चिली मधे भूकंप, त्सुनामीची भीती

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in काथ्याकूट
27 Feb 2010 - 9:07 pm
गाभा: 

सीएनेन ची बातमी :
http://www.cnn.com/2010/WORLD/americas/02/27/chile.quake/index.html?hpt=T1

जिवितहानीची आकडेवारी आणि अन्य बातम्या अजूनही हळुहळू येत आहेत. मृतांना श्रद्धांजली. जखमींबद्दल प्रार्थना.

पॅसिफिक बेसीनच्या प्रदेशामधे त्सुनामीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2010 - 9:39 pm | पिवळा डांबिस

आत्तापर्यंत १०० दगावल्याची बातमी आहे....
हैतीमध्ये झालेल्या भूकंपापेक्षा हा ७०० पट अधिक तीव्र आहे म्हणून सांगितलं...
हवाई बेटांना त्सुनामी नक्की हिट करणार....
कॅलिफोर्निया, ओरेगॉन आणि वॉशिंग्टन या राज्यांच्या किनार्‍यांना त्सुनामी वॉच लागू केलेला आहे.....

८.८ रिष्टर स्केल आहे. समुद्राच्या तळाशी झाल्यामुळे प्रचंड लाटा उठतील. होनुलुलू मध्ये एवॅक्युअशन साठी सर्व तयारी झाली आहे. अजून पाच तासात हवाईच्या किनार्‍याला त्सुनामी वेव पोचेल असा अंदाज आहे.

निसर्गापुढे आपण किती क्षुद्र असतो, हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं!

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

28 Feb 2010 - 2:54 pm | प्रकाश घाटपांडे

निसर्गापुढे आपण किती क्षुद्र असतो, हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं!

हेच म्हणतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर's picture

27 Feb 2010 - 11:05 pm | विसोबा खेचर

सर्व संबंधित सुखरूप जिवित रहावेत एवढीच प्रार्थना..

तात्या.

मृतांना श्रद्धांजली. जे धोक्यात आहेत त्यांच्या सुरक्षिततेबाबत अभीष्टचिंतन.

या ठिकाणी हवाई बेटांवरील सरकारचे धोरण काय असावे? अंतरराष्ट्रीय सागर-विज्ञान-संस्थांचे धोरण काय असावे?

त्सुनामीच्या लाटेची नेमकी उंची किती असणार त्याबद्दल अंदाज सारखे कमी-जास्त होत आहेत. कदाचित त्सुनामीच्या लाटेची उंची कही बेटांवरती खूप अधिक नसेल.

सरकार लोकांना किनार्‍यापासून दूर जाण्याचा सल्ला देत आहेत. जर त्सुनामीची लाट फार उंच आली नाही, तर सागर-विज्ञान संघटनांबद्दल लोकांचा विश्वास कमी होईल. मात्र लाटेची उंची किती असणार हे निश्चित होईस्तोवर लाट बेटांच्या खूप जवळ पोचलेली असेल. आणि तेव्हा "ती निश्चित फार उंच आहे" हे समजल्यास लोकांना दूर जाण्यासाठी पुरेसा वेळ देता येणार नाही. धोकाचा इशारा द्यावा की देऊ नये? नेमका केव्हा द्यावा?

लोक किनार्‍यापासून दूर जात असताना वाहातुक कंपन्यांचा खूप फायदा होऊ शकेल. हवाई-सरकारने आपत्कालीन सेवेत सर्व कामे थांबवून वाहातुक कंपन्यांनी इव्हॅक्युएशनचे काम करण्यास यावे, म्हणून आधीच करार केले असतील. त्सुनामीची लाट फार उंच आली नाही, आणि तरी खूप लोकांना दूर जायचा इशारा केला, तर वाहातुक कंपन्यांना नाहक फायदा झाल्याचे दिसून येईल.

जागतिक आरोग्य संघटना आणि काही सरकारांवर स्वाईन फ्लूबाबत अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत. त्यातून धडा घेऊन जागतिक संघटनांनी आणि हवाई राज्यसरकारांनी काय धोरण घ्यावे?
१. नेमकी कितपत शाश्वती असेपर्यंत लोकांना त्सुनामीच्या धोक्याबाबत इशारा देऊ नये?
२. वाहातुक कंपन्यांना काम सोडून लोकांना हलवण्याबाबत काय मोबदला द्यावा, याबद्दल आधीच करार करावेत का?

सुनील's picture

28 Feb 2010 - 11:37 am | सुनील

चुकीच्या इशार्‍यामुळे वाहतूक कंपन्यांना होऊ शकणारा नफा आणि वेळेवर योग्य तो सल्ला न पोचल्यामुळे जनतेची होऊ शकणारी हानी, यांचे कॉस्ट-बेनिफिट विश्लेषण झाले आहे काय?

तसे झाले नसल्यास, जनतेला सावधानतेचा आगाऊ इशारा देणे हे अधिक योग्य ठरावे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Feb 2010 - 12:03 am | बिपिन कार्यकर्ते

अरेरे!!! खूपच चिंताजनक बातमी. संभावित त्सुनामीच्या पट्ट्यात असणार्‍या लोकांबद्दल प्रार्थना...

बिपिन कार्यकर्ते

II विकास II's picture

28 Feb 2010 - 9:52 am | II विकास II

बापरे !!!, थोड्या, वेळापुर्वी बातमी पाहीली. ८.८ म्हणजे खुपच मोठा.
देव सगळ्यांचे रक्षण करो.

---
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

हीच प्रार्थना...

असे आणखी काही फोटो इथे.

वेताळ's picture

28 Feb 2010 - 12:09 pm | वेताळ

त्सुनामी आली का? लोक सुखरुप बाहेर पडले का?
वेताळ

अप्पा जोगळेकर's picture

28 Feb 2010 - 5:40 pm | अप्पा जोगळेकर

कोणाचे नातेवाईक किंवा आप्तस्वकीय तिथे असतील तर त्यांची क्षमा मागून -

आमचे असे मत आहे की भयंकर, अति भयंकर मनुष्यहानी व्हायला हवी. निदान भारतात तरी झाली पाहिजे. रोज डोंबिवली-कुर्ला किंवा तत्सम प्रवास करणार्‍यांना मी म्हणतो ते नक्कीच कळेल. किती ती माणसं. साला उबग येतो.

शुचि's picture

28 Feb 2010 - 8:33 pm | शुचि

अप्पा काय जीवघेणी थट्टा करताय? अहो जी मुलं उघड्यावर पड्तात त्यांचं काय? सर्वात जास्त व्हल्नरेबल ही लहान मुलं असतात जी "नराधमांच्या" हातात पडतात. वेश्या व्यवसायाला लागतात. आणि लोकसंख्येपेक्षा गलीच्छ , भयावह समस्या निर्माण होऊन बसतात. त्या बाळांच्या आई-वडीलांचे आत्मे तळमळत असतील ते वेगळच.
काय बोलाता आहात तुम्ही अप्पा? का माझी समजण्यात गल्लत होतेय????

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

प्रकाश घाटपांडे's picture

28 Feb 2010 - 9:20 pm | प्रकाश घाटपांडे

यात लोकसंख्येच्या विस्फोटा ला वैतागलेले लोक असा विचार करतात की एकदा अशी काही नैसर्गिक आपत्ती येवो व पृथ्वीवरचा भार हलका होवो. जेणे करुन उरलेल्यांना सुखाने जगता येईल असा काहीतरी भाबडा विचार त्यात असतो.
हा विचार असहाय्यतेतुन आलेला असतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

टारझन's picture

28 Feb 2010 - 9:58 pm | टारझन

आप्पा आणि षुची शी सहमत आहे ..

- चिप्पाटेंगळेकर

अप्पा जोगळेकर's picture

3 Mar 2010 - 2:28 pm | अप्पा जोगळेकर

टारझन,

असा विचार करतो आहे की 'चिप्पा टेंगळेकर' या नावाने देखील एक आयडी चालू करावा मिपावर. तुझे काय मत आहे.

अप्पा जोगळेकर's picture

28 Feb 2010 - 11:09 pm | अप्पा जोगळेकर

शुचिताई,

भारतापुरते बोलायचे झाले तर माझे असे मत आहे की आजची तरूण पिढी ( साधारण १९८० नंतर ज्यांचा जन्म झालेला आहे ते लोक. म्हणजेच मी स्वतः देखील) आणि त्यांच्या आईवडीलांची पिढी यांना फुकट स्वातंत्र्य मिळाल्यामुळे त्याची किंमत कळलेली नाही. युरोपीयन राष्ट्रे, अमेरिका, जपान यांनी पहिल्या आणि दुसर्‍या जागतिक युद्धाची जी भयंकर झळ अनुभवली त्याचा अपरिहार्य परिणाम त्यांच्यावर झालेला आहे. विशेषतः युरोपिअन राष्ट्रांमधली राष्ट्रीय वृत्ती जोपासली जाण्यासाठी या संकटांनी मोठाच हात दिला आहे. त्यांचे स्वतःचे कर्तृत्व आणि उद्यमशील वृत्ती या गोष्टी तर आहेतच.

भयंकर राष्ट्रीय संकटे कोसळतात तेंव्हा सगळी राष्ट्रे टिकतातच असे नाही. परंतु भारताचा पाच हजार वर्षांचा इतिहास असे सांगतो की टिकून राहण्याचे भारतीयांचे स्पिरिट असामान्य असे आहे. हे टिकून राहण्याचे कसब एकटे येत नाही. ते स्वतः बरोबर प्रचंड जडत्व आणि न बदलण्याची कर्मठ मानसिकता घेऊन येते. त्यामुळेच की काय आमची श्रद्धास्थाने, संसद, हॉटेल ताज सारखे मानबिंदू यांचे अस्तित्व धोक्यात आले तरी आम्ही पेटून उठत नाही. कारण हा जरी आमच्या अब्रूवरचा घाला असला तरी तो आमच्या अस्तित्वावरचा घाला नसतो. परंतु एखादा Catastrphe ही परिस्थिती बदलू शकेल असे मानण्यास जागा आहे. कारण असे आमच्या इतिहासात अनेकदा घडले आहे. शिवाय सृजनामधून संहार आणि संहारामधून सृजन हा चक्रमेनिक्रमाचा नियम आहे असे मी मानतॉ. भयंकर संकट ओढवण्यास हीच वेळ योग्य आहे असे ठरवणारा मी कोण असा आक्षेप कोणी घेत असेल तर त्याकरता माझ्याकडे समर्पक उत्तर नाही.

तुमची सहिष्णू प्रतिक्रिया अतिशय योग्य आहे परंतु स्थितप्रज्ञपणे आणि as a third party विचार केला तर माझे म्हणणे तुम्हांला पटू शकेल. असा स्थितप्रज्ञपणे विचार करणे हे काही अंशी क्रूरपणाचे लक्षण आहे हे मी मान्य करतॉ.

हा विचार असहाय्यतेतुन आलेला असतो.

प्रकाश साहेब,

एसीमधे बसून काम करणारी, वीकेन्डला पार्ट्या झोडणारी,लेख लिहिणारी माझ्यासारखी माणसे अगतिक आणि असहाय्य असतात काय? नाही. ती माजलेली असतात. आणखीन एक - मला स्वतःला या गर्दीचा कधी त्रास होत नाही. आम्ही सकाळी अकरा वाजता डोंबिवली स्टार्ट ट्रेनने हपिसात जात असतो आणि उशिरा येत असतो.

शाहरुख's picture

28 Feb 2010 - 11:25 pm | शाहरुख

अप्पा-जी, या राष्ट्र उभारणीच्या कॅटॅस्ट्रोफीमधे आपण स्वतःचे बलिदान करण्यास सज्ज आहात काय ?

शुचि's picture

1 Mar 2010 - 2:12 am | शुचि

>>सृजनामधून संहार आणि संहारामधून सृजन>>
मान्य यात एक अटळपणा आहे , अपरिहार्यता आहे. माणूस विवश आहे निर्मीती-स्थिती-लय या ३ चिरंतन तत्वांपुढे.

मान्य ढोरांसारखी लोकं दिसतात आपल्या देशात, ना कुणाला पर्सनल स्पेस मिळते ना सौजन्य. दैन्याच्या, दुर्देवाच्या भगभगीत दृष्यांनी ओरखडे उठतात मनावर. मन कठोर, संवेदनाहीन "करून" जगावं लागतं.

पण अप्पा, मन इतकं पाषाणासारखं करून कसं चालेल?
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

सुधीर काळे's picture

3 Mar 2010 - 11:15 am | सुधीर काळे

अप्पासाहेब,
तुम्ही इतके तरुण असाल असे नावावरून वाटले नव्हते. मला वाटले होते कीं तुम्ही 'मेरे उमरके नौजवान' असाल, पण तुम्ही तर खरेखुरे नौजवान निघालात!
"कंपल्सरी विषय" म्हणून शिकलेल्या इकॉनॉमिक्समधील माल्थससाहेबांची (Malthus) आठवण करून दिलीत. तोही अगदी हेच म्हणतो कीं लोकसंख्या फार झाली कीं युद्ध वगैरे होते व लोकसंख्या पुन्हा 'लाइनी'त येते.
पण मला तर अशा अघोरी उपायांपेक्षा कुटुंबनियोजन हा विकल्प जास्त पसंत आहे! शुचीताई म्हणतात तसे कर्ती माणसं जर अशा घटनांत दगावली तर मुलांचे व वृद्ध आई-वडिलांचे जे हाल होतात त्याला सीमाच नसते!
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)

अप्पा जोगळेकर's picture

3 Mar 2010 - 2:15 pm | अप्पा जोगळेकर

बाकी मलासुद्धा गंमत वाटत्येय की सगळे मला ५०-६० वर्षांचा प्रौढ माणूस समजत आहेत. म्हणजे प्रकाश घाटपांडेंच्यासारखा ज्येष्ठ माणूस देखील अप्पासाहेब वगैरे लिहितो तेंव्हा हसू आल्याशिवाय राहात नाही.

अप्पा जोगळेकर's picture

1 Mar 2010 - 10:00 am | अप्पा जोगळेकर

असा catastrophe ओढवला तर कोणाची आहुती पडेल हे ठरवणे आपल्या हातात आहे असे मला वाटत नाही. पुन्हा अशी हानी घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशा मताचा मी नाही. कारण त्यासाठी योग्य वेळ कोणती हे ठरविण्याचा अधिकार जगाचे नियंत्रण करणार्‍या कर्तुमकर्तुम शक्तीलाच आहे.

मी भयंकर संहाराबद्दल जे लिहिले ते (I wish मला मायक्रोसॉफ्टमध्ये जॉब मिळाला पाहिजे किंवा I wish मला एव्हरेस्टवर जाता आले पाहिजे) अशा पद्धतीचे hypothetical प्रकटन होते हे स्पष्ट करतो. बाकी माणसाची शक्ती constructive कामातच खर्च झाली पाहिजे यात वाद नाही.

आता लोकसंख्या कमी करण्यासाठी तुम्हीच प्रथम पुढाकार घ्या. घरीच एकादा छोटा बॉम्बस्फोट घडवुन आणा.
वेताळ

आता लोकसंख्या कमी करण्यासाठी तुम्हीच प्रथम पुढाकार घ्या. घरीच एकादा छोटा बॉम्बस्फोट घडवुन आणा.
वेताळ

अप्पा जोगळेकर's picture

1 Mar 2010 - 12:14 pm | अप्पा जोगळेकर

चालेल. चालेल. पत्ता द्या लवकर.

तात्या विंचु's picture

3 Mar 2010 - 2:55 am | तात्या विंचु

या भुकंपाने प्रुथ्वीचा आस ३ इंचाने कलला, त्यामुळे दिवस 1.26 milliseconds ने लहान झाला आहे.
http://www.msnbc.msn.com/id/35662192/ns/technology_and_science-space/

राजेश घासकडवी's picture

3 Mar 2010 - 3:08 am | राजेश घासकडवी

आधीच मिपावर पडीक राहाण्यासाठी झोप कमी केलीय, त्यात हे!

पण कदाचित त्यामुळे पृथ्वीला तेवढा कमी सूर्यप्रकाश मिळाल्याने ग्लोबल वार्मिंग तरी कमी होईल. बघा, निसर्गाला मानवाच्या चुका कशा निस्तराव्या लागतात, हे असले भूकंप वगैरे करून.

राजेश

शुचि's picture

3 Mar 2010 - 3:12 am | शुचि

एव्हरी क्लाऊड हॅज सिल्वर लाइनिंग तसं
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

शाहरुख's picture

3 Mar 2010 - 3:31 am | शाहरुख

पण कदाचित त्यामुळे पृथ्वीला तेवढा कमी सूर्यप्रकाश मिळाल्याने ग्लोबल वार्मिंग तरी कमी होईल

पृथ्वीला तेवढा कमी सूर्यप्रकाश मिळाला तर लायटी, बलं जास्त लावले जातील की..सूर्यप्रकाशाचे 'वॉर्मिंग' जास्त का बलाचे यावर उत्तर ठरेल.

झोप येत होती कचेरीत..म्हणून हा प्रतिसाद !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2010 - 9:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कदाचित त्यामुळे पृथ्वीला तेवढा कमी सूर्यप्रकाश मिळाल्याने ग्लोबल वार्मिंग तरी कमी होईल.

कसं काय? एका दिवसाची लांबी कमी झाली तरी रात्रीचीही लांबी कमी होणारच! समजा काही वर्षांचा अवधी घेतला तर त्यामधे पृथ्वीला मिळणारी ऊर्जा कशी कमी होईल? पृथ्वी सूर्यापासून लांब गेली तर गोष्ट वेगळी, पण हे भूकंपामुळे होणं मलातरी शक्य वाटत नाही.

आस कोणत्या दिशेत कलला हे ही पहाणं गरजेचं आहे. जर आसाचा २३ अंश हा कोन कमी झाला असेल तर ध्रुवप्रदेशांमधे जास्त दिवस हिवाळा टिकेल, ज्यामुळे हरितगृह परिणामांची तीव्रता कमी होऊ शकेल, पण कोन वाढला असेल उलटा परिणाम होऊ शकतो.
पृथ्वीच्या आसाचा कोन २२-२५.५ अंशामधे ७२००० वर्षांच्या चक्रात बदलत असतो.

थोडा छिद्रान्वेषीपणा: सदर लिंकप्रमाणे, आसाचा कोन 2.32 milliarcseconds ने बदलला आहे आणि दिवसांची लांबी 6.8 microseconds ने कमी झाली आहे.

अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

3 Mar 2010 - 10:57 am | प्रकाश घाटपांडे

पृथ्वीच्या आसाचा कोन २२-२५.५ अंशामधे ७२००० वर्षांच्या चक्रात बदलत असतो.

अधिक माहिती आवडेल. संपातबिंदुच्या परिभ्रमणाचा कालावधी ७२००० वर्षे आहे.इतकीच माहिती आहे.त्याचे बारकाईने विश्लेषण माहित नाही म्हणुन विचारतो.

थोडा छिद्रान्वेषीपणा: सदर लिंकप्रमाणे, आसाचा कोन 2.32 milliarcseconds ने बदलला आहे आणि दिवसांची लांबी 6.8 microseconds ने कमी झाली आहे.

या छिद्रान्वेषीपणामुळे आमच्या मनातील शंका परस्पर फिटली त्या बद्दल आभार
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

सुधीर काळे's picture

3 Mar 2010 - 11:06 am | सुधीर काळे

थोडक्यात पृथ्वी चक्क 'सरकली' म्हणायची!
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)

राजेश घासकडवी's picture

3 Mar 2010 - 10:18 am | राजेश घासकडवी

दिवसाची आणि रात्रींचीही लांबी कमी झाली तर जे दहा वर्षांनी व्हायचं ते अकरा वर्षांनी नाही का होणार?

तुमचे ते मिलीसेकंद अन् फिलीसेकंद आम्हाला काही कळत नाही. कमी झाला ना दिवस? मग झालं तर.

असं असलं तरी मला छिद्रान्वेषीपणा आवडतो, त्यामुळे एवढंच म्हणावंसं वाटतं की भूकंपामुळे पृथ्वी लांब जाऊ शकते - जर भूगर्भाच्या हालचालीमुळे तिचा गुरुत्वमध्य बदलला तर? विचार करा.

राजेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2010 - 1:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जर भूगर्भाच्या हालचालीमुळे तिचा गुरुत्वमध्य बदलला तर?

गुरूत्वमध्य बदलू शकेल, पण त्यामुळे सूर्य आणि पृथ्वी या जोडगोळीचा गुरूत्वमध्य बदलणार नाही. कारण सूर्य पृथ्वीपेक्षा बराच जास्त 'जड' आहे. दिवसाची लांबी कमी-जास्त होईल ती पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग जास्त-कमी झाल्यामुळे!

समजा २४ तासांऐवजी दिवस २३ तासांचा झाला (होणार नाही, झोपेची काळजी करत झोप उडवून घेऊ नये ;-) ) तरीही एका वर्षात पृथ्वीला जेवढी ऊर्जा सूर्याकडून मिळते तेवढीच मिळेल ना? कारण ३६५ दिवसांऐवजी थोडे जास्त दिवस (किती होतील याचं गणित कोण करणार?) एका वर्षात येतील, पण रात्रीही तेवढ्याच येणार ना?

पृथ्वीला सूर्याकडून मिळणारी ऊर्जा ही पृथ्वी-सूर्य अंतरावर अवलंबून आहे, पृथ्वी स्वतःभोवती किती वेळात फिरते यावर नाही.

(वरच्या प्रकाशकाकांच्या प्रतिसादाला उत्तरः)
संपात बिंदू दर २६००० वर्षांनी एक चक्र पूर्ण करतो कारण पृथ्वीची परांचन गती. पृथ्वीचा आस एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. याशिवाय संपात बिंदू सरकण्यामधे दुसरी गती असते ती म्हणजे न्यूटेशन; यामुळे ७२००० वर्षांमधे आसाच्या कोनाचं (हा कोन आत्ता २३.५ अंश आहे) एक चक्र पूर्ण होतं.

अदिती

राजेश घासकडवी's picture

3 Mar 2010 - 2:27 pm | राजेश घासकडवी

दिवसाची आणि रात्रींचीही लांबी कमी झाली तर जे दहा वर्षांनी व्हायचं ते अकरा वर्षांनी नाही का होणार?

हा विनोदाचा भाग होता - त्यात एक वर्ष म्हणजे ३६५ दिवस म्हणून मी फूटपट्टी बदलली होती. वर्षातले सेकंद तितकेच राहिले हे बरोबरच...

भूगर्भाच्या हालचालीमुळे गुरुत्वमध्य पृथ्वीच्या केंद्गासापेक्ष जर बदलला, पण तो सध्याच्या कक्षेच्या 'पलिकडे' जाऊ शकेल. याचा अर्थ ती कक्षा वर्तुळाकार (आत्ता आहे असं गृहित धरू) न राहाता लंबवर्तुळाकार होईल. तसं झालं तर सूर्याजवळ ती वेगाने फिरेल व सूर्यापासून लांब ती जास्त वेळ राहील. त्यामुळे उष्णता कमी होईल. सूर्य 'जड' ने फरक पडत नाही कारण आपण मायक्रोसेकंदांच्या गोष्टी करतोय.

(या तर्कात एक छोटीशी गोची आहे:-) )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2010 - 2:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भूगर्भाच्या हालचालीमुळे गुरुत्वमध्य पृथ्वीच्या केंद्गासापेक्ष जर बदलला, पण तो सध्याच्या कक्षेच्या 'पलिकडे' जाऊ शकेल.

पृथ्वीचा गुरूत्वमध्य बदलला यामधे आपण (किमान) दोन गोष्टी गृहीत धरल्या आहेत पृथ्वीचा आकार गोल नाही (जे बरोबर आहे) आणि पृथ्वीवर वस्तूमानाची विभागणी रेडिअली सिमेट्रीक (मराठी शब्द?) नाही (हे ही बरोबर असावं). पण याचा पृथ्वीच्या कक्षेशी कितीसा संबंध आहे?
कारण पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं हे फक्त पृथ्वीसंदर्भात नसून, सूर्याचाही त्यात समावेश आहे. थोड्याफार प्रमाणात, मायक्रोसेकंदांच्या पातळीवर गुरूचा समावेश आहे.

याउलट चंद्र-पृथ्वी या सिस्टममधे, चंद्राच्या बाबतीत बदल झाले तर मात्र फरक पडण्याची शक्यता आहे.

तशीही पृथ्वीची कक्षा लंबवर्तुळाकार आहे, आणि पृथ्वी जानेवारीत जेव्हा सूर्याजवळ असते तेव्हा वेगाने फिरते; म्हणूनच उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस जरी २२ डिसेंबरला असला तरीही सूर्योदय सर्वात उशीरा आणि सूर्यास्त सर्वात लवकर २ डिसेंबरला होत नाहीत.

अदिती

राजेश घासकडवी's picture

3 Mar 2010 - 3:10 pm | राजेश घासकडवी

गुरुत्वमध्य 'बदलेल' हे गृहीतकच चूक आहे. कारण आंतर्गत बलाने तो बदलत नाही. बाह्य बल लागतं. तो बदलू दिला तर काय वाटेल ते होऊ शकतं कारण बाह्य बलाने पृथ्वी लांब जाऊ शकते. आत कितीही उलाढाल्या झाल्या तरी क्रिया-प्रतिक्रियेमुळे गुरुत्वमध्य सूर्यसापेक्ष तिथेच राहाणार, आणि कक्षा बदलणार नाही. म्हणून तुमचं बरोबर आहे, ग्लोबल वॉर्मिंग काही टळणार नाही.

पृथ्वीची स्वत:भोवती फिरण्याची गती बदलू शकते कारण गुरुत्वमध्य तेच असलं तरी मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो...

पारंबीचा भापू's picture

3 Mar 2010 - 10:32 am | पारंबीचा भापू

आज ऐकले की चिलीमधल्या ८.८वाल्या भूकंपातल्या मृतांची संख्या १००० ला पोचली! पण हेतीतल्या ७वाल्या भूकंपात दोन लाख मृत्यू पावले. फारच फरक वाटतो.
भापू