जीवनाश्यक गोष्टी..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
28 Feb 2010 - 11:26 pm
गाभा: 

राम राम मंडळी,

येथे आपापल्या जीवनावश्यक गोष्टींची यादी प्रत्येकाने देणे अपेक्षित आहे..

माझ्यापासून सुरवात करतो. आपणही अवश्य सांगा -

मधुबाला, लता, किशोरदा, यमन, भीमण्णा, बाबूजी, पुलं, कुसुमाग्रज, सचिनदा, पंचमदा, शोले, हृषिदा, गुलजार, मदनमोहन, मिसळ, मासळीचं जेवण, श्रीखंड, पान-चुना-तंबाखू...

या माझ्याकरता जीवनावश्यक गोष्टी आहेत..

आपल्याही अवश्य सांगा.. :)

सर्वांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा!

तात्या.

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

28 Feb 2010 - 11:40 pm | पाषाणभेद

हे काय नविनच बाई. केळीचं शिक्रण र्‍हायलंय की!

आम्हाला तर इंटरनेट शिवाय झोपच येत नाही.

पक्षी इंटरनेट असेल तर आम्ही झोपतच नाही म्हणा. अन तरीही मिसळपाव सारखे मराठी संस्थळ असेल तर झोप कुणाला येणार? ह्हो की नाही?इतके चांगले स्थळ कोणी सोडेल का?

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

टारझन's picture

28 Feb 2010 - 11:42 pm | टारझन

हॅहॅहॅ .. अणुष्का मॅडम आणि अनुषंगाने येणारी अजुन एक गोष्ट दिसली नाही मालक वरच्या लिष्ट मधे !
असो .. "जिवणाश्यक" नसेल :)

आमच्या "जिवनावश्यक" गोष्टी भरपुर आहेत :) असो .. त्यातली मिपावर मनसोक्त दंगे करणे ही एक ;)

- (ललनाप्रेमी) टारोबा ##र

टारझन's picture

28 Feb 2010 - 11:57 pm | टारझन

हॅहॅहॅ ... तोतापुरी आंबे .. हे राहिलंच की :)
तोतापुरी आंबे आम्हाला जिवनावश्यक जिवनाश्यक वाटतात.

शुचि's picture

1 Mar 2010 - 7:55 pm | शुचि

(१) गाणी
(२) कविता
(३) सुगंध
(४) देवपूजा
(५) आकर्षण
(६) पुस्तकं
(७) वीकांत

ता. क. - कुटुंब घातलं नाहीये कारण ते फक्त "या" जीवनाची आवश्यक "गोष्ट" नसून, इट इ़ज द व्हेरी फायबर ऑफ माय बीईंग ......

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

तिमा's picture

1 Mar 2010 - 9:21 am | तिमा

भारतीय संगीत
कुठलाही गोड पदार्थ
कविता, साहित्य, मैफिली
वर्तमानपत्र
टीका करणे
समविचारी असतील तर भरभरुन बोलणे अन्यथा मौन

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

Dhananjay Borgaonkar's picture

1 Mar 2010 - 9:55 am | Dhananjay Borgaonkar

१. मित्र.
२. पुण्यातील घर.
३. आंतरजाल.
४. घरचं जेवण.
५. पुस्तकं.
६. जगजीत सिंग.
७. तिच्या रम्य आठवणी.
८. महिन्यातुन एकदा दारु.

विसोबा खेचर's picture

1 Mar 2010 - 1:20 pm | विसोबा खेचर

७. तिच्या रम्य आठवणी.

क्या बात है..!

८. महिन्यातुन एकदा दारु.

हे मस्त! :)

तात्या.

युयुत्सु's picture

1 Mar 2010 - 10:11 am | युयुत्सु

आहार, निद्रा, मैथुन
तंबोरा, पुस्तकं
इंटरनेट

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

अप्पा जोगळेकर's picture

1 Mar 2010 - 10:19 am | अप्पा जोगळेकर

अत्यावश्यक गोष्टी -
बॅडमिंटन खेळणे.
वारंवार डोंगरात भट्कणे.(गेल्या साताठ वर्षांनधली सवय.)
नाक्यावर टवाळक्या करणे.
मित्र आणि कुटुंब.

तोंडी लावण्याकरता पण अत्यावश्यक नाहीत अशा गोष्टी -
लिखाण आणि वाचन.
मिसळपाव.
दारु आणि सिगरेटी.

(एक शंका आहे - तात्या पोटापाण्यासाठी काही उद्योग करत नाहीत काय? रोजच्या रोज होमपेज वर गाण्या-बजावण्याबद्दल काय काय लिहीत असतात. फोटो अपलोड करत असतात. पुन्हा प्रतिक्रियांची उडवाउडवी असतेच. नक्की काय प्रकार आहे? मला आधी वाटलं होतं की मिपा व्यावसायिक पद्धतीने चालते. पण कुठे जाहिराती किंवा पॉप्-अप्स पण दिसत नाहीत. )

विसोबा खेचर's picture

1 Mar 2010 - 10:34 am | विसोबा खेचर

तात्या पोटापाण्यासाठी काही उद्योग करत नाहीत काय?

तूर्तास अंमळ बेकार आहे. धंदा डाऊन आहे..हळूहळू जोर धरत आहे! :)

अजून काही व्यक्तिगत प्रश्न असतील तर tatya7@gmail.com इथे विरोपपत्र पाठवा...

तात्या.

शैलेन्द्र's picture

1 Mar 2010 - 1:58 pm | शैलेन्द्र

आप्पा, डोंबिवलीत रहाता ना? अहो मग डोंगरात जाताना साद घाला की... येवु आम्हीही...

भिडू's picture

1 Mar 2010 - 1:38 pm | भिडू

सचिन ची बॅटिंग

शैलेन्द्र's picture

1 Mar 2010 - 2:03 pm | शैलेन्द्र

बायको (हा कल्पवृ़क्ष आहे, अन्न, वस्त्र, व इतर अनेक गरजा येथे पुर्ण होतात.)
मुलगा.
इंटरनेट
व्यायाम,
प्रवास,
गाडी असणे व ती चालवणे,
डोंगरात भटकणे.

हे झाल मीनिमम....

आई,बायको, मुलगा, फोटोग्राफी, चित्रकला, सह्यादीतली भटकंती, मिसळपाव (पदार्थ आणि साईट), पुस्तके, संगणक, ब्रायन अडम्स, चवीचे खाणे, पुरे करतो . :)

गुपचुप's picture

1 Mar 2010 - 3:43 pm | गुपचुप

पुस्तकं,चवीचे खाणे,इंटरनेट,प्रवास,आहार, निद्रा,वर्तमानपत्र, मित्र, कुटुंब,आणि..... ती.

"मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..."

आशिष सुर्वे's picture

1 Mar 2010 - 6:30 pm | आशिष सुर्वे

१. आई-बाबांचे प्रेम
२. कुलस्वामिनीचा आशिर्वाद
३. आईच्या हातचे जेवण
४. आजी-आजोबांच्या आठवणी
५. कोकणातले मायाळू घर
६. बहिणीची माया
७. पुस्तके
८. आंबा
९. वडापाव
१०. सुसाट ड्रायव्हिंग
११. सचिनचा मैदानावरील वावर
१२. माझी स्वप्ने..
१३. माझा भूतकाळ

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

शुचि's picture

2 Mar 2010 - 3:06 am | शुचि

छान लिहीलयत.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

झुळूक's picture

2 Mar 2010 - 12:52 pm | झुळूक

सुन्दर लिहलं आहे.

अर्धवटराव's picture

2 Mar 2010 - 4:23 am | अर्धवटराव

१) नशा
२) नीशा

अर्धवटराव
-रेडि टु थिन्क

राजेश घासकडवी's picture

2 Mar 2010 - 4:23 am | राजेश घासकडवी

बहुतेकांनी वस्तू, उपक्रम दिले आहेत. मला यापेक्षा जरा हातात न पकडता येण्यासारख्या गोष्टी लिहाव्याशा वाटतात
माझ्या अत्यावश्यक गोष्टी, मनस्थिती, परिस्थिती
१. स्वातंत्र्य - मनाला येईल ते करता येणं. आत्ता हेच कर आणि ते करू नको अशी जबरदस्ती नसणं.
२. सुंदर झोप - विशेषत सुट्टीला अंमळ जड जेवण झाल्यावर
३. मोकळी स्वच्छ हवा, हिरवळ, सूर्यप्रकाश - शक्यतो एकत्र
४. भारतातला पाऊस - अर्थात तो स्वातंत्र्याबरोबरच चांगला लागतो
५. गुंगून जाण्याची स्थिती - लेखन वाचन इ. तहानभूक विसरवणारी
६. काहीही न करणं. त्यासाठी काही गोष्टी पुढे ढकलणं.
७. हव्याशा गोष्टीची हुरहूर, वाट पाहाणं
८. लोकांना शिकवणं, समजावून सांगणं, लोकांना आपलं म्हणणं पटणं
९. विविध गोष्टींमधले पॅटर्न शोधणं.
१०. लोकांनी कौतुक करणं, लाड करणं
११. थकून आलेलं असताना गरम टब बाथ, मालिश, आणि थंडगार बीअर

मिसळभोक्ता's picture

2 Mar 2010 - 11:01 pm | मिसळभोक्ता

भाविक घासकडवी शेट,

पूजा विसरलात.

> मला यापेक्षा जरा हातात न पकडता येण्यासारख्या गोष्टी लिहाव्याशा वाटतात

अच्छा, अच्छा.. मग चालू द्या.

(घासकडवीचा फ्यान)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

स्मृती's picture

5 Mar 2010 - 3:01 pm | स्मृती

अरे काय परफेक्ट आणि मस्त लिहिलंय घासकडवींनी! फारच आवडलं :)

पक्या's picture

2 Mar 2010 - 4:30 am | पक्या

कुटुंब (आई वडील, मुले, पत्नी , बहीण ..)
इंटरनेट
मोबाइल फोन
आवडते खाद्य पदार्थ , सुंदर गाढ झोप

जय महाराष्ट्र , जय मराठी !

शानबा५१२'s picture

2 Mar 2010 - 11:31 pm | शानबा५१२

कुटुंब
एकांत व internet दोन्ही PC आणि Mobile वर

गरज असेल त्यापेक्षा जास्त पैसा
मित्र (आवडते ).....हो नावडतेही आहेत.त्यांना दुखवायचे नाही म्हणून त्याच्याबरोबर राहतो(कधीतरी)
.

...बाकी सर्व अक्कलेने व पैशाने मिळवता येते

शानबा५१२'s picture

2 Mar 2010 - 11:35 pm | शानबा५१२

internetशिवाय PC आणि Mobile म्हणजे 'कुपोषण झालेला धष्ट्र्प्रुष्ट,जाडा मुलगा...........'

प्रशु's picture

6 Mar 2010 - 5:21 am | प्रशु

लोकल ट्रेन... (उपनगरीय रेल्वे गाड्या)...