तिखटी

अस्मी's picture
अस्मी in पाककृती
8 Mar 2010 - 5:02 pm

तिखटी हा कोकणात केला जाणारा तोंडीलावण्याचा प्रकार आहे...मोस्टली मुगाच्या डाळीच्या खिचडी बरोबर खाल्ला जातो...

साहित्य : १ वाटी दही
२-३ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
३-४ लसूण पाकळ्या
मीठ

कृती : १.आधी मिरच्या भाजून घ्याव्यात आणि ठेचून घ्याव्यात.
२.दही घुसळून घ्यावे.
३.लसूण सोलून ठेचून घ्यावी.
४.कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
५.आता दह्यात ठेचलेली लसूण, मिरची, आणि कोथिंबीर घालावी.
६.चवीनुसार मीठ घालावे आणि चांगले मिक्स करुन घ्यावे.
७.तय्यार आहे एक चटकदार तोंडीलावणे.... :)

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

8 Mar 2010 - 5:09 pm | मेघवेडा

पाकृ छान! पदार्थ तर उत्तम आहेच.. पण फोटो?????

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

वाघा's picture

8 Mar 2010 - 5:41 pm | वाघा

खुपच स्वादिस्ट!

विसोबा खेचर's picture

8 Mar 2010 - 5:56 pm | विसोबा खेचर

चवदार पाकृ..

अहो पण फोटो कुठाय?

तात्या.

आशिष सुर्वे's picture

8 Mar 2010 - 6:04 pm | आशिष सुर्वे

जल्ला तोंडाला पानी सुटलं ओ!

एकदा गावच्या आंब्याखालच्या कातलावर बसून आम्हा पोराटोरांनी खाल्लेली खिचडी आठवली..
आम्हा चाकरमान्यांसाठी शेजारच्या घरातल्यांनी एकदम पेशल बनवलेली..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

खादाड's picture

8 Mar 2010 - 7:00 pm | खादाड

आम्ही थोड आल पण घालतो !!

अजुन कच्चाच आहे's picture

8 Mar 2010 - 7:58 pm | अजुन कच्चाच आहे

आमच्या घरी त्याला "चटका" असे सार्थ नाव आहे.....
स् स् स्..........ट्च्टा !!
.................
अजून कच्चाच आहे.
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?

काजुकतली's picture

12 Mar 2010 - 3:41 pm | काजुकतली

फोटोसकट कृती देण्याचा एक अतिशय उपयुक्त आणि चांगला पायंडा मिसळपाववर पडला आहे तो कृपया मोडु नये. फोटोसकट पाहिलेली पाकृ लगेच कळते, शिवाय एंड प्रोडक्ट कसे दिसते तेही समजते

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2010 - 5:09 pm | बिपिन कार्यकर्ते

नुसते साहित्य वाचूनच ब्रह्मानंदी टाळी लागली....

बिपिन कार्यकर्ते