नजर

प्रभो's picture
प्रभो in जे न देखे रवी...
11 Mar 2010 - 9:21 am

प्रिये तुझ्या नजरेत झाकू दे मला |
प्रेमाचा एक संदेश सांगू दे मला ||

बोलूया नजरेनेच आज आपण |
फूल आज प्रेमाचे फुलवू दे मला ||

नजरेच्या मोगर्‍यांचे वार हे सुगंधी |
जखमेची ह्या तू दवा दे मला ||

खेळाची नजरेच्या मजा ही न्यारी |
सुखासाठी आज त्या जगू दे मला ||

शृंगारकविता

प्रतिक्रिया

शेखर's picture

11 Mar 2010 - 9:26 am | शेखर

प्रभ्या, तुला आज काय जरा जास्तच आठवण आली का तिची?

बाकी कविता छान...

मेघवेडा's picture

12 Mar 2010 - 2:28 am | मेघवेडा

नजरेच्या मोगर्‍यांचे वार हे सुगंधी |
जखमेची ह्या तू दवा दे मला ||

मस्त रे!

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

शुचि's picture

12 Mar 2010 - 2:34 am | शुचि

हेच म्हणते
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

प्रभो's picture

12 Mar 2010 - 3:11 am | प्रभो

धन्यवाद.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

रेवती's picture

12 Mar 2010 - 5:13 am | रेवती

भावना कागदावर तर चांगल्या उतरल्या आहेत्.......प्रत्यक्षात कधी उतरवणार?:)

रेवती