnaindia.com/mumbai/report_lavasa-rocks-with-protests_1260171

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती's picture

22 Mar 2010 - 1:21 pm | अरुंधती

तेहलकाचा हा रिपोर्ट
http://www.tehelka.com/story_main43.asp?filename=Bu130210city_without.asp

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

22 Mar 2010 - 2:04 pm | प्रकाश घाटपांडे

लवासावर खालील प्रतिक्रिया वाचा
http://mimarathi.net/node/522#comment-6477
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अरुंधती's picture

22 Mar 2010 - 7:48 pm | अरुंधती

थोडक्यात, लवासा लेक सिटी हे एक 'प्रॉफिट मेकिंग व्हेन्चर' असून, त्यातून ह्यात गुंतलेल्या लोकांना पैसा काढायचा आहे. उद्योजक व राजकारणी यांचा अभूतपूर्व संगम झाला की कशी सर्व कामे सुरळीत होतात, परवानग्या मिळतात, भूसंपादन सुरळीत होते, गावकर्‍याना मोठी स्वप्ने दाखवून, दिशाभूल करुन फसवता येते आणि नन्तर त्यातून खोर्‍याने पैसा ओढता येतो ह्याचे हे अनुपम उदाहरण आहे!
आता बायोमिमिक्री सारखे तंत्र तिथे वापरून ते पर्यावरणवाद्यांच्या आरोपांमधील हवा काढून घेण्याच्या (सु)प्रयत्नांत आहेत. तिथे पर्यटन बोकाळेल असा त्यांचा अंदाज आहे. लवासा हा भाग फक्त श्रीमंत, अतिश्रीमंत व अतिअतिश्रीमंतांनाच परवडण्यासारखा आहे. बाकीच्यांनी एका दिवसापुरते तिथे जावे, आपल्याला हा चान्स मिळाला म्हणून देवाचे आभार मानावेत आणि डोळ्यांचे पारणे फेडून, खिसा रिकामा करून महा-आनंदे घरी यावे! त्यावर जरूर लिहावे!!
गावकर्‍यांचे काय घेऊन बसलात.... असे नाहीतर तसे, जगतील कसेबसे! आणि फार टिवटिव करायला लागले तर त्यांचे आवाज बरोबर गप्प करण्याची कला ह्या व्यावसायिकांना उत्तम अवगत आहे. तेव्हा काळजी नसावी!!

प्रगती ही अशीच होत असते बरं आपल्या देशात.... मग नंतर त्या प्रोजेक्ट मधील फोलपण उलगडून चार विचारवंत काथ्याकूट करतात, पत्रकार बोचरे वार करतात, राजकारणी सारवासारव करतात आणि उद्योजक तोवर दुसर्‍या अशाच प्रकल्पात बिझी असल्याने फारसे लक्ष देत नाहीत. आणि पर्यावरणवादी हळहळत बसतात. गावकरी हात चोळत बसतात.हेच आहे उद्योगाचे 'नवनिर्माण'!!!!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

विकास's picture

22 Mar 2010 - 11:20 pm | विकास

साधारण दिडएक वर्षांपुर्वी मी लवासाला भेट दिली होती. स्थापत्य आणि पर्यावरणशास्त्राच्या नजरेतून जे काही मी त्या प्रकल्पाची आधी कुठलिही माहीती नसताना पाहू शकलो ते केवळ उत्सुकतेने पाहीले होते.

कोकण आणि सह्याद्रीचे टोक अशा दोन्हीकडून सीमा असलेल्या भागतील हे एक जरी उत्तम रस्ता असला तरी बर्‍यापैकी दुर्गम भागातील नगर रचना केलेले गाव आहे. त्या डोंगरावरून जात असतानाच मोकळी आणि सुंदर हवा जशी लागते तसेच येथे खूप पाणी असावे असे तात्काळ वाटू लागते. अर्थात त्या किल्ल्याच्या आत (कारण पहारेकरी असतात/असायचे म्हणून!) गेलो की लक्षात येऊ लागते की निसर्गाने भरलेला हा भाग आहे. त्याला स्वतंत्र भारतातील पहीले हिलस्टेशन म्हणतात, हे माहीत असेलच (इतर ब्रिटीशांनी बांधलेली आहेत).

त्यावेळेस झालेली एकंदरीत डेव्हलपमेंट पाहून एकदम देखणे बांधकाम वाटले. तसेच संपूर्ण पद्धती (स्टाईल) ही जुन्या युरोपिअन वगैरे घाटणीची वाटली. रंग संगती, बांधकाम, सर्वच मस्त होते. तलाव बघण्यासारखे होते आणि तेंव्हा ऐकल्याप्रमाणे तेथे यॉटींग वगैरेची व्यवस्था पण करणार होते.

अर्थात तरी देखील काही गोष्टी आढळल्या की ज्या डिझाइन म्हणून विशेष पटल्या नाहीत आणि कुठेतरी त्यामुळे साधनसंपत्तीचे व्यवस्थापन ऑपरेटींग स्टेज मधे जास्त होऊ शकेल असे वाटले.

प्रकल्प हा त्याच्या विरोधकांनापण आवडू शकेल असा आहे. मात्र त्याच बरोबर नंतर ते बघताना फक्त अस्वस्थताच आली, कारण यात काही विस्थापनाचे प्रश्न आहेत का हाच प्रश्न डोक्यात आला... मात्र त्याच बरोबर असेही वाटले की जर काही "मोठे प्रश्न" असते तर आज पर्यंत नक्कीच विरोधकांनी ओरड केली असती, न्यायालयात धाव घेतली असती वगैरे... त्यामुळे असे वाटले की चाणक्याच्या वाक्याप्रमाणे, "पाण्यातला मासा पाणी कधी पितो ते कळत नाही", अशा पद्धतीने गैरव्यवहार झाले असतीलही पण ते मेधा पाटकर अथवा तशा प्रभृतींना अधिक महत्वाचे वाटण्यासारखे नसावेत....त्याला देखील (विरोध का झाला नाही) याबद्दल कोणी तरी मला उत्तरे दिली होती पण आत्ता लक्षात नाहीत. आठवल्यास नक्की सांगेन. कदाचीत येथे कुणाला माहीत असतील तर सांगावीत. (प्रकाशराव काही कल्पना?)

अर्थात माझी भेट अतिशय मर्यादीत होती आणि वेळही फारतर तासभर तेथे प्रत्यक्ष काढला असावा. नंतर काही मी या प्रकल्पाची माहीती काढायच्या भानगडीत पडलो नाही. आजकाल भारतात गेटेड कम्युनिटीज चे पेव फुटले आहे असे मला वाटते. मात्र त्या इतक्या दुर्गम भागात नसतात. लवासाच्या दृष्टीकोनातून हेच सगळ्यात मोठे आव्हान आहे असे वाटते.

म्हणूनच एकंदरीत गोषवाराच (केवळ माझ्या नजरेतून, प्रोजेक्ट, स्थापत्यशास्त्र, पर्यावरण आदी, विस्थापन वगैरे नाही कारण मला ठोस माहीती नाही) करायचा झाला तर इतकेच म्हणेन: प्रकल्प देखणा आहे, मात्र बिझनेस प्लॅन म्हणून त्यातून लगेच रीटर्न्स मिळण्याची शक्यता कमी वाटत आहे. त्यात जागतिक मंदीने भर घातली आहे. आता जर बदलेल्या उच्चशिक्षणाच्या धोरणामुळे कुठलेही परदेशी विद्यापिठ आले तर उत्कृष्ठ जागा आहे. (मला वाटते त्यांची तशीच इच्छा आहे). मात्र एकदा का हा प्रकल्प पूर्ण होऊन व्यवहारात आला की येथे अनेक प्रश्न असतील असे वाटते: कचरा, मलनि:स्सारण वगैरेचे व्यवस्थापन, पाण्याचे आणि वीजेचे व्यवस्थापन, इमर्जन्सी सेवा वगैरेची उपलब्धता वगैरे... जर रीटर्न्स मिळायला वेळ लागला तर त्याचा प्रत्यक्ष परीणाम हा या प्रकल्पाच्या मेंटेनन्सवर होऊ शकतो असे वाटते. अजून एक गोष्ट समजली नाही की हे नक्की कुणाच्या राजकीय हद्दीत येते? म्हणजे ते स्वतःच एक गाव आहे की अजून काही? स्थानिक स्वराज्य संस्था कशी असणार? वगैरे...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रशु's picture

22 Mar 2010 - 11:31 pm | प्रशु

'सायबांच्या वाढदिवसापासुन 'राष्ट्र्वादी' जागतिक तापमानवाढी बद्द्ल प्रचार करतय. लवासा बांधताना जंगलतोड झाली असणारचं ना...

गेल्या वर्षी लोकसत्तेत ह्या लवासाची झाडाझडती घेणारा लेख आला होता...

हुप्प्या's picture

23 Mar 2010 - 5:31 am | हुप्प्या

श्री. चौधरी हे मेधा पाटकरच्या अनुयायांपैकी आहेत. त्यांच्या बोलण्यात असे आले की कित्येक छोट्या शेतकर्‍यांच्या जमिनी लवासाने विकत घेऊन त्यांना तेव्हा तरी बरे वाटतील इतके पैसे दिले. (इथे धाकदपटशा वगैरे वापरला नसेलच असे नाही). ज्या किंमतीत त्या जागा लवासाने विकल्या त्याच्या तुलनेत विस्थापितांना दिलेल्या जमिनीच्या किंमती कमीच होत्या.

परंतु असे एक रकमी पैसे कधी बघायची, त्यांचे नियोजन करायची सवय नसल्याने अनेकांनी ते उधळपट्टीत संपवले. अगदी अती चैन केली आणि मग ठणठणाट. आणि मग असे कित्येक शेतकरी लवासाच्याच आलिशान इस्टेटवर वॉचमन, कष्टकरी म्हणून कामाला लागले आहेत.
आता इथे लवासाची सगळी चूक असे म्हणता येत नाही. पण हक्काच्या मालकीचे शेत गमावून तुटपुंज्या पगाराची नोकरी स्वीकारायला लागल्यामुळे नवे सामाजिक प्रश्न नक्कीच निर्माण होतील. एकीकडे ही आलिशान श्रीमंत वस्ती आणि दुसरीकडे गरीबांची वस्ती. ह्यातून नक्कीच संघर्ष होतील.

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Mar 2010 - 8:15 am | अक्षय पुर्णपात्रे

लवासा सिटी साक्षात स्वर्ग असेल तरी या प्रकल्पाचे समर्थन होऊ शकत नाही. जमिन सोडणार्‍या लोकांचा प्रश्न 'योग्य किंमत दिली त्यांनी पैसे उधळले' किंवा 'योग्य किंमत' इतपतच मर्यादीत नाही. एका जीवनपद्धतीस तिलांजना देण्याची किंमत कदाचित 'पर्सिक्युटेड' लोकच देऊ शकतील. 'योग्य किंमत' ठरवण्यासाठी आवश्यक असलेली माहिती जमिन देणार्‍या लोकांना माहीत होती, हे गृहीतक चुकीचे आहे.

याविषयी अत्यंत प्रगल्भ आणि प्रत्यक्षदर्शी लेख मिपावर श्री मोडक यांनी लिहिलेले आहेत. कृपया ज्यांनी ते वाचलेले नाहीत त्यांनी हे लेख जरूर वाचावेत. खाली दुवे देत आहे.

काही नोंदी अशातशाच... - २
काही नोंदी अशातशाच... ३
काही नोंदी अशातशाच... ४